आधार कार्ड डाउनलोड कसे करायचे? जाणून घ्या 7 सोप्या Steps

आधार कार्ड डाउनलोड करायचे: आधार कार्ड हा भारतीय लोकांसाठी सर्वात महत्त्वाच्या दस्तऐवजांपैकी एक आहे. आधार ही आपली ओळख आहे आणि आपण भारत देशाचे नागरिक आहोत याचे हे प्रमाण आहे. आपल्या दैनंदिन जीवनात याचा उपयोग आपण आपले आयडेंटिटी प्रूफ म्हणून करतो.

जवळपास सर्व सरकारी कार्यालयात, बँकेत आणि इतरही आपले आधार कार्ड आपण ओळखपत्र म्हणून वापरतो आणि ते ग्राह्य सुद्धा धरले जाते. त्यामुळे आपल्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.

आपल्यापैकी बहुतेक प्रत्येक व्यक्तीकडे Aadhar card असतेच पण काही कारणास्तव जर आपले आधार हरवले असेल , गहाळ झाले असेल किंवा डॅमेग झाले असेल तर आपल्याला ते पुन्हा ऑनलाईन आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करता येते आणि त्याची प्रिंट सुद्धा काढता येते. चला मग जाणून घेऊया की आधार कार्ड कसे डाउनलोड करावे?

आधार कार्डची सुरुवात

केंद्र सरकारच्या नियोजन मंडळांतर्गत जानेवारी 2009 मध्ये Unique Identification Authority of India या प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली. 29 सप्टेंबर 2010 ला आधार योजनेअंतर्गत पहिल्या क्रमांकाचे वितरण महाराष्ट्रातल्या नंदुरबार जिल्ह्यातल्या टेंभली गावातल्या रंजना सोनवणे या महिलेला करण्यात आले. व ते देशातील पहिले आधार कार्ड मिळवणारे गाव ठरले .

तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग, United Progressive Democratic Alliance च्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि UIDAI चे तत्कालीन चेअरमन नंदन निलेकणी यांच्या उपस्थितीत आधार कार्डचे विमोचन करण्यात आले.

आधार क्रमांक नोंदणी व या क्रमाकांचा विविध योजना तसेच खात्यामध्ये वापर करण्यासाठी प्राधिकरणाने 35 राज्ये-केंद्रशासित प्रदेश तसेच मानव संसाधन विकास मंत्रालय ,सार्वजनिक बॅंका . एल.आय.सी, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ या सर्व मुख्य संस्थाबरोबर करार केले आहेत. विविध बॅंका ,खाते व मंत्रालयानी टप्याटप्याने त्यांच्या योजना किंवा कार्यक्रमांसाठी ओळखपत्र म्हणून व पत्याचा दाखला म्हणून आधार कार्ड वापरण्यास परवानगी दिली आहे.

15 फेबुवारी 2016 पर्यंत सुमारे 97.69 कोटी आधार क्रमांक किंवा कार्ड वितरीत करण्यात आले आहेत म्हणजे साधारणत: 75.8% लोकापर्यंत ही योजना पोहचली आहे. भारतीय आर्थिक पाहणी अहवाल 2015-16 नुसार 6 थेट लाभ हस्तातंर योजनांमध्ये आधार योजनेने महत्त्वाची भूमिका बजावली आहे

एलपीजी सबसिडी वितरणात 54.96% , मनानरेगा योजनेत 54.10%, जन धन योजनेत 42.45%, सार्वजनिक वितरण व्यवस्थेत 38.96%, राष्ट्रीय सामाजिक साहाय्यता योजनेत 24.31%व कामगार भविष्यनिर्वाह निधी योजनेत 17.55% माहिती आधार क्रमांकाशी जोडली गेली आहे.जनधन -आधार -मोबाइल या त्रिसूत्रीमधला आधार हा सर्वात मोठा आधारस्तंभ आहे.

