Home Blog Page 2

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी (labhale amhas bhagya bolato marathi lyrics)

0
labhale amhas bhagya bolato marathi lyrics
labhale amhas bhagya bolato marathi lyrics

labhale amhas bhagya bolato marathi lyrics: “लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी” एकताक्षणी तमाम मराठी भाषिकांच्या अंगावर शहारे आणणारे हे आपले “मराठी अभिमान गीत“. या संपूर्ण गीताच्या ओळी म्हणजेच (lyrics) आज आपण जाणून घेणार आहोत. पण त्या आधी आपण या गीताबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात.

जसे की हे गीत कुणी लिहिले त्या कवीचे नाव काय? त्यांचे आणखी कुठले साहित्य उपलब्ध आहे? या सर्व गोष्टींवर आज आपण प्रकाश टाकणार आहोत. तर मित्रांनो या महान महाराष्ट्र गीताचे गीतकार आहेत अखंड महाराष्ट्राचे मानबिंदू ‘मराठी गझलसम्राट’सुरेश भट.

“लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी” हे गीत मराठी मनाला प्रचंड ऊर्जा देणारे आहे. मराठी नवीन वर्ष गुढीपाडवा असो की, मराठी भाषा दिन असो किंवा महाराष्ट्र दिवस असो या गीताचे गायन झाल्याशिवाय आपण तो उत्सव पूर्ण झाल्यासारखे वाटतच नाही. कारण मायमराठीचे कौतुक करण्यासाठी हे सर्वात उत्त्तम गाणे आहे. म्हणून या गीताचे लेखक कवी सुरेश भट यांच्याबद्दल आपल्याला माहिती असलीच पाहिजे. चला तर मग थोडक्यात जाणून घेऊया गझलसम्राट’सुरेश भट यांच्याबद्दल.

सुरेश भट यांच्याबद्दल माहिती (labhale amhas bhagya bolato marathi lyrics)

labhale amhas bhagya bolato marathi lyrics
Suresh Bhat

labhale amhas bhagya bolato marathi lyrics: कवी सुरेश भट यांचा जन्म दि . 15 April 1932 या दिवशी अमरावतीला झाला. त्यांचे वडील श्रीधर भट हे व्यवसायाने डॉक्टर होते. त्यांच्या आईला कवितांची प्रचंड आवड होती. त्यांच्यामुळे सुरेश भट यांना लहानपणीच मराठी कवितांची गोडी निर्माण झाली. सुरेश भट यांनी ते अडीच वर्षाचे असताना पोलिओची बाधा झाली. त्यामुळे त्याचा उजवा पाय जन्मभरासाठी अधू झाला होता.

कवी सुरेश भट यांनी मराठी भाषेत गझल हा काव्यप्रकार पहिल्यांदाच रुजवला. त्यामुळे त्यांना ‘गझलसम्राट’ असे मानाने संबोधले जाते.

शिक्षण आणि काव्यरचना

सुरेश भटांचे संपूर्ण शिक्षण अमरावती येथेच झाले. बी.ए. च्या अंतिम वर्षाला दोन वेळा नापास झाल्यावर शेवटी १९५५ साली ते बी.ए. पास झाले. त्यानंतर त्यांनी शिक्षक म्हणून नोकरी स्वीकारली. अमरावती जिल्ह्यात ग्रामीण भागात नोकरी करताना त्यांनी त्यांचे काव्यलेखन सुरू ठेवले होते. त्यांनी लिहिलेल्या कवितांची एक वही हृदयनाथ मंगेशकरांना एका फुटपाथवर सापडली. (labhale amhas bhagya bolato marathi lyrics) त्यातील कविता वाचून ते खूप प्रभावित झाले व त्यांनी सुरेश भटांना शोधून काढले.

मंगेशकरांनी त्यांच्या कवितांना चाली लावून त्या कविता अमर केल्या. त्यांच्या गझला व कविता हृदयनाथ मंगेशकर, लता मंगेशकर, आशा भोसले, सुरेश वाडकर आदींनी गायल्या आहेत. गडचिरोली येथे भरलेल्या ३९ व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष देखील होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता. बाबासाहेबांप्रमाणे आयुष्याच्या अखेरच्या पर्वात सुरेश भट यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला होता.

सुरेश भट यांची संगीतसेवा

त्यांच्या आईसाहेबांमुळे शालेय जीवनातच त्यांना संगीताची गोडी लागली होती. त्यांच्या आई स्वतः हार्मोनिअम वाजवत. त्यांनी मैदानी खेळ खेळण्यास असमर्थ असणाऱ्या आपल्या लाडक्या मुलासाठी बाजाची पेटी आणली होती. भट यांचे वडील- श्रीधरपंतही संगीतप्रेमी होते. त्यांच्याकडे एच. एम. व्ही.चा एक ग्रामोफोन होता, मुलाची आवड पाहून आठवड्यातून ते एक तरी ध्वनिमुद्रिका विकत आणायला विसरत नसत.

ही संगीत आवड सुरेश भट यांना शाळेच्या बँडपथकात घेऊन गेली. तिथे ते बासरी वाजवीत. संगीतातील प्रगती पाहून श्रीधरपंतांनी सुरेशला रीतसर संगीत शिक्षण द्यायचे ठरविले. आजारी असताना सुरेश भट तासन् तास अंथरुणावर बासरी वाजवत बसलेले असायचे. सुरेश भट हे सुद्धा स्वतः उत्तम गायक होते. त्यांचा गायनाचा एक कार्यक्रम अमरावतीत २०-२-१९८४ रोजी झाला होता. त्यावेळी साथीसाठी पेटीवर हृदयनाथ मंगेशकर होते.

अंथरुणावर बसून आणि पडून असतांना सुद्धा त्यांनी गुलाबराव महाराज यांचा ‘गानसोपान’ हा ग्रंथ आणि विष्णू नारायण भातखंडेकृत ‘संगीत खंड’, असे अनेक ग्रंथ सुरेश भट यांनी त्याच काळात वाचले होते. त्यांनी ‘गानसोपान’ची अनेक पारायणे केली होती. संगीत शिकण्याची जिद्द पहा ! १९५२ ला त्यांना तबला शिकावासा वाटल्यावर तो ही ते शिकले. पुढे ते ढोलकीही वाजवीत असत.(labhale amhas bhagya bolato marathi lyrics)

शारीरिक व्यंग तरीही पट्टीचे खेळाडू

सुरेश भटांचा एक पाय दुर्बल झाल्यावर त्यांनी व्यायामावर जोर देण्याचे ठरविले व बाकीचे शरीर मजबूत बनवले. याचा उपयोग त्यांना त्याच्या गाण्यातही झाला. ते तासन् तास मैफली करू शकत असत. ते दंड-बैठका काढतच पण डबलबारवर १०० ते १५० डिप्स सुद्धा मारत. त्यामुळे इतकी शक्ती पायात आली की ते बिनदिक्कत सायकल चालवू लागले. वडिलांनी त्यांना मिलर कंपनीचा डायनोमा असलेली रॅले कंपनीची एक सायकल महाविद्यालयात जाण्यासाठी दिली होती.

१९६५ मध्ये जेव्हा अमरावती रेल्वेस्थानकावर उड्डाणपूल बनला तेव्हा अमरावतीतील सायकल रिक्षावाले त्यावर उतरून ती चढण चढत असत. पण सुरेश भट आपला भाऊ दिलीप याला डबलसीट घेऊन एका दमात ती चढण चढत. ते कबड्डी, व्हॉलीबॉलही खेळत. ते आकाशदिवा, पतंग, कॅलिडोस्कोप (शोभादर्शक) आणि पेरिस्कोप (परिदर्शक) सुद्धा उत्तम बनवीत.

काचा कुटून पतंगाचा मांजा बनविण्यात ते कमालीचे वाकबगार होते. सुरेश भट यांना गुलेर (बेचकी किंवा गलोल) बनविता येई. त्यांचा नेम अचूक असे. ते पाहून श्रीधरपंतांनी त्यांच्यासाठी खास अमेरिकन स्लिंग शॉट बंदूक आणून दिली होती. ती वापरून भट चिमणी, कबुतर घायाळ करीत. ते भालाफेकही करीत. (labhale amhas bhagya bolato marathi lyrics)

कवी सुरेश भट यांचा काव्यसंग्रह

“लिहिणारा माणूस कवितेत लपत नसतो. तो आपल्या कवितेत लपूच शकत नाही. कविता आरशाचे काम करते. ती स्वच्छ व निकोप चेहरे दाखवते आणि लबाड व घाणेरडे चेहरेही दाखवते. केवळ नक्षीदार शब्दांमुळे कवितेत यश मिळत नसते. सुबक, गोंडस व नक्षीदार शब्दांमुळे कविता सुंदर होत नसते आणि शब्दांचा थयथयाट घातला म्हणून कविता शक्तिशाली बनत नसते.”

सुरेश भट (15 April 1932 – 14 March 2003)
 • रूपगंधा
 • रंग माझा वेगळा
 • काफला
 • एल्गार
 • रसवंतीचा मुजरा
 • झंझावात
 • सप्‍तरंग
 • हिंडणारा सूर्य (गद्य)
 • सुरेश भट – निवडक कविता

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी (labhale amhas bhagya bolato marathi lyrics)

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी..!!


'लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी'
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी,
एवढ्या जगात माय मानतो मराठी

आमुच्या मनामनात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
आमुच्या उराराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी

आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या नहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी
आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी

येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाटते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी
येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलखात सादते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी

येथल्या नभामधऊन वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरीच हाल सोसते मराठी
हे असेच कितीक खेळ पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी

- सुरेश भट

Laabhale aamhas bhagya bolato marathi lyrics in english

Laabhale aamhas bhagya bolato marathi
Laabhale aamhas bhagya bolato marathi
Jaahlo kharech dhany eikto marathi!!

Laabhale aamas bhagya bolato matrathi
Laabhale aamas bhagya bolato matrathi
Jaahalo kharech dhanny eikto marathi
Dharm, panth, jaat ek jaanto marathi,
Evdhya jagaat maay maanato marathi

Aamuchya mana-manat dangte marathi
Aamuchya raga-ragat rangate marathi
Aamuchya ura-urat spandate marathi
Aamuchya nasa-nasat naachate marathi

Aamuchya pila-pilat jannmate marathi
Aamuchya nahangyat rangate marathi
Aamuchya mula-muleet khelte marathi
Aamuchya ghara-gharat vaadhate marathi
Aamuchya kula-kulaat naandte marathi

Yethalya phula-phulat haasate marathi
Yethalya disha-dishat daatate marathi
Yethalya naga-nagaat garjate marathi
Yethalya dari-darit heendate marathi
Yethalya vana-vanaat gunjte marathi
Yethalya tarulkhaat saadate marathi
Yethalya kalee-kaleet laajate marathi

Yethalya nabha-madhun varshate marathi
Yethalya pikan-madhun dolate marathi
Yethalya nadhyan-madhun vaahate marathi
Yethalya charaa-charat raahate marathi

Paahune jari asankhya posate marathi
Aapulya gharich haal sosate marathi
Hey ase kiteek khel pahate marathi
Shevati madandh takht fodate marathi
          - suresh bhat


निष्कर्ष

तर मित्रांनो आज आपण काय पाहिले? कवी सुरेश भट यांचा जीवन प्रवास कसा होता हे आपण आपण जाणून घेतले. त्याच बरोबर त्यांची संगीताची आवड, व त्यांचा काव्यसंग्रह आपण जाणून घेतला. महाराष्ट्र अभिमान गीत “लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी” (labhale amhas bhagya bolato marathi lyrics) आपण जाणून घेतले.

मला आशा आहे तुम्हाला माझा हा लेख व हे माहिती (labhale amhas bhagya bolato marathi lyrics) नक्की आवडली असेल. तुम्हाला मिळालेली हि माहिती तुम्ही आपल्या मित्रांना, कुटुंबियांना सोशल मीडियावर जरूर शेअर करा.

12 राशींची नावे मराठीत आणि इंग्रजीत : zodiac signs in marathi

0
zodiac signs in marathi
zodiac signs in marathi

zodiac signs in marathi: ज्योतिष विद्या ही एक पारंपारिक भारतीय हिंदू प्रणाली आहे, ज्योतिष विद्येला वैदिक परंपरेत अनन्यसाधारण महत्व आहे. भारतीय ज्योतिष हे अलीकडेच वैदिक ज्योतिष म्हणून देखील ओळखले जाते. ज्योतिष शास्त्रात मुख्य भूमिका निभावतात त्या म्हणजे (zodiac signs in marathi) 12 राशी.

वैदिक ज्योतिष कुंडली तीन प्रमुख शाखांमध्ये विभागली गेली आहेत भारतीय खगोलशास्त्र, मुंडणे ज्योतिष, आणि भविष्यवाणी ज्योतिष. आपण आज जाणून घेऊयात या 12 राशींची नावे मराठी भाषेत, त्याच बरोबर या १२ राशींचे इंग्रजी नावे काय आहेत, हे सुद्धा आपण या लेखात पाहूया.

वैदिक ज्योतिषाने आपल्याला दिलेली सर्वात मोठी साधने म्हणजे चंद्र आणि नक्षत्रांची स्थिती. निरायना (साइडरियल राशिचक्र) हा 360 अंशांचा काल्पनिक पट्टा आहे जो उष्णकटिबंधीय राशीप्रमाणे बारा भागात विभागला आहे. भारतीय ज्योतिष तुमचे एकूण चरित्र प्रकट करू शकते, तुम्हाला भविष्यासाठी मार्गदर्शक ठरू शकते. असे सांगितले जाते.

भारतीय वैदिक ज्योतिष zodiac signs in marathi

zodiac signs in marathi
astrology

zodiac signs in marathi: राशींची एकूण संख्या 12 असते, आणि प्रत्येक राशीची स्वतःची बलस्थाने आणि कमकुवतपणा असतो. ग्रहांच्या स्थितीच्या प्रक्षेपणाचे विश्लेषण करून आणि जन्माच्या क्षणी ग्रहणातील सूर्यआणि चंद्र यांची तत्कालीन स्थिती पाहून. राशींच्या अभ्यासाद्वारे स्वतःचे विशिष्ट गुण, इच्छा आणि जीवन व लोकांबद्दल वृत्तीचा साधारणपणे अंदाज लावता येऊ शकतो.

