Best Blogging Tips & Tricks in marathi (2022)

Best Blogging Tips & Tricks in Marathi ( marathi blog writing, marathi blog jagat, best marathi blogging tips & tricks in 2021)

चला मी तुम्हाला Best 33 Blogging Tips & Tricks सांगणार आहे. ज्या आजपर्येंत कुणीही तुम्हाला सांगितल्या नसतील, खास करून आपल्या माय मराठी भाषेत. तर हातात एक कडक चहा घ्या आणि ह्या Best 33 Blogging Tips & Tricks समजून घ्या.

blogging tips tricks in marathi : तर इथे इंटरनेटवर ब्लॉगोस्फिअरमध्ये कोट्यावधी ब्लॉग आहेत, पण त्यापैकी काहीच ब्लॉग ब्रॅण्डिंगच्या अनुषंगाने आपले धोरणे आखत आहेत. किंवा तसे अनुसरण करीत आहेत.

ऑनलाईन पैसे कमविण्याच्या उद्देशाने दररोज शेकडो नवीन ब्लॉग्ज इंटरनेटवर दिसतात पण बर्‍याच नवख्या ब्लॉगरना ते यशस्वी ब्लॉगर कसे बनू शकतात याबद्दल माहिती नसते.

म्हणूनच मी Best 33 Blogging Tips & Tricks तुमच्याशी share करण्याचे ठरविले आहे. जेणेकरून या Tips & Tricks तुम्हाला तुमच्या blogging करिअरमध्ये फायद्याच्या ठरतील. विशेषत: जेव्हा तुम्ही एक ब्लॉगर म्हणून आपलं ब्लॉगिंग करिअर सुरु करता. तेव्हा तुमच्या हातून नकळत बर्‍याच ब्लॉगिंग चुका घडतात.

म्हणूनच मी सर्व नवोदित ब्लॉगर्सना ब्लॉगिंगवरील Best 33 Blogging Tips & Tricks वाचण्याची शिफारस करतो, आणि आशा करतो कि नवीन ब्लॉगर या चुकांमधून धडा घेतील व आपल्या blogging करिअरमध्ये यशश्वी होतील.

ब्लॉगिंग करणे सोपे काम आहे पण, आपल्या स्वतःच्या ब्लॉगमध्ये सातत्य राखणे कठीण आहे. विशेषत: जेव्हा आपण ब्लॉगिंगमधून पैसे कमवण्याचा विचार करीत असाल तर आपल्याला बर्‍याच गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.

Table of Contents

उदाहरणार्थ

 • Writing
 • SEO
 • Marketing
 • Monetization
 • Social Signals
 • Promotion

आणि बरेच काही. नेहमी लक्षात ठेवा, a blog has no limit, सामान्यातला सामान्य ब्लॉग येत्या काळात सर्वात मोठा ब्रांड बनू शकतो.

Best 33 Blogging Tips & Tricks मराठीत

1. आपला पाया (foundation) मजबूत बनवा.

foundation
foundation

ब्लॉगवर traffic प्रत्येकाला हवा असतो, परंतु उतावळ्या ब्लॉग्जर्सना SEO, social media marketing, आणि चांगले articles कसे लिहावे इत्यादी शिकण्यात आपला वेळ खर्ची घालवायचा नसतो.

प्रत्येकाला एक यशस्वी ब्लॉगर व्हावंसं वाटत ते नैसर्गिक आहे आणि व्हायलाच हवं. पण नवीन ब्लॉगरला जर माहीतच नसेल की यशाची गुरुकिल्ली काय आहे मग त्याने तरी काय करावं?

तुम्ही content writing, SEO, आणि social media marketing, या मूलभूत कौशल्यांचा सन्मान करत ब्लॉगिंगची आपली सुरुवातीची काही महिने खर्च केल्यास तुम्ही जेव्हा grow करता तेव्हा हिचं skills (कौशल्ये) तुमच्या यशाचा पाया म्हणून भक्कमपणे उभे राहतील.

तुम्ही content writing सुधारण्या बद्दल जर गंभीरपणे विचार करत असाल तर, मी तुम्हाला सल्ला देतो की तुम्ही AdWeek Copywriting ebook वाचून एक चांगली सुरुवात करू शकता.

राहिला प्रश्न SEO, आणि social media marketing चा तर या विषयावर मी इथे ThankMeLater वर सातत्याने सविस्तर लेख लिहीत आहे. ते तुम्ही वेळ काढून वाचू शकता.

2. नेहमी प्रामाणिक राहा. 

