Home Blog Page 3

गुढीपाडवा का साजरा केला जातो? information of gudi padwa in marathi -10 points

0
gudi padwa
gudi padwa

गुढीपाडवा का साजरा केला जातो?information of gudi padwa in marathi

गुढी पाडवा (gudi padwa) हा वसंत ऋतू काळात साजरा केला जाणार महत्वाचा सण आहे, जो मराठी आणि कोकणी भाषिकांनसाठी पारंपारिक नवीन वर्षाचा उत्सव आहे. चंद्र-हिंदू दिनदर्शिकेनुसार नवीन वर्षाच्या सुरूवातीस चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्र गोवा आणि काही इतर राज्यात हा सण अतिशय उत्साहात साजरा केला जातो.

गुढीपाडव्याची काही इतर नावे

गुढीपाडवा हा सण काही इतर नावाने सुद्धा साजरा केला जातो जसे की..

 1. पाडवा
 2. पाडवो
 3. पाड्ड्वा
 4. पाड्ड्वो
 5. पाडयो- सौसार पाडवो, सौसार पाडयो- कोंकणी
 6. पोडिया, युगादि- कन्नड़
 7. पद्यमी- तेलगू
 8. चेटी चंद- सिंधी समाज

वरील काही नावे ही संस्कृत शब्द प्रतिपदा (प्रतिपाद) आणि संवत्सर या शब्दांशी साधर्म्य असणारी आहेत.

Gudi Padwa
Gudi Padwa

गुढीपाडवा कसा साजरा करावा ‘पूजा-विधी’

गुढी

गुढी पाडवा (gudi padwa) या सणाला आपल्या घराच्या दारासमोरील उजव्या बाजूला उंच गुढी उभारली जाते. Gudi Padwa Puja Vidhi Marathi उत्साहात मनोभावे गुढीची विधिवत पूजा केल्या जाते ती पुढील प्रमाणे..

 1. गुढीपाडव्याच्या दिवशी कुटुंबातील सर्वांनी पहाटे लवकर उठावे.
 2. लवकर उठून घर आणि अंगण (आवार) स्वच्छ झाडून घ्यावे.
 3. सर्व कामे उरकून स्वच्छ आंघोळ करावी.
 4. पारंपरिक स्वच्छ पोशाख परिधान करावा.
 5. दारासमोर पूजास्थळी स्वस्तिक चिन्ह काढावे.
 6. यांनतर पाटावर गंध, फुले, वाहावे.
 7. बांबूची काठी स्वच्छ करून त्यावर गुढी उभारायला घ्यावी.
 8. गुढीच्या टोकावर कडूलिंबाची पाने व आंब्याची माळ लावावी.
 9. त्यांनतर गुढीच्या टोकावर रेशमी कापड बांधावे.
 10. तांब्याचा किंवा चांदीचा कलश/लोटा स्वछ करून घ्यावा.
 11. त्यावर स्वस्तिक काढून पाच टिळे लावावे.
 12. कलश काठीच्या टोकावर अडकावावा.
 13. देवाचं नामःस्मरण करून साखरेची माळ गुढीवर लावावी.
 14. गुढी किंचित झुकलेल्या अवस्थेत उभी करावी.

याशिवाय नववर्षयाच्या स्वागतासाठी ढोल ताश्यांच्या गजरात पारंपारिक पद्धतीने लेझीम खेळत प्रभात फेरी शोभायात्रा काढावी. संपूर्ण परिसर चैतन्याने आनंदून सोडावा.

गुढीपाडव्याला केले जाणारे खाद्यपदार्थ

महाराष्ट्रीयन जेवणामध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी खास बेत असतो. नववर्षाचं स्वागत करण्यासाठी गुढीपाडव्याला काही खास महाराष्ट्रीन खाद्यपदार्थ आवर्जून केले जातात. गुढी पाडवा (gudi padwa) साजरा करतांना सुगरणींचा उत्साह ओसंडून वाहट असतो, विविध खाद्यपदार्थांची अगदी रेलचेल असते. तर चला जाणून घेऊया गुढीपाडव्याला बनवले जाणारे खास महाराष्ट्रीय खाद्यपदार्थ.

Gudi Padwa Special Recipes in Marathi

 1. पुरणपोळी
 2. बटाट्याची भाजी
 3. पुरी
 4. वरण-भात
 5. खीर
 6. घाटलं
 7. श्रीखंड
 8. खोबऱ्याची चटणी
 9. लोणचं
 10. पापड
 11. कुरडया
 12. भजी

सांस्कृृतिक आख्यायिका

 1. प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्षे वनवास भोगून लंकाधिपती रावण याचा पराभव करून या दिवशीच अयोध्येत प्रवेश केला अशी मान्यता आहे.
 2. ब्रम्हदेवाने याच दिवशी विश्वाची निर्मिती केली असे सुद्धा सांगितले जाते.
 3. शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने याच दिवशी शकांचा पराभव केला अशी आख्यायिका प्रचलित आहे. याच शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणना शालिवाहन शक चालू झाला असेही म्हटले जाते.

गुढीपाडव्याचा इतिहास

प्रदिर्घ काळ महाराष्ट्र व आसपासच्या राज्यांवर राज्य करणारे महाराष्ट्रातील एकमेव घराणे म्हणजे सातवाहन. आजच्या महाराष्ट्राच्या भाषा-संस्कृतीचा पाया घालणारा, तिचे वर्धन करत महाराष्ट्राची ओळख निर्माण करणारा हा राजवंश. महाराष्ट्रातील रायगड (मुळ नांव रायरी), राजमाची अशा शेकडो किल्ल्यांची मुळ उभारणी सातवाहन काळात झाली.

“तिनही समुद्रांचे पाणी चाखणारे अश्व असलेले सातवाहन” अशी सार्थ बिरुदावली त्यांनी मिरवली. साडेचारशे वर्षांच्या कालावधीत शेकडो महाराष्ट्री प्राकृतातील शिलालेख, हालाच्या “गाथा सप्तशती” सारखे नितांत सुंदर काव्यसंग्रह, वररुचीच्या “प्राकृतप्रकाश” या व्याकरण ग्रंथाने माहाराष्ट्रीला समृद्धी दिली. पुर्वी रट्ठांचा समूह तो महाराष्ट्र अशी ओळख पुसून या रट्ठसमुहाला एकाच एक राजकीय पटलाखाली आणले.

देशी-विदेशी व्यापारातून आर्थिक समृद्धी आणली व प्रजेला ख-या अर्थाने सुखाचे दिवस दाखवले. हालाच्या गाथांतील काव्यावरून एका आनंदी खेळकर समाजाचे दर्शन जे घडते ते त्यामुळेच.त्यामुळे महाराष्ट्राचे संस्थापक, वर्धनकर्ते हे सातवाहन होत असे म्हणायला काहीही प्रत्यवाय नाही. संपुर्ण महाराष्ट्र आणि सातवाहनांची सत्ता असलेल्या अन्य प्रदेशांत (राज्यांत) गुढी पाडवा (gudi padwa) हा नववर्ष दिन म्हणून साजरा होतो.

गौतमीपूत्र सातकर्णी या महावीराने नहपान या शक क्षत्रपावर विजय मिळवून महाराष्ट्र व आसपासचा परिसर स्वतंत्र केला तो हा स्वातंत्र्यदिन…नवीन संवत्सर सुरु करुन यादगार बनवले. आजही आपण गुढ्या उभारून गुढी पाडवा (gudi padwa) हा विजयोत्सव साजरा करत असतो.

सातवाहन

आताच्या महाराष्ट्रात उदयाला आलेले परंतु उत्तरेत गुजरात, मध्यप्रदेश ते खाली दक्षीणेत महाराष्ट्रासहित कर्नाटक, गोवा आणि आंध्रापर्यंत साडेचारशे वर्ष एवढा प्रदिर्घ काळ सत्ता गाजवणारे एकमेव घराणे झाले, ते म्हणजे सातवाहन घराणे. इसवीपुर्व २३० मद्धे हे घराणे उदयाला आले. जुन्नर ही त्यांची पहिली राजधानी होती. नंतर ती पैठण येथे नेली गेली. छिमुक सातवाहन हा या घराण्याचा संस्थापक मानला जातो.

तत्कालीन काण्व राजांचा पराभव करून त्यांनी महाराष्ट्र व मध्य भारतावर आपली सत्ता कायम केली. त्याहीपुर्वी सातवाहन घराण्यातील लोक अशोकाचे मांडलिक म्हणून महाराष्ट्रावर सत्ता गाजवत असावेत असा विद्वानांचा कयास आहे. पुढे काण्व आले आणि नंतर स्वतंत्र राज्य स्थापन केली जी पुढे साडेचारशे वर्ष टिकली. भारतात एवढा प्रदिर्घ काळ सत्ता चालवणारे दुसरे घराणे झाले नाही.

मध्य आणि दक्षीण भारताच्या संस्कृतीवर कधीही न पुसणारा परिणाम या घराण्याने केला.कोण होते हे सातवाहन? पुराणांत त्यांना आंध्र असे म्हटले आहे. ते शूद्र (अवैदिक) वर्णाचे होते असाही उल्लेख पुराणे करतात. आंध्र म्हणजे ऐतरेय ब्राह्मण व महाभारतात ज्यांचा उल्लेख औंड्र असा आला आहे त्या वंशाचे.

हा भारतातील पुंड्र, मुतीब, शबर ई. जमातींप्रमाणे एक अवैदिक वंश होता. हा मुळचा पशुपालक समाज. महाराष्ट्र प्राचीन काळापासुन अपवाद वगळता निमपावसाळी प्रदेश असल्याने येथे मेंढपाळी हाच मुख्य व्यवसाय होता. त्यामुळे त्याच समाजातुन राजे निर्माण होणे स्वाभाविक होते. महाभारतात औंड्रांना असूर राजा महाबळीचा पुत्र असे निर्देशिलेले आहे.

औंड्र समाज हा पुंड्रांसोबत दक्षीणेत पुरातन काळापासून वावरत होता. आजचे ऒडिशा, आंध्र ही प्रदेशनामेही औंड्रांवरुनच पडलेली आहेत, यावरुन या समाजाचा व्यापक विस्तार ल्क्षात यावा. मावळालाही “आंदर मावळ” असे म्हटले जाते. “आंदर मावळ” हे नांव आंध्र अथवा औंड्र मावळवरुन बनला असावा.

सातवाहनांची पहिली राजधानीही याच प्रदेशात असल्याने हा शब्दही आंध्र-औंड्र याचाच अपभ्रंश असावा असे म्हटले तर वावगे होणार नाही. सातवाहन हे सहिष्णू होते. पांचरात्र या अवैदिक संप्रदायाशी निष्ठा ठेवत त्यांनी बौद्ध लेण्यांना उदार राजाश्रय दिला तसेच अनेक यज्ञही करवून घेत वैदिकांनाही दानदक्षीणा दिल्या.सातवाहन काळात त्यांचा व्यापार सुदूर इजिप्त, रोम, अरबस्तान ईत्यादि देशांत फैलावलेला होता.

भडोच, कल्याण, चेऊल ई. पश्चिम किनारपट्टीतील बंदरांतून मोठ्या प्रमाणात आयात-निर्याती होत. यांच्याच काळात महाराष्ट्रात गिरीदुर्ग आणि लेण्यांची निर्मितीही मोठ्या प्रमाणात झाली. व्यापारासाठीचा आजही प्रसिद्ध असलेला नाणेघाट आणि त्याच घाटात असलेल्या गुंफांतील प्रदिर्घ शिलालेख आणि सातवाहनांचे प्रतिमागृह त्यांच्या वैभवाची साक्ष आहेत.

केवळ हेच घराणे दक्षीणेत बळकट राहिल्याने उत्तरेत सर्वस्वी सत्ता गाजवणारे कुशाण घराणे दक्खनेत कधीच पाय रोवू शकले नाही. त्यांच्या राजकाळात साहित्य संस्कृतीने वैभवाचे टोक गाठले होते. हालाची “गाथा सप्तशती”, गुणाढ्याचे “कथा सरित्सागर”, वररुचीचे माहाराष्ट्री प्राकृताचे व्याकरण अशा अजरामर कृती त्यांच्याच काळात लिहिल्या गेल्या.

हाल सातवाहनाच्या गाथा सप्तशतीत तत्कालीन मोकळ्या ढाकळ्या समाजाचे प्रतिबिंब पडले आहे. नेक स्त्रीयांच्या काव्य रचना या काव्यग्रंथात सामाविष्ट केलेल्या आहेत. सातवाहन घराण्यात महिलांचे स्थान किती उच्च दर्जाचे होते हे नागणिका, बलश्री सारख्या किर्तीवंत राजनिपूण महिलांवरुनही दिसून येते.एवढा प्रदिर्घ काळ सत्ता चालवतांना चढ-उताराचेही प्रसंगही येणे स्वाभाविक होते.

गौतमीपुत्र सातकर्णी सत्तेवर आला तेंव्हा अशीच बिकट परिस्थिती होती.साडेचारशे वर्षांच्या प्रदीर्घ राजवटीत स्वाभाविकपणे चढ-उताराचेही प्रसंगही आले. नहपान हा क्षहरात घराण्यातील पश्चिमेवर राज्य करणारा एक क्षत्रप होता. मुळचे हे क्षत्रप कुशाणांचे अधिकारी, पण कुशाणांची सत्ता खिळखिळी झाल्यावर ते स्वतंत्र बनले.

इ.स. ३२ मद्धे नहपान सत्तेवर आला. तो अत्यंत महत्वाकांक्षी होता. या काळातील सुंदर, चकोर वगैरे सातवाहन राजे दुर्बळ निघाले. याचा फायदा घेत त्याने सातत्याने स्वा-या करत सातवाहनांचा बहुतेक प्रदेश जिंकुन घेतला. गौतमीपुत्र सातवाहन सत्तेवर आला तेंव्हा सातारा-क-हाड एवढाच भाग त्याच्या स्वामित्वाखाली होता.कोकण प्रदेशही नहपानाने हिरावून घेतला असल्याने तेथून चालणारा व्यापारही नहपानाच्या हाती गेला.

महाराष्ट्रातील प्रजा गुलाम झाली. पराकोटीचे शोषण सुरु झाले.परंतु गौतमीपुत्र हा अत्यंत पराक्रमी पुरुष होता. त्याने नहपानावर सलग आक्रमणे सुरू केली. जवळपास वीस वर्ष त्याने नहपानाशी संघर्ष केला. त्याला पूर्वजांनी उभारलेल्या गिरिदुर्गांचाही त्याला उपयोग झाला. त्याने शक्तीबरोबरच युक्तीचाही वापर केला.

‘गौतमीपुत्राने शेवटी आपल्या हेरांचा वापर करुन नहपानाला विपुल दानधर्म करायला प्रोत्साहित केले व त्यामुळेच नहपानाचा विनाश करण्यात गौतमीपुत्र यशस्वी झाला ही केवळ दंतकथा मानता येत नाही. शेवटी नाशिक जवळ अतिशय निकराचे युद्ध करुन गौतमीपुत्राने नहपानाचा समूळ पराभव केला. त्याला ठार मारले.

गुढीपाडव्याच्या सुरुवात

नाशिक येथील लेण्यातील एका शिलालेखात गौतमीपुत्राबद्दक्ल अभिमानाने नोंदवले गेले… “खखरात (क्षहरात) वंस निर्वंस करस”एका अर्थाने हा महाविजय होता. परकीय शकांच्या जवळपास तावडीत गेलेले आपले विशाल साम्राज्य गौतमीपुत्राने आपल्या नितांत पराक्रमाने परत जिंकून घेतले.

पुढे दिडशे वर्ष या साम्राज्याकडे वाकड्या नजरेने पाहायचे सामर्थ्य कोणात आले नाही. नहपानावरील हा अद्वितीय असा विजय मिळाला तो दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढी पाडवा (gudi padwa) होय. इसवी सनाच्या ७८ मध्ये ही क्रांती घडली. हा विजयोत्सव प्रजा गुढ्या उभारून साजरा करणे स्वाभाविक होते. तोच दिवस बनला गुढी पाडवा (gudi padwa). अखिल दक्खनेच्या स्वातंत्र्याचा दिवस.

संवत्सर

या दिवसापासून गौतमीपुत्राने संवत्सर सुरु केले ते म्हनजे सालाहन (शालिवाहन नव्हे) शक. या विजयानंतर गौतमीपुत्राने आपले साम्राज्य एवढे बलाढ्य केले की त्याला भारतीय इतिहासात तोड नाही. ‘तीन समुद्रांचे पाणी प्यायलेले घोडे ज्याच्याकडे आहेत असे ते सातवाहन’ अशी सार्थ उपाधी त्यांना मिळाली.

आपल्या अनेक सणांमागे एक अद्भुत असा इतिहास दडलेला असतो. गुढीपाडव्याच्या (चैत्र शुद्ध प्रतिपदा) दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती करून कालगणनाही सुरू केली अशी कथा ब्रह्मपुराणात व व्रतराजात येते.

कधी रामाचाही संबंध गुढीपाडव्याशी जोडला जातो. पण इसवी सन ७८ पासूनच शालीवाहन शकाचे पहिले वर्ष का गणले जाते यावर कोणी विचार केलेला दिसत नाही. नहपानाचा मृत्यू सन ७८ मद्धेच झाला याबाबत विद्वान इतिहासकारांनाही शंका नाही. या सणामागील मुळ उद्देश्य गौतमीपुत्र सातकर्णीने नहपान या शक (क्षत्रप) राजावर मिळवलेल्या अद्भुत विजयाचा आनंदोत्सव साजरा करणे हा आहे हे सहसा आपल्याला माहीत नसते.

प्राचीन काळी अगदी एखाद्या घरातील आनंदवार्ताही घोषित करण्यासाठी गुढ्या उभारल्या जात. हा तर एक जनतेच्व्हा स्वातंत्र्योत्सव होता त्यामुळे सर्वांनीच गुढ्या उभारणे स्वाभाविक होते आणि तीच पुढे परंपरा कायम झाली. हा धार्मिक उत्सव नसून महाराष्ट्राला स्वातंत्र्याचा मंगलदिवस आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

शालिवाहन शक

दुसरे महत्वाचे असे कि “शालिवाहन शक” असा मुळात शब्दच नाही. या नांवाचा कोणताही राजा होऊन गेलेला नाही. शालिवाहन हा शब्द मूळ प्राकृतातील ‘सालाहन’ असा आहे. प्राकृत भाषेचे संस्कृतीकरण करण्याचा अवाढव्य प्रयत्न इसवी सनाच्या दुस-या शतकात सुरू झाला. तेव्हा मूळ प्राकृत नावे, शब्द बदलण्यात आले.

सातवाहनांच्या तत्कालीन शिलालेखांमध्येही “सालाहन” अशीच नोंद आहे, शालिवाहन नव्हे. परंतू संस्कृतीकरणाच्या नादात सालाहनचे “शालिवाहन” केले गेले व शालिवाहन नांवाचा कोणताही राजा झाला नसल्याने शालिवाहन शकाभोवती खोट्या कथा निर्माण करून मुळ इतिहास पुसण्याचा प्रयत्न केला गेला ही दुर्दैवी बाब आहे.

खरे तर सातवाहनांमुळे उत्तरेकडून सतत होणा-या आक्रमणांपासून साडेचारशे वर्ष दक्षीण सुरक्षित राहिली. आपली संस्कृती भेसळीपासून सुरक्षित राहिली. शक-हुण-कुशाण अशा आक्रमकांना नर्मदेपलीकडेच ठेवण्यात यश मिळाले. गौतमीपूत्र सातकर्णीने आपल्या पराक्रमाच्या जोरावर शकांचे संकट हरण केले.

नहपानासारख्या बलाढ्य शकाचा नुसता पराजयच केला नाही तर त्याला रणांगनात ठार मारून निर्वंश केले. हा आपल्या इतिहासातील पहिला स्वातंत्र्यलढा. ज्या दिवशी हा अलौकिक विजय मिळाला तो आपण गुढी पाडवा (gudi padwa) म्हनून साजरा करतो.

जेथे जेथे सातवाहनांचे साम्राज्य होते बव्हंशी त्याच प्रदेशांत गुढी पाडवा (gudi padwa) साजरा केला जातो हेसुद्धा लक्षात ठेवले पाहिजे.म्हणजे लोकांची स्मृती आपल्या एका महान सम्राटालाच दरवर्षी मानवंदना देत आलीच आहे.. पण मूळ इतिहास पुसटला गेला असतांना. त्या इतिहासाला आता जीवंत करून महाराष्ट्राच्या संस्थापकांना गुढीपाडव्याच्या निमित्ताने मानवंदना देणे आपले कर्तव्य ठरते.

दोन गुढीपाडवा तेही एकाच वर्षी

साधारणपणे शालिवाहन शकाच्या एका हिंदू वर्षात वर्षारंभी एकच गुढी पाडवा (gudi padwa) येतो. पण शके 1938 मध्ये दोन गुढीपाडवे आले होते.

