Google Adsense म्हणजे काय? Sign up करण्यासाठी 10 Steps

Internet च्या जगातून online पैसे कमविण्यासाठी तुम्हाला Google adsense बद्दल माहिती असणे आवश्यक आहे. कारण online पैसे कमावण्यासाठी Google adsense चा जगात सर्वाधिक वापर केल्या जातो.

Google adsense म्हणजे काय आणि ते कसे काम करते हे आपल्याला माहिती नसल्यास, ही पोस्ट पूर्णपणे वाचल्यानंतर, Google adsense कसे काम करते याबद्दल तुम्हाला 100% खात्री होईल त्यासाठी लक्षपूर्वक वाचा.

Google Adsense म्हणजे काय?

Google adsense mhanje kay? तुम्ही नवीन youtuber, blogger असल्यास किंवा इंटरनेट वरून ऑनलाइन पैसे कमवू इच्छित असल्यास तुम्हाला Google adsense बद्दल माहित असणे अनिवार्य आहे. अन्यथा, इंटरनेटवर काम करून पैसे मिळवणे तुमच्यासाठी खूप अवघड आहे. कारण इंटरनेटवरून हजारो, किंबहुना लाखो रुपये दर-महिना कमविण्याचा हा मार्ग आहे.

आपल्यास इथे हे जाणून घेणे देखील महत्वाचे आहे की Google केवळ इंग्रजी कन्टेन्ट वर “google adsense ads” दाखवीत असे, परंतु 2014 मध्ये, Google अ‍ॅडसेन्स कडून एक updates आले.

ज्यामध्ये हिंदी सहित इतर काही भारतीय भाषेमधल्या कन्टेन्ट वर जाहिरात दाखवण्याचे धोरण देखील लागू केले गेले. त्यानंतर हिंदी ब्लॉगर्सची संख्या वाढली आणि आज हिंदी ब्लॉगर्सच्या मागोमाग मराठी ब्लॉगर्स सुद्धा ब्लॉगिंगमधून हजारो रुपये कमवत आहेत.

मी इथे नमूद करू इच्छितो की blogger आणि Youtuber हे online money मिळविण्यासाठी adsense चा वापर करतात. कारण अधिक प्रमाणात पैसे मिळविण्याचा हा trustable आणि एक सर्वोत्तम प्लेटफॉर्म आहे.

तसे, इंटरनेटवर बरेच ऑनलाईन पैसे कमविण्याचे प्रोग्राम आहेत. परंतु Google adsense यापैकी सर्वात प्रसिद्ध आहे. पाहिलं कारण Google अधिक पैसे देते आणि दुसरं Google हा सर्वात विश्वसनीय प्लेटफॉर्म आहे, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा धोका नाही. तर आपण गूगल अ‍ॅडसेन्स प्रोग्राम मध्ये सामील होऊन सहज पैसे कमवू शकता.

Google Adsense का खास आहे?

Google adsense एक advertisement program आहे. Google त्याच्या अ‍ॅडसेन्स जाहिराती त्याच वेबसाइटवर किंवा ब्लॉगवर display करते जिथे लोक ऑनलाइन भेट देतात. जेणेकरून Google त्याच्या जाहिरातदाराच्या उत्पादनांचे promotion करू शकेल.

यासाठी google आपल्या जाहिरातदारां कडून पैसे घेते. त्यातले 32% पैसे google स्वतःकडे ठेवते आणि उर्वरित 68% पैसे त्या publisher ला म्हणजेच वेबसाईट मालकांना देते ज्यावर Google adsense च्या जाहिराती दाखवल्या जातात.

उदा. एका जाहिरातदाराने त्याची जाहिरात दाखवण्यासाठी google कडे 100 रु. दिले तर google त्यातील 32 रु. स्वतः घेते आणि बाकी 68 रु. ब्लॉगर किंवा youtuber ला देते. त्यामुळे तिघांचेही उद्दीष्ट पूर्ण होते. जाहिरातदाराची जाहिरात होते, त्याच्या product विक्रीत वाढ होते, google आपली फी घेते, आणि ब्लॉगर किंवा youtuber ला त्याच्या पेजवर जाहिरात display केल्यामुळे त्याचा मोबदला म्हणून पैसे मिळतात.

Google adsense वरुन ऑनलाईन पैसे मिळवण्यासाठी आपल्याला प्रथम आपला ब्लॉग किंवा वेबसाईट अ‍ॅडसेन्सशी connect करावी लागते. पण आपण हे तेंव्हाच करावे जेंव्हा बऱ्यापैकी आपल्या blog वर traffic येत असेल. traffic तेंव्हाच येणार जेंव्हा आपण आपल्या blog वर नियमित दर्जेदार आर्टिकल लिहू.