ज्योतिष आपल्याला एखाद्या व्यक्तीची मूलभूत वैशिष्ट्ये, प्राधान्ये, त्रुटी आणि भीती यांचे झलक देऊ शकते. वायू, अग्नि, पाणी आणि पृथ्वी या चार घटकांपैकी प्रत्येकाच्या कुंडलीत 12 चिन्हे असतात. चार राशी घटक मूलभूत वैशिष्ट्ये, भावना, वर्तन आणि विचार यावर गहन प्रभाव दर्शवितात. हे घटक आपल्यातील प्रत्येक प्रकारात कार्यरत असलेल्या आवश्यक प्रकारच्या ऊर्जाचे प्रतिनिधित्व करतात.

या उर्जा तुम्हाला सकारात्मक बाबींवर लक्ष केंद्रित करण्यास कश्या मदत करतील. भविष्यातील तुमच्या संभाव्यतेबद्दल व तुमच्या सकारात्मक वैशिष्ट्यांविषयी चांगल्या प्रकारे समजून नकारात्मक गोष्टींचा सामना करण्यास तयार करणे हे ज्योतिष शास्त्राचे उद्दीष्ट आहे. 1999 साली केलेल्या एका सर्वेनुसार horoscope आणि astrology हे त्याकाळी इंटरनेट सर्वात जास्त शोधल्या गेलेले शब्द होते.

चिनी ज्योतिष zodiac signs in marathi

चिनी राशी ही जगातील सर्वात प्राचीन ज्ञात जन्मकुंडली पैकी एक आहे. आणि त्यात एका विशिष्ट वर्षाचे प्रतिनिधित्व करणारे बारा प्राणी असतात. चीनी ज्योतिष पारंपारिक खगोलशास्त्रावर आधारित आहे. चीनच्या ज्योतिषशास्त्राचा विकास खगोलशास्त्राशी जोडला गेला व “जो हान” राजवंशाच्या काळात वाढला.

चिनी ज्योतिषानुसार एखाद्या व्यक्तीच्या जन्माचे वर्ष या प्राण्यांपैकी एक दर्शवते. बारा प्राण्याचे चिन्ह किंवा राशिचक्र चिन्हे म्हणजे उंदीर, बैल, वाघ, ससा, ड्रॅगन, साप, घोडा, मेंढी, वानर, कुक्कुट, कुत्रा आणि डुक्कर. चिनी ज्योतिषात सुद्धा निसर्गाचे पाच घटक आहेत पाणी, लाकूड, अग्नि, पृथ्वी आणि धातू.

चिनी ज्योतिषानुसार एखाद्याच्या जन्माच्या वेळी ग्रहांची स्थिती आणि सूर्य आणि चंद्राच्या स्थानांद्वारे एखाद्या व्यक्तीचे भविष्य निश्चित केले जाऊ शकते. चिनी लोकांचा असा विश्वास आहे की, आपले जन्म वर्ष आपली वृत्ती आणि क्षमता निश्चित करू शकते व प्राणी जन्म चिन्हे हे प्रतीकात्मक आहेत आणि विशिष्ट वर्तनाचे प्रतिनिधित्व करतात.

माया ज्योतिष zodiac signs in marathi

माया कॅलेंडर किंवा Tzolkin हे विश्वाच्या अमूर्त उर्जा आणि सृष्टीच्या उत्क्रांतीवर आधारित आहे मानले जाते. माया ज्योतिष हे माया कॅलेंडरवर आधारित आहे आणि हे ज्योतिष शास्त्रातील सर्वात अग्रेषित शास्त्रांपैकी एक आहे. Tzolkin कॅलेंडरमध्ये वीस दिवसांची चिन्हे (सौर जमाती) आणि तेरा गैलेक्टिक संख्या असतात, जे 260-दिवसांचे कॅलेंडर वर्ष बनवितात.

mayan astrology signs in english

1. CROCODILE11. MONKEY
2. WIND12. GRASS
3. HOUSE13. REED
4. LIZARD14. JAGUAR
5. SERPENT15. EAGLE
6. DEATH16. VULTURE
7. DEER17. EARTH
8. RABBIT18. KNIFE
9. WATER19. STORM
10. DOG20. FLOWER
mayan astrology signs in english

प्राचीन माया सभ्यतेतील लोकांचा असा विश्वास होता की जीवनात शांतता आणि सुसंवाद निर्माण करण्यासाठी आपल्याला या सार्वत्रिक उर्जेसह स्वत: ला समजून घेतले पाहिजे आणि संरेखित केले पाहिजे. हे वीस चिन्हे प्रत्येक माया कॅलेंडरमध्ये एक दिवस दर्शवतात, अशा प्रकारे वेगवेगळ्या महिना आणि वर्षांच्या व्यक्तींना समान दिवस ग्लिफ सामायिक करता येते. एखाद्याच्या माया दिवसाचे चिन्ह त्याचे / तिचे व्यक्तिमत्व परिभाषित करते.

zodiac signs in marathi (12 राशींची नावे)

zodiac signs in marathi
zodiac signs in marathi

list of zodiac signs in marathi

12 राशींची नावे मराठी zodiac signs in English
मेषAries
वृषभTaurus
मिथुनGemini
कर्कCancer
सिंहLeo
कन्याVirgo
तूळLibra
वृश्चिकScorpio
धनुSagittarius
मकरCapricorn
कुंभAquarius
मीनPisces
zodiac signs in marathi

तात्पर्य

तर मित्रांनो आज आपण पाहिले की, मराठी व इंग्रजी भाषेत १२ राशींचे नावे (zodiac signs in marathi) काय आहेत. मला आशा आहे की तुम्हाला १२ राशींबद्दल थोडक्यात माहिती मी येथे देऊ शकलो असेल. तुमचे काही प्रश्न किंवा सूचना असल्यास खाली कॉमेटबॉक्स मध्ये मांडा. हा लेख आवडल्यास आपल्या मित्रांना, परिवारातील सदस्यांना, सोशल मीडियावर नक्की शेअर करा.

कलौंजिला मराठीत काय म्हणतात? 10 प्रभावी आरोग्य फायदे : kalonji meaning in marathi

1
kalonji meaning in marathi
kalonji

kalonji meaning in marathi : भारतीय स्वयंपाकघराला विविध आयुर्वेदिक वनस्पतींचा खजिना असे म्हटले तर वावगं ठरू नये! याला कारणही तसेच आहे. भारतीय स्वयंपाकघरात अनेक प्रकारचे मसाले वापरले जातात. यातील अनेक मसाले हे औषधी गुणांनी परिपूर्ण असतात व किरकोळ आजारात अगदी घरच्या घरी उपचार करण्यासाठी सुरक्षित आणि उपयुक्त ठरतात.

यापैकीच आणखी एक आश्चर्यकारक फायदे असलेला पदार्थ म्हणजे “कलौंजि” (kalonji plant in marathi) कलौंजि हा पदार्थ आपल्या किचनमध्ये बिया स्वरूपात आढळतो. याचा वापर प्रामुख्याने मसाला बनविताना केला जात असला तरी, किरकोळ स्वरूपाच्या अनेक आजारांवर कलौंजिचे सेवन रामबाण उपाय ठरते. अनेक जीवनसत्वाने युक्त हा पदार्थ रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयोगी आहे.

kalonji meaning in marathi

kalonji meaning in marathi
kalonji

kalonji meaning in marathi : कलौंजि या वनस्पतीचे शास्त्रीय नाव Nigella Sativa (निजेला सटाईव्हा) असे आहे, जे लॅटिन शब्द “निजर” म्हणजे (काळा) पासून घेतले आहे. इंग्रजी मध्ये कलौंजि या वनस्पतीला Black seeds असे म्हणतात. तर हिंदीमध्ये कलौंजि किंवा “प्याज के बीज” किंवा “मंगरेला” असे म्हटले जाते. याचे संस्कृत मध्ये नाव “कृष्णजीरा” असे आहे.

भारत सहित दक्षिण पश्चिम आशियायी भूमध्य सागराच्या तटीय प्रदेशात तसेच, उत्तर आफ्रिकेत kalonji चे पीक घेतले जाते. कलौंजिचे रोप २० ते ३० सेंटीमीटर उंच असते. लांबट पातळ विभाजित पाने, मुलायम पांढरे किंवा फिक्कट निळ्या रंगांची फुले या रोपाला लागतात. चेंडूच्या आकाराचे याला फळ येते आणि या फळाच्या बिया (kalonji seed in marathi) म्हणजेच कलौंजि होय.

चमत्कारिक औषधी गुणांनी भरपूर असणारे हे बीज अनेक रोगांवर रामबाण इलाज आहे. असे म्हटले जाते कि मृत्यु सोडला तर प्रत्येक आजारावर हे गुणकारी औषध काम करते. अनेक प्रकारच्या आजारावर वर्षानुवर्षे उपचार म्हणून कलौंजिचा वापर केला जातो. वरील भागात आपण पाहिलंच की विविध भाषेत कलौंजिला काय म्हटले जाते. तर मराठी भाषेत याला काय पर्यायी शब्द आहे ते आता आपण पाहू.

खरं तर, ब्रोन्कायटीसपासून ते अतिसार (diarrhea) पर्यंतच्या प्रत्येक गोष्टीचा नैसर्गिक उपाय म्हणून अनेक शतके याचा उपयोग केला जात होता. तर मराठी भाषेत याला एक ठराविक असे नाव नाही, लोक वेगवेगळ्या प्रकारे या बियांना संबोधतात. त्यातील काही नावे हे पुढील प्रमाणे आहेत. तुम्हाला जे नाव सोपं वाटेल त्याचा वापर तुम्ही तुमच्या दैनंदिन व्यावहारिक जीवनात करू शकता.

 • कलौंजि (मराठी/हिंदी)
 • मंगरेला (हिंदी/मराठी)
 • काळं जिरं (मराठी)
 • निगेला बियाणे (मराठी)
 • काळे कांदा बियाणं (मराठी)
 • ब्लॅक सीड (इंग्रजी)
 • काला जीरा (हिंदी)
 • प्याज के बीज (हिंदी)
 • कृष्णजीरा (संस्कृत)
 • नायजेला सॅटिवा/Nigella Sativa (शास्त्रीय नाव)

कलौंजिचा उपयोग kalonji meaning in marathi

कलौंजिचा वापर औषधे, सौन्दर्य प्रसाधने, मसाले व सुगंधी व्यंजने बनवण्यासाठी केला जातो. प्रामुख्याने भारतीय स्वयंपाकघरात याचा मसाले म्हणून वापर केला जातो. चवीला कलौंजि सौम्य प्रमाणात कडू व तिखट असते. याचा उपयोय ब्रेड, नान, केक किंवा लोणचंबनवण्यासाठी केला जातो.

कलौंजिचे फायदे kalonji meaning in marathi

kalonji meaning in marathi
कलौंजि/kalonji

टाइप -2 मधुमेह

दरदिवशी नियमित २ ग्राम कलौंजि खाल्ल्याने वाढतं ग्लुकोजचं प्रमाण कमी होऊ शकत. इन्सुलिन रेजिस्टेंस मध्ये घट होते, बीटा सेलच्या कार्यप्रणालीमध्ये वाढ होते आणि ग्लायकोसिलेटिड हिमोग्लोबीन कमी होण्यास मदत होते. एका टेस्ट-ट्यूब अभ्यासानुसार कलौंजि तेलाने आवश्यक अँटीऑक्सिडंट म्हणून देखील काम केले. (Trusted Source) मधुमेह असलेल्या 57 लोकांवर केलेल्या एका अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की, एक वर्षापर्यंत आहारात पूरक प्रमाणात कलौंजिचा समावेश केल्याने एलडीएल कोलेस्ट्रॉल कमी झाला आहे. (Trusted Source).

कॅन्सर

२०२१ मध्ये समोर आलेल्या एका संशोधनानुसार मध आणि कलौंजिच्या तेलात ट्युमर विरोधी गुण आढळून आले आहेत. जे कर्करोगाच्या पेशींची होणारी अनियंत्रित वाढ रोखण्यास सक्षम आहेत. यामध्ये असणारे Antioxidants हा असा पदार्थ आहे जो हानिकारक मुक्त रॅडिकल्सला neutralize करतो आणि पेशींचे होणारे ऑक्सिडेटिव्ह नुकसान टाळतो.

काही अभ्यासक असे सूचित करतात की अँटीऑक्सिडंट्स हे कर्करोग, मधुमेह, हृदयरोग आणि लठ्ठपणा अश्या अनेक प्रकारच्या रोगांचे तीव्र परिस्थितींपासून संरक्षण करू शकतात. (Trusted Source). मधुमेह असलेल्या लोकांमध्ये केलेल्या अभ्यासानुसार असे आढळले आहे की दररोज १२ ग्रॅम कालौन्जी १२ आठवड्यांसाठी घेतल्यास total आणि एलडीएल कोलेस्ट्रॉल (“bad” LDL cholesterol) दोन्ही कमी होते. (Trusted Source).

कोलेस्ट्रॉल

कोलेस्ट्रॉल हा आपल्या शरीरात चरबीसारखा पदार्थ आहे. आपल्याला कोलेस्टेरॉलची आवश्यकता असते परंतु, जंक-फूड मुळे व पुरेसा पौष्टिक आहार न घेतल्यामुळे आपल्या रक्तात उच्च प्रमाणात कोलेस्टेरॉल तयार होऊ शकते आणि हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.

१७ अभ्यासकांनी मिळून केलेल्या एक स्टडी मध्ये असे दिसून आले आहे की कॅलोन्जी बरोबर पूरक पौष्टिक आहार घेतल्यामुळे एकूण आणि “bad” LDL cholesterol तसेच blood triglycerides या दोन्हीमध्ये महत्त्वपूर्ण घट झाली आहे. विशेष म्हणजे, हे देखील आढळले की कालौन्जीच्या बियाणे पावडरपेक्षा कलौंजिच्या तेलाचा जास्त प्रभाव होता. (Trusted Source)

रक्तदाब (Blood pressure)

एक कप गरम पाण्यात अर्धा चमचा एका कलौंजिचे तेल टाकून दिवसातून दोनदा पिण्यामुळे रक्तदाब नियंत्रित होतो. एक चमचा कलौंजिच्या तेलात २० मिली ऑलिव्ह ऑईल मिसळून शरीरावर मालिश केल्यानंतर अर्धा तास उन्हात उभे राहिल्यास रक्तदाब कमी होतो. हा उपाय दर तिसऱ्या दिवशी एक महिना केल्यास याचा फायदा होतो.