८ एप्रिल २०१६पासून सुरू होणाऱ्या शालिवाहन शक १९३८ या नूतनवर्षी वर्षारंभी आणि वर्षअखेरीस असे दोन गुढीपाडवे आले होते. ८ एप्रिल २०१६ रोजी रोजी गुढी पाडवा (gudi padwa) आलाच होता, पण नंतरच्या वर्षी शके १९३९ च्या चैत्र शुक्ल प्रतिपदा ही क्षय तिथी असल्याने त्या दिवशी, म्हणजे २९ मार्च २०१७ रोजी गुढीपाडवा नव्हता. तो आदल्या दिवशीच्या २८ मार्च २०१७ रोजी आलेल्या अमावास्येच्या दिवशी-सकाळी ८.२७ वाजता फाल्गुन अमावास्या संपल्यावर साजरा करावा लागला.

लेख आवडल्यास आपल्या मित्रांना, नातलगांना सोशल मीडियावर नक्की शेअर करा.

because sharing is caring ❤️

रायगड किल्ल्यावर (Raigad fort) जाण्यापूर्वी तुम्हाला या 10 गोष्टी माहित असणे आवश्यक आहे

4
raigad killa
raigad killa

रायगड किल्ला/ Raigad fort information in marathi

raigad killa
Raigad Fort

दुर्गप्रकार-

गिरिदुर्ग

उंची-

८२० मीटर/२७०० फूट

डोंगररांग

सह्याद्री

ठिकाण-

रायगड, महाराष्ट्र

पोहचायचे ठिकाण-

महाड

चढाईची श्रेणी

सोपी

सध्याची अवस्था

ठीक

ताबा-

मराठा साम्राज्य-(1656-1689, 1707-1818)
मोगल साम्राज्य-(1689-1707)
ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी-(1818-1858)
ब्रिटिश साम्राज्य-(1858-1947)
केंद्र सरकार, भारत-(1947-वर्तमान)

वास्तुविद्याविशारद-

हिरोजी इंदुलकर

Raigad fort/रायगडाची इतर नावे

आजवरच्या इतिहासात रायगड किल्ल्याला (Raigad fort) इतर १५ विविध नावांनी संबोधिले गेले आहे. जसे..

 • रायगड 
 • रायरी 
 • इस्लामगड 
 • नंदादीप 
 • जंबुद्वीप 
 • तणस 
 • राशिवटा 
 • बदेनूर 
 • रायगिरी 
 • राजगिरी 
 • भिवगड 
 • रेड्डी 
 • शिवलंका 
 • राहीर 
 • पूर्वेकडील जिब्राल्टर
raigad fort
Raigad Fort

सभासद बखर

(रायगड किल्ला/ Raigad fort) ‘देवगिरीच्याहुन दशगुणी, दीड गाव उंच, प्रशस्त जागा. पर्जन्यकाळी कड्यावर गवत उगवत नाहि. उभ्या कड्यावर पाखरू उतरावयास जागा नाहि’ हे बघून महाराज खुशीने म्हणाले… ‘तख्तास जागा हाच गड करावा’. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या शब्दाचा उल्लेख बखरीत आहे. रायगडाचे स्थान लक्षात घेऊन या किल्यावरच राजधानी बसवण्याचे महाराजांनी निश्चित केले.

राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चखोटा. चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे दिड गांव उंच. पर्जन्यकाळी कडियावर गवत उगवत नाही आणि धोंडा तासीव एकच आहे. दौलताबाद पृथ्वीवर चखोट गड खरा, परंतु तो उंचीने थोडका. दौलताबादचे दशगुणी गड उंच असे देखोन बहुत संतुष्ट झाले आणि बोलिले, तक्तास जागा हाच गड करावा.

रायगड किल्ला/Raigad Fort हा मराठी मनाचा मानबिंदू आणि महाराष्ट्राची शान आहे. छत्रपती शिवाजीराजांनी रायगडचे स्थान आणि महत्त्व पाहून इ.स.1674 ला या गडाला आपल्या राज्याची राजधानी बनविली.

रायगड हा महाराष्ट्रातील, रायगड जिल्ह्यातील महाड येथे एक डोंगर किल्ला आहे. हा डेक्कन पठारामधील सर्वात मजबूत किल्ल्यांपैकी एक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांची राजधानी बनवताना रायगडवर बरीच बांधकामे व संरचना बांधल्या.

हा किल्ला सह्याद्री पर्वतरांगेत आहे, त्याची उंची समुद्रसपाटीपासून 820 मीटर (2,700 फूट) आहे. गडावर सुमारे 1737 पायर्‍या आहेत. रायगड रोप-वे, एक एरियल ट्राम-वे अस्तित्त्वात आहे. या रोप-वेची उंची 400 मीटर आहे आणि लांबी 750 मीटर आहे आणि त्यामुळे रायगडावर पोहचायला फक्त 4 मिनिटे लागतात.

रायगड किल्ला/Raigad Fort 1765 पासून रायगड जिंकणे हा ब्रिटिश ईस्ट इंडियन कंपनीसाठी त्यांच्या सशस्त्र मोहोमेचा महत्वाचा भाग होता. ब्रिटिश लोक रायगडाला ‘पूर्वेकडील जिब्राल्टर’ असे म्हणत असत. अखेरीस 9 मे 1818 रोजी इंग्रजांनी किल्ला जिंकला, लुटला आणि नष्ट केला.

apj Abdul Kalam यांची प्रेरणादायी 12 मराठी पुस्तके

शिवराज्याभिषेक

शिवराज्याभिषेक हा रायगडाने अनुभवलेला सर्वश्रेष्ठ प्रसंग आहे. महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे, महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासातील एक लक्षणीय घटना आहे. १९ मे १६७४ रोजी राज्याभिषेकाच्या विधी पूर्वी महाराजांनी प्रतापगडाच्या भवानीचे दर्शन घेतले.

तीन मण सोन्याचे म्हणजेच ५६ हजार किंमतीचे छत्र देवीला अर्पण केले. गडावरील राज सभेत ६ जून १६७४, ज्येष्ठ शुद्ध १३ शके १५९६, शनिवार या दिवशी राज्याभिषेक साजरा झाला.

२४ सप्टेंबर १६७४, ललिता पंचमी आश्विन शुद्ध ५, आनंद संवत्सर शके १५९६ या दिवशी तांत्रिक पद्धतीने राजांनी स्वतःला आणखी एक राज्याभिषेक करून घेतला.

marathi typing tool free download कसे करावे? Windows, Chrome आणि Android साठी. 5 सोप्या steps

Raigad Fort/रायगड किल्याचा इतिहास

शिर्के पाचव्या शतकापासून रायगडाचे स्वामी होते. इ.स.1656 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेतला, त्याआधी रायगडाला रायरी म्हणून ओळखले जायचे. हा किल्ला जावळीचा जहांगीरदार चंद्रराव मोरे यांच्या ताब्यात होता. चंद्रराव मोरे हे विजापूरकरांचे (आदिलशाह) पिढीजात जहागीरदार होते.

तदनंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरी किल्ल्याचे नूतनीकरण व विस्तारीकरण केले. त्याचे नाव रायगड (राजाचा किल्ला) असे ठेवले. ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्याची राजधानी बनले.

Raigad Fort/रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी पाचाड व रायगडवाडी ही गावे आहेत. रायगडमधील मराठा राजवटीत ही दोन्ही गावे अत्यंत महत्त्वाची मानली जात होती. रायगड किल्ल्याच्या माथ्यावरची खरी चढाई पाचडपासून सुरू होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शासनकाळात पाचाड गावात 10,000 घोड्यांची घोडदळ नेहमीच स्टँडबायवर ठेवली जात असे. शिवाजी महाराजांनीं रायगडपासून सुमारे दोन मैलांच्या अंतरावर लिंगाणा हा दुसरा किल्लाही बांधला. लिंगाणा किल्ला कैद्यांना ठेवण्यासाठी वापरला जात असे.

त्यानंतर इ.स. 1689 मध्ये मुघल सरदार झुल्फिखार खानने रायगड ताब्यात घेतला आणि औरंगजेबाने त्याचे नाव इस्लामगड असे ठेवले. 1707 मध्ये, सिद्दी फतेहखान याने हा किल्ला ताब्यात घेतला आणि 1733 पर्यंत रायगड त्याच्या ताब्यात होता. 1733 मध्ये हा गड मराठ्यांनी पुन्हा ताब्यात घेतला पुढे 1818 पर्येंत रायगडावर मराठ्यांचा ताबा होता.

इ.स. 1765 पासून ब्रिटिशांचा या गडावर डोळा होता. सध्याचा महाराष्ट्रातील दक्षिणेकडील जिल्हा असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणसह रायगडचा किल्ला ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने सशस्त्र मोहिमेत लक्ष्य केले होते. 1818 मध्ये कालकाई च्या टेकडीवर तोफ डागण्यात आली. आणि कराराच्या अनुषंगाने रायगड किल्ला/Raigad Fort हा 9 मे 1818 रोजी ते ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात देण्यात आला.

World’s No.1 Richest Man Elon Musk कोण आहेत?

प्रमुख वैशिष्ट्ये

रायगड किल्ला/Raigad Fort हा छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला होता आणि गडाचे मुख्य वास्तुविशारद/अभियंता हीरोजी इंदुलकर होते. मुख्य राजवाडा लाकूड वापरून बांधला गेला होता, आता त्यातील फक्त आधारस्तंभ उरले आहेत.

मुख्य किल्ल्याचे अवशेष म्हणजे राण्यांच्या खोल्या आहेत, यात सहा खोल्यांचा समावेश आहे, ज्यामध्ये प्रत्येक खोलीत स्वतःची खासगी स्नानगृहे आहेत. याव्यतिरिक्त, तीन टेहळणी बुरुजांचे अवशेष थेट राजवाड्याच्या मैदानासमोर दिसतात, त्यापैकी फक्त दोनच उरले, कारण तिसऱ्या बुरुजाचा एका बॉम्बस्फोटात नाश झाला होता. रायगड किल्ल्यात घोडेस्वार चालकांसाठी बाजारपेठ उपलब्ध असल्याचे अवशेषही आहेत. गडावर गंगासागर तलाव म्हणून ओळखल्या जाणार्‍या कृत्रिम तलावाचे देखील दर्शन होते.

किल्ल्याचा एकमेव मुख्य मार्ग म्हणजे “महा दरवाजा” (प्रचंड दरवाजा). जो पूर्वी सूर्यास्ताच्या वेळी बंद केला जात होता. महा दरवाजाच्या दोन्ही बाजूला दोन प्रचंड बुरुज असून उंची अंदाजे 65-70 फूट उंच आहे. या दरवाज्यापासून किल्ल्याचे शिखर 600 फूट उंच आहे.

रायगड किल्ल्याच्या आत राज- दरबारात शत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूळ सिंहासनाची प्रतिकृती आहे. किल्ल्यावरून टकमक टोक नावाच्या शिक्षा अंमलबजावणीचे ठिकाण पहायला मिळते. स्वराज्याशी गद्दारी करणाऱ्या कैद्यांना त्यांच्या मृत्यूपर्यंत ठार मारण्याची शिक्षा सुचवल्यावर या टोकावरून त्यांना खाली फेकण्यात येत असे, या भागास आता कुंपण घालण्यात आले आहे.

मुख्य बाजारपेठेच्या अवशेषांसमोरच छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. जगदीश्वर मंदिर व छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी गडावर आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आई माता जिजाबाईची समाधी खाली पाचड या गावी आहे.

इंटरनेट वरून पैसे कमावण्याचे 12 मार्ग (Without Investment)

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे

 1. महाराजांची समाधी : मंदिराचा पूर्वदरवाजापासून थोड्या अंतरावर जो अष्टकोनी चौथरा दिसतो तीच महाराजांची समाधी. सभासद बखर म्हणते, ‘क्षत्रियकुलावतंस श्रीमन्महाराजाधिराज शिवाजी महाराज छत्रपती यांचा काल शके १६०२चैत्र (शुद्ध १५ (इसवी1680) या दिवशी रायगड येथे मृत्यू झ़ाला. तेथे काळ्या दगडाचा चिऱ्याचे सुमारे छातीभर उंचीचे अष्टकोनी जोते बांधिले असून वरून फरसबंदी केलेली आहे. फरसबंदीचा खाली पोकळी आहे, तिथे महाराजांचा अवशिष्टांश रक्षामिश्र मृत्तिकारूपाने सापडते. दहनभूमी पलीकडे भग्‍न इमारतींचा अवशेषांची एक रांग आहे, ते शिबंदीचे निवासस्थान असावे. त्याचा पलीकडे सदर वस्तीपासून विलग असा एक घराचा चौथरा दिसतो. हे घर इ.स. 1674 मध्ये इंग्रज वकील हेनरी ऑक्झेंडन यास राहावयास दिले होते. महाराजांचा समाधीचा पूर्वेकडे भवानी टोक आहे तर उजवीकडे दारूची कोठारे, इथून बारा टाकी दिसतात.
 2. हिरकणी टोक : गंगासागराचा उजवीकडे पश्चिमेस जी चिंचोळी वाट जाते ती हिरकणी टोकाकडे जाते. हिरकणी टोकाशी संबंधित हिरकणी गवळणीची एक कथा सांगितली जाते. या बुरुजावर काही तोफाही ठेवलेल्या दिसतात. बुरुजावर उभे राहिले तर डाव्या हाताला गांधारीचे खोरे, उजव्या बाजूला काळ नदीचे खोरे दिसते. तसेच इथून पाचाड, खुबलढा बुरूज, मशीद मोर्चा ही ठिकाणे तोफेचा माऱ्यात आहेत. त्यामुळे युद्धशास्त्राचा तसेच लढाऊ दृष्टीने ही खूप महत्त्वाची आणि मोक्याची जागा आहे.
 3. टकमक टोक : बाजारपेठेच्या समोरील टेपावरून खाली उतरून टकमक टोकाकडे जाता येते. तेथेच दारूच्या कोठाराचे अवशेष दिसतात. जसजसे टोकाकडे जावे तसतसा रस्ता निमुळता होत जातो. उजव्या हाताला सरळ तुटलेला २६०० फूट खोल कडा आहे. टोकावर वारा प्रचंड असतो व जागाही कमी असल्यामुळे गोंधळ न करता सावधानता बाळगावी लागते.आधीपासुनच शिवराज्यकाळात या ठिकाणावरून गुन्हेगारांचा कडेलोट केला जाई.
 4. वाघदरवाजा : कुशावर्त तलावाजवळून घळीने उतरत वाघ दरवाजाकडे जाता येते. आज्ञापत्रात लिहिले आहे की, ‘किल्ल्यास एक दरवाजा थोर आयब आहे, यांकरीता गड पाहून एक दोन – तीन दरवाजे, तशाच चोरदिंडा करून ठेवाव्या. त्यामध्ये हमेशा राबत्यास पाहिजे तितक्या ठेवून वरकड दरवाजे व दिंडा चिणून टाकाव्या.’ हे दूरदर्शीपणाचे धोरण ठेऊनच महाराजांनी महादरवाजाशिवाय हा दरवाजा बांधून घेतला. या दरवाजाने वर येणे जवळजवळ अशक्यच असले तरी दोर लावून खाली उतरू शकतो. पुढे राजाराम महाराज व त्यांची मंडळी झुल्फिरखानाचा वेढा फोडून याच दरवाजाने निसटली होती.
 5. कुशावर्त तलाव : होळीचा माळ डाव्या हातास सोडून उजवीकडील वाट कुशावर्त तलावाकडे जाते. तलावाजवळ महादेवाचे छोटेसे देऊळ दिसते. देवळासमोर फुटलेल्या अवस्थेतला नंदी दिसतो.
 6. जगदीश्वर मंदिर : बाजारपेठेचा खालचा बाजूस पूर्वेकडील उतारावर ब्राह्मणवस्ती, ब्राह्मणतळे वगैरे अवशेष दिसतात. तेथूनच समोर जे भव्य मंदिर दिसते तेच महादेवाचे म्हणजे जगदीश्वराचे मंदिर. मंदिरासमोर नंदीची भव्य आणि सुबक मूर्ती आहे. पण सध्या ही मूर्ती भग्रावस्थेत आहे. मंदिरात प्रवेश केला की भव्य सभामंडप लागतो. मंडपाच्या मध्यभागी भव्य कासव आहे. गाभाऱ्याचा भिंतीस हनुमंताची भव्य मूर्ती दिसते. मंदिराचा प्रवेशद्वाराचा पायऱ्यांचा खाली एक लहानसा शिलालेख दिसतो. तो पुढीलप्रमाणे, ‘सेवेचे ठायी तत्पर हिरोजी इटळकर’ या दरवाजाचा उजव्या बाजूस भिंतीवर एक सुंदर शिलालेख दिसतो. याचा थोडक्यात अर्थ पुढीलप्रमाणे -’सर्व जगाला आनंददायी असा हा जगदीश्वराचा प्रासाद श्रीमद् छत्रपती शिवाजी राजांचा आज्ञेने शके १५९६ मध्ये आनंदनाम संवत्सर चालू असताना सुमुहुर्तावर निर्माण केला. या रायगडावर हिरोजी नावाचा शिल्पकाराने विहिरी, तळी, बागा, रस्ते, स्तंभ, गजशाळा, राजगृहे अशांची उभारणी केली आहे. ती चंद्रसूर्य असेतोवर खुशाल नांदो.’
 7.  शिरकाई देऊळ : महाराजांचा पुतळ्याचा डाव्या बाजूस जे छोटे देऊळ दिसते ते शिरकाईचे देऊळ. शिरकाई ही गडावरील मुख्य देवता. शिर्के पाचव्या शतकापासून रायगडाचे स्वामी होते. याची आठवण देणारी गडस्वमिनी शिरकाई हिचे मंदिर गडावर आहे. लोकमान्य टिळकांचा काळात मावळकर नावाचा इंजिनिअराने हे मंदिर बांधले आहे. ते शिरकाईचे मूळ मंदिर नाही. मूर्ती मात्र प्राचीन आहे. मूळ शिरकाई मंदिर राजवाड्यास लागून डावीकडे होळी माळावर होते. तेथे मूळ देवळाचा चबुतरा अजूनही आहे. ब्रिटिश काळात तेथे शिरकाईचा घरटा हा नामफलक होता.
 8. बाजारपेठ : नगारखान्याकडून डावीकडे उतरून आले की, समोर जी मोकळी जागा दिसते तो ‘होळीचा माळ’. तेथेच आता शिवछत्रपतींचा भव्य पुतळा बसवलेला आहे. पुतळ्यासमोर जे दोन रांगांमध्ये भव्य अवशेष दिसतात तीच शिवाजी महाराजांचा काळातील बाजारपेठ. पेठेचा दोन रांगात प्रत्येकी २२ दुकाने आहेत. दोन रांगांमधून जवळजवळ चाळीस फूट रुंदीचा रस्ता आहे.हे बाजार पेठ आजही हुबेहुब जसेचा तसेच आहे.
 9. नगारखाना : सिंहासनाचा समोर जे भव्य प्रवेशद्वार दिसते तोच हा नगारखाना. हे बालेकिल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे. नगारखान्यातून पायऱ्या चढून वर गेले की माणूस किल्ल्यावरील सर्वाधिक उंचीवर असतो.
 10. राजसभा : महाराजांचा राज्याभिषेक जेथे झ़ाला, तीच ही राजसभा. राजसभा २२० फूट लांब व १२४ फूट रुंद आहे. येथेच पूर्वेकडे तोंड केलेली सिंहासनाची जागा आहे. येथे बत्तीस मणांचे सोन्याचे सिंहासन होते. सभासद बखर म्हणते, ‘तख्त सुवर्णाचे बत्तीस मणांचे सिद्ध करवले. नवरत्‍ने अमोलिक जितकी कोशात होती, त्यामध्ये शोध करून मोठी मोलाची रत्‍ने जडाव केली.’
 11. राजभवन : राणीवशाचा समोर डाव्या हातास दासदासींचा मकानांचे अवशेष दिसतात. या अवशेषांचा मागे दुसरी जी समांतर भिंत आहे त्या भिंतीचा मध्यभागी जो दरवाजा आहे तेथून बालेकिल्ल्याचा अंतर्भागात प्रवेश केला की जो प्रशस्त चौथरा लागतो तेच हे महाराजांचे राजभवन. राजभवनाचा चौथारा ८६ फूट लांब व ३३ फूट रुंद आहे. १३. रत्‍नशाळा : राजप्रासादाजवळील स्तंभांच्या पूर्वेकडे असलेल्या मोकळ्या जागेत एक तळघर आहे, तीच ही रत्‍नशाळा. हा खलबतखाना म्हणजेच गुप्त बोलणी करण्यासाठी केलेली खोली असावी असेही म्हणतात.
 12. मेणा दरवाजा : पालखी दरवाजाने वर प्रवेश केला की, चढउतार असलेला एक सरळ मार्ग आपल्याला मेणा दरवाजापर्यंत घेऊन जातो. उजव्या हातास जे सात अवशेष दिसतात ते आहेत राण्यांचे महाल. मेणा दरवाजातून बालेकिल्ल्यावर प्रवेश करता येतो.
 13. पालखी दरवाजा : स्तंभांचा पश्चिमेस भिंत असलेल्या भागातून ३१ पायऱ्या बांधलेल्या दिसतात. त्या चढून गेल्यावर जो दरवाजा लागतो तो पालखी दरवाजा. या दरवाजातून बालेकिल्ल्यात प्रवेश करता येतो.
 14.  स्तंभ : गंगासागराचा दक्षिणेस दोन उंच मनोरे दिसतात. त्यासच स्तंभ म्हणतात. जगदीश्वराचा शिलालेखामध्ये ज्या स्तंभांचा उल्लेख केला आहे, ते हेच असावेत. ते पूर्वी पाच मजले होते असे म्हणतात. ते द्वादश कोनी असून बांधकामात नक्षीकाम आढळते.
 15. गंगासागर तलाव : हत्तीतलावापासून जवळच रायगड जिल्हा परिषदेचा धर्मशाळेचा इमारती दिसतात. धर्मशाळेपासून दक्षिणेकडे अंदाजे ५० -६० पावले चालत गेल्यास जो तलाव लागतो तो गंगासागर तलाव. महाराजांचा राज्याभिषेकानंतर सप्तसागर व महानांची आणलेली तीर्थे याच तलावात टाकली गेली. म्हणूनच याचे गंगासागर असे नाव पडले. शिवाजी महाराजांचा काळात शिबंदीसाठी याचे पाणी वापरण्यात येई.
 16. हत्ती तलाव : महादरवाजातून थोडे पुढे आल्यावर जो तलाव दिसतो तो हत्ती तलाव. गजशाळेतून येणाऱ्या हत्तींच्या स्नानासाठी आणि पिण्यासाठी या तलावाचा उपयोग होत होता.
 17. महादरवाजा : महादरवाजाचा बाहेरील अंगास वर दोन्ही बाजूस दोन सुंदर कमळाकृती कोरल्या आहेत दरवाजावर असणाऱ्या या दोन कमळांचा अर्थं म्हणजे किल्ल्याचा आत ‘श्री आणि सरस्वती’ नांदत आहे. ‘श्री आणि सरस्वती’ म्हणजेच ‘विद्या व लक्ष्मी’ होय. महादरवाजाला दोन भव्य बुरूज असून एक ७५ फूट तर दुसरा ६५ फूट उंचं आहे. तटबंदीमध्ये जी उतरती भोके ठेवलेली असतात त्यास ‘जंग्या’ म्हणतात. शत्रूवर मारा करण्यासाठी ही भोके ठेवलेली असतात. बुरुजांमधील दरवाजा हा वायव्य दिशेस तोंड करून उभा आहे. महादरवाजातून आत आल्यावर पहारेकऱ्यांचा देवड्या दिसतात तसेच संरक्षकांसाठी केलेल्या राहण्याचा खोल्या दिसतात. महादरवाजापासून उजवीकडे टकमक टोकापर्यंत तर डावीकडे हिरकणी टोकापर्यंत तटबंदी बांधलेली आहे.
 18. चोरदिंडी : महादरवाजापासून उजवीकडे टकमक टोकापर्यंत जी तटबंदी जाते, त्यावरून चालत गेल्यास जिथे ही तटबंदी संपते, त्याचा थोडे अलीकडे बुरुजात ही चोरदिंडी बांधलेली आहे. बुरुजाचा आतून दरवाजापर्यंत येण्यासाठी पायऱ्या आहेत.
 19. खुबलढा बुरूज : गड चढू लागले म्हणजे एक बुरुजाचे ठिकाण दिसते, तोच हा सुप्रसिद्ध खुबलढा बुरूज. बुरुजा शेजारी एक दरवाजा होता, त्यास ‘चित्‌ दरवाजा’ म्हणत पण हा दरवाजा आता पूर्णपणे उध्वस्त झ़ाला आहे.
 20. नाना दरवाजा : या दरवाजास ‘नाणे दरवाजा’ असेही म्हणत. नाना दरवाजा याचाच अर्थ लहान दरवाजा. इ.स. १६७४ च्या मे महिन्यात राज्याभिषेकाचा निमित्ताने इंग्रजांचा वकील हेन्‍री ऑक्झेंडन याच दरवाजाने आला होता. या दरवाजास दोन कमानी आहेत. दरवाजाचा आतील बाजूस पहारेकऱ्यांसाठी दोन लहान खोल्या आहेत. त्यांस ‘देवडा’ म्हणतात. दरवाजास अडसर घालण्यासाठी खोबणी दिसतात.
 21. मदारमोर्चा किंवा मशीदमोर्चा : चित्‌ दरवाजाने गेल्यावर नागमोडी वळणे घेत गेलेल्या रस्त्याने पुढे गेल्यावर एक सपाटी लागते. या मोकळ्या जागेत टोकाशी दोन पडक्या इमारती दिसतात. त्यापैकी एक पहारेकऱ्यांची जागा असून दुसरे धान्याचे कोठार आहे. येथे मदनशहा नावाचा साधूचे थडगे आहे. तेथे एक प्रचंड तोफही दिसते. येथून पुढे गेल्यावर खडकात खोदलेल्या तीन गुहा दिसतात.
 22. पाचाडचा जिजाबाईंचा वाडा : उतारवयात जिजाबाईंना गडावरची थंड हवा, वारा मानवत नसे, म्हणून महाराजांनी त्यांचासाठी पाचाडजवळच एक वाडा बांधून दिला. तोच हा मासाहेबांचा राहता वाडा. वाड्याची व्यवस्था ठेवण्यासाठी काही अधिकारी तसेच शिपायांची व्यवस्थाही महाराजांनी केली होती. पायऱ्यांची एक उत्तम विहीर, तसेच जिजाबाईंना बसण्यासाठी केलेले दगडी आसन बघण्यासारखे आहे. यास ‘तक्क्याची विहीर’ असेही म्हणतात.
 23. रायगडावरील अश्‍मयुगीन गुहा : पाचाड गावातून रायगडचा दोरवाटेचा (रोप वेचा) तळावरून पाचाड खिंडीत येते. येथून पायउतार होऊन अवघ्या १४३५ पायऱ्या चढून गेले, की रायगडमाथा गाठता येतो. पण या पाचाड खिंडीतच रायगडाचा विरुद्ध दिशेस अवघ्या ४-५ मिनिटांचा चढणीवर एक गुहा आहे. तिला म्हणतात “वाघबीळ’ किंवा “नाचणटेपाची गुहा.’ नवे ट्रेकर्स या गुहेला “गन्स ऑफ पाचाड’ असे म्हणू लागले आहेत.