(Best Blogging Tip)

Be Honest
Be Honest

” जग बदलायचं असेल तर आधी स्वतःपासून सुरुवात करा “

-महात्मा गांधी

जी लोकं तुमच्याशी खोटं बोलतात किंवा इतरांशी खोटं बोलतात, हे तुमच्या लक्षात आल्यावर त्यांच्या शब्दाला तुम्ही किंमत देता का? खरचं एखादा खोटं बोलतोय हे पकडणे इतके अवघड आहे का? नाही ना!!

बरं, ब्लॉगिंग असं एक साधन आहे ज्याच्या माध्यमातून आपण जगासमोर स्वत: ला व्यक्त करत असतो. हे सगळं लेख, व्हिडिओ, ऑडिओ किंवा इतर कोणत्याही माध्यमातून आपण जगासमोर  मांडत असतो.

गोष्ट अशी आहे की जेव्हा आपण प्रामाणिक असता तेव्हा आपली पोहोच वाढते. जगाला प्रामाणिक लोक आवडतात आणि प्रामाणिकपणाबद्दल ते आपला अधिक आदर करतात.

प्रामाणिक राहिल्यामुळे आपली विचारसरणी देखील सुधारते कारण ते आपल्याला अधिक सहानुभूतीशील आणि करुणाशील बनवते. जरी आपण यापूर्वी खोटे बोलला असला तरीही तुम्ही आता हा भूत मागे ठेवावा.

ब्लॉगिंग तुमच्या कुटुंबासाठी, मित्रांसाठी किंवा इतर कोणासाठीही नाही, हे सर्व तुमच्या स्वतःसाठी आहे. आपण ब्लॉगिंग करतो कारण आपल्याला जगातील प्रत्येक भागामधून समविचारी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ब्लॉग ही आपल्या हक्काची जागा आहे म्हणून.

पुढील वेळी तुम्ही कुठलाही नवीन piece of content लिहायला घ्याल त्यावेळी, प्रामाणिक रहा. प्रामाणिक राहिल्याने आपला लेख कंटाळवाणा बनत नाही, उलट तो अधिक मनोरंजक आणि authentic बनतो.

प्रामाणिक राहण्याची सुरुवात स्वतःशी खोटं बोलून आपण करू शकत नाही. उदाहरणार्थ तुम्ही असे ठरवले की उद्या पहाटे मी माझा आलार्म वाजताक्षणी अंथरुणातून उठेल. तर तसे करा. यापुढे 5-10 मिनिटांची अतिरिक्त झोप घेऊन स्वतःशी खोटं बोलू नका.

असे केल्याने तुम्ही स्वतः स्वतःला महत्व दिल्यासारखे होईल. तुम्ही एकदा ठरवलं कि मला हे काम करायचं आहे तर ते केल्याशिवाय स्वस्थ बसू नका. ज्या गोष्टी तुम्हाला नको आहेत त्या गोष्टीला स्पष्ट नकार द्यायला शिका. नेहमी खरे बोलणे तुम्हाला एक निश्चयी व्यक्तित्व बनविण्याचा पाया तयार करते.

3. केंद्रित (Focused) आणि समर्पित रहा.

Focused
Focused

शाळेत परीक्षेला बसल्यावर प्रश्नपत्रिका सोडवतांना तुम्ही कसे Focused असायचे विसरलात का? कोणत्याही गोष्टीत यशस्वी होण्यासाठी समर्पण आणि फोकस हे मुख्य घटक असतात. ब्लॉगिंग सुरु करायच्या आधी पुढच्या 3-4 महिन्यांसाठी तुम्हाला तुमच्या जीवनातील इतर सर्व गोष्टी विसरणे आवश्यक आहे. एखाद्या संन्यासीसारखे समर्पण ठेवा आणि केवळ आपल्या ब्लॉगवर लक्ष केंद्रित करा.

या चार-चरण प्रक्रियेचे अनुसरण करा:

 • Learn, Practice, Implement, Improvise.

आपल्या ब्लॉगवर स्वतःला 4 महिने समर्पित करा स्वतःला झोकून द्या! आणि मी वचन देतो की तुम्ही तुमच्या पुढील जीवनात नक्कीच यशस्वी ब्लॉगर म्हणून उभे असाल. ज्यांचा ब्लॉगिंगशी संबंध नाही अश्या लोकांना सुद्धा या गोष्टी लागू होतील.

 

4. दररोज लिहा:

Write daily
Write daily

लिखाण ही एक सवय आहे आणि तुम्ही जितके अधिक लिहाल तितके चांगले लेखक व्हाल. तसेच Google ला नवीन content आवडतो. आपला ब्लॉग नेहमी updated ठेवणे हि खूब महत्वाची गोष्ट आहे.