यकृत

यकृत हा एक महत्त्वपूर्ण अवयव आहे. हे विषारी पदार्थ आपल्या शरीरातून काढून टाकते, औषधांचे चयापचय करते, पोषक प्रक्रिया करते आणि आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या प्रथिने आणि रसायने तयार करते. कित्येक प्राण्यांच्या आश्वासक अभ्यासानुसार असे आढळले आहे की कलौंजि यकृताची इजा आणि नुकसानीपासून संरक्षण करू शकते. (Trusted Source).

पोलिओ

अर्धा कप गरम पाण्यात एक चमचे मध मिसळून अर्धा चमचा कलौंजिचे तेल घालून उपाशी पोटी पिल्याने पोलिओ होण्याचा धोका कमी होतो.

कलौंजिचे आणखी काही फायदे kalonji meaning in marathi

kalonji meaning in marathi
kalonji seed
 • कलौंजिचा काढा बनवून पिल्याने गर्भधारणेदरम्यान होणाऱ्या वेदना कमी होण्यास मदत होते.
 • कलौंजिची पेस्ट बनवून रात्री झोपतांना चेहऱ्यावर लावण्याने मुरूम होण्याचा त्रास कमी होतो.
 • सांधेदुखीवर कलौंजिचा काढा फायदेशीर आहे.
 • ज्यांना स्वप्नदोष होण्याचा त्रास आहे त्यांनी एक कप सफरचंदाच्या रसात अर्धा चमचा कलौंजिचे तेल घालून पिल्यास फायदा होतो.
 • झोपण्यापूर्वी एक कप गरम पाण्यात अर्धा चमचा कलौंजिचे तेल घालून पिल्यास मानसिक तणाव दूर होण्यास मदत होते.
 • ज्यांना संधिवाताचा त्रास आहे त्यांनी कलौंजिचा काढा पिल्यास फायदा होतो.
 • ज्यांना निद्रानाशाचा त्रास आहे त्यांनी, झोपण्यापूर्वी एक कप गरम पाण्यात अर्धा चमचा कलौंजिचे तेल घालून पिल्यास शांत झोप लागण्यास मदत होते.
 • सूज असल्यास कलौंजि वाटून सूज असलेल्या भागावर लेप लावल्यास सूज कमी होते.
 • उलटी (Vomiting) होण्याचा ज्यांना त्रास आहे त्यांनी सकाळी अर्धा चमचा आल्याचा रस आणि अर्धा चमचा कलौंजिचे तेल हे मिश्रण पिल्यास त्रास नाहीसा होतो.
 • ५० ग्रॅम कलौंजि एक लिटर पाण्यात उकळून त्या पाण्याने केस धुतल्यास केसांची वाढ जलद होते.

कलौंजि खाण्याचे काही नुकसान kalonji meaning in marathi

आपण वर बघितल्या प्रमाणे कलौंजिचे (kalonji meaning in marathi) आरोग्यविषयक अनेक फायदे आहेत आणि ते मसाल्याच्या रूपात किंवा मसाला म्हणून सामान्यतः सुरक्षित असतात, तर कॅलोंजी supplement म्हणून घेतल्यास किंवा कलौंजि तेल वापरण्याचे काही दुष्परिणाम सुद्धा असू शकतात.

काही टेस्ट-ट्यूब अभ्यासानुसार असे आढळले आहे की कलौंजि आणि त्याचे घटक रक्त गोठण्यास प्रभावित करतात. जर तुम्ही रक्त गोठण्यासाठी औषध घेत असाल तर, कलौंजि सप्लीमेंट्स घेण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांशी सल्लामसलत करून खात्री करा. (Trusted Source).

याव्यतिरिक्त, काही प्राण्यांवर केलेल्या अभ्यासानुसार असे आढळले आहे की गर्भधारणेदरम्यान कलौंजि सुरक्षितपणे सेवन केले जाऊ शकते, परंतु एका प्राण्यांच्या अभ्यासानुसार असे आढळले आहे की हे तेल मोठ्या प्रमाणात वापरल्यास ते गर्भाशयाच्या आकुंचन कमी करते. (Trusted Source).
आपण गर्भवती असल्यास, हे मध्यम प्रमाणात वापरण्याची खात्री करा किंवा वापर करण्याआधी आपल्याला काही समस्या असल्यास आपल्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

तात्पर्य

तर मित्रांनो आज आपण काय शिकलो? आपण हे शिकलो की कलौंजि म्हणजे काय? (kalonji meaning in marathi) कलौंजिचे शास्त्रीय नाव काय आहे? तसेच कलौंजिला आणखी किती नावाने ओळखले जाते? कलौंजि खायचे किती फायदे आहेत? यात काय काय पौष्टिक तत्वे आहेत? कलौंजिला आपल्या मराठी भाषेत कुठल्या नावाने ओळखतात?

वरील सर्व प्रश्न आणि कलौंजि बद्दल बरीच माहिती आपण या लेखात समजून घेतली आहे. मला आशा आहे तुम्हाला माझा हा लेख (kalonji mhanje kay marathi) नक्की आवडला असेल तुमचे आणखी काही प्रश्न असतील तर नक्की कॉमेंटबॉक्स मध्ये कळवा. लेख आवडल्यास सोशल मीडियावर शेअर करा.

Disclaimer

प्रस्तुत लेखातील सूचना आणि सल्ले हे केवळ सामान्य माहितीसाठीच आहेत, यांना व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून घेतले जाऊ शकत नाही. कृपया आरोग्यविषयक कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

एवोकॅडो म्हणजे काय? खाण्याचे 10 फायदे आणि तोटे :avocado in marathi

0
avocado in marathi
avocado in marathi

avocado in marathi: जर तुम्हाला तुमचे वाढलेले वजन कमी करायचे असेल किंवा जर तुम्हाला तुमची त्वचा आणखी उजळ करायची असेल किंवा तुम्हाला कर्करोग, मधुमेह आणि हृदयविकार यासारख्या अनेक जीवघेण्या रोगांना टाळायचं असेल तर आपल्या आहारात “एवोकॅडो” (avocado meaning in marathi) समाविष्ट करा, हे एक अतिशय आरोग्यदायी फळ आहे. परंतु त्याआधी तुम्हाला एवोकॅडोबद्दल संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे, कि हे फळ खाण्याचे नक्की किती फायदे व तोटे आहेत. आणि म्हणून आपण या लेखाच्या माध्यमातून अवोकाडो म्हणजे काय ते जाणून घेऊया?

एवोकॅडो म्हणजे काय | Avocado in marathi

avocado in marathi
avocado fruit tree

avocado in marathi: बहुतेक लोकांचा एवोकॅडो बद्दल गोंधळ होतो, म्हणजे confused होतात की हे फळ आहे की भाजी आहे? तर, एवोकॅडो हे एक फळ आहे. चवीबद्दल विचाराल तर एवोकॅडो खारट आणि गोड या दोन्ही स्वरूपात उपलब्ध आहे. एवोकॅडोमध्ये उच्च प्रमाणात फॅटी ऍसिड्स असतात आणि त्यात कोलेस्टेरॉलची पातळी खूप कमी असते. .

बरेचशे लोक जास्त कॅलरीमुळे एवोकॅडो खाणे सोडतात कारण त्यांना असे वाटते की ते खाल्ल्याने त्यांचे वजन वाढू शकते, परंतु हे खरं नाही, एवोकाडोमध्ये कॅलरीचे प्रमाण लोणी आणि इतर उच्च-कॅलरीयुक्त आहारापेक्षा खूपच कमी असते. या लेखात आपण एवोकॅडोच्या (avocado fruit in marathi) विविध आरोग्य फायद्यांविषयी पुढे बोलणार आहोतच, परंतु आधी या मौल्यवान आणि आरोग्यदायी फळाबद्दल आपण थोडेसे अधिक जाणून घेऊया

avocado information in marathi

avocado in marathi: एवोकॅडो या फळाला एलीगेटर नाशपाती (Alligator Pears) म्हणूनही ओळखले जाते, हे फळ दिसायला प्रामुख्याने मगरीच्या त्वचेसारखे असते. एवोकॅडो हे फळ एवोकॅडो नावाच्या झाडापासून मिळते जे सुमारे 65 फूट उंच असू शकते. पूर्वी एवोकॅडो उत्पादन केवळ पूएब्ला (Puebla) आणि मेक्सिको (Mexico) मधेच घेतले जात होते, परंतु आरोग्यासाठी मिळणाऱ्या विविध फायद्यांमुळे, बर्‍याच देशांमध्ये या फळाचे उत्पादन घेतले जाते.

या फळाची त्वचा खूप जाड असल्यामुळे यावर कीटकनाशकांचा प्रभाव पडत नाही त्यामुळे तुम्हाला कधीही सेंद्रिय एवोकॅडो खरेदी करण्याची गरज नाही, कारण कीटकनाशकांच्या फवारणीचा या फळावर परिणाम फार कमी हितो. हे देखील लक्षात ठेवा की एव्होकॅडोचे बरेच प्रकार आहेत, परंतु सर्वांत लोकप्रिय आणि प्रसिद्ध प्रकार creamy Hass हा आहे.

avocado benefits in marathi | एवोकॅडोचे फायदे

avocado in marathi
avocado

एवोकॅडोच्या चमत्कारीक फायद्यांबद्दल जाणून घेतल्यावर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. एवोकॅडो सहसा कच्चा खाला जातो, त्याव्यतिरिक्त याचा वापर मिष्टान्न आणि कोशिंबीर म्हणून देखील केला जातो. अ‍ॅव्होकॅडो (avocado benefits in marathi) मध्ये विविध पौष्टिक, जीवनसत्त्वे आणि विटामिन मोठ्या प्रमाणात असतात.

एवोकाडोमध्ये monounsaturated फॅटी ऍसिड्स चा एक चांगला स्त्रोत आहे व यात साखर अगदी कमी प्रमाणात असते. याव्यतिरिक्त, हा नैसर्गिक ऊर्जेचा एक चांगला स्रोत आहे व यात बरेच आवश्यक जीवनसत्त्वे आणि विटामिन आहेत. अ‍व्होकाडोमध्ये कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, तांबे, मॅंगनीज, फॉस्फरस आणि झिंक असते. याव्यतिरिक्त, एवोकॅडोचे काही इतर ही फायदे खाली दिले आहेत.

1. बद्धकोष्ठता (constipation) दूर करण्यास मदत

एवोकॅडो (avocado in marathi) हे एक उच्च फायबरयुक्त फळ आहे. विरघळणारे (Soluble) आणि अघुलनशील (Insoluble)तंतू जे पाचन तंत्राला योग्यरित्या कार्य करण्यास मदत करतात, यामध्ये हे दोन्ही समाविष्ट आहेत. या प्रकारचे फायबर पाचनक्रियेसाठी खूप महत्वाचे मानले जाते, त्यामुळेच बद्धकोष्ठता टाळण्यास हे फळ मदत करते. याव्यतिरिक्त, वरील जंतू हे जठरासंबंधी आणि पाचक रस उत्तेजित करतात जेणेकरुन पौष्टिक पदार्थ उत्तम प्रकारे शोषले जातील.

खरं तर, शौचालयात जाण्यात अडचण येणार्‍या लोकांना अ‍ॅव्होकॅडो हे एक प्रकारे वरदान आहे. शिवाय हे फळ पोटातील कर्करोगाचा धोका कमी करण्यास देखील मदत करते. वजन कमी करू इच्छिणाऱ्या व्यक्तीसाठी हे फळ खूप लाभकारक आहे. एवोकॅडो खाल्ल्यानंतर भूक कमी लागते त्यामुळे नेहमी काही ना काही खात राहण्याची इच्छा कमी होते.

2. तोंडाचे आरोग्य | oral health avocado in marathi

एवोकॅडो खाल्ल्याने टोडाची दुर्गंधी टालता येते जी मुख्यत: अपचन आणि पोटदुखीमुळे होते. पाचन तंत्रामध्ये सुधारणा करून तोंडाचा दुर्गन्ध दूर केला जाऊ शकतो आणि एवोकॅडोमध्ये आढळणारे अँटीबैक्टीरियल आणि अँटीऑक्सिडंट फ्लेव्होनॉइड्स आपल्या तोंडातील बॅक्टेरिया नष्ट करतात ज्यामुळे श्वास घेतांना दुर्गंधी येऊ येत नहीं याव्यतिरिक्त, एवोकॅडो तोंडाचा कर्करोग देखील रोखू शकतो.

3. त्वचा आणि केसांची निगा राखण्यासाठी मदत

एवोकॅडो एक पौष्टिकने समृद्ध असलेलं फळ आहे, जे आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. हे खाल्ल्याने तुमची कोरडी व खराब झालेले त्वचा सुधारते. आणि आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की आता एवोकॅडोचा वापर बर्‍याच सौंदर्यप्रसाधनांमध्ये केला जातो कारण यामुळे त्वचेला पोषक जीवनसत्त्वे मिळतात व त्वचा चमकदार राहण्यास मदत होते. कोरड्या आणि खराब झालेल्या केसांना पुनरुज्जीवन करण्यासाठी अ‍व्होकाडोचा वापर केला जाऊ शकतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, अवोकाडो तेल प्लेग सोरायसिसच्या उपचारात मदत करते. अ‍व्होकाडोच्या मदतीने तुम्ही अकाली येणाऱ्या वृद्धत्वावर देखील मात करू शकता.

4. यकृत संबंधी आरोग्य

यकृताची होणारी हानी कमी करण्यास हे फळ खूप चांगले आहे. यात काही सेंद्रिय संयुगे आहेत जे यकृताचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. यकृताचे नुकसान सामान्यत: हेपेटायटीस- सी मुळे होते. अलीकडील झालेल्या संशोधन अभ्यासाच्या निष्कर्षांवरून असे दिसून येते की विविध प्रकारच्या परिस्थितीत यकृताचे संरक्षण करण्यास आणि सुरक्षा करण्यात एवोकॅडो (avocado in marathi) प्रमुख भूमिका बजावू शकते.