जगातील इतर सर्व गुहांपेक्षा या गुहेची रचना पूर्ण वेगळी आहे. पाचाड खिंडीतून येथवर चढून आले की गुहेचे एक तोंड दिसते. या तोंडातून आत गेले की समोर येणारे दृश्‍य अचंबित करणारे आहे. दोन गोलाकृती प्रचंड भोके पलीकडील बाजूला आहेत. तिथवर गेले, की पाचाडचा भुईकोट किल्ला, पाचाड गाव व पाचाडपासून ते पाचाड खिंडीकडे येणारा घाटरस्ता व्यवस्थित पाहता येतो.

या गुहेत सतत एकापाठोपाठ येणाऱ्या थंड वाऱ्याचा झ़ुळका आपला सारा थकवा दूर करतात. ज्या अर्थी अश्‍मयुगीन मानवाची इथे वस्ती होती. त्याअर्थी इथे जवळपास बारमाही पाण्याचे एखादे नैसर्गिक ठिकाण निश्‍चित असणार. त्याचा शोध घ्यायलाच हवा. रायगड पाहायला शेकडो-हजारो दुर्गयात्रींना या वाघबीळ गुहेची कल्पनाच नसते. अश्‍मयुगीन मानवाचे जुने वसतीस्थान, ३ तोंडे असणारी गुहा, तेथून दिसणारा उत्कृष्ट देखावा, सतत वाहणारा थंड वारा यांची अपूर्वाई येथे भेट देणाऱ्याला जाणवते.

तुम्हाला फसेबूकचं व्यसन लागलं आहे का? कसे सोडावे ? 8 उपाय

कसे पोहोचावे –

रायगड किल्ला/Raigad Fort वर शाळा महाविद्यालयांच्या आणि अनेक पर्यटन कंपन्यांच्या सहली रायगडावर आयोजित केल्या जातात. पुण्याहून रायगडापर्यंत जाण्यासाठी थेट बससेवा आहे. ही बस पुण्यातून भोरमार्गे वरंधा घाटातून महाडमार्गे पाचाड पर्येंत येते. गडावर दोरवाटेने (रोप-वे) पाळण्यात बसून जाता येते, तर हजार-बाराशे पायऱ्या चढून रायगडावर पोहोचता येते.

गडावर राहायची सोय

गडावर राहण्यासाठी उत्तम सोय आहे. गडावर एक धर्मशाळा आहे. एक मोठा हॉल व छोट्या मोठ्या अशा ७ ते ८ खोल्या आहेत. राहण्याची सोय विनाशुल्क आहे.

गडावर खाण्याची सोय

गडावर खाण्याची व विविध वस्तूंची दुकाने आहेत. गडावर खाण्याची सोय आहे पण स्वतःच्या सोयीप्रमाणे खाद्यपदार्थ घेऊन जावे.

गडावर पिण्याच्या पाण्याची सोय

गडावर जाण्यासाठी आता एकूण दोन मार्ग आहेत. येथे पाण्याची खूप चांगली सोय आहे. शुद्ध पाणी आणि फिल्टर केलेले पाणी आपणास मिळते. गडावर गंगासागर तलाव इत्यादी अनेक पाण्याचे तलाव आहेत. त्यांत मुबलक पाणी १२ महिने असते.

लेख आवडल्यास सोशल मीडियावर नक्की शेअर करा.

because sharing is caring ❤️

apj Abdul Kalam यांची प्रेरणादायी 12 मराठी पुस्तके

0
apj abdul kalam
apj abdul kalam

Dr. A.P.J. Abdul Kalam/ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम

apj abdul kalam
apj abdul kalam

पूर्ण नाव-

अबुल पाकिर जैनुलअब्दीन अब्दुल कलाम

जन्मतारीख-

15 ऑक्टोबर 1931

जन्मस्थान-

रामेश्वरम, मद्रास राज्य, ब्रिटिश इंडिया (आताचे तामिळनाडू, भारत)

मृत्यु-

27 जुलै 2015 (वय 83) शिलॉंग, मेघालय, भारत

निवास-

देसिया निनैवागम पेई करम्बु, रामेश्वरम, तामिळनाडू

नागरिकता-

भारतीय

आई वडील-

जैनुलबदीन (वडील)

आशियम्मा (आई)

शिक्षण-

सेंट जोसेफ कॉलेज, तिरुचिरापल्ली (BEng)
मद्रास इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजीज (MEng)

व्यवसाय-

एरोस्पेस सायंटिस्ट, लेखक

पदनाम-

राष्ट्रपती (माजी) भारत सरकार
पंतप्रधानांचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार भारत सरकार
संरक्षण संशोधन व विकास संघटनेचे सचिव भारत सरकार
प्रकल्प संचालक भारतीय अवकाश संशोधन संस्था (इसरो)

apj abdul kalam परिचय

1916 डॉ. कलाम (Dr. A.P.J. Abdul Kalam) पाच भावंडांपैकी सर्वात धाकटे होते, त्यांना मोठी बहिण असीम जोहरा (मृ. 1997)) आणि त्यानंतर तीन मोठे भाऊ: मोहम्मद मुथु मीरा लेबबाई मरायकाय (जन्म 4 नोव्हेंबर 1916), मुस्तफा कलाम (मृ. 1999) आणि कासिम मोहम्मद (मृ. 1995).
आयुष्यभर ते मोठ्या भावंडांचे आणि त्यांच्या विस्तारित कुटुंबांशी अगदी जवळचे होते आणि जीवनभर डॉ. कलाम अविवाहित राहिले. ते आपल्या कुटुंबियांना नियमितपणे थोडे पैसे पाठवत असत.
1931 अवुल पाकीर जैनुलब्दीन अब्दुल कलाम यांचा जन्म 1ऑक्टोबर 1931रोजी पंबन बेटावरील रामेश्वरम या तीर्थक्षेत्रात, मद्रास प्रेसिडेंसीमध्ये आणि आता तामिळनाडू राज्यात एक तमिळ मुस्लिम कुटुंबात झाला.
त्याचे वडील जैनुलब्दीन हे बोट मालक आणि स्थानिक मशिदीचे इमाम होते. त्यांची आई अशिअम्मा गृहिणी होत्या. त्यांच्या वडिलांच्या मालकीची फेरी होती. ते रामेश्वरम मधून धनुष्कोडी या गावापर्यंत हिंदू यात्रेकरूंना ने-आन करत होते.
कलाम हे त्याच्या कुटुंबातील चार भाऊ आणि एक बहिण यांच्यात सर्वात लहान होते. त्याचे पूर्वज श्रीमंत व्यापारी आणि जमीनदारी करणारे होते, ज्यात बरीच मालमत्ता आणि मोठ्या प्रमाणात शेत-जमीन होती.
त्यांच्या वडिलांच्या व्यवसायामध्ये मुख्यतः पाण्यातून सामानाची ने-आन करणे तसेच मुख्य भूमी आणि पंबानमधील यात्रेकरूंना घेऊन जाणे समाविष्ट होते. याचा परिणाम म्हणून, त्यांच्या कुटुंबाने “मरा कलाम अय्याकीवार” (लाकडी बोट स्टीयरर्स) ही पदवी संपादन केली, त्यात काही वर्षांनी “मराकीयर” असा अपभ्रंश झाला.
1914 मध्ये मुख्य भूभागावर पंबन येथे पूल बांधल्यामुळे, त्यांचा व्यवसाय अपयशी ठरला आणि वडिलोपार्जित घराशिवाय घराण्याची जमीन आणि संपत्ती कालांतराने गमावली. बालपणापासूनच कलाम यांचे कुटुंब गरीब झाले होते.
अगदी लहान वयातच त्याने आपल्या कुटुंबाच्या उत्पन्नाची पूर्तता करण्यासाठी वर्तमानपत्रे विकली.
1954

apj abdul kalam शालेय जीवनात डॉ. कलाम हे एक सरासरी श्रेणीचे विध्यार्थी होते. पण शिकण्याची तीव्र इच्छा असणारा एक तेजस्वी आणि कष्टकरी विद्यार्थी असे त्याचे वर्णन केले जायचे. ते तासंतास अभ्यासात गुंग असायचे खासकरून त्यांना गणित खूप आवडायचे. रामानाथपुरमच्या श्वार्ट्ज उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षण संपल्यानंतर कलाम यांनी सेंट जोसेफ कॉलेज, तिरुचिराप्पल्ली येथे शिक्षण घेतले, ते नंतर मद्रास विद्यापीठाशी संबंधित होते, तेथून त्यांनी 1944 मध्ये भौतिकशास्त्रात पदवी मिळवली. 

मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असतांना कलाम वरिष्ठ वर्गाच्या प्रकल्पात काम करत होते, डीन त्यांच्या प्रगतीअभावी असंतुष्ट झाले आणि पुढील तीन दिवसांत प्रकल्प पूर्ण झाला नाही तर शिष्यवृत्ती रद्द करण्याची धमकी दिली. कलाम यांनी डीनला प्रभावित करण्यासाठी डेडलाइन संपायच्या आत प्रकल्प पूर्ण केला, नंतर डीन त्यांना म्हणाले की, “मी तुला ताणतणाव घालत होतो आणि तु एक कठीण मुदत पूर्ण व्हायच्या आधी करू शकतो का ते पाहत होतो”
1960 त्यांचे लढाऊ पायलट होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही कारण त्यांनी क्वालिफायरमध्ये नववे स्थान मिळवले आणि आयएएफमध्ये केवळ आठचं पदे उपलब्ध होती.
1960 मध्ये मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून पदवी संपादन केल्यानंतर कलाम संरक्षण संशोधन व विकास संघटनेच्या (एरोनॉटिकल डेव्हलपमेंट आस्थापना (प्रेस इन्फॉरमेशन ब्यूरो, भारत सरकार)) या संशोधन आणि विकास सेवेचे (डीआरडीएस) सदस्य झाल्यानंतर वैज्ञानिक म्हणून सामील झाले.
त्यांनी छोट्या होव्हरक्राफ्टची रचना करून आपल्या कारकिर्दीची सुरूवात केली, परंतु सुरवातीला डीआरडीओमध्ये निवड झाल्यामुळे ते असंतुष्ट होते. कलाम हे विक्रम साराभाई, प्रख्यात अवकाश वैज्ञानिक, यांच्या अध्यक्षतेखाली काम करणा INCOSPAR समितीचा देखील एक सदस्य होते. 1969 मध्ये कलाम यांची भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) येथे बदली झाली जिथे ते भारताचे पहिले उपग्रह प्रक्षेपण वाहन (एसएलव्ही- III) चे प्रकल्प संचालक होते ज्यांनी रोहिणी उपग्रह यशस्वीपणे जुलै 1980 मध्ये पृथ्वीच्या कक्षेत तैनात केले.
कलाम यांनी सर्वप्रथम 1965 साली डीआरडीओमध्ये स्वतंत्रपणे विस्तार करण्यायोग्य रॉकेट प्रकल्पाचे काम सुरू केले. 1969 मध्ये कलाम यांना सरकारची मंजुरी मिळाली आणि अधिकाधिक अभियंत्यांचा समावेश करण्याच्या कार्यक्रमाचा विस्तार केला.
1963  

apj abdul kalam 1963 ते 1964 मध्ये त्यांनी व्हर्जिनियामधील हॅम्प्टन येथील नासाच्या लॅंगली रिसर्च सेंटरला भेट दिली, ग्रीनबेल्ट, मेरीलँड मधील गोडार्ड स्पेस फ्लाइट सेंटर, आणि वॉलॉप्स फ्लाइट फॅसिलिटी इथे हि भेटी दिल्या. 1970 ते 1990 च्या दरम्यान कलाम यांनी ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन (पीएसएलव्ही) आणि एसएलव्ही-II प्रकल्प विकसित करण्याचा प्रयत्न केला, हे दोन्हीही यशस्वी ठरले.

