तुम्हाला फसेबूकचं व्यसन लागलं आहे का? कसे सोडावे ? 8 उपाय |facebook in marathi

एखादी व्यक्ती फेसबुकवर सतत active असणे म्हणजे त्याच्या इतर महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांपेक्षा, आणि महत्वाच्या कामापेक्षा त्याचा अधिक प्रमाणात वेळ जर, फेसबुक वर जात असेल तर नक्कीच हि विचार करण्यासारखी गोष्ट आहे.

जगभरात तब्बल १.१ अब्ज पेक्ष्या जास्त वापरकर्त्यांकडे फेसबुक अकाउंट असने आणि ते रोज तपासत राहणे ही एक गंभीर समस्या बनली आहे.

तर वर सांगितल्या प्रमाणे तुम्हाला सुद्धा फसेबूकचं व्यसन आहे का ?

थेरपिस्टच्या म्हणण्यानुसार फेसबुकचे व्यसन ही social networking आणि social dysfunction यांच्यातील एक बारीक रेष आहे. उत्तर कॅरोलिना, ग्रीन्सबोरो येथे लग्न आणि कौटुंबिक चिकित्सक Paula Pile यांचे फेसबुक व्यसनाच्या सद्य परिस्थितीबद्दल काय म्हणायचे आहे ते येथे आहेः

“Last Friday, I had three clients in my office with Facebook problems, it’s turned into a compulsion — a compulsion to dissociate from your real world and go live in the Facebook world.”

अर्थात -“गेल्या शुक्रवारी, माझ्याकडे फेसबुकची समश्या घेऊन तीन ग्राहक आले होते, सांगत होते कि फेसबुकच्या वेसनाने त्यांच्या आयुष्याने असं वळण घेतलय कि, त्याचे सक्तीमध्ये रुपांतर झाले – आपल्या वास्तविक जगापासून विभक्त होऊन फेसबुकच्या आभासी जगात जाण्याची थेट सक्ती.”

ती म्हणते की जेव्हा लोक कौटुंबिक आणि कामाच्या जबाबदार्यांकडे दुर्लक्ष करतात तेव्हा समस्या उद्भवतात, कारण त्यांना वास्तविक जगापेक्षा फेसबुकचं जग अधिक मनोरंजक वाटतं. तिथे ते जास्ती आनंदी असतात.

तंत्रज्ञानाच्या आगमनाने संवादांसाठी लोक एकमेकांसाठी पूर्वीपेक्षा सहजरित्या उपलब्ध झाली आहेत. संवाद साधने आपल्या बोटांच्या टोकावर येऊन पोहोचले आहे. पण आपण त्याचा गैरफायदा घेतोय. संवाद साधायच्या निमित्ताने तुम्हाला फेसबुकच व्यसन लागलं आहे का ?

आपण ज्यांच्यावर प्रेम करतो ज्यांची काळजी घेतो त्यांच्याशी संपर्क साधण्याचे आणि कनेक्टिव्हिटीचे साधन म्हणून फेसबुकचा वापर करणे चांगले आहे. परंतु हे फेसबुकवर social life जगण्याच्या नादात आपल्या ऑफलाइन personal life ची जागा घेण्यापर्यंत पोहोचू नये.

तुम्ही किती फेसबुक एडिक्ट आहात याबद्दल तुम्हाला खात्री नाही?

काळजी करण्याची गरज नाही.

खाली तुम्हाला फेसबुकचं व्यसन लागलं आहे का ? हे लक्षणं तपासण्याचे काही चिन्ह.

Oatmeal या वेबसाईट वर तुम्ही ‘How addicted to Facebook are you?’ हे quiz देखील घेऊ शकता.

 • Facebook तुम्हाला ‘फेसबुक फेम’ चे वेड लावत आहे का ?
 • फेसबुक वर फोटो अपडेट केल्यावर तुम्हाला काळजी वाटते का?
 • ज्यांना Likes मिळत नाही अशा Posts तुम्ही Delete केल्या आहेत का ?

हे सूर्यप्रकाशा इतकं सत्य आहे की फेसबुक एक व्यसन आहे कारण ते त्वरित तुम्हाला like च्या रूपाने आनंद देतं. फेसबुक आपल्या वापरकर्त्यांमध्ये प्रसिद्धीची भावना आणते आणि म्हणूनच वापरकर्ते त्याला आकर्षित होतात.

जर्मनीच्या Freie University च्या Dr Dar Meshi यांच्या मते

As human beings, we evolved to care about our reputation. In today’s world, one way we’re able to manage our reputation is by using social media websites like Facebook.