तुमचा busy schedule असल्यास, तुम्ही पोस्ट शेड्यूलिंग feature वापरावे किंवा कमीतकमी post frequency राखली पाहिजे. काही काळ, post frequency राखणे कठीण आहे, अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्यासाठी हे काम करायला पूर्ण-वेळ content writer ठेऊ शकता.

5. Niche आधारित वेबसाइट तयार करा:

(Best Blogging Tip)

ब्लॉगिंग सुरू करतांना आपण केलेल्या सर्वात सामान्य चुकांपैकी एक म्हणजे आपण भिन्न niche कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. मी जेव्हा माझी पहिली वेबसाईट सुरु केली, तेव्हा मी टेक, ब्लॉगिंग आणि जागतिक बातम्यांचा समावेश करण्याचा प्रयत्न केला, अर्थातच ही चांगली कल्पना नव्हती.

जेंव्हा तुम्ही तुमच्या ब्लॉगवर एका niche ला धरून आर्टिकल लिहिता तेंव्हा bounce rate खाली जातो आणि page views वाढायला लागतात. हे आपल्याला आपल्या ब्लॉगवर subscribers वाढवायला आणि रँकिंग मध्ये मदत करतं. niche कसा निवडावा याबद्दल खाली लेख आहे तो तुम्हाला मदत करेल.

6. व्याकरणाच्या चुका टाळा:

तुम्ही कुठल्याही niche वर ब्लॉगिंग करा हरकत नाही पण तुम्ही व्याकरणात चुक करता कामा नये. हे तुमच्या वाचकाला bad user experience देते, आणि तुमचा ऑनसाइट एसईओसाठी देखील खराब आहे म्हणून हे अजिबात परवडण्या सारखं नाही हे लक्षात घ्या.

search engine रँकिंगसाठी अनेक सिग्नलपैकी एक म्हणून readability आणि grammar महत्वपूर्ण मानते. आपली मात्तृभाषा माय मराठी आहे, तुम्हाला इंग्रजी भाषेत ब्लॉगिंग करायची असल्यास, इंग्रजी भाषेचा सराव करणे सुरु ठेवावे. व्याकरणाच्या चुका टाळण्यासाठी grammarly हे extension वापरावे.

(Best Blogging Tip)

7. link देण्यास घाबरू नका.

जेव्हा मी एक नवीन ब्लॉगर होतो, तेव्हा मी ज्या वेबसाइटचा संदर्भ घेतला आहे अशा इतर वेबसाइटच्या लिंक द्यायला खूप घाबरायचो. कारण मला भीती वाटायची की अश्याने माझ्या ब्लॉगचा बाउन्स रेट वाढेल आणि वाचक इतर वेबसाईटवर जातील. पण हे तितकेसे खरे नाही.

लिंक दिल्याने user चा आपल्या ब्लॉगवर विश्वास वाढतो, शिवाय SEO मध्ये सुद्धा मदत होते. जर तुम्हाला बाउन्स रेटबद्दल चिंता वाटत असेल तर मी सूचित करतो की तुम्ही नवीन टॅबमध्ये बाह्य लिंक द्या.

(Best Blogging Trick)

8. content कॉपी करू नका

जेंव्हा आपण सुरु करतो तेंव्हा अर्थातच आपल्याला शंका असते की मी उच्च दर्जाचे आर्टिकल लिहू शकेल का ? मग म्हणून काही जण इतर ब्लॉगवरचे content कॉपी करतात. हे सरळ-सरळ कॉपीराइटचे उल्लंघन असते. यामुळे आपली वेबसाईट बॅन होऊ शकते शिवाय आर्थिक दंड ही बसू शकतो.

जन्मताच कुणी writer बनून येत नसतो मी वर सांगितल्या प्रमाणे दररोज लिहिण्याचा सराव केल्याने तुम्ही हळू-हळू उच्च दर्जाचे लिखाण करू शकता. आणि हे बघा! नक्कलं करण्यात आपला खूप वेळ वाया जातो त्यापेक्षा आपल्याला जस जमेल तस लिहिल्यास ते आपल्या वाचकाच्या थेट हृदयाला भिडतं. लिखाण उच्चकोटीचे नसेल तरीही.