आधार कार्डचे महत्व

ही जगातली सर्वात मोठी biometric identification योजना आहे. भारतीय रहिवाशांसाठी असलेल्या या योजनेचे नियंत्रण केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या आधिपत्त्याखालील Unique Identification Authority of India (UIDAI) या प्राधिकरणामार्फत केले जाते. आधार कायदा 2016 अनुसार या योजनेला वैधानिक पाठबळ प्राप्त आहे.

सामाजिक सुरक्षितताविषयक आणि सरकारी मदतीच्या योजनांच्या लाभार्थ्यांची ओळख पटविण्यासाठी त्याचप्रमाणे सरकारशी संबंधित सर्व व्यवहारांमध्ये व्यक्तींची ओळख पटविण्यासाठी हा क्रमांक वापरण्यात येत आहे. केंद्र सरकारतर्फे अनेकविध सेवा जसे की बॅंकांतील खाती, मोबाईल सीमाकार्डे, कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी योजना, सार्वजनिक वितरणव्यवस्था इत्यांदीच्या खात्यांशी आधार संलग्न करण्यास आग्रह धरण्यात येत आहे.

या योजनेअंतर्गत भारतातील 1 अब्ज 20 कोटींवर लोकांचे आधार क्रमांक तयार करण्यात आले आहेत. आधारअंतर्गत भारतातील व्यक्तींना त्यांनी पुरविलेल्या बायोमेट्रिक आणि अन्य तपशीलाच्या अद्वितीयतेच्या आधारावर एक 12 अंकी क्रमांक दिला जातो.

आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी आवश्यक गोष्टी

आधार कार्ड डाउनलोड
Image Source UIDAI

आपल्याला आधार कार्ड आपल्या मोबाईल किंवा कॉम्पुटरमध्ये डाउनलोड करण्यासाठी काही गोष्टी आवश्यक आहे त्या पुढील प्रमाणे.

  • आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुमचा मोबाईल क्रमांक आधारशी लिंक असायला हवा.
  • तुम्हाला तुमचा आधार क्रमांक माहित असावा.

या दोन गोष्टीची जर तुम्ही पूर्तता केली तर सहजपणे तुम्ही तुमचे आधार कार्ड डाउनलोड करू शकता. कसे ते आपण Step-by-Step जाणून घेऊया.

आधार क्रमांकाचा वापर करून आधार कार्ड कसे डाउनलोड करावे

आधार कार्ड डाउनलोड करण्याचे बरेचसे मार्ग आहेत त्याबद्दल आपण एक-एक सविस्तररित्या जाणून घेऊ. जेणेकरून तुम्ही सहजपणे आधार कार्ड डाउनलोड करू शकाल.

  1. सर्वप्रथम तुम्ही Unique Identification Authority of India (UIDAI) च्या अधिकृत वेबसाइट वर जा.

2. UIDAI वेबसाइटच्या Home पेज वर My Aadhaar वर क्लिक करा.

3. My Aadhaar वर क्लिक केल्यास तुम्हाला Download Aadhaar चा ऑप्शन दिसेल तिथे क्लिक करा.

4. एक नवीन पेज open होईल, तिथे I have सेक्शन मध्ये Aadhaar Number वर क्लिक करा.

5. खाली तुमचा 12 अंकी आधार क्रमांक एंटर करा.

6. खाली Masked Aadhaar साठी चेक-बॉक्स दिला आहे, जर तुम्हाला तुमचा आधार Hide करायचा असेल तर त्यावर क्लिक करा अन्यथा आवश्यकता नाही.

7. खाली तुम्हाला Captcha चित्र दिसेल त्याला fill करा.

8. खाली Send OTP बटनावर क्लिक करा.

9. तुमच्या मोबाईल वर OTP आला असेल, तो टाका.

10. तुम्हाला एक आधार कार्डचा सर्वे दिसेल, त्यात कुठलंही उत्तर Select करा.

11. आता Verify & Download वर क्लिक करा, तुमचे आधार कार्ड डाउनलोड व्हायला सुरुवात झाली.

