asap meaning in marathi, asap full form in marathi त्याच बरोबर LOL, TOS, BTW, FLY ROFL, WTF यांचे full form मराठी भाषेत काय आहेत?
सोशल नेटवर्किंग साईट्स वर असे शब्द जगभरात सर्रास वापरले जात आहेत. पण का? गरज काय? असा प्रश्न तुम्हाला कधीतरी पडला असेलच? तर चला समजून घेऊया!
वेगवान चालणार्या व्यापक तंत्रज्ञानाच्या या आभासी जगात वर्तमान काळात आम्हाला खरा मित्र आणि नातेवाईकांशी बोलण्याची किंवा त्यांच्याबरोबर वेळ घालवण्याची फुरसत नसते. याला कारण आहे, आपणच बनवलेली आपली आजची ही अतिव्यस्त जीवनशैली.

तरीही कुणाबरोबर संवाद साधायची वेळ आलीच किंवा चॅट करण्याची वेळ आली तर त्यातही आपण पूर्ण वाक्य लिहिण्याच्या समस्येवर तोडगा काढला आहे. खासकरून तरुणांनी त्यांची शैली म्हणून ASAP, LOL, TOS, BTW, FLY असे संक्षेप वापरतात.
- खरंच OK चा काही फुल फॉर्म होतो का?
- व्हॉट्सअॅपवरुन पैसे पाठविण्याची आणि प्राप्त करण्याची step by step प्रक्रिया जाणून घ्या
याला आपण संकेताक्षरे (abbreviation)असे म्हणू शकतो. प्रत्येक तरुण पिढी स्वतःचे शब्दकोष आणि त्यांचे अर्थ, शब्दलेखन आणि वापरायचे स्वतःचे मार्ग, त्यांच्या स्वत: च्या मर्जीने मस्त आणि स्टाइलिश बनण्यासाठी असे short-forms बनवत असतात आणि त्याचा वापर करत असतात.
ASAP चा फुल-फॉर्म काय आहे?
उदाहरणार्थ:
टेलिफोनिक संभाषणात, ग्राहक आपल्या पुरवठादारास विनंती करतो की शक्य तितक्या लवकर 100 पॅकेट्स पाठवा.
पुरवठादार: GM Sir! मी तुम्हाला कशी मदत करू शकते?
ग्राहकः PLZ मला शक्य तितक्या लवकर माझ्या दुकानात 100 पाकिटे वितरित करा.
पुरवठादार: नक्की सर. ASAP! (As Soon As Possible)= शक्य तितक्या लवकर
ASAP शब्दाचे काही प्रयोग
- I will complete the assignment ASAP.
- I want 200 packets delivered to my office, ASAP.
- I need a response ASAP.
अजय देवगणचा सिंघम हा आपल्यापैकी प्रत्येकानेच पहिला असेल आणि त्यातला हा सीन जेंव्हा जयकांत शिक्रे पहिल्यांदा अजय देवगनच्या गावी पोलीस स्टेशन मध्ये येतो. आणि मग तो प्रसिद्ध डायलॉग (अभी के अभी) होय यालाच social networking साईट्स वर ASAP! म्हटल्या जाते. लवकरात लवकर=आताच्या आताचं.
जे लोक सोशल नेटवर्किंग साइट्सवर चॅट करण्याच्या विश्वात नवीन आहेत, त्यांच्यासाठी हा संक्षिप्त अर्थ समजण्यापलीकडे आहे कारण ASAP, LOL, TOS, BTW, FLY हे short-forms त्यांच्या दैनंदिन जीवनात संभाषण आणि संवादांमध्ये वापरले जात नाहीत. मग त्यांचा गोंधळ होणे साहजिक आहे.
म्हणूनच आज आपल्यातील प्रत्येकाने ही संकेताक्षरे शिकून घेणे त्यांचे अर्थ समजून घेणे गरजेचे आहे. जग पुढे जात असतांना आपण मागे पडायला नको. त्यासाठीच मी आज तुम्हाला ASAP, LOL, TOS, BTW, FLY आणि 50+ संकेताक्षरांचे Full-Form तुम्हाला सांगणार आहे.
अचूक short-forms वारंवार वापरल्याने आपल्या गप्पांमध्ये रंगत येऊ शकते. संकेताक्षरे च्या वाढत्या मागणीचे आणखी एक कारण असे आहे की यामुळे आपल्यास दीर्घ वाक्य टाइप करण्याचा बराच वेळ वाचतो आणि आपल्याला fast टाइप करण्यास मदत होते.