5. दृष्टी सुधार (Vision improvement)

एवोकॅडो तुमचे डोळे निरोगी ठेवण्यात मदत करतात. यामध्ये लेटेन आणि झेक्सॅन्थिन सारख्या कॅरोटीनोइड्स आहेत, जे डोळ्यांचे मोतीबिंदू, वया-संबंधित डोळ्यांचे रोग आणि मॅक्युलर डीजेनेरेशनपासून आपले डोळे संरक्षित करण्यात मदत करतात. अशा परिस्थितीत बहुतेक वेळा डोळ्याच्या ऊतींमध्ये मुक्त रेडिकल जमा होतात. या विशिष्ट कॅरोटीनोईड् एवोकॅडोची अँटीऑक्सिडंट क्रिया धोकादायक मुक्त रॅडिकल्सचा प्रभाव कमी करते.

6. मूत्रपिंडाचे आरोग्य (Kidney health)

क्रोनिक किंवा वारंवार मूत्रपिंडाच्या विकारांनी ग्रस्त असलेल्या लोकांमध्ये खनिजे आणि द्रवपदार्थाचा संतुलन राखण्यासाठी आहार महत्वाची भूमिका निभावते. पोटॅशियम हे एक खनिज आहे जे हृदयाचे सामान्य गती कायम राखण्यास मदत करते. अ‍वोकाडो (avocado in marathi) पोटॅशियमचा चांगला स्रोत आहे आणि आपल्या आहारात समाविष्ट केल्यामुळे त्याचे इतर फायदे देखील मिळू शकतात.

हे सुनिश्चित करणे महत्वाचे आहे की पोटॅशियमची पातळी खूप जास्त नाही कारण ते हृदयासाठी देखील धोकादायक ठरू शकतात. पेशी आणि अवयवांसाठी रासायनिक वाहिन्यांद्वारे द्रव संतुलन राखण्यासाठी पोटॅशियम ही एक महत्वाची बाब आहे. मूत्रपिंडाच्या कार्यासाठी द्रवपदार्थाचे हे संतुलन शरीरात द्रव आणि विषाच्या हालचाली हाताळते.

7. Morning sickness during pregnancy

गर्भधारणेदरम्यान, सकाळी होणार त्रास ही खूप सामान्य गोष्ट आहे गर्भधारणेदरम्यान एव्होकॅडो (avocado in marathi) खाल्ल्यास मळमळ आणि क्वासीसवर विजय मिळविण्यास मदत होते. कारण त्यात व्हिटॅमिन बी-6 असते, जे सहसा मळमळ आणि उलट्या कमी करण्याशी मदत करते.

avocado meaning in marathi
avocado

8. वजन कमी करण्यास मदत

नियमित व्यायामासह निरोगी व सकस आहार घेतल्यास वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते. त्याच बरोबर जर आहारात तुम्ही एवोकॅडो चा समावेश केला तर त्याचे परिणाम लगेच दिसून येतात. एवोकॅडो(avocado in marathi) हे फळ शरीराला पौष्टिक मूल्य प्रदान करतात आणि वजन नियंत्रणास मदत करतात. वजन नियंत्रित करण्यासाठी अ‍ेवोकॅडोचे अनेक फायदेशीर प्रभाव नुकत्याच झालेल्या अभ्यासाक्रमात सुचविले गेले आहेत.

9. अँटीकँसर गुणधर्म

एवोकॅडोच्या आरोग्य विषयक फायद्यांमध्ये स्तन कर्करोग आणि प्रोस्टेट कर्करोगाचा धोका कमी होतो असे अभ्यासाद्वारे समोर आले आहे. एवोकॅडोमध्ये कॅरोटीनोईड्स आणि मोनोअनसॅच्युरेटेड फॅट असतात, हे दोन्हीही कर्करोगाच्या धोका कमी करण्यास महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. अ‍ॅव्होकॅडोमध्ये ग्लूटाथिओन देखील आहे, जो अँटीऑक्सिडेंट आहे जो कर्करोगाच्या पेशी आणि मुक्त रॅडिकल्सच्या धोकादायक प्रभावांपासून रक्षण करतो.

10. रक्तातील ग्लुकोजची पातळी

फळांव्यतिरिक्त एवोकॅडोच्या पानांचा रस देखील आरोग्यास लाभकारक आहे. एवोकॅडोच्या पानांचा अर्क रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करू शकतो. एवोकॅडोमधील बहुतेक कार्बोहायड्रेट-7 कार्बन शुगर्सपासून बनलेले असतात, ज्यात तुलनेने क्वचितच साखर असते हे एंजाइम हेक्सोकिनेस ला प्रतिबंधित करते. हे अ‍ॅव्होकॅडोस ग्लूकोजद्वारे शरीरात चयापचय होण्याच्या मार्गावर नियंत्रण ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांच्या एकूण आरोग्यास संरक्षण मिळते.

Side Effects of Avocado in marathi

जर अ‍वाकाॅडोला संपूर्ण भोजन किंवा संपूर्ण आहार म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही, कारण रोगांपासून बचाव करण्यासाठी हे सर्वात महत्वाचा खाद्यपदार्थ आहे. हे फळ निरोगी आयुष्याचे सिक्रेट आहे. परंतु कधीकधी त्याचे(avocado in marathi) अत्यधिक सेवन आपल्या आरोग्यास हानिकारक देखील ठरू शकते. त्याचे काही दुष्परिणाम खालीलप्रमाणे आहेतः

प्रमाणात घेतल्या गेलेल्या एवोकॅडोच्या दुष्परिणामांमध्ये या गोष्टी समाविष्ट आहेत:

आपण एवोकॅडोचे (avocado in marathi) मोठ्या प्रमाणात सेवन केल्यास ते आपल्या आरोग्यास हानिकारक ठरू शकते, एवोकॅडोचे काही दुष्परिणाम खालीलप्रमाणे आहेत:

 • मायग्रेन
 • मळमळ
 • उलट्या होणे
 • प्रकाशासाठी संवेदनशीलता (Sensitivity to light)

जर एवोकॅडो खाल्ल्याने तुम्हाला वरील लक्षणें जाणवत असतील तर ताबडतोब एवोकॅडोचे सेवन मर्यादित करा आणि जवळच्या डॉक्टरांना भेटा.

what is avocado called in marathi

वर म्हटल्या प्रमाणे मूलतः एवोकॅडो (avocado in marathi) हे अमेरिकन/मॅक्सिकन फळ आहे. या फळाचे मूळ हे भारतीय नसल्या कारणाने याला मराठीत असे विशेष ठराविक नाव नाही. विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात श्रीलंकेमधून त्याची आपल्याला ओळख झाली. म्हणून या फळाला आपण एवोकॅडो असेच म्हटले पाहिजे.

हिंदीमध्ये या फळाला “मख्खनफल” म्हणून ओळखतात. किंवा अलीकडे त्याचे तसे नामकरण करण्यात आले असावे. परंतु मराठी भाषेत त्याला वेगळे काही नाव नाही सामान्यतः एवोकॅडो असेच संबोधले जाते. मराठी भाषेत एवोकॅडोच नामकरण करायचं म्हटलं तर मी त्याला “लोणीफळ” असे नाव देईल. बघा आता तुम्हाला यापेक्षा सुंदर नाव सुचतं का? किंवा तुमच्याकडे काही नावे असतील तर खाली कॉमेटबॉक्स मध्ये नक्की कळवा.

हा लेख आवडल्यास आपल्या मित्रांना सोशल मिडीयावर नक्की शेअर करा.

Disclaimer

प्रस्तुत लेखातील सूचना आणि सल्ले हे केवळ सामान्य माहितीसाठीच आहेत, यांना व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून घेतले जाऊ शकत नाही. कृपया आरोग्यविषयक कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

साल्मन माशाला मराठी भाषेत काय म्हणतात? खाण्याचे 5 फायदे : salmon fish in marathi

0
salmon fish in marathi
salmon fish in marathi

salmon fish in marathi: साल्मन /ˈसॅमन / Salmon fish ला मराठी भाषेत काय म्हणतात? हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर हा मासा Salmonidae कुटूंबातील एका माशाचा प्रकार आहे. त्याच बरोबर trout, char, grayling, आणि whitefish हे माशे सुद्धा Salmonidae कुटूंबातील प्रजाती आहेत. सॅल्मन माश्याचे मूळ उत्तर अटलांटिक (genus Salmo) आणि पॅसिफिक महासागर हे आहे.

दक्षिण अमेरिका स्थित ग्रेट लेक्स ऑफ नॉर्थ अमेरिका आणि पॅटागोनिया सारख्या तुलनेने थोडया उष्ण वातावरणात सुद्धा Salmon माश्याच्या बऱ्याच प्रजाती अस्तित्वात आल्या आहेत. त्यानंतर आता जगातील बर्‍याच भागात Salmon माशाची कृत्रिम शेती केली जाते.

सामान्यतः साल्मन मासे हे “एनाड्रोमस” असतात म्हणजेच प्रवाहाच्या विरुध्द पोहणारे. सुरुवातीला हे गोड्या पाण्यातून समुद्रात थलांतर करतात आणि प्रजनन करण्यासाठी गोड्या पाण्याकडे परत जातात. आपली अंडी देण्यासाठी हे मासे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने नदीकडे पोहतात.

Salmon माश्याच्या प्रजाती । salmon fish in marathi

salmon fish in marathi
salmon fish

salmon fish in marathi: साल्मन माश्यांच्या दोन प्रमुख प्रजाती आढळतात Salmo आणि Oncorhynchus. Salmo ही प्रजाती मुख्यत्वे अटलांटिक साल्मन म्हणून ओळखली जाते तर Oncorhynchus ही पॅसिफिक साल्मन म्हणून ओळखली जाते. अटलांटिक साल्मन मध्ये Salmo ही एकचं प्रजाती येते तर पॅसिफिक साल्मन मध्ये एकूण ६ उप-प्रजाती येतात याबद्दल खालील यादी पहा.

1. Salmo: Atlantic salmon

2. Pacific salmon: 1) Chinook salmon 2) Chum salmon 3) Coho salmon 4) Masu salmon 5) Pink salmon 6) Sockeye salmon

आणखी कुठल्या माश्यांना salmon fish म्हटले जाते? salmon fish in marathi

salmon fish बाबतीत आता पर्येंत बऱ्यापैकी माहिती आपल्याला झाली असेल. पण जगात आणखीही काही मासे आहेत ज्यांना साल्मन मासे म्हणून ओळखले जाते. आणि त्यातील एक भारतीय सुद्धा आहे. होय तुम्ही अगदी अचूक अंदाज लावला. चला तर मग जाणून घेऊया कि आणखी कुठल्या माश्यांना salmon fish समजले जाते.

सामान्य नावशास्त्रीय नाव
Australian salmonArripis trutta (Forster, 1801)
Hawaiian salmonElagatis bipinnulata (Quoy & Gaimard, 1825)
Danube salmonHucho hucho (Linnaeus, 1758)
Indian salmonEleutheronema tetradactylum (Shaw, 1804)
Some other fishes called salmon

salmon fish nutrition value in marathi

सामान्यतः साल्मन माश्यांपासून उच्च दर्जाचं प्रोटीन, हेल्दी गुड फॅट, आणि ओमेगा-3 फॅटी ऍसिड मिळतं. त्याचबरोबर अनेक आवश्यक विटामिन्स जसे B3, B5, B6, B12, vitamin D, vitamin E आणि मिनरल्स देखील मिळतात म्हणून हा मासा जगभरात लोकप्रिय आहे.

Salmon fish Nutrition Facts in marathi

खालील पौष्टिक माहिती USDA द्वारे (85 ग्रॅम) कच्च्या, अटलांटिक सॅल्मनसाठी प्रदान केली आहेत.

 • कॅलरी: 121
 • चरबी: 5.4 ग्रॅम
 • सोडियम: 37.4 मीली ग्रॅम
 • कार्बोहाइड्रेट: 0 ग्रॅम
 • प्रोटीन: 17 ग्रॅम
 • फाइबर: 0 ग्रॅम
 • साखर: 0 ग्रॅम

प्रथिने

85 ग्रॅम कच्च्या अटलांटिक सॅल्मन माश्यांमध्ये 17 ग्रॅम प्रथिने असतात. कृत्रिम शेतात वाढवलेल्या सॅल्मन मध्ये चरबी जास्त असल्यामुळे, वजनात प्रोटीन किंचित कमी असते. म्हणून सॅल्मन मासा एक उच्च-गुणवत्तेच्या संपूर्ण प्रोटीनचा एक उत्कृष्ट स्त्रोत आहे जो आपल्या शरीरात आवश्यक असणारे अमीनो ऍसिड आपल्याला प्रदान करतो.

कार्ब

सॅल्मन मासा हा नैसर्गिक फायबर आणि साखरेसह कार्बोहायड्रेट्सपासून मुक्त आहे.

फॅट

85 ग्रॅम कच्च्या अटलांटिक सॅल्मन माश्यांमध्ये चरबीचे प्रमाण (good fat) 5.4 ग्रॅम असते. यापैकी यापैकी EPA आणि DHA सह सुमारे 1.5 ग्रॅम फायदेशीर ओमेगा-3 फॅटी ऍसिड असते. जे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत लाभकारक आहे.

जीवनसत्त्वे आणि खनिजे

सॅल्मन माश्यापासून व्हिटॅमिन ए आणि अनेक बी-जीवनसत्त्वे मिळतात. व्हिटॅमिन डी साठी सॅल्मन मासा हा एक चांगला स्रोत आहे. तसेच हा मासा बऱ्याच मिनरल्सच्या नैसर्गिक अन्न स्त्रोतांपैकी एक आहे. सॅल्मनमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस, जस्त आणि सेलेनियम यासह अनेक मिनरल्स देखील मोठ्या प्रमाणात असतात. याव्यतिरिक्त, सॅल्मनमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम देखील असते.

Benefits of Salmon Fish in marathi

साल्मन मासे खाल्ल्याने खालील फायदे होऊ शकतात. salmon fish in marathi

1. हृदयाच्या आरोग्यासाठी

हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्यासाठी साल्मन फिशचे फायदे घेतले जाऊ शकतात. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या मते, आठवड्यातून एकदा सॅल्मन फिश खाणे हृदयविकाराचा झटका आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांपासून बचाव करू शकतो. अश्या प्रकरणात, सॅल्मन फिश आठवड्यातून एक किंवा दोनदा सेवन केले जाऊ शकतात. पण त्याआधी डॉक्टर कडून एकदा वैद्यकीय सल्ला नक्की घ्यावा.