9. blog भिन्न ब्राउझरमध्ये test करा

Chrome, Firefox, Opera, iPhone, safari हे सर्वात common ब्राउझर आहेत. आणि आपण यापैकी कोणताही ब्राउझर गमावण्याची अपेक्षा कशी करू शकतो? तुमचा ब्लॉग प्रत्येक ब्राउझरवर योग्य प्रकारे लोड होत आहे आणि तुमची डिझाइन CSS सर्व ब्राउझरशी सुसंगत आहे याची खात्री करा.

10. उत्कटतेने आणि संयमाने ब्लॉगिंग करा

पॅशन आणि संयम हे ब्लॉगिंग बझवर्ड्ससारखे आहेत.

ब्लॉगिंगसाठी नेहमी योग्य niche निवडा ज्याबद्दल तुम्हाला जरा इतरांपेक्षा जास्त माहित आहे आणि लिहायला उत्साह आहे असा विषय निवडा. ब्लॉगिंग ही “गरीबी हटाव” योजना नाही. पैसे कमावण्यासाठी संयम ठेवावा लागेल.

तुम्हाला पैसे येण्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल आणि तुम्ही त्यासाठी योग्य रणनीती बनविली तरच ते येतील. तुमचे लक्ष्य ब्लॉगिंगमधून झटपट पैसे कमविणे हे असल्यास, online marketing चे इतर पैलू देखील पहा पण ब्लॉगिंग मधून पैसे यायला जरा वेळ लागेलच.

11. ब्लॉगिंगसाठी एक धोरण बनवा

परिभाषित रणनीती आणि ध्येय यासह तुम्ही जगातील कुठलीही गोष्ट साध्य करू शकता. याचा अर्थ असा नव्हे कि तुम्ही दरदिवशी नवीन काहीतरी काम हाती घ्या आणि ते पूर्णत्वास न नेता असचं अर्धवट सोडा. असे करणे निव्वळ मूर्खपणा ठरेल.

ब्लॉगिंग हि न संपणारी process आहे आणि खरे ब्लॉगर कधीच हार मनात नसतात.

कार्यपद्धती बनवण्याचा आणि त्यावर टिकून राहण्याचा उत्तम मार्ग म्हणजे गोष्टी process मध्ये रूपांतरित करा.

उदाहरणार्थ, एकदा तुम्ही तुमच्या content ला कसे promote करणार आहात हे निश्चित केल्या नंतर त्याची एक चेकलिस्ट तयार करा आणि प्रत्येक वेळी जेंव्हा नवीन कन्टेन्ट post म्हणून publish कराल तेंव्हा अनुसरण करा.

तुम्ही म्हणाल कि हे किती कंटाळवाणे आणि repetitive आहे पण मित्रांनो आपण आपल्या creativity शी sacrifice करून कसं चालेल? जेंव्हा-जेंव्हा तुम्ही तुमच्या ब्लॉगवर चांगलं आर्टिकल लिहाल आणि त्याला promote करणार नाही, तर त्याचा सरळ प्रभाव ब्लॉगच्या traffic वर होतो.

म्हणून तुम्ही लिहिलेल्या प्रत्येक पोस्टला चालल्या images नी सजवा आणि promote करा, आणि या प्रकियेला आपली सवय बनवा.

अश्या repetitive tasks साठी भविष्यात तुम्ही virtual assistant देखील ठेऊ शकता. त्यासाठी Asana किंवा Trello सारखे tools वापरू शकता

खालील काही नोंदी तुम्हाला उपयोगी पडतील.

 • तुम्ही publish करणार असलेल्या आर्टिकलची एक यादी बनवा.
 • येत्या महिन्यात तुंही किती लेख पोस्ट करणार आहात याच कॅलेंडर बनवा.
 • कुठल्या platforms वर तुमचे लेख शेअर करणार आहात याची लीस्ट बनवा.

येथे Trello ची लिंक देत आहे

12. Social Media Marketing Strategy बनवा

ते दिवस गेले आता, जेंव्हा traffic generating साठी ब्लॉगर्स फक्त search engines वर अवलंबून असायचे. पण आज आपल्या समोर Facebook, Twitter, Pinterest यासारखे अनेक प्रर्याय उपलब्ध आहेत. या माध्यमांचा traffic generating साठी फायदा घेत नसेल असा ब्लॉगर विरळाच.

कधीकधी Social Media वरून इतका traffic येतो की search engine मधील ट्रॅफिकशी त्याची तुलना सुद्धा करू शकत नाही, पण लक्षात ठेवा हा ट्राफिक लगेच येणार नाही. तुम्हाला तुमच्या niche संबंधी सोशल मीडियामधील लोकांशी संवाद साधावा लागेल आणि त्यांच्याबरोबर तुम्हाला virtual नाते निर्माण करावं लागेल.