1970 कलाम apj abdul kalam यांना राजा रमन्ना यांनी टीबीआरएलचे प्रतिनिधी म्हणून आणि “Smiling Buddha” या देशाच्या पहिल्या अणुचाचणीच्या साक्षीदार म्हणून आमंत्रित केले होते.
1970 च्या दशकात कलाम यांनी प्रोजेक्ट डेव्हिल आणि प्रोजेक्ट व्हॅलियंट या दोन प्रकल्पांचेही दिग्दर्शन केले त्यांनी एस.एल.व्ही. यशस्वी कार्यक्रमाच्या तंत्रज्ञानापासून बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा विकास करण्याचा प्रयत्न केला.
केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता नाकारली गेली असतानाही पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी कलाम यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या विवेकाधिकारांच्या माध्यमातून या एरोस्पेस प्रकल्पांसाठी गुप्त निधी वाटप केला. या वर्गीकृत एरोस्पेस प्रकल्पांचे खरे स्वरूप लपविण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाला खात्री पटवून देण्यात कलाम यांनी अविभाज्य भूमिका बजावली. 1980 च्या दशकात त्यांच्या संशोधन आणि शैक्षणिक नेतृत्वातून त्यांना मोठे गौरव व प्रतिष्ठा मिळवून दिली ज्यामुळे सरकार त्यांच्या संचालकतेखाली प्रगत क्षेपणास्त्र कार्यक्रम सुरू करण्यास उद्युक्त झाले.
कलाम आणि संरक्षणमंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार डॉ. व्ही. एस. अरुणाचलम यांनी तत्कालीन संरक्षणमंत्री आर. वेंकटरामन यांच्या एकामागून एक क्षेपणास्त्रांच्याऐवजी नियोजित क्षेपणास्त्रांचा विकास करण्याच्या प्रस्तावावर काम केले. वेंकटरामन यांनी मिशनसाठी ₹ 388 कोटी वाटप करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी मिळविण्यामध्ये मोलाची भूमिका बजावली, ज्यांना एकात्मिक मार्गदर्शित क्षेपणास्त्र विकास कार्यक्रम (आयजीएमडीपी) असे नाव देण्यात आले, आणि कलाम यांची मुख्य कार्यकारी म्हणून नेमणूक केली.
मिशन अंतर्गत अनेक क्षेपणास्त्रांचा विकास करण्यात कलाम यांचा मोठा वाटा होता, यामध्ये अग्नि, एक इंटरमीडिएट-रेंज बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि पृथ्वी ही रणनीतिकखेळ भू-क्षेपणास्त्र होती, परंतु या प्रकल्पांवर गैरप्रकार, खर्च व वेळ वाया घालवण्यावर टीका केली गेली.
1981 कलाम apj abdul kalam यांना 40 विद्यापीठांतून 7 मानद डॉक्टरेट मिळाली. इस्रो आणि डीआरडीओमध्ये काम केल्याबद्दल आणि सरकारचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून त्यांनी दिलेल्या भूमिकेबद्दल भारत सरकारने 1981 मध्ये पद्मभूषण आणि 1990 मध्ये पद्मविभूषणने त्यांचा सन्मान केला. 1997 मध्ये कलाम यांना भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान, भारत रत्न, भारतातील संरक्षण तंत्रज्ञानाच्या वैज्ञानिक संशोधन आणि आधुनिकीकरणास दिलेल्या योगदानाबद्दल प्राप्त झाला. 2013 मध्ये, डॉ. कलाम हे “अवकाश-संबंधित प्रकल्पांचे व्यवस्थापन आणि नेतृत्व” मधील उत्कृष्टता ओळखण्यासाठी राष्ट्रीय अवकाश सोसायटी कडून Von Braun Award प्राप्तकर्ता होते.
1992 कलाम apj abdul kalam यांनी पंतप्रधानांचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार आणि संरक्षण संशोधन व विकास संघटनेचे सचिव म्हणून जुलै 1992 ते डिसेंबर 1999 पर्यंत काम केले.
पोखरण -२ अणुचाचणी या काळात घेण्यात आली त्याकाळात त्यांनी सघन राजकीय आणि तांत्रिक भूमिका पार पाडली.
कलाम यांनी चाचणी टप्प्यात राजगोपाला चिदंबरम यांच्यासह मुख्य प्रकल्प समन्वयक म्हणून काम पाहिले. कलाम हे देशातील नामांकित अणु वैज्ञानिक बनले. तथापि, साइट चाचणीचे संचालक के. संथनम म्हणाले की, थर्मोन्यूक्लियर बॉम्ब हा ‘फिझल’ होता आणि चुकीचा अहवाल देण्याबद्दल कलाम यांच्यावर टीका केली. पण कलाम आणि चिदंबरम यांनी हे दावे फेटाळून लावले.
1998  apj abdul kalam 1998 मध्ये, कार्डियोलॉजिस्ट सोमा राजू यांच्यासमवेत कलाम यांनी low-cost coronary स्टेंट विकसित केला, ज्याचे नाव “कलाम-राजू स्टेंट” आहे. 2012 मध्ये या दोघांनी ग्रामीण भागातील आरोग्य सेवेसाठी rugged tablet computer ची रचना केली, ज्याला “कलाम-राजू टॅब्लेट” असे नाव देण्यात आले.
1999  apj abdul kalam 1999 मध्ये वैज्ञानिक सल्लागारपदाचा राजीनामा दिल्यानंतर दोन वर्षांत कलाम यांनी 100000 विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचे निश्चित केले. त्यांनी स्पष्ट केले की मला, “तरुण मुले, विशेषत: उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांशी संवाद साधायचा आहे”.डॉ. कलाम याच्या म्हणण्यानुसार त्यांना त्यांच्या अनुभवांचा विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती प्रज्वलित करण्यास मदत होईल आणि त्यासाठी रोड मॅप आधीच उपलब्ध आहे अशा विकसित भारतात काम करण्यासाठी त्यांना तयार करा. “प्रत्येक विद्यार्थ्याने त्याच्या अंत: करणातील सुप्त अग्निपंखांचा उपयोग करुन आकाशात विजयी झेप घ्यावी” हे त्यांचे स्वप्न होते.
2001 अधिक समृद्ध, अध्यात्मिक आणि एकात्म भारत निर्माण करण्यासाठी आध्यात्मिक नेत्यांची भेट घेण्याची कलामांची इच्छा हीच त्यांना सुरुवातीच्या काळात स्वामीनारायण संप्रदायाचे हिंदू गुरु प्रभू स्वामी यांची भेट घेण्यास कारणीभूत ठरली. दरम्यान कलाम यांनी प्रभूस्वामी यांचा साधेपणा आणि त्यांच्या आध्यात्मिक व्यक्तित्वाकडे त्वरित आकर्षित झाल्याचे वर्णन केले.
2002 भारतातील विविध गटांमध्ये कलाम यांच्या व्यापक लोकप्रियतेचा एक घटक व त्यांचा वारसा हा एक टिकाऊ पैलू आहे. त्यांनी भारतातील अनेक अध्यात्मिक व सांस्कृतिक परंपरेतील घटकांचे कौतुक केले.
कुराण आणि इस्लामिक प्रवृत्तीवरील त्याच्या विश्वास या व्यतिरिक्त कलाम यांची हिंदू संस्कृतीशी सुद्धा श्रद्धा होती. त्यांनी संस्कृत शिकली, भगवद्गीता सुद्धा वाचली. कलाम यांना तामिळ कविता लिहिणे, वीणा (दक्षिण भारतीय स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट) वाजविणे आणि कर्नाटिक भक्ती संगीत दररोज ऐकणे देखील आवडत असे.
एकदा कॉंग्रेस नेते शशी थरूर म्हणाले, “कलाम हे संपूर्ण भारतीय आहेत, विविधतेच्या परंपरा असलेल्या भारतीय कलावंताचे मूर्तिमंत रूप “. त्यांनी भारताची ऐक्य दर्शविणारी सर्व सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरा उत्तम प्रतिबिंबित केली.
2003 सप्टेंबर 2003 मध्ये पीजीआय चंदीगडमधील संवादात्मक सत्रात कलाम यांनी देशातील तरुण लोकसंख्येला भारताची ताकद बनवण्याचा निर्धार व्यक्त केला.
2006  apj abdul kalam राष्ट्रपती म्हणून त्यांच्या कार्यकाळात ते प्रेमाने जनतेचे अध्यक्ष म्हणून ओळखले जात असत. आपल्या कार्यकाळात त्यांना सादर केलेल्या 21 दया याचिकांपैकी 20 जणांचे भवितव्य ठरविण्याबाबत कलाम यांच्यावर टीका झाली होती. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 72 मध्ये भारताच्या राष्ट्रपतींना क्षमा करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत, म्हणजे मृत्युदंडातील दोषींची फाशीची शिक्षा स्थगित करणे किंवा त्यास कमी करणे. राष्ट्रपतीपदाच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात कलाम यांनी केवळ एका दया याचिकेवर कारवाई केली आणि नंतर त्यांना फाशी देण्यात आलेल्या बलात्कारी धनंजय चॅटर्जीची याचिका नाकारली. 2005 मध्ये बिहारमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा वादग्रस्त निर्णयही त्यांनी घेतला.
2007 कार्यकाळ संपल्यानंतर, 20 जून 2007 रोजी कलाम यांनी 2007 च्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत त्यांच्या विजयाबद्दल निश्चितता असल्यास दुसर्‍या टर्मवर विचार करण्याची तयारी दर्शविली. तथापि, दोन दिवसांनंतर त्यांनी राष्ट्रपती भवनात कोणत्याही राजकीय प्रक्रियेत सहभागी होणार नाही, असे सांगून पुन्हा राष्ट्रपती पदाची निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला. नव्याने राष्ट्रपती होण्यासाठी त्यांना डाव्या पक्ष-संघटना , शिवसेना आणि यूपीए घटकपक्षांचे त्यांना समर्थन नव्हते.
2011 2011 च्या I Am Kalam या हिंदी चित्रपटात छोटू या एका गरीब पण तेजस्वी राजस्थानी मुलाचे Dr. A.P.J. Abdul Kalam हे आदर्श दाखवले आहेत.
2012 मे 2012 मध्ये, कलाम apj abdul kalam यांनी भारतीय तरुणांसाठी भ्रष्टाचाराला पराभूत करण्याची मध्यवर्ती थीम असलेल्या What Can I Give Movement ची स्थापना केली.
2013  apj abdul kalam एक आदरणीय वैज्ञानिक म्हणून त्यांनी भारतीय अंतराळ कार्यक्रमाच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. एक वचनबद्ध शिक्षक म्हणून त्यांनी लाखो लोकांना प्रेरणा दिली. तरुणांचे सर्वोत्तम कार्य साध्य करण्यासाठी. आणि एक निष्ठावान नेते म्हणून त्यांनी देश-विदेशात जनतेचे अध्यक्ष म्हणून ओळखले जाऊ लागले. डॉ. कलाम यांचे नम्रता आणि लोकसेवेचे समर्पण जगातील कोट्यावधी भारतीय आणि प्रशंसकांना प्रेरणा देणारे आहे.
2014 Dr. A.P.J. Abdul Kalam हे आता विद्यार्थ्यांत जास्त रमू लागले. विद्यार्थ्यांचे प्रश्न एकूण त्यांचे उत्तरे देणे, त्यांच्यात आत्मविशास वाढवणे, 2020 पर्यंत भारताला महासत्ता बनवण्याचे त्याचे ध्येय होते त्यासाठी ते शेवटपर्येंत आयुष्यभर झटले.
2015  apj abdul kalam 27 जुलै 2015 रोजी वयाच्या 83व्या वर्षी शिलॉंग, मेघालय येथे विद्धयार्थ्यांशी संवाद साधत असतांना हृदय विकाराचा झटका येऊन त्यांचे निधन झाले.
2017 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम राष्ट्रीय स्मारक हे दिवंगत राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. यांच्या स्मृती प्रित्यर्थ बनवण्यात आले. हे स्मारक भारताच्या तामिळनाडू राज्यातील रामेश्वरम या बेटाच्या शहरातील पेई करुंबू येथे आहे. हे स्मारक, संशोधन संरक्षण आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) बांधले आहे.
2018 फेब्रुवारी 2018 मध्ये, बॉटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या वैज्ञानिकांनी त्याच्या सन्मानार्थ, नव्याने सापडलेल्या वनस्पती प्रजातींचे नाव “ड्रायप्टिस कलामी” ठेवले.

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार

वर्ष पुरस्कार किंवा सन्मानाचे नाव पुरस्कार देणारी संस्था
1981 Padma Bhushan Government of India
1990 Padma Vibhushan Government of India
1994 Distinguished Fellow Institute of Directors (India)
1997 Bharat Ratna Government of India
1997 Indira Gandhi Award for National Integration Indian National Congress
1998 Veer Savarkar Award Government of India
2000 Ramanujan Award Alwars Research Center, Chennai
2007 King Charles II Medal University of Wolverhampton, UK
2008 Doctor of Engineering (Honoris Causa) Nanyang Technological University, Singapore
2009 International von Kerman Wings Award California Institute of Technology, USA
2009 Hoover Medal ASME Foundation, USA
2009 Honorary Doctorate Oakland University
2010 Doctor of Engineering University of Waterloo
2011 IEEE Honorary Membership IEEE
2012 Doctor of Laws (Honoris Causa) Simon Fraser University
2014 Doctor of Science Edinburgh University, UK

डॉ. कलामांनी लिहिलेली पुस्तके

1.अदम्य जिद्द (मराठी अनुवाद : सुप्रिया वकील)

  Check Price On Amazon

2. इग्नायटेड माइंड्‌स: अनलीशिंग द पॉवर विदिन इंडिया

Check Price On Amazon

3. ‘इंडिया २०२०- ए व्हिजन फॉर द न्यू मिलेनियम’

Check Price On Amazon

4. इंडिया – माय-ड्रीम

Check Price On Amazon

5. विंग्ज ऑफ फायर (आत्मचरित्र)

Check Price On Amazon

6. सायंटिस्ट टू प्रेसिडेंट (आत्मकथन)

Check Price On Amazon

7. स्क्वेअरिंग द सर्कल सेवन स्टेप्स टू इंडियन रेनेसांस 

Check Price On Amazon

कलामांसंबंधी लिहिली गेलेली पुस्तके

1. असे घडले डाॅ. ए.पी.जे. अब्दुल कलाम (प्रणव कुलकर्णी)

Check Price On Amazon

2. ए.पी.जे. अब्दुल कलाम – एक व्यक्तिवेध

Check Price On Amazon

3. रामेश्वरम ते राष्ट्रपतीभवन- डॉ. अब्दुल कलाम

Check Price On Amazon

4. स्वप्न पेरणारे शास्त्रज्ञ राष्ट्रपती : डॉ. अब्दुल कलाम 

Check Price On Amazon

5. कर्मयोगी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम

Check Price On Amazon

लेख आवडल्यास सोशल मीडियावर नक्की शेअर करा.

because sharing is caring ❤️

World’s No.1 Richest Man Elon Musk कोण आहेत?

0
elon musk marathipedia
elon musk marathipedia
Elon-Musk Forbes

Elon Musk/एलन मस्क

पूर्ण नाव-

एलन रिव मस्क

जन्म-

28 जून 1971

निवास-

बेल एयर्स, लॉस एंजेलिस, कैलिफ़ोर्निया, संयुक्त राज्य अमेरिका

नागरिकता-

दक्षिण अफ़्रीका (1971–वर्तमान)
कॅनडा (1989–वर्तमान)
संयुक्त राज्य अमेरिका (2002–वर्तमान)

आई वडील-

एरोल मस्क-(वडील)

मेई मस्क-(आई)

शिक्षण-

क्वीन्स विद्यापीठ
(पदवी नाही)
पेनसिल्व्हेनिया विद्यापीठ
(बीएस आणि बीए, 1997)

व्यवसाय-

उद्योजक, अभियंता, शोधक आणि गुंतवणूकदार

हुद्दा-

CEO of SpaceX
CEO of Tesla Inc.
CEO of Neuralink
Chairman-SolarCity
Co-chairman of OpenAI

एकूण संपत्ती-

184 अब्ज यूएस डॉलर (08 जानेवारी 2021)

वैवाहिक जोडीदार-

जस्टिन मस्क (M-2000 div- 2008)
तलुला रिले (M- 2010–div 2012- M-2013–div-2016)

अपत्य- 7

 • Damian Musk
 • Xavier Musk
 • Saxon Musk
 • Kai Musk
 • Griffin Musk
 • Nevada Alexander Musk
 • X Æ A-Xii

परिचय –

Elon Reeve Muskएलन रीव मस्क हे दक्षिण आफ्रीकन-कॅनेडियन-अमेरिकन दिग्गज व्यापारी, गुंतवणूकदार, अभियंता आणि शोधकर्ता आहेत. एलन स्पेसएक्सचे संस्थापक, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मुख्य डिझाइनरआहे. टेस्ला कंपनीचे सह-संस्थापक, मुख्य कार्यकारी अधिकारी व उत्पादनाचे आर्किटेक्ट आहेत. ओपनएआयचे सह-अध्यक्ष, न्यूरलिंकचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाय बोरिंग कंपनीचे संस्थापक आहेत.

Elon Musk याव्यतिरिक्त सोलरसिटीचे सह-संस्थापक आणि माजी अध्यक्ष, झिप 2 चे सह-संस्थापक आणि X.COM चे संस्थापक आहेत, जे नंतर कॉन्फिनिटीमध्ये विलीन झाले आणि त्याला PayPal हे नवीन नाव प्राप्त झाले.

डिसेंबर 2016 मध्ये Elon Musk हे जगातील सर्वात शक्तिशाली लोकांच्या फोर्ब्स मासिकाच्या यादीमध्ये 21 व्या स्थानावरहोते. 08 जानेवारी 2021 पर्यंत, Elon कडे 184 अब्ज अमेरिकन डॉलर्सची संपत्ती आहे आणि फोर्ब्सने जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून त्यांची नोंद केली आहे.

एलन यांचे असे म्हणणे आहे की SolarCity, Teslaआणि SpaceX ची उद्दीष्टे जग आणि मानवता बदलण्याच्या त्यांच्या दृष्टीकोनाभोवती फिरत आहेत. त्यांच्या उद्दीष्टांमध्ये शाश्वत ऊर्जा उत्पादन आणि वापराद्वारे ग्लोबल वार्मिंग कमी करणे मंगळावर वसाहतकरण (मंगळावर मानवी वस्ती) स्थापित करून “मानव विलुप्त होण्याचा धोका” कमी करणे समाविष्ट आहे

त्यांच्या मुख्य व्यवसाया व्यतिरिक्त त्यांनी हायपरलूप (Hyperloop project) म्हणून ओळखल्या जाणार्‍या हाय-स्पीड ट्रान्सपोर्ट सिस्टमची कल्पना केली आणि इलेक्ट्रिक फॅन प्रॉपल्शनद्वारे सुपरसोनिक जेट्सची उभ्या उड्डाण आणि टेक ऑफ प्रक्रियेचा प्रस्ताव दिला. ज्याला Musk इलेक्ट्रिक जेट म्हणून ओळखले जाते.

टेस्ला कंपनीच्या स्टॉक मध्ये बाउन्स आल्यानंतर 7 जानेवारी 2021 रोजी अमेझॉनचे मालक जेफ बेझोस यांना मागे टाकत Elon Musk (एलन मस्क) जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले.

प्रारंभिक जीवन

एलोन मस्क यांचा जन्म 28 जून, 1971 रोजी, दक्षिण आफ्रिकेचे विद्युत अभियंता, पायलट आणि खलाशी एरॉल मस्क आणि मेय मस्क (रेजिना, सस्केचेवान, कॅनडा येथील मॉडेल आणि आहारतज्ज्ञ) यांच्या पोटी दक्षिण आफ्रिकेच्या प्रिटोरिया, ट्रान्सव्हाल येथे झाला.

एलोन मस्क यांना एक लहान भाऊ किम्बल आणि लहान बहीण तोस्का आहेत. त्यांचे आजोबा डॉ. जोशुआ हॅल्डमन अमेरिकन वंशाचे कॅनेडियन नागरिक होते. ज्यांची पत्नी ब्रिटिश होती आणि त्यांच्याकडे पेनसिल्व्हेनिया डच वंश देखील होता. 1980 मध्ये त्याच्या आईवडिलांच्या घटस्फोटानंतर, Elon Musk मुख्यत: प्रिटोरियाच्या उपनगरात त्याच्या वडिलांसोबत राहत होते. त्यांना एक सावत्र बहीण आणि एक सावत्र भाऊ सुद्धा आहे.

एलोन मस्क यांच्या वडिलांची झांबियामध्ये पाचूची (पन्ना/emerald) खाण होती त्यामुळे एलोन “भव्य जीवन शैली” मध्ये वाढले. त्याच्या बालपणात, एलोन मस्क उत्सुक वाचक होते. वयाच्या 10 व्या वर्षी, त्यांनी कमोडोर व्हीआयसी -20 चा वापर करुन संगणनाची आवड निर्माण केली.त्यांनी स्वत: ला कॉम्प्युटर प्रोग्रामिंग शिकविले आणि 12 व्या वर्षापर्यंत, त्यांनी ब्लास्टार येथे पीसी आणि ऑफिस टेक्नॉलॉजी मॅगझिनला मूलभूत-आधारित व्हिडिओ गेमसाठी कोड बनवून विकला.

शैक्षणिक प्रवास

प्रिटोरिया बॉईज हायस्कूलमधून पदवी मिळविण्यापूर्वी त्यांनी वॉटरक्लूफ हाऊस प्रिपरेटरी स्कूल आणि ब्रायनस्टन हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले. त्याच्या वडिलांनी प्रिटोरियाच्या महाविद्यालयात शिक्षण पूर्ण करण्याचा आग्रह धरला पण एलोन मस्क यांनी अमेरिकेत जाण्याचा निर्धार केला.

कॅनडामधून अमेरिकेत प्रवेश करणे सोपे होईल, म्हणून त्यांनी कॅनेडियन-जन्मलेल्या आईमार्फत कॅनेडियन पासपोर्टसाठी अर्ज केला. कॅनेडियन पासपोर्टची वाट पाहत असताना, Elon Musk यांनी प्रिटोरिया विद्यापीठात पाच महिने शिक्षण घेतले. यामुळे त्यांना दक्षिणेत अनिवार्य असलेली सैन्य सेवा टाळता आली.

कॅनडाला पोचल्यावर, ते एका युथ हॉस्टेलमध्ये राहिले. त्यानंतर त्यांनी सास्कॅचेवनमध्ये दुसर्‍या चुलतभावाबरोबर राहण्यासाठी पश्चिमेकडे प्रवास केला. तेथे ते एक वर्ष नोकरी करत राहिले. 1990 मध्ये, Kingston, Ontario येथील क्वीन्स विद्यापीठात प्रवेश घेतला आणि दोन वर्षानंतर पेनसिल्व्हानिया विद्यापीठात प्रवेश घेतला. 1997 मध्ये त्यांनी विज्ञान विषयात पदवी संपादन केली. (BS) व्हार्टन स्कूल वरून अर्थशास्त्र विषय पदवी आणि भौतिकशास्त्रात पदवी (BA) मिळवली.

1995साली, एलोन मस्क यांनी Netscape मध्ये नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केला, पण नोकरीच्या चौकशीला त्यांना कधीच प्रतिसाद मिळाला नाही असे त्यांचे म्हणणे आहे. आणि मग नोकरीऐवजी इंटरनेटच्या लाटेवर स्वार होण्याचा निर्णय घेतला आणि इंटरनेट स्टार्टअप सुरू केला.

करिअर-

Zip2

1995 मध्ये, एलोन मस्क यांचा भाऊ किंबल व त्यांचा मित्र ग्रेग कौरी यांच्या जोडीने गुंतवणूकदारांच्या एका छोट्या गटाकडून जमा केलेल्या पैशातून वेब सॉफ्टवेअर कंपनी Zip2 ची स्थापना केली.

त्यांनी पालो अल्टो येथे एका लहान भाड्याच्या कार्यालयात काम सुरु केले. कंपनीने maps, directions, आणि yellow pages तयार केले. वृत्तपत्र प्रकाशन उद्योगासाठी Internet city guide विकसित केले आणि त्यांची बाजारपेठ तयार केली.