2. वजन कमी करण्यासाठी

वजन कमी करण्यासाठी सॅल्मन फिशचा वापर केला जाऊ शकतो. सीडीसी (सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन) च्या मते वजन कमी करण्यासाठी, कमी कॅलरीयुक्त आहारामुळे वजन नियंत्रित राहू शकते. या प्रकरणात, ग्रील्ड सॅल्मन किंवा भाजलेले साल्मन खाणे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

3. सूज कमी करण्यासाठी

सॅल्मन फिशचा उपयोग शरीरात होणार्‍या काही सामान्य प्रकारची सूज कमी करण्यासाठी केला जाऊ शकतो. सॅल्मन माशामध्ये ओलेगा-3 फॅटी ऍसिड आढळतो, जो दाहक-विरोधी समजला जातो. जर सूज अधिक गंभीर असेल तर वैद्यकीय उपचार घ्या.

4. केसांसाठी सॉल्मन फिशचे फायदे

केसांना निरोगी ठेवण्यासाठी साल्मन फिशचा वापर केला जाऊ शकतो. NCBI (नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फर्मेशन) च्या म्हणण्यानुसार, सालमन फिशमध्ये व्हिटॅमिन डी -3 घेणे केसांना निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

5. त्वचेसाठी सॅल्मन फिशचे फायदे salmon fish in marathi

त्वचेसाठी सॅल्मन माशांचे फायदे घेतले जाऊ शकतात. सॅल्मन फिश हा प्रथिनांचा चांगला स्रोत मानला जातो. प्रोटीनचे सेवन आपल्या स्नायू तसेच त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. अशा परिस्थितीत, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर मासे आहारात समाविष्ट केली जाऊ शकतात.

How to eat Salmon Fish in marathi

खालीलप्रमाणे सॅल्मन फिशचा वापर केला जाऊ शकतो.

कधी खावे: सॅल्मन मासे सकाळी न्याहारीत घेऊ शकता. आपण दुपारच्या जेवणात देखील सॅल्मन फिश खाऊ शकता. तसेच रात्रीच्या जेवणासाठी देखील सॅल्मन मासे खाऊ शकतो.

salmon fish in marathi
salmon fish
 • साल्मन मासे तेलात तळून खाऊ शकता.
 • फिश करी बनवून खाऊ शकतो.
 • हे मासे वाफवून सुद्धा खाल्ले जाऊ शकतात.
 • काही लोक हे मासे लिंबू पिळून कच्चे सुद्धा खातात.
 • पालेभाज्यां बरोबर वाफवून खाऊ शकता.
 • तव्यावर तेलात भाजून खाऊ शकता.

साल्मन माशाला मराठी भाषेत काय म्हणतात? salmon fish in marathi

आता मूळ विषयाकडे वळूया की सॅल्मन माशाला मराठी भाषेत काय म्हणतात? (salmon fish in marathi) सॅल्मन मासे हे मुळात थंड पाण्यात राहणारे मासे आहेत. भूमध्य, प्रशांत आणि अटलांटिक महासागराच्या थंड पाण्यात मुख्यतः वस्ती आहे. थोडक्यात सॅल्मन माश्याचे मूळ हे उबदार पाण्याचे नाही. आणि म्हणूनच साल्मन मासे हे भारतातील रहिवासी नसल्याने त्यासाठी विशेष असे मराठी किंवा इतर कुठल्याही भारतीय भाषेत नाव नाही.

काही लोकांना वाटत सॅल्मन मासा आणि “रावस” हे एकाच माशाचे नाव आहे. पण हे पूर्णतः खरे नाही. रावस माशाचे शास्त्रीय नाव Polynemus tetraductylus असे आहे. पण रावस माश्याला आपण भारतीय सॅल्मन (Indian salmon) म्हणू शकता. रावस माश्याला आपण सॅल्मन माशाचा लांबचा नातेवाईक समजूया जो भारतात राहतो. पण लक्षात ठेवा हे या माशाचे दोन वेगवेगळे प्रकार आहेत.

निष्कर्ष salmon fish in marathi

तर मित्रांनो आज आपण काय शिकलो? आपण हे शिकलो की सॅल्मन मासा कुठे आढळतो? सॅल्मन माश्याच शास्त्रीय नाव काय आहे? या माश्याच्या आणखी किती प्रजाती आहेत? हा मासा खायचे किती फायदे आहेत? यात काय काय पोष्ट तत्वे आहेत? आणि सॅल्मन माश्याला आपल्या मराठी भाषेत कुठल्या नावाने ओळखतात?

हे सर्व प्रश्न आणि बरीच माहिती आपण या लेखात समजून घेतली आहे. मला आशा आहे तुम्हाला माझा हा लेख (salmon fish in marathi) नक्की आवडला असेल तुमचे आणखी काही प्रश्न असतील तर नक्की कॉमेंटबॉक्स मध्ये कळवा. लेख आवडल्यास सोशल मीडियावर शेअर करा.

Disclaimer

प्रस्तुत लेखातील सूचना आणि सल्ले हे केवळ सामान्य माहितीसाठीच आहेत, यांना व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून घेतले जाऊ शकत नाही. कृपया आरोग्यविषयक कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

प्रदूषण वर निबंध मराठी |Best essay on pollution in marathi 500+ Words

0
essay on pollution in marathi
pollution

essay on pollution in marathi: प्रदूषण ही एक जागतिक गंभीर समस्या आहे हे आता आपल्या प्रत्येकाला कळून चूकले आहे. प्रदूषणाची पातळी इतकी वाढत आहे कि त्याचा परिणाम आता जागतिक तापमान वाढीवर दिसून येत आहे. म्हणूनच, त्वरित या समस्येवर लक्ष देण्याची आणि कायमस्वरूपी तोडगा काढण्याची नितांत आवश्यकता आहे.

प्रदूषणामुळे आपल्या पृथ्वीचे गंभीर नुकसान होत आहे आणि आपल्याला त्याचे दुष्परिणाम समजून घेण्याची गरज आहे आणि हे नुकसान टाळले जाणे आवश्यक आहे. प्रदूषणावरील या निबंधात आपण प्रदूषणाचे परिणाम आणि ते कसे कमी करता येतील याकडे लक्ष देऊ. हा निबंध तुम्ही कुठल्याही निबंध स्पर्धेत किंवा परीक्षेत सहज वापरू शकता.

पण त्याआधी विध्यार्थी मित्रांनो आपण समजून घेऊया की “प्रदूषण म्हणजे काय”? कश्यासाठी तर, जेणेकरून तुम्हाला essay on pollution in marathi हा निबंध लिहितांना “प्रदूषण” विषयाची खोलवर माहिती असावी म्हणून. तर चला मग सुरुवात करूया निबंध लिहिण्यासाठी आवश्यक असलेल्या या महत्वाच्या विषयाची.

प्रदूषण म्हणजे काय? । pradushan essay in marathi language

pradushan essay in marathi language
pollution

सध्याचे युग हे औद्योगिक विकासाचे युग आहे. जगातील सर्व विकसनशील देशांमध्ये हजारो कारखरण्यात दिवसरात्र उत्पादने बनवण्याचे काम सुरु आहे. या सर्वांच्या परिणामामुळे आपले वातावरण दूषित होत आहे. आपल्याला श्वास घेण्यासाठी शुद्ध हवा मिळणेसुद्धा कठीण झाले आहे. आपले पाणी आणि जमीनही प्रदूषित होत आहे. हवा, पाणी आणि जमीन प्रदूषण ही एक मोठी गंभीर समस्या आहे.

हवेचे प्रदूषण मुख्यत: कारखान्यातून निघणाऱ्या धुरामुळे होते. रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांमध्ये इंधन जाळल्यामुळे हवा दूषित होते. या हवेमध्ये बरीच विषारी वायू आढळतात. हे वायू आपल्या शरीरात श्वासोच्छवासाद्वारे प्रवेश करतात, ज्याचा आरोग्यावर फार वाईट परिणाम होतो.

त्यामुळे नवीन रोग जन्माला येतात. मोटर्सच्या इंधन ज्वलनामुळे तयार होणारे कार्बन-मोनोऑक्साइड, नायट्रोजन-डायऑक्साइड आणि सल्फर डायऑक्साईड सारखे वायू हवेला विषारी बनवतात.पाण्याचे प्रदूषण प्रामुख्याने कारखान्यातून बाहेर येणाऱ्या विषारी द्रवपदार्थांमुळे होते. मोठ्या शहरांमधील घाण गटारे नद्यांमध्ये पडतात, ज्यामुळे पाणी दूषित होते. या घाण पाण्यात हजारो विषाणू तयार होतात.

नद्यांचे पाणी पिण्यायोग्य आहे असे समजून आपण ते ना उकळता पितो म्हणून अनेक रोग आपल्यावर हल्ला करतात. पिकांच्या संरक्षणासाठी, आपण वापरत असलेल्या अनेक जंतुनाशक औषधे आपले अन्न दूषित करतात. शेकडो प्रकारची रसायने आणि जंतूंनाशकांच्या फवारण्यामुळे जमिनीचे प्रदूषण होते. रस्त्यांच्या कडेला ओसंडून वाहत असलेल्या कचराकुंड्या अनेक आजारांना जन्म देतात.

धावत्या गाड्या आणि गिरण्यांमधून निघणारा कर्कश आवाजही आरोग्यास हानीकारक आहे. आपल्याला न दिसणारे विविध प्रकारचे रेडिएशन अणुयुगाचे परिणाम आहेत. ही रेडिओ किरणं आरोग्यासाठी खूप धोकादायक आहेत. अण्वस्त्रांच्या चाचणीमुळे या किरणांचे प्रमाण दररोज वाढत आहे.

तर विध्यार्थी मित्रांनो ही प्रदूषणाची थोडक्यात व्याख्या आहे. “essay on pollution in marathi” निबंध लेखन करतांना तुम्ही वरील मुद्दे लक्षात ठेवले तर तुम्हाला निबंध लिहायला सोपे जाईल. चला आता मूळ निबंधाकडे वळूया.

essay on pollution in marathi । प्रदूषण वर निबंध मराठी

वैज्ञानिक क्रांती झाल्यानंतर आधुनिक जगात मानवतेच्या सेवेसाठी वैज्ञानिकांनी जे शोध लावले त्यामुळे त्याकाळी मानवी जीवनातल्या काही अशक्य वाटणाऱ्या अडचणी आज दूर झाल्या. मानवी जीवन अधिक सुखकर आणि सोपे झाले. तरीही, त्यातून होत असलेले दुष्परिणाम सुद्धा आज आपल्या समोर उभे आहे त्यातला सर्वात मोठा आणि गंभीर दुष्परिणाम म्हणजे “प्रदूषण“.

प्रदूषणाचा नेमका अर्थ । Pradushan Essay in Marathi Language

प्रदूषण म्हणजे नैसर्गिक संतुलनातील एक दोष किंवा पर्यवरणात होत असलेला बिघाड. ज्याने नैसर्गिक पर्यावरणाचा ह्रास होतो. शुद्ध हवा, शुद्ध पाणी, शुद्ध अन्न, किंवा शांत नैसर्गिक वातावरण न मिळणे याला प्रदूषण म्हणतात. प्रदूषणाचे बरेच प्रकार आहेत. त्यातील वायू प्रदूषण, जल प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण हे मुख्य प्रकार आहेत.

वायू प्रदूषण –

महानगरांमध्ये हे प्रदूषण मोठ्या प्रमाणात पसरते. दिवसरात्र कारखान्यांतून निघणारा धूर, मोटार वाहनांमधून निघणारा काळा धूर प्रचंड प्रमाणात हवेत मिसळल्यामुळे आता महानगरात निरोगी हवेत श्वास घेणे कठीण झाले आहे. भारतातल्या सगळ्याच मध्य शहरात हवेतील प्रदूषणाने कधीच धोक्याची पातळी ओलांडली आहे. औद्धोगीकरणामुळे शहरात मोकळा श्वास घेणे अशक्य झाले आहे. ही समस्या जास्त आहे जिथे लोकसंख्या दाट आहे, झाडांची कमतरता आहे आणि वातावरण अधिकाधिक प्रदूषित होत चालले आहे.

जल प्रदूषण –

कारखान्यांचे दूषित पाणी त्यावर काहीही प्रकिया न करता सरळ नदी किंवा नाल्यांमध्ये सोडले जाते. आणि त्यामुळे नदीच्या स्वच्छ पाण्याचे देखील तीव्र प्रदूषण होते. नद्यांचे हे पाणी धरणांमध्ये जाते पुढे हेच दूषित पाणी नळाद्वारे तुमच्या आमच्या घरात येते. यामुळे अनेक रोग दरवर्षी उद्भवतात. सर्वसामान्यांच्या आरोग्यावर यामुळे भयानक परिणाम होतो.

ध्वनि प्रदूषण –

माणसाला जगण्यासाठी शांत वातावरणाची गरज आहे. निसर्गाच्या सानिध्यात राहिल्याने मनुष्यचं काय तर इतर प्राणी, पक्षी सुद्धा निरोगी व आनंदी आयुष्य जगू शकतात. किंबहुना तो सर्वांचा हक्कच आहे. पण आजकाल कारखान्यांचा आवाज, वाहतुकीचा आवाज, मोटार वाहनांचा आरडाओरडा, लाऊड ​​स्पीकर्सचा कर्कश आवाज यामुळे बहिरेपणा आणि तणाव निर्माण झाला आहे.

प्रदूषणाची कारणे | pollution essay in marathi

अनियंत्रित कारखाने, वैज्ञानिक संसाधनांचा जास्त प्रमाणात वापर, टेलिव्हिजन, फ्रिज, कूलर, वातानुकूलन, वीजेचा अमर्यादीत वापर इत्यादी कारणे वाढत्या प्रदूषणास जबाबदार आहेत. नैसर्गिक संतुलन बिघडणे हे देखील याला मुख्य कारण आहे. झाडे तोडल्यामुळे, जंगले नष्ट केल्यामुळे हवामानाचे चक्र विचलित झाले आहे. दाट वस्ती असलेल्या भागात हिरवळ न राहिल्यामुळे प्रदूषण वाढले आहे.

प्रदूषणाचे दुष्परिणाम | essay on pollution in marathi

वरील प्रदूषणामुळे मनुष्याच्या निरोगी जीवनाला धोका निर्माण झाला आहे. शिवाय पेरणी, पक्षी, कीटक, समुद्री जीव यांचे जीवन सुद्धा धोक्यात आहे. दरवर्षी होणारी जागतिक तापमान वाढ पृथ्वीचा नाश करत आहे. मनुष्य मुक्त हवेत दीर्घ श्वास घेण्यास आतुर झाला आहे.

