birthday wishes in marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

birthday wishes in marathi : वाढदिवस हा प्रत्येकासाठी खूप खास दिवस असतो. प्रत्येकाच्या आयुष्यात या दिवसाला खूप महत्व असतं आणि त्या दिवशी तुम्ही आपल्या आवडत्या व्यक्तीला शुभेच्छा संदेश पाठवला तर मग क्या ही बात हैं!

वाढदिवस साजरा करणे ही परंपरा आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवणे व वाढदिवस जल्लोषात साजरा करणे ही आता काळाची गरज बनून गेली आहे. जन्मदिनी वाढदिवसाच्या शुभेच्छा प्राप्त करणे हे कुणासाठीही खूप सुखावह असते.

आपल्या मित्रांना आणि कुटुंबाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतांना त्यात एक प्रेमाची व आपुलकीची भावना असते या दिवशी आपण त्या व्यक्तीला सांगायचे असते कि तू आमच्या साठी किती स्पेशल आहेस, तुझं असणं आमच्यासाठी जरूरी आहे.

आणि म्हणून आज मी तुम्हाला तुमच्या भावना “happy birthday wishes in marathi” व्यक्त करण्यासाठी खूप सारे birthday wishes in marathi येथे देत आहे, यांचा बिनधास्त वापर करा आणि आपल्या प्रिय व्यक्तीचा वाढदिवस त्याला हार्दिक शुभेच्छा पाठवून आनंदात साजरा करा.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा birthday wishes in marathi

येणारा प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्यात भरभरून यश आणि आनंद घेऊन येवो देवाकडे एवढीच प्रार्थना आहे की तुम्हाला आयुष्यात, वैभव, प्रगती,आरोग्य, प्रसिद्धी आणि समृद्धी मिळावी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे तुला दिर्घ आयुष्य लाभो हिच वाढदिवसाची हार्दिक शुभेच्छा

आजचा वाढदिवस अनमोल असावा,जीवनाच्या शिंपल्यात मोत्यापरी जपावा, इंद्रधनुचे सप्तरंग बहरत यावे.आपल्याला चांगले आरोग्य सुखसमृध्दी दिर्घ आयुष्य लाभो. हिच सदिच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुमच्या मनातील सर्व स्वप्न पूर्ण होऊ दे आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होउ दे तुमच्या सर्व प्रयत्नाना यश मिळू दे हीच ईशवर चरणी प्रार्थना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

व्हावास तू शतायुषी
व्हावास तू दीर्घायुषीही
एक माझी इच्छा तुझ्या
भावी जीवनासाठी!
वाढदिवसाच्या शुभेच्छा !

समुद्राचे सर्व मोती, तुमच्या नशिबी राहो तुझ्यावर प्रेम करणारे सर्वजण तुझ्या सोबत असो देवाकडे एवढीच प्रार्थना करतो कि तू नेहमी यशाच्या शिखरावर जात राहो !तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा !

संकल्प असावेत नवे तुमचे.. मिळाव्या त्यांना नव्या दिशा.. प्रत्येक स्वप्न व्हावे पुर्ण तुमचे.. हयाच वाढदिवसाच्या शुभेच्छा !

वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा !!!
आज तुझा वाढदिवस,
लाख लाख शुभेच्या ज्या ज्या
अपेक्षितल्या,
त्या त्या पूर्ण होवोत इच्छा
भावी आयुष्य आणि प्रगतीसाठी
मनापासून शुभेच्छा…

लखलखते तारे सळसळते वारे, फुलणारी फुले इंद्रधनुष्याची झुले, तुझ्यासाठीच उठले आज हे पक्षी सारे.. वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा!!!

आपल्या वाढदिवसाच्या शुभ क्षणी देवाकडे एकच प्रार्थना आहे की आपली सर्व स्वप्ने साकार व्हावी आजचा वाढदिवस तुमच्या आयुष्यातील एक अनमोल आठवण रहावी आणि त्या आठवणीने तुमचं आयुष्य अधिकाधिक सुंदर बनाव .. तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा !

नेहमी आनंदी रहा कधी दुःख तुमच्या वाट्याला येऊ नये समुद्रासारखी खोल तुमची ख्याती व्हावी आणि आभाळाएवढं हृदय व्हावं..वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे..मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे ! तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

उगवता सूर्य तुम्हाला प्रखर तेज देवो, उगवणाऱ्या प्रत्येक फुलांनी तुमच्या आयुष्यात गंध भरावा, ईश्वर तुम्हाला सर्व सुख आणि अमृद्धी देवो ..वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुला प्रत्येक पाऊलावर यश मिळो तुझ्या जीवनात नेहमी सुख मिळो तुला कशाची कमतरता न भासो आणि तुझं स्वास्थ्य असंच छान राहो !वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

गुलाबाच्या फुला काय सांगू तुला

मराठी मध्ये वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा happy birthday wishes in marathi

नातं आपल्या प्रेमाचं दिवसें दिवस असंच फ़ुलावं, वाढदिवशी तुझ्या तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावं. ???? वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ????