कंपनी यशस्वी होण्यापूर्वी, मस्क म्हणतात की, त्यांच्या कडे राहायला घर सुद्धा नव्हते. त्यांना एक अपार्टमेंट परवडणार नव्हते, त्याऐवजी झोपायला ऑफिसचा सोपा वापरायचे. याव्यतिरिक्त, ते म्हणतात की त्यांच्याकडे फक्त एकचं संगणक होता. Elon Musk यांच्या मते, “वेबसाइट वर दिवसा काम चालायचं आणि रात्री आम्ही कोडिंग करायचो, आठवड्याच्या सातही दिवस”

जेव्हा Musk बंधूंनी न्यूयॉर्क टाईम्स आणि शिकागो ट्रिब्यूनशी करार केले आणि संचालक मंडळाला सिटी सर्चमध्ये विलीनीकरणाची योजना टाकण्यास उद्युक्त केले तेव्हा त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला. तरीही मुख्य कार्यकारी अधिकारी होण्यासाठी Musk चे प्रयत्न मंडळाने नाकारले. कॉम्पॅकने फेब्रुवारी 1999 मध्ये 307 दशलक्ष डॉलर्समध्ये Zip2 घेतला. मस्कला विक्रीतून त्याच्या 7 टक्के वाटा म्हणून 22 दशलक्ष डॉलर्स प्राप्त झाले.

X.com आणि PayPal

मार्च 1999 साली Zip2 च्या विक्रीतून मिळालेल्या 10 दशलक्ष डॉलर्स मधून online financial services, आणि e-mail payment कंपनी म्हणून मस्क यांनी X.com ची सह-स्थापना केली. एक वर्षानंतर, कंपनी कॉन्फिनिटीमध्ये विलीन झाली, ज्यात PayPal नावाची मनी ट्रान्सफर सेवा होती.

पेपलच्या युनिक्स-आधारित पायाभूत सुविधांना मायक्रोसॉफ्टकडे स्थानांतरित करण्याच्या इच्छेबद्दल कंपनीच्या इतर अधिकाऱ्यांशी असहमत झाल्यामुळे ऑक्टोबर 2000 मध्ये Elon Musk यांना मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावरून काढून टाकले गेले.

ऑक्टोबर 2002 मध्ये, पेपल $1.5 अब्ज डॉलर्सच्या स्टॉकमध्ये eBay ने विकत घेतली, त्यातून एलोन मस्क यांना 165 दशलक्ष डॉलर्स मिळाले. विक्रीपूर्वी, कंपनीच्या सर्वात मोठ्या भागधारक असलेल्या एलोनकडे पेपलच्या 11.7% समभाग होते.

2017 मध्ये PayPal कडून एक अज्ञात धनराशी देऊन डोमेन नाव X.com पुन्हा विकत घेतले. त्यांनी कारण सांगितले की ते X.com शी भावनिकरीत्या जोडलेले आहेत.

SpaceX

2001 मध्ये Elon Musk यांनी मार्स ओएसिस ची कल्पना केली. ज्यामध्ये मंगळावर एक लघु ग्रीनहाऊस अन्न-धांन्याची पिके घेईल आणि अंतराळ अन्वेषणात लोकांची आवड पुन्हा जागृत करेल. ऑक्टोबर 2001मध्ये, मस्क यांनी ग्रीनहाऊस पेलोड्स अंतराळात पाठवू शकतील अशा नूतनीकरण केलेल्या नेपर इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे (ICBMs) खरेदी करण्यासाठी मॉस्को येथे एका गटासह प्रवास केला.

त्यांनी NPO Lavochkin आणि Kosmotras या कंपन्यांची भेट घेतली. मस्ककडे नवशिक्या म्हणून पाहिले जात होते त्यातून त्यांना खूप अपमान देखील सहन करावा लागला. रशियन मुख्य डिझाइनरांपैकी एक व्यक्ती तर चक्क मस्क यांच्यावर थुंकले सुद्धा. हा गट रिकाम्या हाताने अमेरिकेत परतला.

कोसमोत्रांशी त्यांची आणखी एक बैठक झाली आणि त्यांना 8 दशलक्ष डॉलर्ससाठी एक रॉकेट देऊ केला, जो मस्कने नाकारला. त्याऐवजी Elon Musk यांनी स्वस्त रॉकेट्स तयार करू शकणारी कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला. 100 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करून मस्क यांनी मे 2002 मध्ये अंतराळ संशोधनात तंत्रज्ञान महामंडळ, SpaceX ची स्थापना केली.

Tesla

Elon musk Tesla
Elon musk Tesla

Tesla, Inc. (मूळतः टेस्ला मोटर्स) ची स्थापना जुलै 2003 मध्ये मार्टिन एबरहार्ड आणि मार्क टार्पेनिंग यांनी केली होती, ज्यांनी या Series A फेरीपर्यंत कंपनीला अर्थसहाय्य दिले. दोन्ही माणसांनी मस्कच्या सहभागाआधी कंपनीच्या सुरुवातीच्या विकासामध्ये सक्रिय भूमिका बजावल्या..

टेस्कला संचालक मंडळाचे अध्यक्ष म्हणून काम करून फेब्रुवारी 2004 मध्ये एलोन मस्क यांनी Series A round गुंतवणूकीच्या फेरीचे नेतृत्व केले. मस्कच्या मते, जे. बी. स्ट्रॉबेल यांच्यासह तिघेही आधीच्या एसी प्रोपल्शन टेझेरो इलेक्ट्रिक रोडस्टर प्रोटोटाइपद्वारे प्रेरित होते. मस्क यांनी कंपनीमध्ये सक्रिय भूमिका घेतली आणि सविस्तर स्तरावर रोडस्टर उत्पादनांच्या डिझाइनचे निरीक्षण केले, परंतु दर-दिवशीच्या व्यवसायात ते फारसे गुंतले नाहीत.

2008 मध्ये एलोन मस्क कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उत्पादन आर्किटेक्ट म्हणून नेतृत्व स्वीकारले. ही पदवी आजही आहे. 2019 पर्यंत, एलोन मस्क हे जगभरातील कोणत्याही मोटर वाहन उत्पादकाचे प्रदीर्घ काळ कार्यकारी सीईओ आहेत.


टेस्ला मोटर्सने 2008 मध्ये टेस्ला रोडस्टर नावाच्या इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कारची निर्मिती केली आणि सुमारे 2,500 वाहनांची विक्री 31 देशांमध्ये केली, जी लिथियम-आयन बॅटरी सेल्स वापरणारी पहिली अनुक्रमे ऑल-इलेक्ट्रिक कार होती. टेस्लाने जून 2012 मध्ये आपल्या चार-दरवाजाच्या मॉडेल एस सेडानची डिलिव्हरी करण्यास सुरवात केली.

टेस्लाने स्वत: च्या मोटारी व्यतिरिक्त इलेक्ट्रिक पॉवरट्रेन सिस्टीमची विक्री केली. डेमलरला (स्मार्ट ईव्हीसाठी, मर्सिडीज बी-क्लास इलेक्ट्रिक ड्राईव्ह आणि मर्सिडीज ए-क्लाससाठी) आणि टोयोटाला (आरएव्ही 4 एव्हीसाठी). टेस्कलामध्ये दीर्घकालीन गुंतवणूकदार म्हणून Elon Musk हे डेमलर आणि टोयोटा दोघांनाही आणू शकले.

29 जानेवारी, 2016 पर्यंत, Musk यांच्या जवळ 28.9 दशलक्ष टेस्ला शेअर्स होते, जे कंपनीच्या जवळपास 22% इतके होते. 31 डिसेंबर, 2019 पर्यंत, Musk हे 38,658,670 समभाग किंवा सर्व टेस्ला शेअर्सपैकी 20.8% मालकीचे आहेत.

SolarCity

SolarCity साठी एलोन यांनी आरंभिक संकल्पना आणि आर्थिक भांडवल पुरवले, त्यांचे चुलतभाऊ लिंडन आणि पीटर रिव्ह यांनी सन 2006 मध्ये एकत्र येऊन SolarCity ची स्थापना केली. 2013 पर्यंत, SolarCity ही अमेरिकेतील सौर उर्जा प्रणालीची दुसरी सर्वात मोठी कंपनी होती.

2012 मध्ये, मस्कने घोषित केले की सोलरसिटी आणि टेस्ला विद्युत ग्रिडवरील रूफटॉप सौरचा प्रभाव सुलभ करण्यासाठी इलेक्ट्रिक व्हेल बॅटरी वापरण्यास सहकार्य करेल, 2013 मध्ये हा कार्यक्रम थेट चालू झाला.

टेस्लाने 2016 मध्ये $2 अब्ज डॉलर्सहून अधिक किंमतीत SolarCity विकत घेतली आणि त्याच्या सौर विभागात बदल केले.

Neuralink

2016 मध्ये, Musk यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेसह मानवी मेंदूला सामायिक करण्यासाठी Neuralink या न्यूरो टेक्नॉलॉजी स्टार्ट-अप कंपनीची सह-स्थापना केली. मनुष्यबळ सॉफ्टवेअरमध्ये विलीन करण्यास आणि कृत्रिम बुद्धिमत्तेत प्रगती साधण्यासाठी मदत करण्याचा अंतिम हेतू असून ही कंपनी, मानवी मेंदूत रोपण केली जाऊ शकते अशी उपकरणे तयार करण्यावर केंद्रित आहे.

या संवर्धनांमुळे मेमरी सुधारू शकते किंवा संगणकीय डिव्हाइस बरोबर अधिक थेट इंटरफेसिंग करता येऊ शकेल. असे मस्क यांचे म्हणणे आहे.

The Boring Company

17 डिसेंबर, 2016 रोजी, ट्रॅफिकमध्ये अडकले असतांना रहदारीला कंटाळून मस्कने ट्विट केले ” मी बोगदा खोदणारी मशीन बनवणार.. आणि नुसतं खोदकाम करणार..” त्यानंतर त्यांनी ‘द बोरिंग कंपनी’ (TBC) ची स्थापना केली. 21 जानेवारी, 2017 रोजी, मस्कने ट्वीट केले, “बोगद्याच्या आघाडीवर उत्साहवर्धक प्रगती”. एक महिना किंवा आणखी काही दिवसांत खोदकाम सुरू करण्याची योजना.

फेब्रुवारी 2017 मध्ये, कंपनीने लॉस एंजेलिसमधील स्पेस एक्सच्या कार्यालयांच्या आवारात 30 फूट (9.1 मीटर) रुंद, 50 फूट (15 मीटर) लांब, आणि 15 फूट (4.6 मीटर) खोल “test trench” खोदण्यास सुरवात केली, बांधकामास परवानगी नव्हती. लास वेगास कन्व्हेन्शन सेंटरच्या खाली एक बोगदा 2020 च्या सुरुवातीस पूर्ण झाला. नंतर स्थानिक अधिकाऱ्यांनी बोगदा यंत्रणेच्या विस्तारीकरणाला मान्यता दिली.

Hyperloop

12 ऑगस्ट, 2013 रोजी, Elon Musk यांनी कमी-दाबाच्या ट्यूबचा समावेश करून हाय-स्पीड ट्रान्सपोर्ट सिस्टमच्या संकल्पनेचे अनावरण केले. ज्यामध्ये रेषात्मक प्रेरण मोटर्स आणि एअर कॉम्प्रेसरद्वारे चालविलेल्या एअर कुशनवर प्रेशरयुक्त कॅप्सूल चालवितात.

जून 2015 मध्ये, मस्कने SpaceX प्रायोजित हायपरलूप पॉड स्पर्धेत माईल-लांबीच्या ट्रॅकवर ऑपरेट करण्यासाठी Hyperloop pod तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांना आणि इतरांना डिझाइन स्पर्धा जाहीर केली. ट्रॅकचा वापर जानेवारी 2017 मध्ये झाला. आणि मस्कने बोगदा बनविणे देखील सुरू केले.

जुलै 2017 मध्ये, मस्कने दावा केला की न्यूयॉर्क शहर ते वॉशिंग्टन डीसी पर्यंत हायपरलूप तयार करण्यासाठी त्याला ” सरकारची शाब्दिक मंजुरी” मिळाली आहे.

OpenAI

डिसेंबर 2015 मध्ये, Elon Musk यांनी ना-नफा-ना-तोटा या सूत्रावर कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) संशोधन कंपनी OpenAI तयार करण्याची घोषणा केली. कृत्रिम सर्वसाधारण बुद्धिमत्ता अशा मार्गाने विकसित करणे जे मानवतेसाठी सुरक्षित आणि फायद्याचे आहे असा या कंपनीचा हेतू आहे.

भविष्यात AI सर्वांसाठी उपलब्ध करून देण्याचा मस्कचा मानस आहे. जेणेकरून स्वयंचलित वाहने मानवांच्या सेवेत रुजू होतील. मानवतेच्या फायद्यासाठी आणि विकासासाठी सुरक्षित कृत्रिम बुद्धिमत्तेची आपल्याला गरज आहे असे एलोन मस्क यांचे म्हणणे आहे.

तर.. कल्पनेच्या उत्तुंग भराऱ्या घेणाऱ्या आणि त्या कल्पनांना प्रत्येक्षात उतारवणाऱ्या खऱ्या-खुऱ्या आयरन-मॅन ला भविष्यासाठी खूप शुभेच्या.

लेख आवडल्यास सोशल मीडियावर नक्की शेअर करा.

because sharing is caring ❤️

marathi typing tool free download कसे करावे? Windows, Chrome आणि Android साठी. 5 सोप्या steps

0
marathi typing
google input marathi tool

marathi typing tool free download for Windows, Chrome, and Android

marathi typing करण्यासाठी online किंवा offline काय पर्याय आहेत? Windows वर आपण marathi typing करू शकतो का? Chrome वर marathi typing कशी करावी? आपल्या Android फोनवर marathi typing साठी कुठले app इन्स्टॉल करावे? आणि google input marathi tool काय आहे? आणि कसे डाउनलोड करावे याबद्दल आज आपण जाणून घेऊया.

मी आज तुम्हाला सांगणार आहे की, online/offline marathi typing करण्यासाठी google input marathi tool free download कसे करावे आणि ते आपल्या कॉम्पूटर किंवा लॅपटॉप वर कसे वापरावे. बोनस म्हणून मोबाईल आणि टॅबलेट वर मराठी भाषेत लिहिण्यासाठी काय पर्याय आहेत हे सुद्धा मी या लेखात मांडणार आहे.

तुमच्या कंप्युटर, लॅपटॉप, टॅबलेट आणि मोबाईल फोनवर हे सर्व tools फ्री कसे Download करावे या tools च्या download links आणि त्याचा कसा वापर करावा हे आपण जाणून घेऊया. शिवाय प्रत्येकाची Download लिंक सुद्धा देणार आहे. चला तर मग समजून घेऊयात की marathi typing करण्यासाठी google input marathi tool free download कसे करावे.

तर मित्रांनो देशातील ३६ राज्ये आणि ७२ देशांमध्ये मराठी भाषिकांची वस्ती आहे. आपण मराठी आहोत याचा आपल्या प्रत्येकाला अभिमान आहे. मराठी भाषा भारतातील प्राचीन भाषांपैकी एक असून महाराष्ट्री प्राकृतचे आधुनिक रूप आहे. मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकांच्या संख्येनुसार ही जगातील दहावी आणि भारतातील तिसरी सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे.

2011 च्या जनगणनेनुसार, भारत देशात मराठी भाषकांची एकूण लोकसंख्या सुमारे 9 कोटी आहे. मराठी महाराष्ट्र राज्याची अधिकृत तर गोवा राज्याची सहअधिकृत भाषा आहे.

आपण मराठी भाषी लोकांना आपसात online संवाद साधतांना सर्वात मोठी अडचण काय येत असेल तर ती म्हणजे marathi typing करणे, (देवनागरी) भाषेत टाईप करणे. इंग्रजी (रोमन लिपी) मध्ये मराठी शब्द टाईप करणे म्हणजे तारेवरची कसरत असते.

आपल्या प्रत्येक मराठी भाषकाला वाटतं कि आपण आपल्या मातृभाषेत म्हणजेच देवनागरी लिपीत टाईप करता यावं. हा आपल्या जिव्हाळ्याचा विषय आहे म्हणून आज आपण इंटरनेटवर मराठी भाषेत कसे टाइप करावे याबाबत सर्व काही स्टेप बाय स्टेप समजून घेऊया.

Google marathi Input Tool काय आहे?

तर मित्रांनो Google marathi Input Tool हे मराठी भाषेत (देवनागरी लिपी) लिहायला आपल्याला मदत करते. हे google marathi keyboard किंवा google marathi typing tool म्हणून देखील ओळखले जाते. याचा उपयोग करून जगभरातील ज्या लोकांना मराठी / देवनागरीमध्ये लिहायचे आहे ते phonetically टाइप करु शकतात.

Windows 10 साठी Google Input Tools सेवा आतातरी बंद आहे. तरी सुद्धा तुम्ही कोणत्याही वेब ब्राउझरमधून Google Input Tools वापरू शकता. तसेच, ते आता क्रोम ब्राउझर, क्रोम ओएस आणि Android OS साठी उपलब्ध आहेत. जर तुम्हीं Chrome browser, Chrome OS and Android OS वापरत असाल तर हे टूल ऑनलाइन किंवा ऑफलाईन सुद्धा वापरू शकता.

Windows users हे Microsoft Indic Language Input Tool सुद्धा वापरू शकतात. जे ILIT Microsoft भाषा वेबसाईटवर उपलब्ध आहे.

install the Microsoft Indic Language Input Tool.

तर असो आपण आपल्या मुख्य मुद्द्याकडे वळूया.

Google marathi typing software free download for Windows 7

Google marathi Input Tool हे भविष्यातील वापरासाठी व्यक्तिचलित दुरुस्त्या ठेवण्यासाठी नवीन किंवा असामान्य शब्द तसेच सानुकूल शब्दकोश वापरतो हे लक्षात ठेवा.

आपण Google marathi Input Tool बद्दल बोलत असलो तरीही, हे tool आपल्याला 80 पेक्षा जास्त भाषा टाइप करण्यास मुभा देते. आपण आपली आवडती भाषा / स्क्रिप्ट निवडू शकता आणि टाइप करू शकता. अर्थातच आपण मराठीत लिहिण्यासाठी मराठी भाषा select करणार आहोत.

google input marathi tool

marathi typing करण्यासाठी Google marathi Input Tool/Google marathi Keyboard वापरण्याचे 5 मार्ग

तुम्ही खालील पैकी कोणत्याही Windows, Mac, Chrome, Android किंवा इतर कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टमवर मराठीत लिहिण्यासाठी Google marathi Input Tool इन्स्टॉल करून वापरू शकता.

1. marathi typing करण्यासाठी Online Google Input Tools/Google Marathi Keyboard

आपण marathi typing करण्यासाठी Google marathi Input Tool ऑनलाइन वापरू इच्छित असल्यास आपल्याला खाली दिलेली लिंक बुकमार्क करणे आवश्यक आहे.

 

हे सुद्धा वाचा.. संगणक म्हणजे काय? संगणकाची संपूर्ण माहिती.

2. marathi typing करण्यासाठी Google Input Marathi Tools Chrome Extension

क्रोम ब्राउझर खूप ट्रेंडी आहे. Chrome वापरकर्ते खालील लिंक वर दिलेले Google marathi Input Tool वापरून Chrome Extension इन्स्टॉल करू शकतात. आणि marathi typing करू शकतात. Chrome वापरकर्त्यांनी download करण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करावे.

 

तुम्ही Chrome ब्राउझरमध्ये Google marathi Input Tool कसे इंस्टॉल करावे आणि वापरावे यावर आपण हा व्हिडिओ देखील पाहू शकता.

video courtesy google tools

Google Input Tool आपल्या Chrome Extension वापरकर्त्यांना “कीबोर्ड शॉर्टकट” सेटिंग पेजद्वारे पूर्वनिर्धारित कीबोर्ड शॉर्टकट वापरण्याची आणि त्यांचे स्वतःचे शॉर्टकट तयार करण्याची मुभा देते.

 

हेही वाचा.. 21 सकारात्मक विचार – जे बनवतील तुम्हाला आयुष्यात 100% यशस्वी

 

3. marathi typing करण्यासाठी Google Input Tools for Chrome OS

तुम्हाला कदाचित Chrome OS बद्दल माहित असेल किंवा नसेलही परंतु Chrome OS चे वापरकर्ते अस्तित्वात आहेत यात शंका नाही. Google Input Tool हे Chrome OS साठी उपलब्ध आहेत . तर Chrome OS वापरकर्त्यांनी Google marathi Input Tool Free Download कसे वापरायचे हे शिकण्यासाठी खालील लिंक वर जावे आणि Free Download करावे.

 

4. marathi typing करण्यासाठी Google Indic Keyboard for Android

अँड्रॉइड वापरकर्ते गुगल प्ले स्टोअर वरून गुगल इंडिक कीबोर्ड install करू शकतात. आपण या कीबोर्डचा वापर करून कोणतीही भारतीय भाषा टाइप करू शकता. आपल्याला marathi typing साठी मराठी भाषा निवडण्याची आवश्यकता आहे. खाली गुगल प्ले स्टोअर उपलब्द असलेल्या app ची link दिलेली आहे आपण क्लिक करून install करू शकता.