प्रत्येकाला लाईक्स आणि सकारात्मक comment मिळविणे आवडते परंतु आपण त्यासाठी वेडं होणार नाही याची खात्री करा. किमान, आभासी जगात तरी. बरेच वापरकर्ते कमी आत्म-सन्मानाने ग्रस्त असतात, कारण त्यांच्या posts त्यांच्या जवळच्या मित्र किंवा नातेवाईकांपेक्षा जास्त लाईक्स मिळवतात.

२. तुम्ही तुमच्या physical life पेक्षा फेसबुकला प्राधान्य देता का ?

लोक आता फेसबुक मेसेजिंग, फोटो शेअर करणे, स्टेट्स अपडेट करणे, कमेंट करणे आणि इतर पोस्ट लाईक्स करण्यात इतके व्यस्त आहेत की त्यांचे शारीरिक जीवनही विसरले आहे!

जर तुम्ही तुमच्या शारीरिक जीवनाशी फेसबुकवर online उपलब्ध राहण्यासाठी तडजोड करीत असाल तर तुम्हाला फेसबूकचं व्यसन लागलं आहे.

तुम्ही फेसबुकवर जे काही करता प्रत्येक्षात तुम्ही वास्तविक जीवनात तसे नाही आहात. इतरांच्या नजरेत येण्यासाठी तुम्ही ढोंग करत आहेत का? जर तुम्ही रात्रीची पूर्ण झोप घेत नसाल, उद्यानात फिरायला जात नसाल, एखाद्या जवळच्या खऱ्या मित्रासह एक कप कॉफी पीत नसाल, आणि फेसबुकसाठी वास्तविक जगात मित्र-मैत्रीणींशी तडजोड करीत असाल तर तुम्हाला फेसबुकचं व्यसन लागलं आहे.

दिवसाच्या शेवटी तुम्ही तुमची महत्वाची कामे, जबाबदाऱ्या, आणि परिवार यांच्याकडे वेळ द्यायचा सोडून, फेसबुकवर दिवसभरात मला किती लाइक्स आले हे मोजणं हा निव्वळ मूर्खपणा आहे. तुमच्याकडे जगण्यासाठी सुंदर जीवन आहे त्याला फेसबुक वर लाईक्स मिळवण्या पुरतं मर्यादित करू नका.

3. तुम्हाला तुमच्याविषयी सगळचं लोकांना सांगण्याची सवय आहे का ?

या काळात जेव्हा बर्‍याच लोकांना त्यांच्या ऑनलाइन गोपनीयतेबद्दल चिंता असते, त्यातील काही लोक मर्यादेच्या पलीकडे जातात, आणि त्यांच्या संवेदनशील आणि जिव्हाळ्याच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल फेसबुकवर पोस्ट करतात.

आपण आपला राग, खळबळ, भावना आणि इतरांबद्दलचे मत फेसबुकवर बिनधास्तपणे टाकत असाल तर होय तुम्हाला फेसबुकचं व्यसन लागलं आहे.

आपले विचार फेसबुकवर share करणे ठीक आहे, परंतु आपल्या खाजगी गोष्टी फेसबुक वर share करणे भविष्यात तुम्हाला अडचणीत टाकू शकतात. आपल्याला नंतर फेसबुकवर केलेल्या कृतीबद्दल खेद व्यक्त करावा लागू शकतो.

फेसबुकच्या व्यसनाधीन व्यक्तींमध्ये जास्त post करणे खूप सामान्य आहे, कधी कधी लोक अवधानाने लागोपाठ बऱ्याच post करतात त्यात एखादी post त्यांच्या वयक्तिक आयुष्याशी निगडीत असते आणि नंतर फेसबुकवर हे काय पोस्ट केले म्हणून त्याबद्दल मनःस्ताप करून घेत असतात.

आपल्या प्रत्येकाचा एक फेसबुक मित्र असतो जो स्टेटस अपडेट, किंवा दुसऱ्यांच्या पोस्ट शेअर करणे किंवा चेक-इनसह फेसबुक न्यूजफीडमध्ये दिसण्यासाठी नेहमीच धडपड करत असतो. हे लोक फेसबुकवर इतके व्यस्त राहतात की ते करत असलेल्या प्रत्येक कामाची एक स्वतंत्र पोस्ट टाकत राहतात. हे एक फेसबूकचं व्यसन आहे.

हे व्यसनाधीनतेचे लक्षण आहे. या लोकांना प्रत्येकाने याची आठवण करून दिली पाहिजे की तुझं फेसबुक सोडूनही अस्तित्व आहे. आणि तू जे हे फेसबुकवर लोकांना दाखवत असतो कि तू किती आयुष्यात मजा करतोस प्रत्येक्षात हे ढोंग आहे.

4. तुम्हाला फेसबुकवर अधिकाधिक मित्र जोडण्याचा नाद आहे का ?