Enrollment ID द्वारे आधार कार्ड कसे डाउनलोड करावे

आधार कार्ड बनवण्यासाठी किंवा नावात बदल, जन्मतारीख बदल, मोबाईल क्रमांक बदल करण्यासाठी जेंव्हा आपण अर्ज करतो तेंव्हा आपल्याला आधार केंद्राकडून एक पावती मिळते. ज्यावर 14 डिजिटचा एक Enrollment ID मिळतो.

जर तुम्ही तुमचा आधार क्रमांक विसरला असाल तर या Enrollment ID मार्फत तुम्ही तुमचे आधार कार्ड डाउनलोड करू शकता. कसे? चला जाणून घेऊया!

  1. UIDAI वेबसाईट वर जा.

2. Download Aadhaar च्या ऑप्शन वर क्लिक करा.

3. एक नवीन पेज Open होईल, तिथे I have Enrollment ID च्या ऑप्शन वर क्लिक करा.

4. खाली दिलेल्या कॉलम मध्ये तुमचा 14 अंकी Enrollment ID टाका.

5. त्याच्या खाली तुम्हाला Date & Time एंटर करण्याचा ऑप्शन असेल, तिथे पावतीवर नोंद असलेली तारीख आणि वेळ अचूक भरा.

6. खाली एक चित्र दिसेल, त्यातला Captcha Code अचूक भरा आणि Send OTP वर क्लिक करा.

7. तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक OTP आला असेल तो टाईप करा.

8. Download Aadhaar च्या पर्यायावर क्लिक करा.

9. काही सेकंदात तुमचे आधार कार्ड डाउनलोड झालेले असेल.

आधार कार्ड डाउनलोड केल्यानंतर पासवर्ड काय टाकावा

आता तुम्ही तुमचे आधार कार्ड डाउनलोड केले आहे पण तुम्ही ती फाईल उखडण्याचा प्रयत्न केल्यास तुम्हाला Screen वर पासवर्ड Enter करावा लागेल.

हा पासवर्ड तुमच्या Date Of Birth (जन्मतारीख) पासूनच बनलेला असतो. ज्यात तुमच्या नावाचे पहिले इंग्रजी 4 कॅरेक्टर कॅपिटल असतात. समजा तुमचे नाव Sachin आहे आणि तुमचा जन्म 1990 साली झाला आहे तर तुमचा पासवर्ड असणार SACH1990.

नाव किंवा जन्म-तारखे नुसार आधार कार्ड कसे डाउनलोड करावे

समजा जर तुमचा आधार क्रमांक तुम्ही विसरला आणि तुमची Enrollment ID असणारी पावती सुद्धा हरवली तर तुम्ही तुमच्या जन्म-तारखे नुसार आधार कार्ड डाउनलोड करू शकता.

या पर्यायाचा वापर करून तुम्ही मोबाईल वर तुमचा आधार क्रमांक मिळवू शकता आणि मग आधार क्रमांकावरून तुमचे आधार कार्ड डाउनलोड करू शकता. तर नेमकी कशी आहे ही प्रक्रिया चला समजून घेऊया!

  1. UIDAI वेबसाइट वर जा.

2. इथे तुम्हाला एक फॉर्म दिसेल ज्यात तुम्हाला काही डिटेल्स भरावे लागतील. तुमचा आधार क्रमांक तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळवायचा असेल तर आधी Aadhar Number च्या ऑप्शनवर क्लिक करा.

3. तुमचं संपूर्ण नाव इथे टाका, जसं तुमच्या आधार कार्ड वर छापील आहे तसं.

4. खाली एका कॉलम मध्ये तुमचा मोबाईल क्रमांक किंवा ईमेल-आयडी यापैकी एक टाका.

5. Captcha भरण्यासाठी खाली एक चित्र असेल त्यात बघून अचूक Captcha टाईप करा.

6. Send OTP च्या बटनावर क्लिक करा.

7. तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक OTP मॅसेज येईल OTP तो तिथे एंटर करा.