तसेच, सोशल मीडिया सिग्नल आपली साइट रँकिंग सुधारण्यात देखील मदत करतात. त्यामुळे तुमचा ब्लॉग सोशल मीडियावर न्यायला विसरू नका.

13. Link Building Strategy बनवा

जेव्हा search engines मध्ये रँक करण्याचा प्रश्न येतो तेव्हा Link building विषय अग्रक्रमाने येतो. एक proper link building strategy बनवा. तुमच्या niche शी संबंधित असणाऱ्या इतर ब्लॉगमधून अधिक बॅकलिंक्स मिळविण्याचा प्रयत्न करा विशेषतः high domain authority blogs.

(Best Blogging Trick)

14. तुमच्या ब्लॉगला एक Community बनवा

तुमच्या ब्लॉगचे environment असे ठेवा की, जेव्हा तुमच्या ब्लॉगवर नवीन visitor येतो तेव्हा त्याला तुमचा ब्लॉग एक community म्हणून वाटले पाहिजे आणि तो त्याचा एक भाग बनला पाहिजे.

15. Niche ब्लॉगरशी चांगले संबंध प्रस्थापित करा

जर तुमचा आणि तुमच्या सारख्या आणखी इतर ब्लॉग्जर्सचा niche एकसारखा असेल तर त्यांच्या ब्लॉगवर आणि सोशल मीडियावरुन कमेंट करून त्यांच्याशी संवाद साधा. हे तुम्हाला खूप मदत करेल कारण आपण त्यांच्याकडून बर्‍याच गोष्टी तुम्ही शिकू शकता.

तुम्ही तुमच्या ब्लॉगसाठी influencer marketing strategy बनविण्याबद्दल देखील विचार केला पाहिजे हे यासाठी की तुमचा ब्लॉग योग्य वेळी योग्य लोकांद्वारे पाहिला जाईल.

(Best Blogging Trick)

16. Unique Content लिहा

आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की “Content is King” होय कन्टेन्ट खरोखर राजा आहे. Content कॉपी करण्याचा कधीही प्रयत्न करू नका कारण शेवटी मग एके दिवशी तुम्हाला search engines मध्ये बॅन केले जाईल तसेच कॉपी केलेला कन्टेन्ट कुणालाही आवडत नाही.

(Best Blogging Tip)

17. Comments ला नेहमी प्रत्युत्तर द्या

मी तुम्हाला देऊ केलेही हि सर्वात महत्वाची आणखी एक ब्लॉगिंग टिप आहे, तुम्ही तुमच्या वाचकांच्या comments ला आवर्जून प्रत्युत्तर देऊन त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. जेव्हा त्यांच्या comment ला उत्तर दिले जाते तेव्हा वाचकांना ते आवडते आणि ते परत येऊन तुमच्या ब्लॉगवर comment करतील. एकूण फायदा तुमचाच!

18. Market ला “उद्या” वर भरवसा नसतो

Tumblr, Medium.com, LinkedIn यासारख्या वेबसाइट वर high PR article submission directories चा वापर करून तुमच्या niche शी संबंधित backlinks जोडून चांगले आर्टिकल्स लिहा. असं केल्याने तुमची domain authority वाढेल आणि तुमचा ब्लॉग search engines मध्ये चांगला रँक करेल.

Google Penguin update आणि over-optimization penalty नंतर मी तुम्हाला शिफारस करेल की, low-quality article marketing टाळा. त्याऐवजी, माझी पुढील टीप वापरा जी तुम्हाला अधिक exposure मिळवून देण्यास मदत करेल.

19. Guest Posting वापरा

तुमच्या niche च्या इतर ब्लॉगवर आठवड्यातून किमान एक लेख लिहिण्याचा प्रयत्न करा जे तुम्हाला त्यांच्या ब्लॉगसाठी लिहिण्याची ऑफर देतात.

high traffic आणि high PR ब्लॉगवर Guest पोस्ट करणे अधिक फायदेशीर आहे कारण यामुळे आपल्याला अधिक exposure आणि quality backlinks मिळतील.

20. वाचकांना त्यांचे Opinions विचारा

तुमच्या लेखांबद्दल वाचकांची मते जाणून घ्या. हे तुमच्या ब्लॉगवर कमेंट्स वाढवेल आणि तुमच्या वाचकांना असे वाटणार नाही की ते एखाद्या रोबोटने लिहिलेला लेख वाचत आहेत. ????