अस्वच्छ पाण्यामुळे अनेक घातक रसायने पिकामध्ये जातात आणि मानवी शरीरात पोहोचतात व प्राणघातक रोगांना कारणीभूत ठरतात. कारखान्यातून झालेल्या गॅस गळतीमुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला, किती अपंग झाले. इको प्रदूषणामुळे ना पाऊस वेळेवर येत नाही, ना हिवाळा-उन्हाळा चक्र व्यवस्थित चालत आहे. अवकाळी पाऊस, दुष्काळ, पूर, गारपीट इत्यादी नैसर्गिक प्रादुर्भावांचे कारणही प्रदूषण हेच आहे.

प्रदूषण कमी करण्याचे उपाय – essay on pollution in marathi

 • विविध प्रकारचे प्रदूषण टाळण्यासाठी जास्तीत जास्त झाडे लावली पाहिजेत.
 • कारखाने लोकवस्ती पासून लांब असावेत.
 • कारखान्यातील दूषित पाणी नदी-नाल्यात सोडू नये.
 • गटारांच्या पाण्याचे योग्य प्रकारे नियोजन करणे गरजेचे.
 • झाडांची अमर्याद कत्तल करून जंगले नष्ट करू नये.
 • खनिज संप्पतीचा अमर्याद उपसा करू नये.
 • जास्तीत जास्त सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा उपयोग.
 • अमर्याद इंधन (पेट्रोल/डिजेल) जाळू नये.
 • पाण्यात कचरा टाकू नये.
 • प्लास्टिक वस्तूंचा वापर कमीत कमी करावा.
 • गाडी चावताना विनाकारण हॉर्न वाजवू नये.
 • वीजेचा अमर्याद वापर करू नये.
 • घराबाहेर जातांना वीजेचे दिवे बंद करावे.

प्रदूषण कमी करण्यासाठी आपण वैयक्तिकरित्या पावले उचलली पाहिजेत. ही पृथ्वी जास्तीत जास्त हिरवी आणि थंड राहील याची काळजी घेतली पाहिजे. याउप्पर, कुणी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आपल्या परीने काही प्रयत्न करत असेल तर त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे व आपणही त्या कार्याला हातभार लावला पाहिजे. (समाप्त)

मला आशा आहे की माझा हा लेख “Best essay on pollution in marathi 500+ Words | प्रदूषण निबंध मराठी” तुम्हाला नक्कीच आवडला असेल. निबंध लिहिण्याची इच्छा असलेल्या तरुण विध्यार्थ्यांसाठी हा लेख मदतगार आहे. वरील निबंधात प्रदूषण या विषया बद्दल ज्या मुख्य गोष्टी आहेत त्या सर्व सामावून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न या निबंधात केला गेला आहे.

प्रदूषणा वरील या निबंधाचा आधार घेऊन, विध्यार्थी आपल्या काही स्वतःच्या कल्पना निवडू शकतात आणि काही ओळींचा मसुदा तयार करू शकतात. वाक्य कसे बनवायचे आणि स्वतःचे लेखन कौशल्य कसे वाढवायचे हे शिकू शकतात. लेख आवडल्यास आपल्या मित्रांना, नातलगांना सोशल मीडियावर नक्की शेअर करा.

चिया सीड ला मराठीत काय म्हणतात? खाण्याचे 10 आश्चर्यकारक फायदे : chia seeds in marathi

0
chia seed in marathi
chia seed in marathi

chia seeds in marathi- चिया बियांमध्ये आरोग्याचा खजिना लपलेला आहे. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर चिया बियाणे तुमच्यासाठी अतंत्य फायदेशीर ठरू शकतात. आजकाल बहुतेक लोक वजन कमी करण्याच्या समस्येशी झगडत आहेत. बरेच लोक असे आहेत जे फिट राहण्यासाठी वर्कआउट बरोबरच घरगुती उपचार देखील घेण्याचा प्रयत्न करतात. म्हणून जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर दररोज चिया बिया खाणे तुमच्यासाठी फायदेशीर आहे.

हे सीड आपल्याला केवळ शारीरिकदृष्ट्या निरोगी ठेवत नाहीत तर बर्‍याच आजारांपासून सुद्धा वाचवते. चियाच्या बियाण्यांच्या आश्चर्यकारक फायद्यांबद्दल बरेचजणांना माहिती नाही. या आकाराने छोट्या दिसणाऱ्या चिया बियाण्यांमध्ये असे अनेक गुण दडलेले आहेत जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. पण त्या आधी आपण समजून घेऊया की हे नेमके चिया बियाणे [chia seeds in marathi] आहेत तरी काय? चला मग जराही उशीर न कारता जाणून घेऊया chia seeds बद्दल.

What is chia seeds called in Marathi? chia seeds ला मराठीत काय म्हणतात?

काही लोक chia seed ला सुपरफूड देखील म्हणतात. चिया बियाणे हे आता बर्‍याच देशांमध्ये पोचले आहेत, व आता भारतातील बर्‍याच घरांमध्ये ते सामान्य घटक बनत आहेत. त्याच्या आश्चर्यकारक आरोग्य फायद्यांमुळे हे मनुष्यासाठी एक वरदान ठरले आहे. आज जास्तीत जास्त लोक त्यांच्या आहारात chia seed घेतात.

दिसायला अगदी लहान दिसणाऱ्या chia seed मध्ये औषधी गुणांचा खजिना आहे. या बिया स्वस्थ राहण्याबरोबरच अनेक आजारांपासून आपला बचाव करायला देखील मदत करतात. Chia Seeds हे मूळचे अमेरिकन (मेक्सिकन) बियाणे आहे. हे भारतात आढळत नाही. जागतिक बाजारपेठेमुळे हे बीज भारतीय बाजारात आले आहे.

हे मूळचे भारतीय नसल्याने chia seed ला मराठीत असे ठराविक नाव नाही. परंतु गैरसमजुतीतून याला “सब्जा” या नावाने ओळखले जाते. चिया ही एक फुलांची वनस्पती आहे, साल्व्हिया हिस्पॅनिकापासून मिळालेलं हे बीज आहे. ज्याचं मूळ अमेरिका आणि मेक्सिकोमध्ये आहे. उशीरा का होईना परंतु सर्वात आरोग्यादायी बियाण्यांपैकी बरीच लोकप्रियता chia seed ला आज मिळाली आहे.

बरेचसे लोक chia seed ला सुपरफूड देखील म्हणतात. परंतु मराठी भाषेत याला ठरविक असे नाव नाही. म्हणून अशा वेळी आपण chia seeds ला चिया सीड्स किंवा चिया बियाणे असेच म्हटलं पाहिजे. हे लक्षात ठेवा की “सब्जा” हे या बियांचं नाव नाही.

बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे की चिया बीज म्हणजेच सब्जा, पण तसं नाही सब्जा व चिया बीज यांच्यामध्ये खूप फरक आहे व दोन्ही वेगळ्या प्रकारच्या बिया आहेत. या दोन्ही बिया आहेत एवढी एकचं गोष्ट या दोन्हीमध्ये सामान आहे. सब्जा हा जास्त काळसर असतो व चिया बीज [Chia Seeds] राखाडी ते काळसर रंगाच्या असतात.

Benefits of chia seeds in marathi (चिया बीज ) आरोग्यासाठी फायदे

chia seed in marathi
chia seed

चिया बियामध्ये पोषक तत्त्वे भरपूर प्रमाणात असतात, चिया लहान, काळे बियाणे असतात, त्यात ओमेगा -3 फॅटी एसिड, मिनरल्स, प्रथिने इत्यादी भरपूर असतात जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. चिया बियाण्यांमध्ये फायबर मुबलक प्रमाणात आढळते, ज्याद्वारे आपण वजन नियंत्रित करू शकता. आपण त्यास आहारात कोणत्याही स्वरूपात समाविष्ट करू शकता.

वजन कमी करण्यासाठी उपयोगी chia seeds

चिया बियाणे वजन कमी करण्यास मदत करतात. वजन कमी करण्यासाठी आहार आणि कसरत दोन्ही आवश्यक आहेत. अशा परिस्थितीत फक्त चिया बियाणे खाणे फायद्याचे ठरणार नाही. एका संशोधनाच्या आधारे, फायबर आणि प्रथिनेयुक्त आहार वजन कमी करण्यास मदत करतो. अशा परिस्थितीत, जे लोक आहारात प्रथिने कॅलरीजच्या प्रमाणात ज्यास्त घेतात त्यांना वजन कमी करण्यास मदत होते. परंतु अचानक चिया बियाणे खाणे आरोग्यासाठी चांगले नाही. सेवन करण्यापूर्वी आहार तज्ञाचा सल्ला जरूर घ्या.

वजन कमी करण्याव्यतिरिक्त, chia seeds चे बरेच फायदे आहेत.

१. अर्ध्यापेक्षा जास्त आजारांचे मूळ म्हणजे पोट. अशा परिस्थितीत, पाचन प्रणाली सुधारण्यासाठी आहारात बदल करणे आवश्यक आहे. आपण देखील या प्रकारच्या समस्येमुळे त्रस्त असाल तर आपल्या आहारात चिया बियाण्यांचा समावेश करा. समजून घ्या की चिया बियाण्यांमध्ये फायबर मुबलक प्रमाणात आहेत, जे पाचक प्रणालीस सक्रिय स्वरूपात कार्य करण्यास प्रवृत्त करते.

२. शरीरातील हाडे मजबूत ठेवण्यासाठी chia seeds चे सेवन केले जाऊ शकते. चिया बियाणे कॅल्शियमचा उत्कृष्ट स्रोत आहे, ज्यामुळे हाडे मजबूत होतात. हाडे मजबूत करण्यासाठी आपण दुधामध्ये चिया बियाणे मिसळू शकता आणि पिऊ शकता.

३. निरोगी त्वचेसाठी देखील chia seeds फायदेशीर आहेत. चिया बियाण्यांमध्ये उच्च प्रमाणात अँटीऑक्सिडेंट असतात ज्यामुळे त्वचेवरील वृद्धत्वाचा प्रभाव कमी होतो. याशिवाय त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यात मदत होते.

४. अशक्तपणामुळे गर्भवती महिलांना जास्त त्रास होतो. अशक्तपणासारख्या आजारावर वेळेवर उपचार घेणे खूप महत्वाचे आहे. यासाठी खाण्यापिण्याची विशेष काळजी आवश्यक आहे. आहारात chia seeds समाविष्ट करणे फायदेशीर ठरू शकते, परंतु त्यात असलेल्या लोहाचे प्रमाण शरीरातील रक्त कमी करू शकते.

५. आजकाल कमकुवत स्मरणशक्तीचा त्रास बहुतेक तरुणांमध्ये दिसून येत आहे. यामागे बरीच कारणे असू शकतात. chia seeds वापरल्याने स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.

६. केस निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करण्याचे बरेच मार्ग आहेत, परंतु त्याचा काही फायदा होत नाही. chia seeds खाल्ल्यास आपण आपले केस निरोगी ठेवू शकता, कारण त्यात व्हिटॅमिन बी आहे. व्हिटॅमिन बी रोज घेतल्यास केस गळण्याच्या त्रासापासून मुक्त होता येते.

चिया बियाण्याचे दुष्परिणाम Side Effects Of Chia Seeds In Marathi

chia seeds चे बरेच फायदे आहेत. परंतु चांगल्या वस्तूचे अतिसेवन केल्याने नुकसान देखील होऊ शकते. आपण त्या वस्तूचा कसा वापर करता यावर हे अवलंबून आहे. जास्त प्रमाणात सेवन केल्याने गंभीर नुकसान होऊ शकते. म्हणून, चिया बियाण्यांचे फायदे तसेच चिया बियाण्यांचे नुकसान याबद्दल जाणून घेणे आवश्यक आहे.

१. लो ब्लड प्रेशर (Chia Seeds Can Lower Blood Pressure)

चिया बियामध्ये ओमेगा -3 फॅटी एसिड असतात जे रक्तदाब सामान्य करण्यात मदत करतात. परंतु चिया बियाणे [Chia Seeds In Marathi] जास्त प्रमाणात घेतल्यास रक्तदाब कमी होऊ शकतो. ज्यांना आधीच कमी रक्तदाब आहे त्यांच्यासाठी हे जाणून घेणे महत्वाचे आहे.

२. चिया बियाणे पोट खराब करू शकते (Chia Seeds Can Upset Stomach)

चिया बियाण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आढळतात. जास्त प्रमाणात फायबरचे सेवन केल्यास पाचन समस्या उद्भवू शकतात. ज्यामुळे पचन कमी होईल आणि पोट साफ व्हायला अडथळा येऊ शकतो.

३. चिया बियांमुळे अ‍ॅलर्जी होऊ शकते (Chia Seeds Can Cause Allergies)

तसे तर चिया बियांपासून एलर्जीची शक्यता फारच कमी आहे. परंतु चिया बियांचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा आवश्यक सल्ला घ्या. तुम्हाला इतर कोणत्याही बियांपासून एलर्जी असल्यास, तुम्हाला चिया बियांपासून एलर्जी होउ शकते.

४. औषधे घेत असाल तर चिया बियाणे टाळा (Avoid Chia Seeds During Medication)

जर तुम्हाला मधुमेह असेल तर चिया बियाणे खाऊ नका. आपल्या आहारात Chia Seeds घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. जर चिया बियाणे कोणत्याही औषधांबरोबर घेतले, तर यामुळे शरीरात वाईट परिणाम होऊ शकतात जसे की कमी रक्तदाब इ.

Chia Seeds Nutritional Value In Marathi

आरोग्याबद्दल जागरूक असलेल्या बहुतेक लोकांच्या आहारात चिया बियाणे समाविष्ट असतात. त्यामधील पौष्टिक तत्त्वामुळे चिया बियाण्याचे फायदे होतात. चिया बियामध्ये कुठले पौष्टिक घटक आहेत आणि किती प्रमाणात आहेत यासाठी आपण खाली दिलेला तक्ता पाहून चिया बियामध्ये असलेल्या पौष्टिक घटकांशी संबंधित संपूर्ण माहिती मिळवू शकता.