ASAP, LOL, TOS, BTW, FLY आणि 50+ संकेताक्षरांची उत्पत्ती
भाषाशास्त्र तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, एका विद्यापीठाच्या प्राध्यापकाने आपल्या विध्यार्थ्यांना शिकवत असतांना ASAP, LOL, TOS, BTW, FLY आणि 50+ संकेताक्षरे तयार केली. जेणेकरून त्यामुळे स्वतःचा आणि त्यांच्या विद्यार्थ्यांचा वेळ वाचावा.
WeAreSocial.com.au चे मॅनेजिंग डायरेक्टर ज्युलियन वॉर्ड म्हणतात की, ILY (I Love You) पासून ते अधिक WTF ( What The F***) पर्यंतचे वेगवेगळे short-forms आता जगभर सामान्य आहेत.
- ब्लॉगसाठी एक उत्कृष्ट Domain Name कसे निवडावे?
- how to use Google Keyword Planner in 2021 मराठीत माहिती घ्या.
social listening aids चा वापर करून, WeAreSocial.com.au यांनी 1 एप्रिल ते 30 जून 2019 दरम्यान ट्विटरवर ऑस्ट्रेलियन लोकांनी वापरलेल्या ट्रेंडिंग शब्दांचे परीक्षण केले.
त्यात पहिल्या क्रमांकावर संकेताक्षर आस्ट्रेलिअन लोकांनी सोशल मीडियावर वापरलं ते होतं ते LOL. याचा वापर दोन महिन्यात तब्बल 1,242,935 वेळा केला गेला. सोशल मीडियावर आपला वेळ वाचवण्यासाठी युसर्स अश्या अनेक युक्त्या लढवीत असतात.
LOL, OMG and ILY: 60 of the dominating abbreviations
WTF, BTW, ROFL आणि IMO
- LOL: Laugh out loud
- OMG: Oh my god
- ILY: I love you
- LMAO: Laughing my a** off
- WTF: What the f***?
- PPL: People
- IDK: I don’t know?
- TBH: To be honest
- BTW: By the way
- THX: Thanks
- SMH: Shaking my head
- FFS: For f***’s sake
- AMA: Ask me anything
- FML: F*** my life
- TBT: Throwback Thursday
- JK: Just kidding
- IMO: In my opinion
- YOLO: You only live once
- ROFL: Rolling on the floor laughing
- MCM: Mancrush Monday
STFU, BFF, TXT आणि GTFO
- IKR: I know right?
- FYI: For your information
- BRB: Be right back
- GG: Good game
- IDC: I don’t care
- TGIF: Thank God it’s Friday
- NSFW: Not safe for work
- ICYMI: In case you missed it
- STFU: Shut the f*** up
- WCW: Womancrush Wednesday
- IRL: In real life
- BFF: Best friends forever
- OOTD: Outfit of the day
- FTW: For the win
- Txt: Text
- HMU: Hit me up
- HBD: Happy birthday
- TMI: Too much information
- NM: Not much
- GTFO: Get the f*** out
FBF, OMW, LMK आणि TTYN
- NVM: Nevermind
- DGAF: Don’t give a f***
- FBF: Flashback Friday
- DTF: Down to f***
- FOMO: Fear of missing out
- SMFH: Shaking my f***ing head
- OMW: On my way
- POTD: Photo of the day
- LMS: Like my status
- GTG: Got to go
- ROFLMAO: Rolling on floor laughing my a*** off
- TTYL: Talk to you later
- AFAIK: As far as I know
- LMK: Let me know
- PTFO: Passed the f*** out
- SFW: Safe for work
- HMB: Hit me back
- TTYS: Talk to you soon
- FBO: Facebook Official
- TTYN: Talk to you never
(*Provided by wearesocial.com.au) यांचे आभार!
ASAP, LOL, TOS, BTW, FLY आणि 50+ संक्षेपांचे Full-Form आज आपण शिकलो आहोत. मग आता त्याचा पुरेपूर फायदा घ्या तुमचा मित्र जर यातील काही संकेताक्षरे टाईप करून जास्तचं शायनींग मारत असेल तर वरचे 50+ संकेताक्षर पाठ करून त्याच्या तोंडावर मारा! 😅
तुम्ही आणखी कोणती नवीन संकेताक्षरे आपल्या दैनंदिन जीवनात वापरता मला खाली कमेंट-बॉक्स मध्ये share करा.
ज्यांना-कुणाला ब्लॉगिंग विषयी उत्सुकता असेल, ब्लॉग बनवायचा असेल, ब्लॉगिंग करून खूप पैसे कमवायचे असतील त्यांना माझ्या या ब्लॉगचा पत्ता द्या. हा लेख जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांना नक्की share करा.
because sharing is caring ❤️