लक्षात ठेवा तुम्ही अधिक कमेंट्स मिळविण्याकरिता कठोर परिश्रम केले पाहिजेत कारण यामुळे तुमचं आणि तुमच्या ब्लॉगचं महत्व वाढतं. याची खात्री करा कि तुम्हाला अर्थपूर्ण टिप्पण्या मिळतील “Thank you” “Nice post,” यासारख्या कमेंट्सच्या मोहात पडू नका. नेहमी अर्थपूर्ण कमेंट्स मिळवण्याचा प्रयत्न करा.

21. नेहमी वाचकांसाठी लिहिण्याचा प्रयत्न करा

नवीन ब्लॉगची सर्वात मोठी समस्या म्हणजे traffic मिळवणे. प्रामाणिकपणे, जेव्हा मी ब्लॉगिंग सुरू केले तेव्हा ते माझ्यासाठीसुद्धा कठीण होते.

तरी बरं, वेळेत मला हे समजले की इथे SEO म्हणून काहीतरी प्रकार आहे. जी आपली search engine visibility सुधारण्यात मदत करते.

SEO महत्वाचा आहेच परंतु सर्वात महत्त्वाचे आहे वाचकत्व.

जेव्हा तुम्ही एखाद्या विषयावर लिहित असाल, तेव्हा त्या niche मधील सर्व संबंधित विषय कव्हर करण्याचा प्रयत्न करा. उदाहरणार्थ, येथे ThankMeLater वर आम्ही ब्लॉगिंगच्या सर्व बाबींचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो आणि यामुळे आम्हाला अधिक user engagement मिळते.

22. तुमचे ब्लॉग-डिझाइन Reader-Friendly बनवा

तुमचा ब्लॉग डिझाइनमध्ये proper navigation सह clean design ठेवा. हे असे असावे की वाचकांना त्यांच्या आवडीचा कन्टेन्ट सहज सापडेल. तुम्हाला माहीतच आहे “Content is King” त्याचं जोडीला design सुद्धा छान असावे, लक्षात ठेवा : The first impression is the last impression.

तसेच, user ला तुमच्या ब्लॉगवर अधिक काळ खिळवून ठेवण्यास मदत होईल. flashy किंवा irritating color असलेल्या ब्लॉगवर तुम्ही स्वतः वेळ घालवणे पसंत कराल? शिवाय तुम्हाला web page लोड होण्यासाठी काही मिनिटे वाट पाहावी लागेल. तुम्हाला चालेल का? नाही ना!

23. SEO friendly Theme वापरा

तुमचे ब्लॉग टेम्पलेट आपल्या SEO आणि ब्रँडिंगसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. नवख्या ब्लॉगरसाठी प्रीमियम टेम्पलेटमध्ये थोडी गुंतवणूक करणे चांगले आहे. जर बजेट तुमच्यासाठी अडचण असेल तर तुम्ही कोणत्याही सर्वोत्कृष्ट वर्डप्रेस थीममधून निवड केली तरी चालेल.

24. प्रभावी शीर्षक वापरा

मी आधी म्हटल्याप्रमाणे, कोणत्याही नवीन ब्लॉगसाठी तुमचा कन्टेन्ट तुमच्या ब्लॉगवर लोकांना नियमित येण्यास भाग पाडते. जर तुम्हाला वाटतं असेल की तुमचा ब्लॉग भविष्यात मोठ्ठा ब्लॉग म्हणून नावारूपाला यावा, तर त्यासाठी पहिल्या काही महिन्यांमध्ये (आणि नंतर देखील) सुसंगतता खूप महत्वाची आहे.

तुम्हाला नियमित content आणि ब्लॉगचे promotion करण्यावर तुम्ही भर दिला पाहिजे. आणखी एक महत्वाची टीप म्हणजे “प्रभावी शीर्षक लिहिणे”. प्रभावी शीर्षक तुमच्या वाचकांना तुमचे अधिक लेख वाचण्यास प्रवृत्त करेल.

नेहमी high-quality content लिहिण्याचा प्रयत्न करा, external links द्यायला घाबरू नका. त्यामुळे तुमचा ऑन पेज SEO सुद्धा चांगला होईल. जेव्हा तुम्ही स्पॅमी साइट्सशी link देत असाल तेंव्हा Nofollow link attribute वापरा.

लेखाचे शीर्षक reader आणि SEO friendly असावे. शीर्षक हे वाचकांना आकर्षित करणारे असले पाहिजे आणि शीर्षकात महत्त्वाचे keywords देखील वापरले जावेत.

तुम्हाला माहित असायलाच हव्या अशा आणखी blogging tips and tricks

Pre-Writing Activity

पटकन लिहायची घाई करू नका. तुम्ही काहीही लिहायला सुरुवात करण्यापूर्वी काही pre-conditions पूर्ण केल्या पाहिजेत.