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे, सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस, सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा केवळ सोन्यासारख्या लोकांना..???? वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ????

नवे क्षितीज नवी पाहट, फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो. तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो. ???? वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ????

क्रेझी मराठी मजेदार वाढदिवसाच्या शुभेच्छा funny birthday wishes in marathi

happy birthday wishes in marathi
happy birthday wishes in marathi

आमचे लाडके मित्र आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस, शहराची शान तसेच तरुण, सक्षम, विचारी, हुशार आणि तडफदार नेतृत्व असलेले, आमच्या College ची आण-बाण-शान आणि हजारो लाखो पोरींची जान असलेले,अत्यंत Handsome, उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले…मित्रासाठी काय पण, कुठे पण, कधी पण या तत्वावर चालणारे…मित्रांमध्ये दिलखुलास पणे पैसा खर्च करणारे व मित्रांमध्ये बसल्या नंतर मोबाइलपेक्षा मित्रांना जास्त महत्व देणारे… DJ लावल्यावर लाखो मुलींचे लक्ष वेधुन घेणारे,लाखो मुलींच्या मनात घर करुन बसलेले… सळसळत रक्त… अशी Personality! कधीही कोणावर न चिडणारे हसमुख आणि मनमोकळ्या स्वभावाचे…मित्रांच्या सुखा-दु:खात सहभागी होणारे असे आमचे खास दोस्त, यांना वाढदिवसाच्या आभाळ भर शुभेच्छा‪…देव आपल्याला दीर्घायुष्य व यशस्वी वाटचाल देवो ही प्रार्थना…!

वहिनींचे चॉकलेट बॉय, मुलींचे प्रपोजल Reject करणारे, पुण्याचे WhatsApp King❤आमचे लाडके बंधू तसेच मुलींचे लाडके व सगळ्या मित्रांना जीव लावणारे लाखों पोरींच्या दिलांची ❤ धडकन.. तसेच Royal Enfieldचे एकमेव मालक व पोरींना आपल्या स्माईल☺वर फ़िदा करणारे, प्रचंड इंटरनेट प्रेमी असे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे #xyzया आपल्या भावास वाढदिवसाच्या कोटी कोटी ट्रक भरून हार्दिक शुभेच्छा…

अब्जावधी दिलांची धडकन, मोजता येणार नाही एवढ्या पोरींचे प्राण, आमच्या सर्वांची जान, ५००००० पोरींच्या whatsappचा statusअसणारा..पोरींमधे (Dairy milk boy, छावा, Tiger) अशा विविध नावांनी प्रसिध्द असलेला, आमचा लाडका आणि मुलिंच्या ह्रदयावर कहर करणारा… आमचा Branded भावाला >>> ♡ नाव ♡ <<< यानां वाढदिवसाच्या, 1 कंटेनर, ३ टमटम, 5 छोटा हत्ती, 10 टायर ट्रक, 11 ट्रैक्टर, आणि 12 टेम्पो भरुन, Cake फाडू शुभेच्छा..Happy Birthday Bhau…

तुझ्यासाठी एक महागडं गिफ्ट ???????? घ्यायला जाणार होतो पण अचानक लक्षात आलं, तुझं वय आता जास्त झालंय, ????????????तसंच मागच्या वर्षीही खूपच गिफ्ट्स दिल्या होत्या ????त्यामुळे यावर्षी फक्त शुभेच्छा आणि प्रेम एवढंच. ????????????????चालतंय नव्हं.. व्हंय रं ????????????????????????????

Dj वाजणार शांताबाई‍, शालु, शिला नाचणार… जळणारे जळणार,आपल्या XYZ चा बर्थडे म्हणजे शहरा-शहरात चर्चा, चौका-चौकात DJ, रस्त्यावर धिंगाना…दोस्तीच्या दुनियेतला राजा माणुस, XYZ बद्दल काय बोलायचं,….. खतरनाक _/_/_ तारीखला राजाचा जन्म झाला..लहानपणापासूनच जिद्द व चिकाटी… शाळेत असतांना राडा करणारे..साधी राहणी उच्च विचार, सगळ्या मित्रांच्या मनावर राज्य करणारे,दोस्ती तुटली नाही पाहिजे ह्या फॉर्म्युलावर चालणारे,आपल्या Cute Smile नें लाखों हसीन जवान दिलांना ❤ भुरळ पाडणारे….आमचं काळीज… डॅशिंग चॉकलेट बॉय, फक्त आवाजाने समोरच्या व्यक्तीला ढगात घालवणारे….तसंच मनानं दिलदार…. बोलनं दमदार….. वागणं रूबाबदार…..आमचे लाडके XYZ यांना वाढदिवसाच्या भर चौकातझिंग झिंग झिंगाट गाणं वाजवून नाचत-गाजत शुभेच्छा…!!!