तुमच्या blog वर कीवर्ड रिसर्च करून नियमित दर्जेदार पोस्ट लिहा. कमीत-कमी ४० पोस्ट लिहिण्याचा प्रयत्न करा. हळू-हळू users तुमच्या ब्लॉग वर येतील, बऱ्या पैकी ट्रॅफिक दिसायला लागल्यावर तुम्ही Google adsense साठी अप्लाय करू शकता. तुमच्या ब्लॉगवर जाहिराती display झाल्यानंतर त्याबदल्यात तुम्हाला पैसे मिळतील.

तुम्ही बऱ्याच website वर automatic text, image, video आणि interactive media advertisements ads बघितल्या असतील. तुम्ही तुमच्या ब्लॉगवर ads Type तुमच्या इच्छेनुसार select करू शकता. ज्यामुळे तुमच्या ब्लॉगवर येणाऱ्या users च्या जास्तीत-जास्त क्लीक्स मिळतील त्यामुळे तुमची जास्त earning होण्याची शक्यता असते.

हेही वाचा..

Google adsense कसे काम करते?

आपल्याला माहिती आहेच की आजच्या काळात digital marketing चे मूल्य किती वाढले आहे. आणि Google digital marketing हे advertisement Network वाल्यांचे सर्वात आवडते प्लॅटफॉर्म आहे. म्हणून बऱ्याच कंपन्या त्याची उत्पादने लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी व त्यांना promote करण्यासाठी Google ला पैसे देते. जेणेकरून Product ची ऑनलाइन जाहिरात होईल.

आता Google adsense त्या जाहिराती तुमच्या ब्लॉग वर दाखवते कारण तुमच्या ब्लॉग वर दर्जेदार कॉन्टेन्ट आहे अधिक ते वाचणारा तुमचा मोठा वाचक वर्ग आहे आणि तुम्ही तुमची वेबसाइट Google adsense बरोबर जोडली आहे. visitor जेव्हा त्या जाहिराती पाहतात आणि त्यांच्यावर क्लिक करतात तेव्हा त्यांना Google तुम्हाला त्याचे कमिशन देते. जे जाहिरातदाराने दिलेल्या संपूर्ण रकमेचे 64 टक्के आहे.

तर अशाच प्रकारे एक ब्लॉगर Google adsense वरून पैसे कमवू शकतो. आणि याचं प्रकारे YouTube च्या मध्यभागी येणार्‍या जाहिरातींद्वारे सुद्धा पैसे मिळविले जातात. ऑनलाइन पैसे मिळवण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे.

Google adsense मधून किती पैसे कमवता येतात?

आता प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न येतो की गूगल अ‍ॅडसेन्समधून किती पैसे कमवता येतात आणि त्यासाठी काही मर्यादा आहे का. गूगल वरून पैसे मिळवण्याची कोणतीही मर्यादा नाही. तुम्ही किती पैसे कमवू शकता हे तुमच्यावर अवलंबून आहे.

कारण google आपल्याला तेंव्हाच पैसे देतं जेंव्हा आपल्या ब्लॉगवर येणार users ब्लॉग वर दाखवल्या गेलेल्या ads वर क्लीक करतो. हे तुमच्यावर अवलंबून आहे कि तुम्ही कुठल्या प्रकारचा कन्टेन्ट आपल्या ब्लॉग वर पोस्ट करता. जर तुम्ही असा कन्टेन्ट ब्लॉग वर पब्लिश करता जो तुमच्या users ला आवडतो किंवा त्यांच्यासाठी खूप मददगार ठरतो तर लोकं तुमच्या साईटवर येतील आणि Google adsense ads वर क्लीक्स वाढतील.

पण एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्ही जास्त कमाई करण्यासाठी आणि जाहिरातींवरच्या क्लीक्स वाढवण्यासाठी आपल्या मित्रांना किंवा नातेवाईकांना ads वर क्लीक्स करण्यास सांगाल तर google तुमचं adsense account कायमचं बंद करू शकतं.

तुमच्या वेबसाइट वर लोकांनी natural मार्गाने उत्स्फुर्तपणे क्लिक करायला हवे. एकाच व्यक्तीने google ads वर वारंवार कारण नसतांना क्लिक केल्याने तुम्हाला नुकसान होऊ शकतं. तुम्हाला पैसे द्यायला google नाकारू शकतं किंवा तुमचं अकाउंट कायम स्वरूपी बंद सुद्धा केला जाऊ शकतं. म्हणून माझं तुम्हाला सांगणं आहे की काजळीपूर्वक एकदा google policy वाचा.

हेही वाचा..

Google adsense चे पैसे आपल्या खात्यात कसे घ्यावे?