25. योग्य विषय निवडा

माझ्यासाठी हे सर्वात कठीण काम आहे. काय लिहायचे हे शोधणे हा इतका विस्तृत विषय आहे की या पोस्टच्या मर्यादित व्याप्तीमुळे मी त्यास न्याय देऊ शकत नाही.

योग्य विषय म्हणजे आपले targeted audience काय शोधत आहेत आणि आपण त्यांच्याशी काय share करावे यावर अवलंबून असतो. उदाहरणार्थ, तुम्ही gadgets आणि gizmos च्या फिल्डमध्ये काम करत असाल तर त्याबद्दल तुमच्या audience साठी काहीतरी लिहिणे चांगले. आपण आपल्या वाचकांसह त्याबद्दलच्या बातम्या देखील share करू शकता.

26. नियोजन

काहीही लिहिण्याआधी, तुम्ही ज्या विषयावर लिहिणार आहात त्याबद्दल तुम्हाला थोडेसे ज्ञान असणे आवश्यक आहे. तुम्ही लिखाणास प्रारंभ करण्यापूर्वी तुम्हाला योजना आखण्याची आवश्यकता आहे. योजना तयार करण्यासाठी, स्वत: ला हे प्रश्न विचारा:

 • मी लिहितोय हे कोण वाचणार आहे?
 • मी विषयाचे कोणते-कोणते भाग कव्हर करावे?
 • अश्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या मला या विषयावर लिहिल्या नाही तरी चालतील?
 • हे वाचल्यानंतर माझ्या audience ला कोणते ज्ञान प्राप्त होईल?
 • माझ्या साइटच्या Search Engine Position वर माझ्या लेखनाचा कसा परिणाम होईल?
 • या लेखनातून मला काय मिळणार?

तुम्ही कोणतीही योग्य योजना न आखता फक्त लिहायला सुरुवात केली तर तुमच्याकडे मजकूराच्या काही ओळी असतील ज्या कोणालाही उपयुक्त नाहीत.

27. संशोधन

तुम्ही लिहायला विषय निवडल्यानंतर आणि तुम्ही जो भाग कव्हर करू इच्छिता त्या क्षेत्रासाठी योजना आखल्यानंतर, आता संशोधनाची वेळ आली आहे.

तुम्ही ज्या विषयांवर लिहिणार आहात त्या विषयावर सखोल Research करणे आवश्यक आहे कारण ब्लॉगिंग फक्त इतरांना शिकवणे आणि माहिती देणे नाही, तर नवीन गोष्टी शिकण्याबद्दल देखील आहे.

एखाद्या विशिष्ट विषयाबद्दल तुमच्याकडे कितीही ज्ञान असले तरीही त्या विषयाला धरून आणखी बऱ्याच गोष्टी असू शकतात ज्या तुम्हाला कदाचित माहित नसाव्या. तुम्ही जितके अधिक संशोधन कराल तितके चांगले तुम्ही लिहू शकाल.

लेखना दरम्यान

Writing
Writing

28. Killer Headline

लिहिण्याची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे killer headline आणि subheading शोधणे जे आपल्या वाचकास आपल्या साइटवर आणेल. heading हा आपल्या लेखाचा मुख्य दरवाजा असतो आणि त्याकडे जर वाचकाचे लक्ष लागले तर आपला मजकूर ज्ञानाचा स्रोत बनतो. तुमचं हेडिंग जर तस नसेल तर मग ते फक्त एक सिम्पल text आहे.

29. Review

तुमचे लेखन कौशल्य कितीही चांगले असले तरीही एखादी त्रुटी राहण्याची शक्यता असते. तुमच्या वाचकांना तुमचा लेख वाचून आनंद झाला हे सुनिश्चित करण्यासाठी तुम्हाला एखाद्याने तुमचा लेख पोस्ट करण्यापूर्वी किमान एकदातरी review करणे आवश्यक आहे. एक review तुमच्या लिखाणाचा दर्जा गगनाला भिडवू शकतो. लक्षात ठेवा.

तुम्ही लिखाणा मार्फत जो संदेश तुमच्या वाचकांना देऊ इच्छिता तो तसाचं लिहिल्या गेलाय ना? हे सुनिश्चित करणे जरुरी आहे. यासाठी तुम्हाला एक सिक्रेट सांगतो, तुम्ही एकदा लेख लिहिल्या नंतर लगेच पोस्ट करू नका थोडं थांबा!