काम – अज्याबात नाही नुसत्या दिल्लग्या.. पन स्वत:ला फोटोग्राफर संघटनेचे अध्यक्ष म्हणनारे,अल्प परीचय -भावा बद्दल बोलाव तेवढं कमीच पण काही हरकत नाही लाडानं योगगुरू म्हणून प्रसिद्ध असलेले…ब्रेकअप झालेल्या मुलींचे कैवारी साक्षात हिराच, नेहमी वेळेवर हजर असणारे (फायदा होत असेल तर)पार्टीला न चुकता वेळेच्या आधी हजार (दुसऱ्याच्या पार्टीला)आपल्या चालण्या अन् बोलण्यातून आपली इमेज तयार केलेले स्वताःला फिट ठेवणारे, शैक्षणिक पुस्तक न उघडता College मध्ये TOP मारणारे…..पोरगी दिसली की अररररर लय भारी हाय म्हणनारे अन स्वत: मागी लागनारे…..।गल्लीतील मित्रांसह पोरीच्या मागे गाडीवर फिरणारे, फिरता फिरता कुठं धडकले, लागले तरी घरी न सांगणारे (आईला घाबरत असल्याने)परंतु सध्या फक्त आपल्या जवळच्याच पाहुण्याच्या एका मुलीसोबतलग्न करून संसारावर लक्ष केंद्रीत असलेले……❤❤❤ एवढे सगळे कुटाने करूनही हम है सिधेसाधे अक्षय अक्षय….. म्हणणारे,आमच्या या मित्राला म्हणजेच योगगुरू XYZ यांना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा…

नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा happy birthday to husband in marathi

latest birthday wishes in marathi
latest birthday wishes in marathi

माझ्या पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी Achievement तर तूच आहेस धन्यवाद माझ्या आयुष्यात आल्याबद्दल ????❤️

कितीही रागावले तरी समजून घेतले मला, रुसले कधी तर जवळ घेतले मला, रडवले कधी तर कधी हसवले, केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा, वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा !

प्रत्येक वेळी तुला पाहिल्यावर मी पुन्हा नव्याने तुझ्या प्रेमात पडते माझ्या आयुष्यातील सर्वात खास व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! Happy Birthday My Love ????❤️

आयुष्यातील खास शुभेच्छा घे, वाढदिवसाच्या निमित्ताने खास गिफ्ट्स घे, तुझं आयुष्य अनेक रंगांनी भरू दे ! वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रिय नवरोबा ????❤️

आज तुमचा वाढदिवस आहे आणि मला असे वाटते की आपण माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाचे व्यक्ती आहात आणि हे सत्य उजागर करण्यासाठी हा योग्य दिवस आहे. माझ्या शुभेच्छा नेहमी तुमच्या सोबत आहेत ! प्रिय नवरा वाढदिवसाच्या शुभेच्छा ????❤️

या Birthday ला तुला प्रेम, सन्मान आणि स्नेह मिळावा,आयुष्यातील सर्व आनंद तुझ्या वाट्याला यावा माझ्या प्रिय पतीदेव !Happy Birthday My Dear Husband ????❤️

तुझा चेहरा जेव्हा समोर येतो तेव्हा माझं मन फुलतं ,देवाची आभारी आहे ज्याने तुझी माझी गाठ बांधली ! Dear नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा ????❤️

माझ्या प्रिय पतीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझे जग तुझ्यापासूनच सुरु होते आणि तुझ्यावरच संपते,माझ्या आयुष्यात आल्याबद्दल धन्यवाद ????

आयुष्याच्या या पायरीवर आपल्या
नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ
दे, आपल्या इच्छा आपल्या आकांक्षा
उंच उंच भरारी घेऊ दे, मनात माझ्या
एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य
लाभू दे. वाढदिवसाच्या खूप खूप
शुभेच्छा!

माझ्या आयुष्यात तुमची जागा दुसरं कुणी घेऊच
शकत नाही, तुम्ही मला इतक प्रेम दिल की
तुमच्या शिवाय मी जीवनाची कल्पनाच करु
शकत नाही. वाढदिवसाच्या खूप खूप
शुभेच्छा!

नाती जपली प्रेम दिले
या परिवारास तू पूर्ण केले,
पूर्ण होवो तुझी प्रत्येक
इच्छा ,वाढदिवशी
हीच एक सदिच्छा.

Conclusion

मित्र आणि मैत्रिणीनो मला खात्री आहे तुम्हाला माझा आजचा हा लेख “birthday wishes in marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा” नक्कीच आवडला असेल. मला आशा आहे की तुम्हाला खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे संदेश इथे मिळाले असलात.

हे संदेश तुम्ही बिनधास्त कॉपी करू शकता आणि आपल्या प्रिय व्यक्तीला ते शकता. तुमच्याकडे आणखी काही वाढदिवसाचे संदेश असल्यास खाली कमेंट बॉक्स मध्ये जरूर share करा. आम्ही ते आमच्या ब्लॉग वर प्रसिद्ध करू.

Share on:

Leave a Comment