जेव्हा आपण गुगल अ‍ॅडसेन्स वरून पैसे कमविणे सुरू करता, तेव्हा आपल्या मनात एक प्रश्न येण्यास सुरवात होते की google adsense चे हे पैसे मी माझ्या बँक खात्यात कसे घेऊ? तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की जेंव्हा तुमच्या google adsense account वर 10 dollar ची तुम्ही कमाई करता तेंव्हा google तुमच्या पत्त्यावर एक पत्र पाठवते.

ज्यामध्ये आपल्याला एक PIN code दिला जातो. त्यामुळे google हे समजण्यास मदत होते की हे तुमचेच account आहे. आणि जेव्हा आपल्या खात्यात 100 डॉलर्स जमा होतात तेव्हा आपण ते आपल्या बँक खात्यात ट्रान्सफर करू शकतो. कारण गूगल 100 डॉलर्सपेक्षा कमी रक्कम ट्रान्सफर करू देत नाही.

हेही वाचा..

काही सामान्य प्रश्न

google adsense account उघडायला पैसे लागतात का?

नाही, यासाठी तुम्हाला कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत. एक google adsense account हे Facebook, twitter आणि इतर कोणत्याही प्लेटफॉर्मवर account तयार करण्यासारखेच आहे. आपल्याकडे फक्त ब्लॉग किंवा वेबसाइट असणे आवश्यक आहे.

google adsense account कोण उघडू शकतो?

कुणीही.. ज्या कुणाला त्यांच्या वेबसाइटद्वारे, ब्लॉगद्वारे किंवा यूट्यूबद्वारे इंटरनेटवरून पैसे कमवायचे आहेत. तो आपले खाते तयार करू शकतो. पण तत्पूर्वी तुम्हाला काही अटींचे पालन करणे गरजेचे आहे. जसे..

  1. तुमचे वय 18 वर्षे पूर्ण हवे.

2. तुमच्या ब्लॉगवर स्वतःची uniqueआणि interesting कन्टेन्ट असायला हवी.

3. तुमच्या ब्लॉगवर उच्च दर्जाचे कमीत-कमी 25-30 पोस्ट असायला हवे.

4. तुमच्या ब्लॉगवर कुठलाच लेख कॉपी केलेला नसावा.

5. google वरून images कॉपी करू नये. अधिकृत stock साईटवरून डाउनलोड कराव्या.

6. तुमच्या ब्लॉग वर privacy policy, contact us, copyright disclaimer हे पेज असावे.

7. तुमचा ब्लॉग कमीत-कमी 2-3 महिने जुना असावा.

हेही वाचा..

Google adsense account कसे तयार करावे?

सर्वप्रथम Google मध्ये “google adsense account” टाईप करून search करा आणि नंतर त्यात लॉग इन करा किंवा पुढील step follow करा.

  1. create a google adsense account इथे भेट द्या.

2. Sign up now वर क्लिक करा.

3. तुमच्या वेबसाइटची URL लिंक Enter करा.

4. तुमचा email address Enter करा.

5. काही महत्वाच्या settings पूर्ण करा ज्या तुम्ही नंतर बदलूही शकता.

6. Save and continue वर क्लिक करा.

7. तुमच्या Google Account वरून Sign in करा.

8. तुमचा देश किंवा प्रदेश Select करा.

9. AdSense Terms and Conditions वाचा आणि accept करा.

10. Create account वर क्लिक करा.

तुमचे google adsense account आता तयार आहे.

पुढे काय करावे?

आपल्या लक्षात येईल की आपल्या नवीन अ‍ॅडसेन्स खात्यातील काही पर्याय ग्रे झाले आहेत. कारण google आपले खाते पूर्णपणे सक्रिय करण्यापूर्वी आपल्याला काही कामे पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी खालील व्हिडिओ पहा.

video courtesy google adsense

आज आपण काय शिकला?

मित्रांनो, google adsense म्हणजे काय आणि ते कसे वापरावे हे आपणास समजले असेलच. तसे, आम्ही आपल्याला संपूर्ण तपशीलवार सांगितले आहे आणि तुम्हाला हे मदतगार ठरेल याची मला खात्री आहे, तर आपल्याला आमचा लेख आवडत असेल तर तो सोशल मिडियावर आपल्या मित्रांसह share करा आणि नंतर आपल्याला काही अडचण आल्यास कृपया कमेंटमध्ये सांगा. मला आपल्या प्रश्ननांची उत्तरे द्यायला नक्की आवडेल.

Share on:

2 thoughts on “Google Adsense म्हणजे काय? Sign up करण्यासाठी 10 Steps”

  1. माहिती छान आहे.
    माझा एक ब्लॉग आहे.एक वर्ष झाले.अजून adsence मिळालेले नाही.program criteriya /program policy बाबत त्रुटी दूर करून मिळतील काय?

    Reply

Leave a Comment