आपल्या जवळच्या कुणालातरी वाचायला द्या. त्याचा आधी review घ्या. काही चूक झाली असल्यास त्यात सुधार करा. पोस्ट कारण्यापूर्वी थोडा आराम करा थोड्या वेळाने ती पोस्ट तुम्ही स्वतः वाचून पहा, खरं सांगतो काहींना-काही त्रुटी तुम्हाला नक्की आढळेल त्यात सुधार करा , मगचं पोस्ट करा.

Post Writing Activity

30. Marketing

एकदा तुम्ही तुमच्या काही पोस्ट लिहून झाल्यावर आता वेळ आली आहे त्या पोस्ट्स साठी वाचकांचं मार्केट शोधणे. मी व्यक्तिशः असे मानतो की तुम्ही ब्लॉगिंगसाठी नवीन आहात आणि तुमच्या ब्लॉगवर पुरेसा traffic नाही. ट्रॅफिक आणण्यासाठी, सर्वात आधी तुमचे वाचक कुठे आहेत हे शोधणे आणि त्यांना तुमच्या ब्लॉग पर्येंत कसे आणता येईल हे तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे.

तुमचे वाचक तुम्हाला कदाचित Quora वर मिळू शकतील. Quora हे तुमच्या ब्लॉगवर ट्राफिक आणण्याचे प्रमुख स्रोत बनू शकते पण त्यासाठी तुम्हाला लोकांच्या प्रश्नांचे योग्य उत्तरे देण्याची कला आत्मसात करायला हवी.

31. सोशल बुकमार्किंग साइटवर बुकमार्क करणे

आपल्या साइटवर आणि आपल्या पोस्टवर traffic आणण्यासाठी सोशल बुकमार्किंग साइट Reddit ही एक उत्तम जागा आहे. तुम्ही या साइटवर तुमच्या पोस्ट बुकमार्क केल्या पाहिजे आणि लोकांना त्या आवडतील आणि पुन्हा ते बुकमार्क करतील अशी आशा करायला हरकत नाही.

आपल्या लिंक वर जितके अधिक बुकमार्क मिळतील तेवढे चांगले. Faster indexing करणे सोशल बुकमार्किंग साइटवर आपले पोस्ट बुकमार्क करण्याचा हा आणखी एक फायदा आहे, विशेषत: नवीन जेथे Google crawling आणि indexing हे slow आहे.

Active social bookmarking साइट फायदेशीर आहेत. खाली काही लोकप्रिय बुकमार्किंग साइटची सूची आहे:

32. Share it on Social Networking sites

मी वर आधीच सांगितल्या प्रमाणे Facebook, Twitter, Pinterest, इत्यादी  आपल्या साइटसाठी ट्रॅफिक निर्माण करण्यास चांगली मार्ग आहेत. तुम्ही तुमच्या आर्टिकलच्या लिंक्स तुमच्या मित्रांबरोबर share केल्यास ट्रॅफिक आणण्यास तुम्हाला मदतच होईल.

जर त्यांना तुमचा content आवडत असेल तर ते आपल्या मित्रांशी share करतील. आपल्या साइटवर रहदारी आणण्याचा हा एक उत्कृष्ट मार्ग आहे.

33. Comments on your posts

एकदा तुमच्या पोस्टवर comments येणास सुरुवात झाल्यानंतर त्यांना प्रत्युत्तर द्या ज्यामुळे चर्चेची नवीन दारं उघडतील, त्यामुळे तुम्हाला कळेल कि तुमच्या वाचकांच्या तुमच्या कडून काय अपेक्षा आहेत. तुमच्या पुढच्या आर्टिकलसाठी इथे तुम्हाला विषय मिळू शकतो म्हणून कंमेंट्स वर दुर्लक्ष करू नका.

आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे trolls ला उत्तरे देऊ नका अश्याने ते आणखी चवताळतात. समजलं!

मला आशा आहे की या Best 33 Blogging Tips & Tricks मराठीत तुमच्यासाठी उपयुक्त ठरतील. आपला ब्लॉग परिपूर्ण ब्रँड बनविण्यासाठी तुम्ही आणखी काय करता ते मला सांगा आणि वरील यादीमध्ये इतर कोणतीही टीप जोडण्यास मोकळ्या मनाने commet box मध्ये व्यक्त व्हा!

ज्यांना-कुणाला ब्लॉगिंग विषयी उत्सुकता असेल, ब्लॉग बनवायचा असेल, ब्लॉगिंग करून खूप पैसे कमवायचे असतील त्यांना हा लेख share करा.

because sharing is caring ❤️

Share on:

Leave a Comment