पौष्टिक तत्त्व मात्रा – 28 ग्रॅम
प्रथिने4 ग्रॅम
फायबर11 ग्रॅम
फॅट 9 ग्रॅम
कॅल्शियम18% आरडीआय
मॅंगनीज30% आरडीआय
मॅग्नेशियम30% आरडीआय
फॉस्फरस27% आरडीआय
Chia Seeds Nutritional Value

चिया बियांचा उपयोग व रेसिपी How To Eat Chia Seeds In Marathi

chia seed in marathi
chia seed

आतापर्यंत तुम्हाला आपल्याला Chia Seeds च्या फायद्यांविषयी माहिती झाली असेलच. आता आहारात चिया बियांचा कसा वापर करावा हे जाणून घ्यायची वेळ आली आहे. चिया बियांचा वापर अनेक प्रकारे तुम्ही तुमच्या आहारात समाविष्ट करू शकता. जर तुम्हाला रेसिपी बनवण्याचा कंटाळा आला असेल तरीही तुम्ही आपल्या आहारात चिया बियाण्यांचा इतर प्रकारे समाविष्ट करू शकता.

१. Chia Seeds आणि पाणी (Chia Seeds And Water)

आपल्या आहारात चिया बियाणे समाविष्ट करण्याचा हा सर्वात सामान्य आणि सोपा मार्ग आहे. चिया बियांचे पाणी तयार करण्यासाठी १/४ कप चिया बियाणे आणि ४ कप पाणी आवश्यक आहे. चिया बियाण्यांना सुमारे २०-३० मिनिटे पाण्यात भिजवावे. किंवा त्यात चव आणण्यासाठी तुम्ही लिंबाचा रस, संत्र्याचा रस देखील घालू शकता.

२. चिया बियाणे आणि कोशिंबीर (Chia Seed And Salad)

बहुतेक लोक चिया बियाणे भिजवल्या नंतर कोशिंबीर (salad) म्हणून चिया बियाणे खाणे पसंत करतात. यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करण्याची गरज नाही. आपल्या रोजच्या कोशिंबीरात चिया बिया घाला आणि आरोग्यवर्धक कोशिंबीरांचा आनंद घ्या.

३. चिया बियाणे आणि क्विनोआ (Chia Seeds And Quinoa)

जर तुम्हाला निव्वळ चिया बियाणे खायला आवडत नसेल तर आपण चिया बियाणे तांदूळ किंवा बाथळा (एक पालेभाजी) बरोबर आहारात खाऊ शकता.

४. चिया बियाणे आणि दही (Chia Seeds And Yogurt)

बर्‍याच लोकांना जेवणात दही खायला आवडते. चिया सीड डाएट समाविष्ट करण्यासाठी तुम्हाला फक्त चिया बीज दह्यात लागतील आणि एक स्वादिष्ट दही तयार असेल. तुम्ही चिया बियाणे मिक्सरमध्ये वाटून देखील घालू शकता.

FAQs

१. चिया बियांचे काय फायदेआहेत? (What benefits does chia seeds have?)

chia seeds चे फायदे आरोग्याशी संबंधित आहेत. दररोज चिया बियाणे खाणे वजन कमी करण्यास मदत करते कारण त्यात फायबर असते. याव्यतिरिक्त, यात ओमेगा -3 फॅटी ऍसिड मुबलक प्रमाणात उपलब्ध असते. ज्यामुळे आपले शरीर हृदयरोग, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल इत्यादी अनेक आजारांपासून सुरक्षित ठेवण्यास मदत होते. चिया बियाण्यांचे योग्य प्रमाणात सेवन करणे हे निरोगी आयुष्याच्या प्रारंभा करण्यासारखे आहे.

२. चिया बियाण्याचे तोटे काय आहेत? (Why Chia seeds are bad for you?)

चिया बियाणे घेतल्यानंतर रक्तदाब सामान्य राहतो. काही लोकांना चिया बियाण्यापासून देखील एलर्जी असू शकते. तुम्ही कोणत्याही प्रकारचे औषध घेत असल्यास, चिया बियाणे घेऊ नका. चिया बियाणे आकाराने लहान असतात आणि एकाच वेळी ते मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात. बर्‍याच वेळा असे केल्याने चिया बिया घशात अडकू शकतात ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. त्यामुळे हे काजळीपूर्वक बिजवून खाव्या लागतात.

३. एका दिवसात किती प्रमाणात चिया बियाणे खावे? (How much chia seeds should you eat?)

प्रत्येक आहारची गरज प्रत्येकाच्या शरीरानुसार असते. साधारणतया, दिवसातून दोनदा 20 ग्रॅम म्हणजे 1.5 चमचे चिया बियाणे सेवन करणे सामान्य आहे.

४. चिया बियाणे वजन कमी करण्यास कशी मदत करतात? (Can chia seeds help you loose weight?)

चिया बियाण्यांमध्ये भरपूर फायबर आढळतात. फायबर खाल्ल्यानंतर, पचण्यास जास्त वेळ लागतो आणि पोट बर्‍याच काळासाठी भरलेले राहते, ज्यामुळे वारंवार आणि पुन्हा पुन्हा भूक लागत नाही. म्हणून अभ्यासातून असे आढळले आहे की chia seeds वजन कमी करण्यास मदत करतात. परंतु आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की फक्त चिया बियाण्यांनी वजन कमी होणार नाही, त्यासाठी व्यायाम आणि संतुलित आहाराची काळजी घेणे देखील आवश्यक आहे.

Disclaimer

प्रस्तुत लेखातील सूचना आणि सल्ले हे केवळ सामान्य माहितीसाठीच आहेत, यांना व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून घेतले जाऊ शकत नाही. कृपया आरोग्यविषयक कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

रितिका फोगाट संपूर्ण माहिती मराठीत। Ritika Phogat :2021

0
ritika phogat
image source- NDTV.COM

रितिका फोगाट / Ritika Phogat suicide हरियाणाच्या चरखी दादरी जिल्ह्यात कुस्तीपटू रितिका फोगाट (वय 17) या आत्महत्येने मरण पावली. एका स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभूत झाल्याने पोलिसांनी गुरुवारी सांगितले. पण तिने आत्महत्या का केली? कोण होती ही रितिका फोगाट? चला आज जाणून घेऊया तिच्याबद्दल सविस्तर माहिती.

रितिका फोगाट / Ritika Phogat suicide (वय 17) ही, हरियाणाच्या चरखी दादरी जिल्ह्यात नावाजलेली कुस्तीपटू होती. भारताच्या प्रसिद्ध कुस्तीपट्टू गीता आणि बबिता फोगाट यांची ती चुलत बहीण होती, एका स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभूत झाल्याच्या घटनेने तिने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी गुरुवारी दिली.

अधिक माहिती देतांना पोलीस म्हणाले की रितिकाने 15 मार्चच्या रात्री नैराशेतून असे टोकाचे पाऊल उचलले. राजस्थानच्या जयपूर खेड्यातील रहिवासी, रितिका गेल्या चार वर्षांपासून Jhojhu Kalan पोलिस स्टेशन अंतर्गत चरखी दादरीच्या बालाळी गावात तिचे काका आणि द्रोणाचार्य पुरस्कार महावीरसिंह फोगट यांच्याकडे गेल्या चार वर्षांपासून राहत होती.

रितिका फोगाट 15 March 2021 रोजी रात्रीच्या वेळी तिच्या मामाच्या घरी मृत्यू झाला कारण तिचे प्रतिस्पर्ध्या कडून चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पराभवाचा धक्का बसल्यामुळे ती निराश झाली होती. 12 ते 14 मार्च दरम्यान राजस्थानच्या भरतपुर येथे ही स्पर्धा पार पडली.

कोण होती रितिका फोगाट? ritika phogat information in marathi

रितिका फोगाट / Ritika Phogat चरखी दादरी येथील महावीर फोगट स्पोर्ट्स Academy मध्ये कुस्ती चा सराव करीत होती. रितिका फोगट ही एक महिला रेसलर होती. तिचा जन्म 25 March 2004 रोजी राजस्थानच्या झुंझुनूच्या जैतपूर येथे झाला होता. आता 2021 पर्यंत ती 17 वर्षांची आहे. मीडिया रिपोर्टनुसार, रितिकाने 12 मार्च ते 14 मार्च दरम्यान राजस्थानमधील भरतपूर येथील लोहागड स्टेडियममध्ये राज्यस्तरीय उप-कनिष्ठ, कनिष्ठ महिलां आणि पुरुषांच्या कुस्ती स्पर्धेत भाग घेतला होता.

14 मार्च रोजी झालेल्या अंतिम सामन्यात रितिका एक गुण कमी मिळाल्यामुळे पराभूत झाली. या सामन्यादरम्यान महावीर फोगट ही तिथे उपस्थित असल्याचे सांगण्यात येते. पराभवानंतर रितिका ला मोठा धक्का बसला आणि तिने आपले जीवन संपवले.

Ritika Phogat Biography, Wiki, Death Reason, Sister, Family, Age

Ritika Phogat Biography, Age, Profession, Height

NameRitika Phogat
NicknameRittu
ProfessionWoman Wrestler
Famous ForGeeta and Babita Phogat Sister
InstagramNA
Ritika Phogat Biography

Physical Status

Age17 Years
HeightIn centimeters- 160 cm
In meters- 1.60 m
In Feet Inches-5’3 ”
WeightIn Kilograms- 55 kg
In Pounds- 121 lbs
Eye ColorBlack
Hair ColorBlack
Shoe Size5 US
Physical Status

Personal Information

Date of Birth25 March 2004
Birth PlaceJaitpur, Jhunjhunu, Rajasthan
Zodiac signNot Known
NationalityIndian
School NameNA
College NameNA
Qualifications12th Pass
Personal Information

Family Profile

Father NameNot Known
Mother NameNot Known
SistersGeeta and Babita Phogat
Family Profile

सर्वांना ठाऊक आहे की तिची चुलत बहीण गीता फोगटने 2010 पासून आयोजित राष्ट्रकुल खेळामधील कुस्तीमध्ये भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकले आहे. 2012 मध्ये तिला ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या पहिल्या भारतीय महिला-कुस्तीपटूची पदवीही मिळाली आहे. बहिण बबिता फोगाटनेही राष्ट्रकुल खेळ 2010 मध्ये रौप्य पदक जिंकले होते आणि 2012 मध्ये देखील कांस्यपदक जिंकले होते, शेवटी 2014 मध्ये तिने सुवर्णपदक जिंकले होते.

कुस्तीची स्टार गीता फोगट हिने रितिकाची तिची माहेरची बहीण एक प्रतिभावान कुस्तीपटू असल्याचे वर्णन केले. “माझ्या कुटुंबासाठी हा अत्यंत दु: खद क्षण आहे. रितिका एक प्रतिभावान कुस्तीपटू होती आणि तिने असे पाऊल का घेतले मला माहित नाही. विजय आणि पराभव हे एखाद्या अ‍ॅथलीटच्या जीवनाचा एक भाग असतात. आम्ही असे पाऊल उचलू नये, ”असं त्यांनी हिंदीमध्ये ट्विटमध्ये म्हटलं आहे.

माजी केंद्रीय मंत्री विजय कुमार सिंह यांनीही रितिकाच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे.

“एक भयानक बातमी आहे की आम्ही Ritika Phogat ला गमावले तिने पुढे एक उत्कृष्ट कारकीर्द केलीअसती. काही दशकांपूर्वी जिथे हे जग होते तेथून बदलले आहे. खेळाडूंना अशा दबावांचा सामना करावा लागत आहे जो यापूर्वी नव्हता. त्यांच्या दबावाचा सामना करण्यासाठी त्यांच्या प्रशिक्षणाचा एक महत्त्वाचा भाग असायला हवा. ”

ही खूपच दुःखद घटना आहे. एक तरुण महिला खेळाडू आपल्यातून जाणे अत्यंत धक्कादायक आहे. आत्महत्या हा काही शेवटचा उपाय असू शकत नाही. ती एक प्रतिभावान खेळाडू होती, तिच्या पुढे संपूर्ण आयुष्य होते अश्या कित्तेक कुस्त्या आणि याहूनही मोठ्या कुस्त्या ती भविष्यात सहज जिंकली असती.

आपण एक भविष्यातली आंतरराष्टीय कुस्तीपट्टू गमावलाय हे मात्र शंबर टक्के खरे आहे. तिला भावपूर्ण श्रद्धांजली.

माझा आवडता सण दिवाळी निबंध | Best Marathi Nibandh Diwali 2021

2
Marathi nibandh Diwali
Marathi nibandh Diwali

Best Marathi Nibandh Diwali: विध्यार्थी मित्रांनो जसे की आपण सगळे जाणतोच की, भारत हा विविधतेने नटलेला देश आहे, अनेक धर्माचे आणि पंथाचे लोक इथे आनंदाने राहतात. म्हणून भारतात वर्षभर विविध धर्माचे सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. दिवाळी (diwali information in marathi) हा सण अश्विन महिन्यात येतो इंग्रजी कॅलेंडर नुसार, साधारणतः ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात येतो.

आपल्या शाळेत दरवर्षी निबंध स्पर्धा आयोजित केली जाते, विध्यार्थी विविध विषयावर निबंध लेखन करतात. कधी कधी कुठल्यातरी एकाच विषयावर निबंध लिहिण्यासाठी आपल्याला सांगितलं जात. तसेच दरवर्षी दैवाच्या सुट्टीत एक निबंध हमखास लिहून आणायला सांगितलं जातो तो म्हणजे “माझा आवडता सण दिवाळी” (Marathi Nibandh Diwali) हा निबंध.

आणि म्हणूनच मी तुमचे मदत करण्यासाठी इथे आहे. तुम्हाला निबंध लिहितांना योग्य मुद्दे मांडता यावे म्हणून मी तुमच्यासाठी हा “Best Marathi Nibandh On Diwali” म्हणजेच “माझा आवडता सण दिवाळी” हा निबंध लिहीत आहे. उद्धेश फक्त एकच आहे, जेणेकरून दिवाळीवर निबंध लेखन करतांना तुम्हाला मदत व्हावी.

दिवाळीत शाळेला सुट्टी असते. तरीही, दरवर्षी शाळेत आपले शिक्षक हा निबंध लिहायला सांगतात त्यासाठी तुम्हाला मदत व्हावी म्हणून हा लेख प्रपंच. चला तर मग आणखी उशीर न करता आपण माझा आवडता सण दिवाळी (Marathi Nibandh) Diwaliहा निबंध लिहायला घेऊया तुम्हाला हा निबंध आवडला तर तुम्ही यात थोडाफार बदल करून तुमच्या होमवर्कसाठी याचा समावेश बिनदिक्कत करू शकता. मला या गोष्टीचा आनंदच होईल. चला तर मग मित्रांनो माझा आवडता सण दिवाळी निबंध | Marathi nibandh Diwali लिहायला सुरुवात करूया.