8. खाली Login बटनावर क्लिक करा.

9. Login करताच तुमच्या मोबाईल वर तुमचा आधार कार्ड क्रमांक पाठवण्यात येईल.

आता तुम्हाला तुमचा आधार क्रमांक उपलब्ध झाला आहे. आधार क्रमांकाद्वारे तुम्ही वरचे पर्याय वापरून आधार कार्ड डाउनलोड करू शकता.

विना आधार-क्रमांक आधार कार्ड कसे डाउनलोड करावे

सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जर तुम्हाला विना आधार क्रमांकाचे आधार कार्ड डाउनलोड करायचे असेल तर Masked Aadhaar Card ऑनलाईन डाउनलोड करून त्याची प्रिंट-आऊट काढू शकता. चला तर मग समजून घेऊया कि विना आधार क्रमांक आधार कार्ड कसे डाउनलोड करावे.

  1. UIDAI वेबसाइट वर जा.

2. My Aadhaar वर क्लीक करून Download Aadhaar च्या ऑप्शनवर क्लीक करा.

3. तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाका.

4. खाली Masked Aadhaar चा एक चेक-बॉक्स दिला असेल तिथे क्लीक करा.

5. Captcha वेरिफाई करा.

6. Send OTP बटनावर क्लीक करा.

7. तुमच्या मोबाईल वर OTP आला असेल, तो एंटर करा.

8. Download Aadhaar वर क्लीक करा, काही सेकंदात तुमचा Masked Aadhaar डाउनलोड होईल.

विना मोबाईल नंबर आधार कार्ड कसे डाउनलोड करावे

वर्तमान काळात तुम्हाला जर तुमचे आधार कार्ड डाउनलोड करायचे असेल तर तुमचा मोबाईल नंबर आधारशी लिंक असणे अनिवार्य आहे. जर नसेल तर तुम्ही आधार कार्ड डाउनलोड करू शकत नाही.

  1. आधारशी मोबाईल नंबर जोडण्यासाठी अधिकृत आधार केंद्रावर जावे.

2. आधारशी मोबाईल नंबर लिंक करायला एक फॉर्म मिळतो, तो भरावा त्यात तुमचा वैयक्तिक मोबाईल नंबर भरा.

6. त्याच बरोबर बायोमेट्रिक ऑथेंटीकेशन साठी तुमच्या डोळ्यांचे व बोटांचे ठसे अपडेट करून घ्या.

7. तुमच्या कडून ५० रु. फी आकारण्यात येईल आणि तुम्हाला Enrollment ID असलेली पावती देण्यात येईल.

8. 15 ते 30 दिवसात तुमचा मोबाईल नंबर आधार कार्ड शी लिंक झाला असेल. आता आधार क्रमांकाद्वारे तुम्ही वरील पर्याय वापरून तुमचे आधार कार्ड डाउनलोड करू शकता.

तात्पर्य

मला आशा आहे की तुम्हाला माझा हा लेख आधार कार्ड डाउनलोड करायचे? आवडला असेल. माझा नेहमी प्रामाणिक प्रयत्न असतो की सखोल अभ्यास करून लेख लिहावा जेणे करून तुम्हाला माहितीसाठी इतर बेवसाईट शोधण्याची गरज पडणार नाही.

तुमच्या मित्रांना, परिवाराला, नातेवाईकांना ज्यांना-कुणाला आधार कार्ड अपडेट करायचे असेल तसेच ब्लॉगिंग विषयी उत्सुकता असेल, ब्लॉग बनवायचा असेल, ब्लॉगिंग करून खूप पैसे कमवायचे असतील त्यांना हा लेख share करा.

because sharing is caring ❤️

Share on:

1 thought on “आधार कार्ड डाउनलोड कसे करायचे? जाणून घ्या 7 सोप्या Steps”

Leave a Comment