आपल्याकडे असलेल्या फेसबुक मित्रांची संख्या आता ‘उच्च’ सामाजिक जीवनाचे प्रतीक बनली आहे’. माझे अमुक इतके हजार फेसबुक फ्रेण्ड्स आहेत अश्या बढाया मारणारा एक तरी तुमचा मित्र नक्कीच असेल. आणि मी आणखी friend request स्वीकारू शकत नाही मला follow करा असं जेंव्हा कुणी गर्वाने सांगतं तेंव्हा नक्कीच त्याला फेसबुकचं व्यसन आहे असे समजावे.

एखाद्याला हे समजले पाहिजे की फेसबुक मित्रांची संख्या ही केवळ ‘अर्थ नसलेली संख्या’ आहे. संबंध हे संख्येने नव्हे तर आत्मियतेने जोडले जातात.

5. तुम्ही फेसबुकवर दररोज एका तासापेक्षा जास्त वेळ घालवता का ?

फेसबुकवर किती वेळ खर्च केला गेला आहे याची नेमकी नोंद करणे फार कठीण आहे. तुमची दररोजची खाजगी कामं, वर्तमान कर्तव्ये, कौटुंबिक जबाबदाऱ्या या जर योग्य वेळेवर पूर्ण होत नसतील तर नक्कीच तुम्ही फेसबुकवर खूप वेळ खर्ची घालत असाल. आणि हे एक फेसबुकचं व्यसन आहे.

बर्‍याच थेरपिस्टच्या मते, दररोज फेसबुक वापरकर्त्यांनी एका तासापेक्षा जास्त काळ फेसबुकवर राहता कामा नये. फेसबुकचा अतिवापर केल्याने तुमचं कौटुंबिक स्वास्थ बिघडण्याची शक्यता असते. लग्न आणि कौटुंबिक थेरपिस्ट Paula Pile, फेसबुकवर घालविलेल्या वेळेबद्दल हे सांगतात.

“I can’t imagine that anyone would need more than an hour a day on Facebook, and probably no one needs more than 30 minutes.”

म्हणतात ना “अति तिथे माती” फेसबुक वर खूप वेळ खर्ची घातल्याने भविष्यात तुम्हाला अनेक अडचणींना तोंड द्यावं लागू शकत. फेसबुक तुमच्या पासून सर्वात मोठी गोष्ट जी हिरावून घेताय तेती म्हणजे तुमचा वेळ, जो कधीच परत येणार नाही.

वरील पैकी काही गोष्टी जर तुम्हाला लागू असतील तर तुम्ही नक्कीच फेसबुकच्या व्येसनाधिनतेकडे जाताय, जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर तुम्ही यातून बाहेर पडणे गरजेचं आहे.

8 उपाय जे तुम्हाला फेसबुकची सवय सोडायचा किंवा कमी करायला उपयोगी पडतील.

 • फेसबुकवर रागात संवेदनहीन comments करणे थांबवा.
 • Facebook socializing करण्यापेक्षा वास्तविक जीवनात एकापेक्षा अधिक groups join करण्यावर भर द्या.
 • फेसबुक वर घालवलेला आपला वेळ कमी करा आणि १५ मिनिटांपेक्षा कमी कालावधीसाठी दिवसातून तीन किंवा चार वेळा फेसबुक तपासून पहा.
 • तुमच्या दिवसाची सुरुवात आणि शेवट फेसबुकवर होणार नाही हे सुनिश्चित करा.
 • आधी काम करा, नंतर फेसबुक.
 • तुमच्या फेसबुक फेमबद्दल कमी काळजी घ्या आणि त्याऐवजी आपल्या वास्तविक जीवनाचा आनंद घ्या.
 • ऑफलाईन नवे मित्र-मैत्रिणी बनवण्याचा आणि त्यांना भेटण्याचा प्रयत्न करा.
 • आणि सर्वात महत्वाचं तुमच्या कुटुंबियांना भरपूर वेळ द्या.

मी आशा करतो कि फेसबुकच्या व्येसनाधिनते पासून दूर जाण्यासाठी हा लेख तुमची नक्की मदत करेल. तुम्ही आभासी जगाबरोबरच वास्तविक आयुष्याचा सुद्धा आनंद घ्याल. धन्यवाद!

आपल्याला इंटरनेट किंवा इंटरनेट वरून पैसे कसे कमवावे (how to earn money from internet) या बद्दल आणखी माहिती हवी असल्यास हा ब्लॉग subscribe करा.

तुमच्या मित्रांना, परिवाराला, नातेवाईकांना ज्यांना-कुणाला ब्लॉगिंग विषयी उत्सुकता असेल, ब्लॉग बनवायचा असेल, ब्लॉगिंग करून खूप पैसे कमवायचे असतील त्यांना हा लेख share करा.

because sharing is caring ❤️

Share on:

Leave a Comment