Marathi Nibandh Diwali
Diwali

माझा आवडता सण दिवाळी | Marathi Nibandh Diwali

दिवाळी किंवा “दीपावली” म्हणून ओळखल्या जाणारा हा सण भारतात आणि जगभरात राहणाऱ्या हिंदूंचा सर्वात मोठा व पवित्र सण आहे. हा सण जगभरातील लोक मोठ्या उत्साहात साजरा करतात. हा हिंदू सण मानला जात असला तरी, विविध समाजातील, जाती-धर्मातील लोक भेदभाव विसरून दिवे लावून हा सण साजरा करतात.

दिवाळी हा सण “दिपोत्सव” अंधारावर प्रकाशाचा विजय अर्थात प्रकाशाचा सण म्हणून ओळखला जातो. घरो-घरी मातीच्या पणतीचे दिवे लावले जातात. वेगवेगळ्या रंगांचे, आकारांचे दिवे लावून व आकाश कंदील लावून सारा परिसर “प्रकाशमान” केला जातो. हा सण जेंव्हा साजरा केला जातो तेंव्हा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसून येतो.

सांस्कृतिक मान्यतेनुसार प्रभू राम यांचे लंके वरून याचं दिवशी अयोध्येला आगमन झाले होते. दशानन रावणाचे गर्वहरण करून, वाईटावर चांगुलपणाचा, अंधकारावर प्रकाशाचा विजय मिळवून ते स्वगृही परतले होते. वाटेत त्यांचे स्वागत करण्यासाठी दिवे लावले गेले. त्याची आठवण म्हणून आजही दिवाळी किंवा “दीपावली” साजरी केली जाते. असे म्हटले जाते.

मला दिवाळी हा सण खूप आवडतो. कारण दिवाळीत सर्वांना सुट्टी असते आणि सर्व कुटुंबीय एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात. एकमेकांना भेटवस्तू दिल्या जातात. मी माझ्या सर्व मित्रांना फराळाला घरी बोलावतो, शिवाय माझे मित्र सुद्धा मला त्यांच्या घरी फराळाला नेतात, त्यामुळे आम्हा मित्रमैत्रिणीचीं एकमेकांच्या पालकांशी सुद्धा ओळख होते.

मी आणि माझे मित्र दिवाळीत किल्ला बनवतो. दिवाळीत माझी ताई दारासमोर दररोज सुंदर रांगोळी काढते. आई बनवत असलेल्या पदार्थांचा खमंग सुवास घरात दरवळतो, आई दिवाळीसाठी स्वादिष्ठ फराळ बनवते जसे चकली, लाडू, करंजी, शंकरपाळे, चिवडा. मला लाडू खूप आवडतात.

दिवाळीत बाबा आम्हाला नवीन कपडे घेतात. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आम्ही सर्व कुटुंबीय मिळून लक्ष्मीपूजन करतो. भाऊबीजेच्या दिवशी ताईच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा असतो. त्यादिवशी ताई मला ओवाळते आणि मी तिला भेटवस्तू देतो. ताई माझे खूप लाड करते.

दिवाळीत काही लोक फटाके वाजवतात. पण त्यामुळे मुक्या प्राण्यांना व पक्ष्यांना खूप त्रास होतो. बिचारे मोठ्या आवाजाने खूप भेदरतात. सणासुदीला मुक्या जीवांना असा त्रास देणे मला आवडत नाही. फटाके वाजवल्याने प्रर्यावर्णाचा खूप ह्रास होतो, फटाके प्रदूषण वाढीला कारणीभूत ठरतात असे सरांनी शिकवल्या नंतर मी मोठ्ठा आवाज करणारे फटाके वाजवायचे टाळतो.

तरी बाबा माझ्यासाठी चक्री, फुलभाज्या आणतात. त्या मी पुरेशी काळजी घेऊन माझ्या शाळेतील मित्रांबरोबर पेटवतो. आम्ही मित्र दिवाळीत सर्व लहान मोठ्यांना शुभेच्छा देतो. खूप खेळ खेळतो पण शाळेतून दिलेला होमवर्क सुट्टी संपायच्या आधी पूर्ण करतो.

दिवाळी हा सण अंधारावर प्रकाशाने मिळवलेला विजय आहे म्हणजे “वाईटावर चांगुलपणाचा विजय” हा या सणाचा संदेश आहे. म्हणून मला हा सण खूप आवडतो. त्यातून आदर्श घेऊन मी एक चांगला भारतीय नागरिक बनण्याचा निश्चय करतो. भविष्यात देशासाठी चांगले काम करण्याचा मी प्रण करतो आणि माझ्या सर्व बंधू-भगिनींना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. (समाप्त)

विध्यार्थी मित्रांनो मला आशा आहे की माझा आवडता सण दिवाळी | Marathi Nibandh Diwali हा निबंध तुम्हाला नक्कीच आवडला असेल. निबंध लिहिण्याची इच्छा असलेल्या तरुण विध्यार्थ्यांसाठी मदतगार आहे. वरील निबंधातील दिवाळी या सणाबद्दल ज्या मुख्य गोष्टी आहेत त्या सामावून घेण्याचा प्रामाणिक प्रयन्त या निबंधात केला गेला आहे.

Marathi Nibandh Diwali: दिवाळीवरील या निबंधातील, विध्यार्थी आपल्या काही कल्पना निवडू शकतात आणि काही ओळींचा मसुदा तयार करू शकतात. वाक्य कसे बनवायचे, वाक्यरचना कशी करायची आणि स्वतःचे लेखन कौशल्य कसे वाढवायचे हे शिकू शकतात. लेख आवडल्यास आपल्या मित्रांना, नातलगांना सोशल मीडियावर नक्की शेअर करा.

Easy Marathi Barakhadi In English 3 charts| मराठी बाराखडी इंग्रजी मध्ये.

5
marathi barakhadi in english
marathi barakhadi in english

Marathi barakhadi in english

marathi barakhadi in english
marathi barakhadi in english

what is Marathi barakhadi?

The most important thing in the Marathi language is Marathi Barakhadi. Also Marathi vowels and consonants. Today I am going to tell you what is Marathi Barakhadi, vowel and consonant and I have also made it available to you in English. Below are some of the vowels (स्वर) and consonants (व्यंजन) along with Marathi Barakhadi.

What is the meaning of Marathi Barkhadi?

The Devanagari script is used to write the Marathi language. The set of consonants formed by combining the vowel symbols (vowel symbols e.g. Kana, Matra, Ukar, Velanti, etc.)(स्वरांशचिन्हे उदा. काना, मात्रा, उकार, वेलांटी इ.)

in Devanagari is called Barakhadi. These include the vowels used in the Marathi language and the secret-long distinctions of some of them as well as the symbols of some vowel-dependent religions.

What is Marathi Barkhadi Swar?

In Marathi writing, अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, ए, ऐ, ओ, औ, अं, अः are traditionally called vowels (स्वर). In consonantal, a mark is added to the consonant symbol for the pronunciation of each syllable. She considers these tones to be a sign. Some of these marks are given different names in Marathi.

Swar in Marathi and English-मराठी स्वर chart 1


a

aa

e

ee

u

uu

ri

e

ai

o

au
अं
am
अः
ah
Swar in Marathi and English

Vyanjan in Marathi and English, Marathi Alphabets-मराठी व्यंजन chart 2


ka

kha

ga

gha

ch

cha

ja

jha
त्र
tr

ta

tha

da

dha

na

ta

tha

da

dha

na

pa

pha

ba

bha

ma

ya

ra

la

va

sha

sha

sa

ha

la
क्ष
ksha
ज्ञ
Dnya
Vyanjan in Marathi and English, Marathi Alphabets

Marathi barakhadi in English chart 3

barakhadi marathi to english


ka
का
kaa
कि
ki
की
kee
कु
ku
कू
koo
के
ke
कै
kai
को
ko
कौ
kau
कं
kam
कः
kah

kha
खा
khaa
खि
khi
खी
khee
खु
khu
खू
khoo
खे
khe
खै
khai
खो
kho
खौ
khau
खं
kham
खः
khah

ga
गा
gaa
गि
gi
गी
gee
गु
gu
गू
goo
गे
ge
गै
gai
गो
go
गौ
gau
गं
gam
गः
gah

gha
घा
ghaa
घि
ghi
घी
ghee
घु
ghu
घू
ghoo
घे
ghe
घै
ghai
घो
gho
घौ
ghau
घं
gham
घः
ghah

cha
चा
chaa
चि
chi
ची
chee
चु
chu
चू
choo
चे
che
चै
chai
चो
cho
चौ
chau
चं
cham
चः
chah

chha
छा
chhaa
छि
chhi
छी
chhee
छु
chhu
छू
chhoo
छे
chhe
छै
chhai
छो
chho
छौ
chhou
छं
chham
छः
chhah

ja
जा
jaa
जि
ji
जी
jee
जु
ju
जू
joo
जे
je
जै
jai
जो
jo
जौ
jau
जं
jam
जः
jah

jha
झा
jhaa
झि
jhi
झी
jhee
झु
jhu
झू
jhoo
झे
jhe
झै
jhai
झो
jho
झौ
jhau
झं
jham
झः
jhah
त्र
tra
त्रा
traa
त्रि
tri
त्री
tree
त्रु
tru
त्रू
troo
त्रे
tre
त्रै
trai
त्रो
tro
ञौ
trau
ञं
tram
ञः
trah

ta
टा
taa
टि
ti
टी
tee
टु
tu
टू
too
टे
te
टै
tai
टो
to
टौ
tau
टं
tam
टः
tah

tha
ठा
thaa
ठि
thi
ठी
thee
ठु
thu
ठू
thoo
ठे
the
ठै
thai
ठो
tho
ठौ
thau
ठं
tham
ठः
thah

da
डा
daa
डि
di
डी
dee
डु
du
डू
doo
डे
de
डै
dai
डो
do
डौ
dau
डं
dam
डः
dah

dha
ढा
dhaa
ढि
dhi
ढी
dhee
ढु
dhu
ढू
dhoo
ढे
dhe
ढै
dhai
ढो
dhao
ढौ
dhau
ढं
dham
ढः
dhah

na
णा
naa
णि
ni
णी
nee
णु
nu
णू
noo
णे
ne
णै
nai
णो
no
णौ
nau
णं
nam
णः
nah

ta
ता
taa
ति
ti
ती
tee
तु
tu
तू
too
ते
te
तै
tai
तो
to
तौ
tau
तं
tam
तः
tah

tha
था
thaa
थि
thi
थी
thee
थु
thu
थू
thoo
थे
the
थै
thai
थो
tho
थौ
thau
थं
tham
थः
thah

da
दा
daa
दि
di
दी
dee
दु
du
दू
doo
दे
de
दै
dai
दो
do
दौ
dau
दं
dam
दः
dah

Dha
धा
dhaa
धि
dhi
धी
dhee
धु
dhu
धू
dhoo
धे
dhe
धै
dhai
धो
dho
धौ
dhau
धं
dham
धः
dhah

na
ना
naa
नि
ni
नी
nee
नु
nu
नू
noo
ने
ne
नै
nai
नो
no
नौ
nau
नं
nam
नः
nah

pa
पा
paa
पि
pi
पी
pee
पु
pu
पू
poo
पे
pe
पै
pai
पो
po
पौ
pau
पं
pam
पः
pah

pha
फा
phaa
फि
phi
फी
phee
फु
phu
फू
phoo
फे
phe
फै
pahi
फो
pho
फौ
phau
फं
pham
फः
phah

ba
बा
baa
बि
bi
बी
bee
बु
bu
बू
boo
बे
be
बै
bai
बो
bo
बौ
bau
बं
bam
बः
bah

bha
भा
bhaa
भि
bhi
भी
bhee
भु
bhu
भू
bhoo
भे
bhe
भै
bhai
भो
bho
भौ
bhau
भं
bham
भः
bhah

ma
मा
maa
मि
mi
मी
mee
मु
mu
मू
moo
मे
me
मै
mai
मो
mo
मौ
mau
मं
mam
मः
mah

ya
या
yaa
यि
yi
यी
yee
यु
yu
यू
yoo
ये
ye
यै
yai
यो
yo
यौ
yau
यं
yam
यः
yah

ra
रा
raa
रि
ri
री
ree
रु
ru
रू
roo
रे
re
रै
rai
रो
ro
रौ
rau
रं
ram
रः
rah

la
ला
laa
लि
li
ली
lee
लु
lu
लू
loo
ले
le
लै
lai
लो
lo
लौ
lau
लं
lam
लः
lah

va
वा
vaa
वि
vi
वी
vee
वु
vu
वू
voo
वे
ve
वै
vai
वो
vo
वौ
vau
वं
vam
वः
vah

sha
शा
shaa
शि
shi
शी
shee
शु
shu
शू
shoo
शे
she
शै
shai
शो
sho
शौ
shau
शं
sham
शः
shah

sa
सा
saa
सि
si
सी
see
सु
su
सू
soo
से
se
सै
sai
सो
so
सौ
sau
सं
sam
सः
sah

ha
हा
haa
हि
hi
ही
hee
हु
hu
हू
hoo
हे
he
है
hai
हो
ho
हौ
hau
हं
ham
हः
hah

la
ळा
laa
ळि
li
ळी
lee
ळु
lu
ळू
loo
ळे
le
ळै
lai
ळो
lo
ळौ
lou
ळं
lam
ळः
lah
क्ष
Ksha
क्षा
kshaa
क्षि
kshi
क्षी
kshee
क्षु
kshu
क्षू
kshoo
क्षे
kshe
क्षै
kshai
क्षो
ksho
क्षौ
kshau
क्षं
ksham
क्षः
kshah
ज्ञ
dnya
ज्ञा
dnyaa
ज्ञि
Dnyi
ज्ञी
Dnyee
ज्ञु
dnyu
ज्ञू
dnyoo
ज्ञे
dnye
ज्ञै
dnyai
ज्ञो
dnyo
ज्ञौ
dnyau
ज्ञं
dnyam
ज्ञः
dnyah
Marathi barakhadi in English

Download Marathi Barakhadi in English PDF – मराठी / इंग्लिश बाराखडी PDF

If you like the article, be sure to share it on social media.

because sharing is caring ❤️