 

5. marathi typing करण्यासाठी Google Marathi Keyboard for Windows

Windows साठी Google marathi keyboard (ऑफलाइन इंस्टॉलर) बंद केला गेला आहे, परंतु तरीही मी आपल्याला third-party होस्टकडून google input marathi tool Free download लिंक प्रदान करीत आहे. हे तुमच्या विंडोज पीसीवर योग्य प्रकारे काम करू शकते का ? यासाठी, ज्यांना ऑफलाइन marathi typing करण्यासाठी Google marathi Input Tool हवे आहे, त्यांनी काली दिलेल्या लिंक वरून Google marathi Input Tool free download करू शकतात.

हेही वाचा.. ऑनलाईन आधार कार्ड डाउनलोड कसे करावे? जाणून घ्या 7 सोप्या Steps

 

Google input marathi tools download for free-

 • Download Google Input Tools here
 • Download Google Marathi Input Tool here

Enjoy Google input Marathi Typing tool! 😊

आज आपण काय शिकलो.

तर मित्रांनो आज आपण शिकलो की मराठी भाषेत marathi typing करण्यासाठी (देवनागरी लिपी) आपण ऑनलाईन सहजरित्या Google input marathi tools download करू शकतो Android साठी google play स्टोअर वरून app इन्स्टॉल करू शकतो, आणि त्याचा वापर आपण आपल्या कॉम्पुटर, लॅपटॉप, टॅब, आणि मोबाईलवर सुद्धा करू शकतो. तमाम मराठी जणांना आपल्या भावना मातृभाषेत व्यक्त करू शकतो.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असल्यास, महत्वपूर्ण वाटत असल्यास आपल्या कुटुंबियांना आणि मित्राना सोशल मीडियावर नक्की share करा.

because sharing is caring ❤️

Google Adsense म्हणजे काय? Sign up करण्यासाठी 10 Steps

0
Google adsense mhanje kay?
Google adsense mhanje kay?

Google adsense mhanje kay? आणि त्याचा कसा वापर करावा? (google adsense information in marathi, how to apply google adsense for marathi websites) जाणून घ्या.

Google adsense बद्दल तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे खासकरून तुम्ही जर blogger किंवा youtuber असाल तर तुम्हाला Google adsense बद्दल सर्व काही माहित असायला हवे.

Internet च्या जगातून online पैसे कमविण्यासाठी तुम्हाला Google adsense बद्दल माहिती असणे आवश्यक आहे. कारण online पैसे कमावण्यासाठी Google adsense चा जगात सर्वाधिक वापर केल्या जातो.

Google adsense म्हणजे काय आणि ते कसे काम करते हे आपल्याला माहिती नसल्यास, ही पोस्ट पूर्णपणे वाचल्यानंतर, Google adsense कसे काम करते याबद्दल तुम्हाला 100% खात्री होईल त्यासाठी लक्षपूर्वक वाचा.

Google Adsense

Google Adsense म्हणजे काय?

Google adsense mhanje kay? तुम्ही नवीन youtuber, blogger असल्यास किंवा इंटरनेट वरून ऑनलाइन पैसे कमवू इच्छित असल्यास तुम्हाला Google adsense बद्दल माहित असणे अनिवार्य आहे. अन्यथा, इंटरनेटवर काम करून पैसे मिळवणे तुमच्यासाठी खूप अवघड आहे. कारण इंटरनेटवरून हजारो, किंबहुना लाखो रुपये दर-महिना कमविण्याचा हा मार्ग आहे.

आपल्यास इथे हे जाणून घेणे देखील महत्वाचे आहे की Google केवळ इंग्रजी कन्टेन्ट वर “google adsense ads” दाखवीत असे, परंतु 2014 मध्ये, Google अ‍ॅडसेन्स कडून एक updates आले.

ज्यामध्ये हिंदी सहित इतर काही भारतीय भाषेमधल्या कन्टेन्ट वर जाहिरात दाखवण्याचे धोरण देखील लागू केले गेले. त्यानंतर हिंदी ब्लॉगर्सची संख्या वाढली आणि आज हिंदी ब्लॉगर्सच्या मागोमाग मराठी ब्लॉगर्स सुद्धा ब्लॉगिंगमधून हजारो रुपये कमवत आहेत.

मी इथे नमूद करू इच्छितो की blogger आणि Youtuber हे online money मिळविण्यासाठी adsense चा वापर करतात. कारण अधिक प्रमाणात पैसे मिळविण्याचा हा trustable आणि एक सर्वोत्तम प्लेटफॉर्म आहे.

तसे, इंटरनेटवर बरेच ऑनलाईन पैसे कमविण्याचे प्रोग्राम आहेत. परंतु Google adsense यापैकी सर्वात प्रसिद्ध आहे. पाहिलं कारण Google अधिक पैसे देते आणि दुसरं Google हा सर्वात विश्वसनीय प्लेटफॉर्म आहे, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा धोका नाही. तर आपण गूगल अ‍ॅडसेन्स प्रोग्राम मध्ये सामील होऊन सहज पैसे कमवू शकता.

हेही वाचा..

Google Adsense का खास आहे?

Google adsense एक advertisement program आहे. Google त्याच्या अ‍ॅडसेन्स जाहिराती त्याच वेबसाइटवर किंवा ब्लॉगवर display करते जिथे लोक ऑनलाइन भेट देतात. जेणेकरून Google त्याच्या जाहिरातदाराच्या उत्पादनांचे promotion करू शकेल.

यासाठी google आपल्या जाहिरातदारां कडून पैसे घेते. त्यातले 32% पैसे google स्वतःकडे ठेवते आणि उर्वरित 68% पैसे त्या publisher ला म्हणजेच वेबसाईट मालकांना देते ज्यावर Google adsense च्या जाहिराती दाखवल्या जातात.

उदा. एका जाहिरातदाराने त्याची जाहिरात दाखवण्यासाठी google कडे 100 रु. दिले तर google त्यातील 32 रु. स्वतः घेते आणि बाकी 68 रु. ब्लॉगर किंवा youtuber ला देते. त्यामुळे तिघांचेही उद्दीष्ट पूर्ण होते. जाहिरातदाराची जाहिरात होते, त्याच्या product विक्रीत वाढ होते, google आपली फी घेते, आणि ब्लॉगर किंवा youtuber ला त्याच्या पेजवर जाहिरात display केल्यामुळे त्याचा मोबदला म्हणून पैसे मिळतात.

Google adsense वरुन ऑनलाईन पैसे मिळवण्यासाठी आपल्याला प्रथम आपला ब्लॉग किंवा वेबसाईट अ‍ॅडसेन्सशी connect करावी लागते. पण आपण हे तेंव्हाच करावे जेंव्हा बऱ्यापैकी आपल्या blog वर traffic येत असेल. traffic तेंव्हाच येणार जेंव्हा आपण आपल्या blog वर नियमित दर्जेदार आर्टिकल लिहू.

तुमच्या blog वर कीवर्ड रिसर्च करून नियमित दर्जेदार पोस्ट लिहा. कमीत-कमी ४० पोस्ट लिहिण्याचा प्रयत्न करा. हळू-हळू users तुमच्या ब्लॉग वर येतील, बऱ्या पैकी ट्रॅफिक दिसायला लागल्यावर तुम्ही Google adsense साठी अप्लाय करू शकता. तुमच्या ब्लॉगवर जाहिराती display झाल्यानंतर त्याबदल्यात तुम्हाला पैसे मिळतील.

तुम्ही बऱ्याच website वर automatic text, image, video आणि interactive media advertisements ads बघितल्या असतील. तुम्ही तुमच्या ब्लॉगवर ads Type तुमच्या इच्छेनुसार select करू शकता. ज्यामुळे तुमच्या ब्लॉगवर येणाऱ्या users च्या जास्तीत-जास्त क्लीक्स मिळतील त्यामुळे तुमची जास्त earning होण्याची शक्यता असते.

हेही वाचा..

Google adsense कसे काम करते?

आपल्याला माहिती आहेच की आजच्या काळात digital marketing चे मूल्य किती वाढले आहे. आणि Google digital marketing हे advertisement Network वाल्यांचे सर्वात आवडते प्लॅटफॉर्म आहे. म्हणून बऱ्याच कंपन्या त्याची उत्पादने लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी व त्यांना promote करण्यासाठी Google ला पैसे देते. जेणेकरून Product ची ऑनलाइन जाहिरात होईल.

आता Google adsense त्या जाहिराती तुमच्या ब्लॉग वर दाखवते कारण तुमच्या ब्लॉग वर दर्जेदार कॉन्टेन्ट आहे अधिक ते वाचणारा तुमचा मोठा वाचक वर्ग आहे आणि तुम्ही तुमची वेबसाइट Google adsense बरोबर जोडली आहे. visitor जेव्हा त्या जाहिराती पाहतात आणि त्यांच्यावर क्लिक करतात तेव्हा त्यांना Google तुम्हाला त्याचे कमिशन देते. जे जाहिरातदाराने दिलेल्या संपूर्ण रकमेचे 64 टक्के आहे.

तर अशाच प्रकारे एक ब्लॉगर Google adsense वरून पैसे कमवू शकतो. आणि याचं प्रकारे YouTube च्या मध्यभागी येणार्‍या जाहिरातींद्वारे सुद्धा पैसे मिळविले जातात. ऑनलाइन पैसे मिळवण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे.

हेही वाचा..

Google adsense मधून किती पैसे कमवता येतात?

Google adsense
Google adsense

आता प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न येतो की गूगल अ‍ॅडसेन्समधून किती पैसे कमवता येतात आणि त्यासाठी काही मर्यादा आहे का. गूगल वरून पैसे मिळवण्याची कोणतीही मर्यादा नाही. तुम्ही किती पैसे कमवू शकता हे तुमच्यावर अवलंबून आहे.

कारण google आपल्याला तेंव्हाच पैसे देतं जेंव्हा आपल्या ब्लॉगवर येणार users ब्लॉग वर दाखवल्या गेलेल्या ads वर क्लीक करतो. हे तुमच्यावर अवलंबून आहे कि तुम्ही कुठल्या प्रकारचा कन्टेन्ट आपल्या ब्लॉग वर पोस्ट करता. जर तुम्ही असा कन्टेन्ट ब्लॉग वर पब्लिश करता जो तुमच्या users ला आवडतो किंवा त्यांच्यासाठी खूप मददगार ठरतो तर लोकं तुमच्या साईटवर येतील आणि Google adsense ads वर क्लीक्स वाढतील.

पण एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्ही जास्त कमाई करण्यासाठी आणि जाहिरातींवरच्या क्लीक्स वाढवण्यासाठी आपल्या मित्रांना किंवा नातेवाईकांना ads वर क्लीक्स करण्यास सांगाल तर google तुमचं adsense account कायमचं बंद करू शकतं.

तुमच्या वेबसाइट वर लोकांनी natural मार्गाने उत्स्फुर्तपणे क्लिक करायला हवे. एकाच व्यक्तीने google ads वर वारंवार कारण नसतांना क्लिक केल्याने तुम्हाला नुकसान होऊ शकतं. तुम्हाला पैसे द्यायला google नाकारू शकतं किंवा तुमचं अकाउंट कायम स्वरूपी बंद सुद्धा केला जाऊ शकतं. म्हणून माझं तुम्हाला सांगणं आहे की काजळीपूर्वक एकदा google policy वाचा.

हेही वाचा..

Google adsense चे पैसे आपल्या खात्यात कसे घ्यावे?

जेव्हा आपण गुगल अ‍ॅडसेन्स वरून पैसे कमविणे सुरू करता, तेव्हा आपल्या मनात एक प्रश्न येण्यास सुरवात होते की google adsense चे हे पैसे मी माझ्या बँक खात्यात कसे घेऊ? तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की जेंव्हा तुमच्या google adsense account वर 10 dollar ची तुम्ही कमाई करता तेंव्हा google तुमच्या पत्त्यावर एक पत्र पाठवते.

ज्यामध्ये आपल्याला एक PIN code दिला जातो. त्यामुळे google हे समजण्यास मदत होते की हे तुमचेच account आहे. आणि जेव्हा आपल्या खात्यात 100 डॉलर्स जमा होतात तेव्हा आपण ते आपल्या बँक खात्यात ट्रान्सफर करू शकतो. कारण गूगल 100 डॉलर्सपेक्षा कमी रक्कम ट्रान्सफर करू देत नाही.

हेही वाचा..

काही सामान्य प्रश्न

google adsense account उघडायला पैसे लागतात का?

नाही, यासाठी तुम्हाला कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत. एक google adsense account हे Facebook, twitter आणि इतर कोणत्याही प्लेटफॉर्मवर account तयार करण्यासारखेच आहे. आपल्याकडे फक्त ब्लॉग किंवा वेबसाइट असणे आवश्यक आहे.

google adsense account कोण उघडू शकतो?

कुणीही.. ज्या कुणाला त्यांच्या वेबसाइटद्वारे, ब्लॉगद्वारे किंवा यूट्यूबद्वारे इंटरनेटवरून पैसे कमवायचे आहेत. तो आपले खाते तयार करू शकतो. पण तत्पूर्वी तुम्हाला काही अटींचे पालन करणे गरजेचे आहे. जसे..

 1. तुमचे वय 18 वर्षे पूर्ण हवे.

2. तुमच्या ब्लॉगवर स्वतःची uniqueआणि interesting कन्टेन्ट असायला हवी.

3. तुमच्या ब्लॉगवर उच्च दर्जाचे कमीत-कमी 25-30 पोस्ट असायला हवे.

4. तुमच्या ब्लॉगवर कुठलाच लेख कॉपी केलेला नसावा.

5. google वरून images कॉपी करू नये. अधिकृत stock साईटवरून डाउनलोड कराव्या.

6. तुमच्या ब्लॉग वर privacy policy, contact us, copyright disclaimer हे पेज असावे.

7. तुमचा ब्लॉग कमीत-कमी 2-3 महिने जुना असावा.

8. तुमच्या ब्लॉग वर dissent traffic असायला हवा. दररोज कमीत-कमी 500 users मिळवण्याचा प्रयत्न करा.

9. तुमचा ब्लॉग google search console मध्ये indexed केला असावा.

10. तुमच्या वेबसाइटचे sitemap हे google search console मध्ये submit केले असावे.

हेही वाचा..

Google adsense account कसे तयार करावे?

सर्वप्रथम Google मध्ये “google adsense account” टाईप करून search करा आणि नंतर त्यात लॉग इन करा किंवा पुढील step follow करा.

 1. create a google adsense account इथे भेट द्या.

2. Sign up now वर क्लिक करा.

3. तुमच्या वेबसाइटची URL लिंक Enter करा.

4. तुमचा email address Enter करा.

5. काही महत्वाच्या settings पूर्ण करा ज्या तुम्ही नंतर बदलूही शकता.

6. Save and continue वर क्लिक करा.

7. तुमच्या Google Account वरून Sign in करा.

8. तुमचा देश किंवा प्रदेश Select करा.

9. AdSense Terms and Conditions वाचा आणि accept करा.

10. Create account वर क्लिक करा.

तुमचे google adsense account आता तयार आहे.

पुढे काय करावे?

आपल्या लक्षात येईल की आपल्या नवीन अ‍ॅडसेन्स खात्यातील काही पर्याय ग्रे झाले आहेत. कारण google आपले खाते पूर्णपणे सक्रिय करण्यापूर्वी आपल्याला काही कामे पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी खालील व्हिडिओ पहा.

video courtesy Google AdSenseआज आपण काय शिकला?

मित्रांनो, google adsense म्हणजे काय आणि ते कसे वापरावे हे आपणास समजले असेलच. तसे, आम्ही आपल्याला संपूर्ण तपशीलवार सांगितले आहे आणि तुम्हाला हे मदतगार ठरेल याची मला खात्री आहे, तर आपल्याला आमचा लेख आवडत असेल तर तो सोशल मिडियावर आपल्या मित्रांसह share करा आणि नंतर आपल्याला काही अडचण आल्यास कृपया कमेंटमध्ये सांगा. मला आपल्या प्रश्ननांची उत्तरे द्यायला नक्की आवडेल.

motivational quotes in marathi: 21 सकारात्मक विचार

0
सकारात्मक विचार मराठी
positive thoughts in marathi

motivational quotes in marathi: सकारात्मक विचार म्हणजे केवळ आनंदी असणे असे नव्हे. तर सकारात्मक विचारांचा अर्थ असा आहे की आयुष्यात काही real values निर्माण करणे आणि कौशल्ये (skills) तयार करणे जे आपल्या आयुष्यात क्षणिक आनंदापेक्षा जास्त काळ टिकतील.

केवळ सकारात्मक विचारसरणी ठेवून तुम्हाला याचा परिणाम तुमच्या कार्यावर, तुमच्या आरोग्यावर आणि अगदी तुमच्या वयक्तीक जीवनावरही दिसू लागेल आणि तुम्हाला आयुष्य पूर्वीपेक्षा अधिक आनंदी वाटू लागेल.

सकारात्मक विचारांची शक्ती घनघोर अंधाराला सुद्धा एका आशेच्या किरणाने प्रकाशात बदलू शकते. आपल्या विचारांवर आपले स्वतःचे नियंत्रण असते, म्हणून तुम्हालाचं ठरवायचे आहे की, तुम्हाला सकारात्मक विचार करायचा आहे की नकारात्मक?

motivational quotes in marathi: आपण सर्वांनी 3 इडियट्स हा चित्रपट पाहिला आहे, ज्यात आमिर खानचा एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय डायलॉगआहे- All is Well. आणि आमिर खान या चित्रपटात पुन्हा पुन्हा हा डायलॉग का म्हणतो हे देखील आपल्याला माहित आहे.

तुमच्या डोक्यात सुरु असलेल्या नकारात्मक विचारांना घाबरू नका त्यांना थारा देऊ नका, आयुष्यात कुठलंही काम करतांना negative thoughts मुळे मागे राहू नका. पुढे जात रहा. होय! नकारात्मक विचारांना तुम्ही हरवू शकता ते फक्त सकारात्मक विचार करून.

म्हणून तुमच्या विचार शक्तीला सकारात्मक बनवण्यासाठी खाली काही सकारात्मक विचार (motivational quotes in marathi) दिले गेले आहेत, जे तुम्ही तुमच्या जीवनात अमलात आणू शकता. तुमच्या मनात सुरु असलेल्या नकारात्मक विचारांना थांबवू शकता व तुमच्या आयुष्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता. त्यामुळे प्रत्येक ओळ काळजीपूर्वक वाचा आणि त्याचा अर्थ काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा.

सकारात्मक विचार मराठीत (motivational quotes in marathi)

निर्धार

motivational quotes in marathi
Determination

गर्दी नेहमीच त्याच वाटेवर चालते जी सहज आणि सोपी दिसते. याचा अर्थ असा नाही की गर्दी नेहमीच योग्य मार्गावर चालते. तुमचा मार्ग तुम्ही स्वत: निवडा कारण तुम्हाला तुमच्यापेक्ष्या कुणीच चांगले ओळखु शकत नाही.

जीवन

तुमचा जन्म झाला तेंव्हा तुम्ही रडत होता आणि इतर हसत होते. जीवन असे जागा की, शेवटच्या दिवशी तुम्ही हसत असाल आणि तुमच्यासाठी जग रडतं असेल.

अडचणी

जोपर्यंत तुम्ही इतरांना तुमच्या समस्या आणि अडचणींचे कारण समजत आहात, तोपर्यंत तुम्ही तुमच्या समस्या आणि अडचणी सोडवू शकत नाही. जबाबदारी घ्यायला शिका. (motivational quotes in marathi)

हार मानू नका

अर्ध्या वाटेवरून परत मागे फिरण्यात काही अर्थ नाही, कारण परत येताना तुम्हाला ध्येय गाठायला बाकी असेल तितकेच अंतर पार करावे लागेल. थांबू नका. नेहमी पुढे जा.

अशक्य

या जगात काहीही अशक्य नाही. आपण ते सगळं करू शकतो, ज्या बद्दल आपण विचार करू शकतो. आणि आपल्या डोक्यात असेही विचार येऊ शकतात ज्याचा विचार या जगात कुणी केलाही नसेल. नाविन्यपूर्ण (innovative) विचार करायला शिका.

जय-पराजय

यश आपली ओळख जगाशी करून देतं, आणि आपलं अपयश आपल्याला या जगाची ओळख करून देतं. यशाने हुरळून जाऊ नका आणि अपयश आल्यास खचून जाऊ नका.

आत्मविश्वास (life quotes in marathi)

motivational quotes in marathi
rajgad

कुठल्याही पायाभूत सुविधा नसतांना आकाशात किल्ले बांधलेत इथल्या मावळ्यांनी! कश्याच्या जोरावर? आत्मविश्वास!

महानता (life quotes in marathi)

motivational quotes in marathi
Mahatma Gandhi in South Africa

इतिहास साक्षी आहे, दुसऱ्याला खाली पाडून कुणी महान होत नाही तर खाली पडून परत उभा राहणारा महान बनतो. उठा आणि पुन्हा तयारीला लागा. (motivational quotes in marathi)

चुका (life quotes in marathi)

तुमच्या कडून झालेल्या चुका वेळेवर न स्वीकारल्यास तुम्ही आणखी एक मोठी चूक करत आहात. जेव्हा आपण आपल्या चुका स्वीकारतो तेव्हाच आपण आपल्या चुकांपासून शिकू शकतो. तुमच्या कडून झालेली चूक कबूल करायला लाजू नका.

दृष्टीकोन

पावसाळ्यात सर्व पक्षी आसरा शोधतात पण गरुड पक्षी ढगांच्या वर चढून पाऊस टाळतो. समस्या प्रत्येकाला आहेत, परंतु त्यांचा सामना करण्यासाठी आपल्याकडे आपला दृष्टीकोन हवा. आपल्या कौशल्याने समस्येवर मात करा.

काळजी

तुमच्या नियंत्रणाखाली नसलेल्या गोष्टी आणि परिस्थितीमुळे तुम्ही जर काळजी करत असाल तर याचे दोन परिणाम होतील. तुमच्या वेळेचा अपव्यय होईल आणि भविष्याबद्दल तुम्हाला पश्चात्ताप वाटेल. ज्या गोष्टी तुमच्या हातातचं नाहीत त्याबद्दल काळजी करणे सोडा.

शक्ति

विश्वातल्या सर्व शक्ती आधीपासूनच आपल्या मालकीच्या आहेत. आपणच डोळ्यांवर हात ठेवतो आणि मग काळोख होतो म्हणून रडतो. उघळ्या डोळ्यांनी कल्पनेच्या उंच भराऱ्या घ्या.

पदवी

पदवीधर असणे हे फ़ायदेशीरच आहे. जर आपण इंजिनियर किंवा डॉक्टर असाल तर आपण तेच काम करू शकता. पण तुमच्याकडे जरी पदवी नसेल तरी निराश होऊ नका तुम्ही काहीही करू शकता. शिक्षणाचा आणि बुद्धिमत्तेचा काहीही संबंध नाही. या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत.

कठोर परिश्रम

जर आपण ठरवले तर आपण आपल्या आत्मविश्वासाच्या आणि कठोर परिश्रमाच्या बळावर स्वतःचे नशीब लिहू शकतो आणि आपले नशीब कसे लिहावे हे आपल्याला ठाऊक नसल्यास मग परिस्थिती आपले भाग्यठरवते. कठोर परिश्रमाच्या बळावर स्वतःचे शिल्पकार बना. स्वयंप्रकाशित व्हा.

स्वप्ने

स्वप्ने ती नाहीत जी आपण झोपेत असतांना बघतो. स्वप्ने अशी बघायला हवीत जी आपल्याला झोपू देणार नाहीत. उघळ्या डोळ्यांनी स्वप्ने बघा आणि ती पूर्ण करण्यासाठी झपाटल्यासारखे प्रयत्न करा. तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. (motivational quotes in marathi)

वेळ

तुम्ही असे म्हणू शकत नाही की माझ्याकडे पुरेसा वेळ नाही कारण आपल्याकडे तितकाच वेळ असतो (24 तास) जेवढा महान आणि यशस्वी लोकांना मिळतो. वेळेचं योग्य नियोजन करा, दिवसाची सुरुवात लवकर करा. मुहूर्त पाहण्यात वेळ घालवू नका, महत्वाचं काम असेल तर आजच करा. (motivational quotes in marathi)

विश्वास

विश्वास दगडाला देव बनवतं आणि अविश्वास सजीव माणसाला सुद्धा निर्जीव बनवतो. प्रामाणिकपणे वागा. नेहमी इतरांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करा. लोक तुमच्यावर जीव ओवाळून टाकतील. (motivational quotes in marathi)

यश

लांबून आपल्याला यशाची सर्व दारं बंदच वाटतात कारण यशाचे मार्ग आपल्यासाठी तेंव्हाच उघडतात जेंव्हा आपण अगदी त्याच्या जवळ पोहचतो. म्हणून थांबू नका, कामात खंड पडू देऊ नका, तुमचं यशस्वी होणे निश्चित आहे.

सातत्य

motivational quotes in marathi
consistent

छोट्या स्टेप्स आपल्याला जलद वर पोहचवतात. कामात सातत्य ठेऊन छोटी-छोटी पाऊलं उचला, छोटी सुरुवात करा पण काम मोठं करा.

आत्मघात

आत्महत्येचा विचार भेकडं लोक करतात. तुमची स्वप्ने जिवंत ठेवा जर तुमच्या स्वप्नांची ठिणगी विझली असेल तर तसेही तुम्ही मृत आहात. वयक्तिक आयुष्यात आलेलं प्रत्येक आवाहन स्वीकार करा मजबूत लढा द्या.

आनंद

ही पूर्वनिर्मित वस्तू नाही … ती आपल्या स्वतःच्या कृतीतून येते. यासाठी लोकांना प्रेम वाटा, प्राणिमात्रांवर दया दाखवा ते तुम्हाला १० पटीने प्रेम परत करतील त्यातून तुम्हाला आनंद मिळेल.

वेगळा मार्ग

आणि शेवटी ही कविता…

The Road Not Taken ? (motivational quotes in marathi)

(एक न निवडलेली वाट)

पिवळ्या जंगलात दोन वाटा स्वतंत्रपणे जात होत्या,

आणि हॅलो, मला त्यापैकी एकचं वाट निवडायची होती.

एक प्रवासी म्हणून मी तिथे बराच वेळ उभा राहिलो 

मग मी जितक्या दूर पाहू शकत होतो एका वाटेकडे, मी पाहिलं 

वृक्षांची दाटी दिसें पर्येंत पाहत राहिलो

मग मी दुसरी वाट धरली तीही तेवढीच चांगली होती,

कदाचित त्याहून अधिक चांगली 

कारण येथे गवत जास्त, कदाचित या वाटेवरून प्रवासी कमी जायचे

आणि त्या सकाळी दोन्ही रस्ते एकसारख्या पानांनी झाकले गेले होते.

त्यावर कुणाच्याही चालण्याचे निशान नव्हते.

मग मी पहिली वाट, नंतर कधीतरी येईल म्हणून सोडून दिली 

हे माहित असतांना ही की एक मार्ग कसा पुढच्या मार्गावर नेऊन सोडतो 

मी तिथे परत कधी येईल का याची मला खात्री नव्हती.

आजपासून अनेक युगांनंतर

दीर्घ श्वास घेत मी म्हणणार 

एका जंगलात दोन वाटा स्वतंत्रपणे जात होत्या आणि मी 

ती वाट निवडली ज्यावरून मोजकेचं वाटकरी प्रवास करतात 

आणि त्यामुळेच हा सारा बदल घडू शकला.

                 
                 -Robert Lee Frost
आशा करतो तुम्हाला हा लेख 21 सकारात्मक विचार (motivational quotes in marathi) आवडला असेल आणि तुम्ही हे motivational quotes in marathi तुमच्या जीवनात अमलात आणा. आनंदी जीवन जागा आपल्या मित्रांना आणि कुटुंबातील सदस्यांना हा लेख share करायला विसरू नका.

ASAP, LOL, TOS, BTW, FLY आणि 50+ संक्षेपांचे Full-Form माहित आहेत का?

0
asap meaning in marathi
asap cha arth marathi

asap meaning in marathi, asap full form in marathi त्याच बरोबर LOL, TOS, BTW, FLY ROFL, WTF यांचे full form मराठी भाषेत काय आहेत?

सोशल नेटवर्किंग साईट्स वर असे शब्द जगभरात सर्रास वापरले जात आहेत. पण का? गरज काय? असा प्रश्न तुम्हाला कधीतरी पडला असेलच? तर चला समजून घेऊया!

वेगवान चालणार्‍या व्यापक तंत्रज्ञानाच्या या आभासी जगात वर्तमान काळात आम्हाला खरा मित्र आणि नातेवाईकांशी बोलण्याची किंवा त्यांच्याबरोबर वेळ घालवण्याची फुरसत नसते. याला कारण आहे, आपणच बनवलेली आपली आजची ही अतिव्यस्त जीवनशैली.

LOL

तरीही कुणाबरोबर संवाद साधायची वेळ आलीच किंवा चॅट करण्याची वेळ आली तर त्यातही आपण पूर्ण वाक्य लिहिण्याच्या समस्येवर तोडगा काढला आहे. खासकरून तरुणांनी त्यांची शैली म्हणून ASAP, LOL, TOS, BTW, FLY असे संक्षेप वापरतात.

याला आपण संकेताक्षरे (abbreviation)असे म्हणू शकतो. प्रत्येक तरुण पिढी स्वतःचे शब्दकोष आणि त्यांचे अर्थ, शब्दलेखन आणि वापरायचे स्वतःचे मार्ग, त्यांच्या स्वत: च्या मर्जीने मस्त आणि स्टाइलिश बनण्यासाठी असे short-forms बनवत असतात आणि त्याचा वापर करत असतात.

ASAP चा फुल-फॉर्म काय आहे?

उदाहरणार्थ:
टेलिफोनिक संभाषणात, ग्राहक आपल्या पुरवठादारास विनंती करतो की शक्य तितक्या लवकर 100 पॅकेट्स पाठवा.
पुरवठादार: GM Sir! मी तुम्हाला कशी मदत करू शकते?
ग्राहकः PLZ मला शक्य तितक्या लवकर माझ्या दुकानात 100 पाकिटे वितरित करा.
पुरवठादार: नक्की सर. ASAP! (As Soon As Possible)= शक्य तितक्या लवकर

ASAP शब्दाचे काही प्रयोग

 • I will complete the assignment ASAP.
 • I want 200 packets delivered to my office, ASAP.
 • I need a response ASAP.

अजय देवगणचा सिंघम हा आपल्यापैकी प्रत्येकानेच पहिला असेल आणि त्यातला हा सीन जेंव्हा जयकांत शिक्रे पहिल्यांदा अजय देवगनच्या गावी पोलीस स्टेशन मध्ये येतो. आणि मग तो प्रसिद्ध डायलॉग (अभी के अभी) होय यालाच social networking साईट्स वर ASAP! म्हटल्या जाते. लवकरात लवकर=आताच्या आताचं.

https://www.youtube.com/watch?v=DZxiUebXbZQ

जे लोक सोशल नेटवर्किंग साइट्सवर चॅट करण्याच्या विश्वात नवीन आहेत, त्यांच्यासाठी हा संक्षिप्त अर्थ समजण्यापलीकडे आहे कारण ASAP, LOL, TOS, BTW, FLY हे short-forms त्यांच्या दैनंदिन जीवनात संभाषण आणि संवादांमध्ये वापरले जात नाहीत. मग त्यांचा गोंधळ होणे साहजिक आहे.

म्हणूनच आज आपल्यातील प्रत्येकाने ही संकेताक्षरे शिकून घेणे त्यांचे अर्थ समजून घेणे गरजेचे आहे. जग पुढे जात असतांना आपण मागे पडायला नको. त्यासाठीच मी आज तुम्हाला ASAP, LOL, TOS, BTW, FLY आणि 50+ संकेताक्षरांचे Full-Form तुम्हाला सांगणार आहे.

अचूक short-forms वारंवार वापरल्याने आपल्या गप्पांमध्ये रंगत येऊ शकते. संकेताक्षरे च्या वाढत्या मागणीचे आणखी एक कारण असे आहे की यामुळे आपल्यास दीर्घ वाक्य टाइप करण्याचा बराच वेळ वाचतो आणि आपल्याला fast टाइप करण्यास मदत होते.

ASAP, LOL, TOS, BTW, FLY आणि 50+ संकेताक्षरांची उत्पत्ती

भाषाशास्त्र तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, एका विद्यापीठाच्या प्राध्यापकाने आपल्या विध्यार्थ्यांना शिकवत असतांना ASAP, LOL, TOS, BTW, FLY आणि 50+ संकेताक्षरे तयार केली. जेणेकरून त्यामुळे स्वतःचा आणि त्यांच्या विद्यार्थ्यांचा वेळ वाचावा.

WeAreSocial.com.au चे मॅनेजिंग डायरेक्टर ज्युलियन वॉर्ड म्हणतात की, ILY (I Love You) पासून ते अधिक WTF ( What The F***) पर्यंतचे वेगवेगळे short-forms आता जगभर सामान्य आहेत.

social listening aids चा वापर करून, WeAreSocial.com.au यांनी 1 एप्रिल ते 30 जून 2019 दरम्यान ट्विटरवर ऑस्ट्रेलियन लोकांनी वापरलेल्या ट्रेंडिंग शब्दांचे परीक्षण केले.

त्यात पहिल्या क्रमांकावर संकेताक्षर आस्ट्रेलिअन लोकांनी सोशल मीडियावर वापरलं ते होतं ते LOL. याचा वापर दोन महिन्यात तब्बल 1,242,935 वेळा केला गेला. सोशल मीडियावर आपला वेळ वाचवण्यासाठी युसर्स अश्या अनेक युक्त्या लढवीत असतात.

LOL, OMG and ILY: 60 of the dominating abbreviations

WTF, BTW, ROFL आणि IMO

 1. LOL: Laugh out loud
 2. OMG: Oh my god
 3. ILY: I love you
 4. LMAO: Laughing my a** off
 5. WTF: What the f***?
 6. PPL: People
 7. IDK: I don’t know?
 8. TBH: To be honest
 9. BTW: By the way
 10. THX: Thanks
 11. SMH: Shaking my head
 12. FFS: For f***’s sake
 13. AMA: Ask me anything
 14. FML: F*** my life
 15. TBT: Throwback Thursday
 16. JK: Just kidding
 17. IMO: In my opinion
 18. YOLO: You only live once
 19. ROFL: Rolling on the floor laughing
 20. MCM: Mancrush Monday

STFU, BFF, TXT आणि GTFO

 1. IKR: I know right?
 2. FYI: For your information
 3. BRB: Be right back
 4. GG: Good game
 5. IDC: I don’t care
 6. TGIF: Thank God it’s Friday
 7. NSFW: Not safe for work
 8. ICYMI: In case you missed it
 9. STFU: Shut the f*** up
 10. WCW: Womancrush Wednesday
 11. IRL: In real life
 12. BFF: Best friends forever
 13. OOTD: Outfit of the day
 14. FTW: For the win
 15. Txt: Text
 16. HMU: Hit me up
 17. HBD: Happy birthday
 18. TMI: Too much information
 19. NM: Not much
 20. GTFO: Get the f*** out

FBF, OMW, LMK आणि TTYN

 1. NVM: Nevermind
 2. DGAF: Don’t give a f***
 3. FBF: Flashback Friday
 4. DTF: Down to f***
 5. FOMO: Fear of missing out
 6. SMFH: Shaking my f***ing head
 7. OMW: On my way
 8. POTD: Photo of the day
 9. LMS: Like my status
 10. GTG: Got to go
 11. ROFLMAO: Rolling on floor laughing my a*** off
 12. TTYL: Talk to you later
 13. AFAIK: As far as I know
 14. LMK: Let me know
 15. PTFO: Passed the f*** out
 16. SFW: Safe for work
 17. HMB: Hit me back
 18. TTYS: Talk to you soon
 19. FBO: Facebook Official
 20. TTYN: Talk to you never

(*Provided by wearesocial.com.au) यांचे आभार!

ASAP, LOL, TOS, BTW, FLY आणि 50+ संक्षेपांचे Full-Form आज आपण शिकलो आहोत. मग आता त्याचा पुरेपूर फायदा घ्या तुमचा मित्र जर यातील काही संकेताक्षरे टाईप करून जास्तचं शायनींग मारत असेल तर वरचे 50+ संकेताक्षर पाठ करून त्याच्या तोंडावर मारा! 😅

तुम्ही आणखी कोणती नवीन संकेताक्षरे आपल्या दैनंदिन जीवनात वापरता मला खाली कमेंट-बॉक्स मध्ये share करा.

ज्यांना-कुणाला ब्लॉगिंग विषयी उत्सुकता असेल, ब्लॉग बनवायचा असेल, ब्लॉगिंग करून खूप पैसे कमवायचे असतील त्यांना माझ्या या ब्लॉगचा पत्ता द्या. हा लेख जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांना नक्की share करा.

because sharing is caring ❤️

आधार कार्ड डाउनलोड कसे करावे? जाणून घ्या 7 सोप्या Steps

1
आधार कार्ड कसे डाउनलोड करावे?
आधार कार्ड कसे डाउनलोड करावे?

(how to download aadhar card in marathi, online aadhar card kase download karave marathi madhe mahiti)

होय तुम्ही तुमचे आधार कार्ड डाउनलोड करू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये किंवा कॉम्पुटर  मध्ये काही स्टेप्सच्या आधारे ऑनलाईन सहज डाउनलोड करू शकता आणि गरज असेल तेंव्हा त्याची प्रिंट देखील काढू शकता. आज आपण या लेखात समजून घेऊया की आधार कार्ड कसे डाउनलोड करावे? आणि त्यासाठी कुठल्या गोष्टी आपल्याकडे असणे आवश्यक आहे.

आधार कार्ड हा भारतीय लोकांसाठी सर्वात महत्त्वाच्या दस्तऐवजांपैकी एक आहे. आधार ही आपली ओळख आहे आणि आपण भारत देशाचे नागरिक आहोत याचे हे प्रमाण आहे. आपल्या दैनंदिन जीवनात याचा उपयोग आपण आपले आयडेंटिटी प्रूफ म्हणून करतो.

जवळपास सर्व सरकारी कार्यालयात, बँकेत आणि इतरही आपले आधार कार्ड आपण ओळखपत्र म्हणून वापरतो आणि ते ग्राह्य सुद्धा धरले जाते. त्यामुळे आपल्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.

आपल्यापैकी बहुतेक प्रत्येक व्यक्तीकडे Aadhar card असतेच पण काही कारणास्तव जर आपले आधार हरवले असेल , गहाळ झाले असेल किंवा डॅमेग झाले असेल तर आपल्याला ते पुन्हा ऑनलाईन आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करता येते आणि त्याची प्रिंट सुद्धा काढता येते. चला मग जाणून घेऊया की आधार कार्ड कसे डाउनलोड करावे?

आधार कार्डची सुरुवात

केंद्र सरकारच्या नियोजन मंडळांतर्गत जानेवारी 2009 मध्ये Unique Identification Authority of India या प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली. 29 सप्टेंबर 2010 ला आधार योजनेअंतर्गत पहिल्या क्रमांकाचे वितरण महाराष्ट्रातल्या नंदुरबार जिल्ह्यातल्या टेंभली गावातल्या रंजना सोनवणे या महिलेला करण्यात आले. व ते देशातील पहिले आधार कार्ड मिळवणारे गाव ठरले .

तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग, United Progressive Democratic Alliance च्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि UIDAI चे तत्कालीन चेअरमन नंदन निलेकणी यांच्या उपस्थितीत आधार कार्डचे विमोचन करण्यात आले.

आधार क्रमांक नोंदणी व या क्रमाकांचा विविध योजना तसेच खात्यामध्ये वापर करण्यासाठी प्राधिकरणाने 35 राज्ये-केंद्रशासित प्रदेश तसेच मानव संसाधन विकास मंत्रालय ,सार्वजनिक बॅंका . एल.आय.सी, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ या सर्व मुख्य संस्थाबरोबर करार केले आहेत. विविध बॅंका ,खाते व मंत्रालयानी टप्याटप्याने त्यांच्या योजना किंवा कार्यक्रमांसाठी ओळखपत्र म्हणून व पत्याचा दाखला म्हणून आधार कार्ड वापरण्यास परवानगी दिली आहे.

15 फेबुवारी 2016 पर्यंत सुमारे 97.69 कोटी आधार क्रमांक किंवा कार्ड वितरीत करण्यात आले आहेत म्हणजे साधारणत: 75.8% लोकापर्यंत ही योजना पोहचली आहे. भारतीय आर्थिक पाहणी अहवाल 2015-16 नुसार 6 थेट लाभ हस्तातंर योजनांमध्ये आधार योजनेने महत्त्वाची भूमिका बजावली आहे

एलपीजी सबसिडी वितरणात 54.96% , मनानरेगा योजनेत 54.10%, जन धन योजनेत 42.45%, सार्वजनिक वितरण व्यवस्थेत 38.96%, राष्ट्रीय सामाजिक साहाय्यता योजनेत 24.31%व कामगार भविष्यनिर्वाह निधी योजनेत 17.55% माहिती आधार क्रमांकाशी जोडली गेली आहे.जनधन -आधार -मोबाइल या त्रिसूत्रीमधला आधार हा सर्वात मोठा आधारस्तंभ आहे.

आधार कार्डचे महत्व

ही जगातली सर्वात मोठी biometric identification योजना आहे. भारतीय रहिवाशांसाठी असलेल्या या योजनेचे नियंत्रण केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या आधिपत्त्याखालील Unique Identification Authority of India (UIDAI) या प्राधिकरणामार्फत केले जाते. आधार कायदा 2016 अनुसार या योजनेला वैधानिक पाठबळ प्राप्त आहे.

सामाजिक सुरक्षितताविषयक आणि सरकारी मदतीच्या योजनांच्या लाभार्थ्यांची ओळख पटविण्यासाठी त्याचप्रमाणे सरकारशी संबंधित सर्व व्यवहारांमध्ये व्यक्तींची ओळख पटविण्यासाठी हा क्रमांक वापरण्यात येत आहे. केंद्र सरकारतर्फे अनेकविध सेवा जसे की बॅंकांतील खाती, मोबाईल सीमाकार्डे, कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी योजना, सार्वजनिक वितरणव्यवस्था इत्यांदीच्या खात्यांशी आधार संलग्न करण्यास आग्रह धरण्यात येत आहे.

या योजनेअंतर्गत भारतातील 1 अब्ज 20 कोटींवर लोकांचे आधार क्रमांक तयार करण्यात आले आहेत. आधारअंतर्गत भारतातील व्यक्तींना त्यांनी पुरविलेल्या बायोमेट्रिक आणि अन्य तपशीलाच्या अद्वितीयतेच्या आधारावर एक 12 अंकी क्रमांक दिला जातो.

आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी आवश्यक गोष्टी

आधार कार्ड डाउनलोड
Image Source UIDAI

आपल्याला आधार कार्ड आपल्या मोबाईल किंवा कॉम्पुटरमध्ये डाउनलोड करण्यासाठी काही गोष्टी आवश्यक आहे त्या पुढील प्रमाणे.

 • आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुमचा मोबाईल क्रमांक आधारशी लिंक असायला हवा.
 • तुम्हाला तुमचा आधार क्रमांक माहित असावा.

या दोन गोष्टीची जर तुम्ही पूर्तता केली तर सहजपणे तुम्ही तुमचे आधार कार्ड डाउनलोड करू शकता. कसे ते आपण Step-by-Step जाणून घेऊया.

आधार क्रमांकाचा वापर करून आधार कार्ड कसे डाउनलोड करावे

आधार कार्ड डाउनलोड करण्याचे बरेचसे मार्ग आहेत त्याबद्दल आपण एक-एक सविस्तररित्या जाणून घेऊ. जेणेकरून तुम्ही सहजपणे आधार कार्ड डाउनलोड करू शकाल.

 1. सर्वप्रथम तुम्ही Unique Identification Authority of India (UIDAI) च्या अधिकृत वेबसाइट वर जा.

2. UIDAI वेबसाइटच्या Home पेज वर My Aadhaar वर क्लिक करा.

3. My Aadhaar वर क्लिक केल्यास तुम्हाला Download Aadhaar चा ऑप्शन दिसेल तिथे क्लिक करा.

4. एक नवीन पेज open होईल, तिथे I have सेक्शन मध्ये Aadhaar Number वर क्लिक करा.

5. खाली तुमचा 12 अंकी आधार क्रमांक एंटर करा.

6. खाली Masked Aadhaar साठी चेक-बॉक्स दिला आहे, जर तुम्हाला तुमचा आधार Hide करायचा असेल तर त्यावर क्लिक करा अन्यथा आवश्यकता नाही.

7. खाली तुम्हाला Captcha चित्र दिसेल त्याला fill करा.

8. खाली Send OTP बटनावर क्लिक करा.

9. तुमच्या मोबाईल वर OTP आला असेल, तो टाका.

10. तुम्हाला एक आधार कार्डचा सर्वे दिसेल, त्यात कुठलंही उत्तर Select करा.

11. आता Verify & Download वर क्लिक करा, तुमचे आधार कार्ड डाउनलोड व्हायला सुरुवात झाली.

Enrollment ID द्वारे आधार कार्ड कसे डाउनलोड करावे

आधार कार्ड बनवण्यासाठी किंवा नावात बदल, जन्मतारीख बदल, मोबाईल क्रमांक बदल करण्यासाठी जेंव्हा आपण अर्ज करतो तेंव्हा आपल्याला आधार केंद्राकडून एक पावती मिळते. ज्यावर 14 डिजिटचा एक Enrollment ID मिळतो.

जर तुम्ही तुमचा आधार क्रमांक विसरला असाल तर या Enrollment ID मार्फत तुम्ही तुमचे आधार कार्ड डाउनलोड करू शकता. कसे? चला जाणून घेऊया!

 1. UIDAI वेबसाईट वर जा.

2. Download Aadhaar च्या ऑप्शन वर क्लिक करा.

3. एक नवीन पेज Open होईल, तिथे I have Enrollment ID च्या ऑप्शन वर क्लिक करा.

4. खाली दिलेल्या कॉलम मध्ये तुमचा 14 अंकी Enrollment ID टाका.

5. त्याच्या खाली तुम्हाला Date & Time एंटर करण्याचा ऑप्शन असेल, तिथे पावतीवर नोंद असलेली तारीख आणि वेळ अचूक भरा.

6. खाली एक चित्र दिसेल, त्यातला Captcha Code अचूक भरा आणि Send OTP वर क्लिक करा.

7. तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक OTP आला असेल तो टाईप करा.

8. Download Aadhaar च्या पर्यायावर क्लिक करा.

9. काही सेकंदात तुमचे आधार कार्ड डाउनलोड झालेले असेल.

आधार कार्ड डाउनलोड केल्यानंतर पासवर्ड काय टाकावा

आता तुम्ही तुमचे आधार कार्ड डाउनलोड केले आहे पण तुम्ही ती फाईल उखडण्याचा प्रयत्न केल्यास तुम्हाला Screen वर पासवर्ड Enter करावा लागेल.

हा पासवर्ड तुमच्या Date Of Birth (जन्मतारीख) पासूनच बनलेला असतो. ज्यात तुमच्या नावाचे पहिले इंग्रजी 4 कॅरेक्टर कॅपिटल असतात. समजा तुमचे नाव Sachin आहे आणि तुमचा जन्म 1990 साली झाला आहे तर तुमचा पासवर्ड असणार SACH1990.

नाव किंवा जन्म-तारखे नुसार आधार कार्ड कसे डाउनलोड करावे

समजा जर तुमचा आधार क्रमांक तुम्ही विसरला आणि तुमची Enrollment ID असणारी पावती सुद्धा हरवली तर तुम्ही तुमच्या जन्म-तारखे नुसार आधार कार्ड डाउनलोड करू शकता.

या पर्यायाचा वापर करून तुम्ही मोबाईल वर तुमचा आधार क्रमांक मिळवू शकता आणि मग आधार क्रमांकावरून तुमचे आधार कार्ड डाउनलोड करू शकता. तर नेमकी कशी आहे ही प्रक्रिया चला समजून घेऊया!

 1. UIDAI वेबसाइट वर जा.

2. इथे तुम्हाला एक फॉर्म दिसेल ज्यात तुम्हाला काही डिटेल्स भरावे लागतील. तुमचा आधार क्रमांक तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळवायचा असेल तर आधी Aadhar Number च्या ऑप्शनवर क्लिक करा.

3. तुमचं संपूर्ण नाव इथे टाका, जसं तुमच्या आधार कार्ड वर छापील आहे तसं.

4. खाली एका कॉलम मध्ये तुमचा मोबाईल क्रमांक किंवा ईमेल-आयडी यापैकी एक टाका.

5. Captcha भरण्यासाठी खाली एक चित्र असेल त्यात बघून अचूक Captcha टाईप करा.

6. Send OTP च्या बटनावर क्लिक करा.

7. तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक OTP मॅसेज येईल OTP तो तिथे एंटर करा.

8. खाली Login बटनावर क्लिक करा.

9. Login करताच तुमच्या मोबाईल वर तुमचा आधार कार्ड क्रमांक पाठवण्यात येईल.

आता तुम्हाला तुमचा आधार क्रमांक उपलब्ध झाला आहे. आधार क्रमांकाद्वारे तुम्ही वरचे पर्याय वापरून आधार कार्ड डाउनलोड करू शकता.

विना आधार-क्रमांक आधार कार्ड कसे डाउनलोड करावे

सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जर तुम्हाला विना आधार क्रमांकाचे आधार कार्ड डाउनलोड करायचे असेल तर Masked Aadhaar Card ऑनलाईन डाउनलोड करून त्याची प्रिंट-आऊट काढू शकता. चला तर मग समजून घेऊया कि विना आधार क्रमांक आधार कार्ड कसे डाउनलोड करावे.

 1. UIDAI वेबसाइट वर जा.

2. My Aadhaar वर क्लीक करून Download Aadhaar च्या ऑप्शनवर क्लीक करा.

3. तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाका.

4. खाली Masked Aadhaar चा एक चेक-बॉक्स दिला असेल तिथे क्लीक करा.

5. Captcha वेरिफाई करा.

6. Send OTP बटनावर क्लीक करा.

7. तुमच्या मोबाईल वर OTP आला असेल, तो एंटर करा.

8. Download Aadhaar वर क्लीक करा, काही सेकंदात तुमचा Masked Aadhaar डाउनलोड होईल.

विना मोबाईल नंबर आधार कार्ड कसे डाउनलोड करावे

वर्तमान काळात तुम्हाला जर तुमचे आधार कार्ड डाउनलोड करायचे असेल तर तुमचा मोबाईल नंबर आधारशी लिंक असणे अनिवार्य आहे. जर नसेल तर तुम्ही आधार कार्ड डाउनलोड करू शकत नाही.

आधारशी मोबाईल नंबर कसा लिंक करावा?

 1. आधारशी मोबाईल नंबर जोडण्यासाठी अधिकृत आधार केंद्रावर जावे.

2. आधारशी मोबाईल नंबर लिंक करायला एक फॉर्म मिळतो, तो भरावा त्यात तुमचा वैयक्तिक मोबाईल नंबर भरा.

6. त्याच बरोबर बायोमेट्रिक ऑथेंटीकेशन साठी तुमच्या डोळ्यांचे व बोटांचे ठसे अपडेट करून घ्या.

7. तुमच्या कडून ५० रु. फी आकारण्यात येईल आणि तुम्हाला Enrollment ID असलेली पावती देण्यात येईल.

8. 15 ते 30 दिवसात तुमचा मोबाईल नंबर आधार कार्ड शी लिंक झाला असेल. आता आधार क्रमांकाद्वारे तुम्ही वरील पर्याय वापरून तुमचे आधार कार्ड डाउनलोड करू शकता.

मला आशा आहे की तुम्हाला माझा हा लेख आधार कार्ड कसे डाउनलोड करावे? आवडला असेल. माझा नेहमी प्रामाणिक प्रयत्न असतो की सखोल अभ्यास करून लेख लिहावा जेणे करून तुम्हाला माहितीसाठी इतर बेवसाईट शोधण्याची गरज पडणार नाही.

तुमच्या मित्रांना, परिवाराला, नातेवाईकांना ज्यांना-कुणाला आधार कार्ड अपडेट करायचे असेल तसेच ब्लॉगिंग विषयी उत्सुकता असेल, ब्लॉग बनवायचा असेल, ब्लॉगिंग करून खूप पैसे कमवायचे असतील त्यांना हा लेख share करा.

because sharing is caring ❤️

Stock Images Download करण्यासाठी 11 फ्री वेबसाईट्स

0
Stock Images Download करण्यासाठी 11 फ्री वेबसाईट्स
Stock Images Download करण्यासाठी 11 फ्री वेबसाईट्स

Stock Images Download करण्यासाठी 11 फ्री वेबसाईट्स ( how to download stock images for website in marathi free, how to download stock images for free, stock images download free in marathi, stock images free download in marathi)

आपण आज पाहणार आहोत. खासकरून ब्लॉगिंग करताना दर्जेदार आशयाव्यतिरिक्त आपण लेखाच्या सादरीकरणाचीही काळजी घेणे आवश्यक आहे. कोणत्याही लेखाचे सादरीकरण वर्धित करण्यासाठी आपण लेखात संबंधित image जोडावी कारण >>

“1000 शब्दांपेक्षा एक चित्र ज्यास्त प्रभावी असतं “

तुम्ही आमच्या ब्लॉगवर जर नियमित येत असाल तर तुमच्या लक्षात येईल की, आम्ही articles अधिक आकर्षक बनविण्यासाठी आमच्या ब्लॉगमधील सर्व articles मध्ये attractive images चा वापर करतो.

इंटरनेटवर बर्‍याच Stock images ऑनलाईन उपलब्ध आहेत पण महत्वाची गोष्ट म्हणजे आपण आपल्या ब्लॉगवर किंवा इतर projects साठी त्या Stock images त्यांच्या मालकांनी वापरण्यास परवानगी दिली असेल तरचं त्या Stock image वापराव्यात. अन्यथा नाही. ना ! ना ! मी तुम्हाला इथे image licensing बद्दल प्रवचन देणार नाही तर मी तुम्हाला सरळ त्या Free 11 Websites ची नावं सांगणार आहे. होय तुम्ही योग्य वाचलं फ्री!!! आणि अर्थातच लिंक्स सुद्धा देईलचं. चला तर मग, बघूया एक-एक करून नेमक्या त्या कुठल्या Free Stock Images देणाऱ्या 11 Websites आहेत.

Stock Images Download करण्यासाठी 11 फ्री वेबसाईट्स

1. Pexels :

Pexels
Pexels

या साईट बद्दल मी Quora वर वाचलेलं. आणि ही Free Stock Images साठी भक्कम वेबसाइट आहे. या साईट वरील सर्व Images या Creative Commons Zero (CC0) या परवान्या अंतर्गत परवानाकृत आहेत, याचा अर्थ आपण या Images व्यावसायिक वापरासाठी देखील वापरू शकता.

Creative Commons (CC) organization या संस्थेने ना-नफा-तोटा या धोरणावर Stock Images साठी CC0 license जाहीर केले आहे. दर महिन्याला ते High-Quality 1500 फोटो अपलोड करतात. या वेबसाईट नुसार आतापर्येंत त्यांनी 10k Images अपलोड केल्या आहेत.

Visit Pexels

2. Pixabay :

Pixabay
Pixabay

Pixabay ही वेबसाईट सुद्धा Free Stock Images साठी खूप प्रसिद्ध साईट आहे. सुंदर Images शिवाय आपलं article कधीच attractive वाटत नाही, हा माझा आज पर्येंतचा ब्लॉगिंग अनुभव मला सांगतो. येणाऱ्या काळातही ब्लॉगिंग करताना Images च महत्व कायम राहणार आहे. असं ट्रेंड सांगतो.

म्हणून आपण Pixabay वर देखील बुकमार्क करायला हवे कारण ते जगभरातील लोकांकडून क्लिक केल्या गेलेल्या wide range of images आपल्याला मोफ़त वापरण्याची परवानगी देते. या images अगदी व्यावसायिक वापरासाठी देखील वापरण्यास मुक्त आहेत. Attribution ची आवश्यक नाही.

Visit Pixabay

3. FreePik

FreePik
FreePik

2021 मधील Free Stock Images डाउनलोड करण्यासाठी FreePik ही सर्वात लोकप्रिय वेबसाइट आहे. ही एक प्रकारची फ्रीमियम वेबसाइट आहे जी free + paid images ऑफर करते आणि बाकीच्यांपेक्षा ही वेबसाईट नक्कीच वेगळी आहे.

वेबसाईट किंवा affiliate marketing साठी landing pages बनवायचा विचार असल्यास Stock Images Download करण्यासाठी ही एक उत्कृष्ठ साईट आहे.

Visit FreePik

4. Gratisography :

Tiger
Tiger

माझ्या एका मित्राने मला या वेबसाइटच नाव सुचवलं आणि तेव्हापासून मी या वेबसाइटवर प्रेम करतो. इतर साइटच्या विपरीत, येथे आपण कोणत्याही क्रेडिटशिवाय आपल्या personal आणि business projects साठी उच्च-गुणवत्तेची Images डाउनलोड करू शकता आणि वापरू शकता. आणि हो! येथे दिसणार्‍या Images ची गुणवत्ता उत्कृष्ट आहे.

Go To Gratisography

5. Flickr

Flickr
Flickr

माझ्या वेबसाइट्ससाठी विनामूल्य Images शोधण्यासाठी आणि डाउनलोड करण्यासाठी Flickr माझ्या आवडत्या वेबसाइटपैकी एक आहे. त्यात रॉयल्टी-मुक्त Images चा एक प्रचंड डेटाबेस आहे आणि जेव्हा जेव्हा मी माझ्या लेखासाठी कोणतीही Stock Images Download करण्याची घाई करतो तेव्हा Flickr मी भेट देत असलेली अग्रगण्य वेबसाइट आहे.

कोणतीही Image डाउनलोड करण्यासाठी आपल्याला फक्त creative common category ला भेट देण्याची आणि Images साठी शोध घेण्याची आवश्यकता आहे, आपणास वेगवेगळ्या आकाराच्या संबद्ध प्रतिमा मिळतील आणि आपल्या article ला अनुकूल अशी कोणतीही Image आपण इथून डाउनलोड करू शकता.

Go To Flickr

6. Stocksnap :

Stocksnap
Stocksnap

ही आणखी एक Free Stock Images साइट आहे जिथे आपण विनामूल्य high-quality pictures डाउनलोड करू शकता. सर्व Imagesसीसीओ (CCO) परवान्याअंतर्गत (वरील प्रमाणेच) फ्री आहेत.

Visit Stocksnap

7. MorgueFile

MorgueFile
MorgueFile

MorgueFile ही एक Free Stock Images साइट आहे जी category नुसार Images शोधणे अधिक सुलभ करते. अधिक संबंधित search करण्यासाठी आपण Images ची श्रेणी निवडू शकता.

त्यात clean and clutter-फ्री landing page आणि easy navigation आहे. हे आपल्याला त्याच वेळी Images क्रॉप करण्याचा पर्याय देते आणि आपल्या ब्लॉगवर पोस्ट करणे आणखी सुलभ करते.

check MorgueFile

8. FreeRangeStock

FreeRangeStock
FreeRangeStock

आपण वैयक्तिक आणि व्यावसायिक वापरासाठी FreeRangeck वरुन Images डाउनलोड करू शकता. Images डाउनलोड करण्यासाठी आपल्याला FreeRangeck वेबसाइटवर आधी विनामूल्य नोंदणी करणे आवश्यक आहे.

Images डाउनलोड करण्याव्यतिरिक्त, जर तुम्ही photographer असाल तर आपण Images अपलोड करू शकता आणि त्यांच्या बरोबर तुम्हीही Adsense revenue sharing program मधून पैसे कमवू शकता.

आपल्या computer वर डाउनलोड करण्यापूर्वी तुम्ही Pixlr वर थेट संपादित देखील करू शकता. FreeRangeck बद्दल आपल्याला कदाचित आवडत नसलेली एकमेव गोष्ट म्हणजे त्याचा इंटरफेस, कारण तो खूप जुना आहे आणि तितकासा friendly सुद्धा नाही.

Visit FreeRangeck

9. FreeDigitalPhotos

FreeDigitalPhotos
FreeDigitalPhotos

FreeDigitalPhotos वरून विनामूल्य रॉयल्टी फ्री Images डाउनलोड करण्याव्यतिरिक्त, आपण Powerpoint, Word, Educational projects, Photoshop projects आणि बरेच काही इथे वैयक्तिक आणि व्यावसायिक वापरासाठी देखील डाउनलोड करू शकता.

इथे ग्रीटिंग्ज कार्ड देखील डाउनलोड करू शकता परंतु व्यावसायिक वापरासाठी हे वापरण्यास अनुमती नाही. अशा प्रकारे आपण फक्त Images पेक्षा इतर काही शोधत असाल तर FreeDigitalPhotos कडे जा.

Go To FreeDigitalPhotos

10. Photogen

Photogen

Photogen वैयक्तिक आणि व्यावसायिक वापरासाठी विनामूल्य Images प्रदान करते. Photogen वर प्राणी, संस्कृती, निसर्ग, व्यवसाय इ. सारख्या Images च्या categories आहेत. तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार निवडू शकता. Photogen अतिशय relevant search आणि चांगल्या प्रतीची Images प्रदान करते. हे वापरण्यास सोपे आहे आणि विनामूल्य Images शोधणे इथे खूप सोपे आहे.

Visit Photogen

11. Fotor :

Fotor
Fotor

Fotor ही आणखी एक लोकप्रिय साइट आहे जिथे आपल्याला Fotor समुदायाकडून 335 मिलियन प्रीमियम रॉयल्टी-फ्री स्टॉक फोटो सापडतील. जरी त्यात attribution आवश्यक आहे.

Go To Fotor

तर कश्या वाटल्या तुम्हाला या साईट्स? आता articles लिहितांना google वरून Images डाउनलोड करू नका अशाने google तुम्हाला बॅन करू शकते आणि शिवाय आर्थिक दंड सुद्धा भरावा लागू शकतो.

आपल्या ब्लॉगसाठी किंवा आपल्या व्यवसायासाठी वरील Stock Images Download करण्यासाठी 11 फ्री वेबसाईट्स ला भेट द्या आणि हव्या तितक्या Images डाउनलोड करा आणि आपले लेख पोस्ट करा. शिवाय तुम्ही Free Stock Images Download करण्यासाठी आणखी कुठल्या वेबसाईट्स चा उपयोग करता. मला comment box मध्ये कळवा.

तुमच्या मित्रांना, परिवाराला, नातेवाईकांना ज्यांना-कुणाला ब्लॉगिंग विषयी उत्सुकता असेल, ब्लॉग बनवायचा असेल, ब्लॉगिंग करून खूप पैसे कमवायचे असतील त्यांना हा लेख share करा.

because sharing is caring ❤️