2022 मध्ये ब्लॉगसाठी एक उत्कृष्ट Domain Name कसे निवडावे? चला जाणून घेऊ.

Domain name

ब्लॉगिंग हे संय्यम ठेऊन करायचे काम आहे. आपल्या कामात सातत्य राखल्यास प्रारंभिक अडथळ्यांनंतर आपल्यासाठी इथे प्रचंड प्रमाणात प्रसिद्धी आणि पैसा आहे.

तुमच्या ब्लॉगचे जर 1,000 अस्सल followers असतील जी प्रत्तेक नवीन पोस्टची आतुरतेने वाट बघत असतील तर आपण स्वत: ला यशस्वी ब्लॉगर मानले पाहिजे.

वर दिलेल्या पहिल्या मैलाच्या दगडा प्रयन्त जर तुम्ही प्रवास केला असेल तर याला एक सकारात्मक यश म्हणायला हरकत नाही. आणखी काही महिने असेच सातत्य ठेऊन ब्लॉगिंग करत राहिल्यास निश्चितच तुमच्या ब्लॉगची प्रसिद्धी आणि मूल्य द्विगुणित होत राहील यात तिळमात्र शंका नाही.

ब्लॉगिंग करिअरच्या या टप्प्यावर आता तुम्ही तुमच्या ब्लॉगची design वगैरे बदलू शकता, नवीन content writers नेमू शकता, प्रीमियम प्लगइन install करू शकता गरज पडल्यास आपल्या ब्लॉगचे फोकस सुद्धा बदलू शकता. परंतु अशी एक गोष्ट आहे जी आपण कधीही बदलू शकत नाही – तुमचे Domain Name .

तुमचे Domain Name तुमचा ब्रँड आहे, आणि ब्रँड नाव बदलणे ही सरळ प्रक्रिया नाही. तुम्ही आणि तुमचे डोमेन नाव एक ब्रँड आहे तुम्ही कोण आहात आणि काय करता हे तुमचं ब्रँड नकळत इतर लोकांना सांगते.

Generic Domain Names vs. Keyword Domain Names

तुमच्या ब्लॉगसाठी एक Domain Name निवडत असताना तुम्हाला brandable domain name किंवा keyword domain name यापैकी एक निवडायचा पर्याय असतो.

ThankMeLater सारख्या सर्वसामान्य ब्रँड नावाचा विशिष्ट असा अर्थ नाही आणि या डोमेन नावाने काहीही लाँच करता येऊ शकतं. याला generic brand name म्हणतात.

तसेच आपण असेही म्हणू शकतो कि समजा BloggingInIndia.com सारखे एक डोमेन नाव आहे. हे नाव आपल्याला भारतात ब्लॉगिंगबद्दल लिहिण्यास उपयुक्त ठरेल. भारताबाहेरील वाचक या ब्लॉगला follow करणार नाहीत कारण त्यांना असे वाटू शकते की हा ब्लॉग केवळ भारतीय वाचकांसाठी आहे.

Focusing is good पण तुम्हाला तुमच्या ब्लॉगचा reach (आवाका) वाढवायचा असल्यास डोमेन नाव रोड-ब्लॉक ठरू नये.

उदाहरणार्थ, गुगलने जर SearchEngine.com सारख्या नावाने सुरुवात केली असती तर ते एक सामान्य online search engine असण्यापलीकडे त्यांचा ब्रांडचा विस्तार करू शकले नसते.

जेव्हा आपल्याला एखादा मौल्यवान ब्रँड तयार करायचा असेल तेव्हा कीवर्ड फोकस केलेल्या विशिष्ट नावांपेक्षा ब्रँडबल नावे नेहमीच चांगली असतात.
तथापि, तुम्हाला फक्त एक छोटा niche blog तयार करून साइड प्रोजेक्ट म्हणून त्यावर काम करीत असल्यास, कीवर्ड-आधारित Domain Name ठीक आहेत.

तुमचे Domain Name नंतर बदलणे शक्य आहे काय?

तुम्ही विचार करत असाल की आताकुठे फक्त सुरवातच तर करायची आहे, कुल्यातरी नावाने डोमेन रजिस्टर करू. भविष्यात आपल्याला जर ब्लॉगचा चांगला रिझल्ट आला तर बघू मग डोमेन नाव बदलून चांगला ब्रँड बनवू ! अहं .. नाही!

आता तुम्ही Domain Name बदलू शकत नाही कारण कसाही असला तरी आता तुमचा डोमेन तुमचा ब्रँड झाला आहे. तुमच्या ब्लॉगच्या backlinks, popularity, आणि search traffic सर्व तुमच्या डोमेन नावाशी जोडलेले आहेत.

खूप कमी लोकांनी तोटे सहन न करता त्यांचे Domain Name यशस्वीरित्या बदलले आहे. उदा. SeoMoz.org यशस्वीरित्या Moz.com झाली आहे.

पण तुम्ही हि risk घेऊ नका कारण तुमच्या कडे मोठ्या ब्रँड एवढे रिसोर्सेस नाहीत. पुन्हा नव्याने branding, marketing, and SEO expertise करणे आपल्याला शक्य नाही.

चांगल्या डोमेन नावाने ब्लॉग सुरू करणे खूप महत्वाचे आहे. चांगल्या डोमेन नावाने सुरुवात न करणारे काही ब्लॉगर त्यांच्या वर्षांपूर्वी केलेल्या निवडीबद्दल नेहमीच दुःखी होतात.

काही ब्लॉगर वाईट Domain Name सह असे अडकतात कि ते नाव लक्षात ठेवणे users साठी कठीण होऊन जाते आणि जेव्हा कोणी त्यांची साइट शोधत असेल तेव्हा type-in mistakes होण्याची शक्यता असते.

उदाहरणार्थ, Yaro Stark एक सुप्रसिद्ध ब्लॉगर आहे, परंतु त्याचा ब्लॉग Entrepreneurs-Journey.com या डोमेन नावावर तयार केलेला आहे. आपल्या खासगी कोचिंग कार्यक्रमादरम्यान त्याने बर्‍याच वेळा असे म्हटले आहे की “या नावा व्यतिरिक्त आणखी चांगल्या नावाने सुरुवात करायला हवी होती”.

त्याच्या ब्लॉगची किंमत आज one million dollars आहे जर त्याच्याकडे अधिक चांगले डोमेन नाव असते तर 10% अधिक ब्रँडिंग, reach, आणि traffic त्याला मिळाली असती तर विचार करा आज त्याचे मूल्य किती असते?

नक्कीच, प्रत्येकजण ब्लॉगिंग करिअरच्या भविष्यातील यशाचा अंदाज लावू शकत नाही आणि आपल्यापैकी बहुतेकांकडे इतके पैसे उपलब्ध नसतात की त्यापासून खूप मोठी सुरुवात करता येईल.

तरीही, याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही कश्याही नावाने डोमेन घ्यावा. आपण मध्यम मार्ग काढून चांगल्या डोमेन नावासाठी तोडगा काढू शकता – विशेषत: जर आपण ब्लॉगिंगबद्दल खूपच गंभीर असाल तर.

याच विषयाला धरून आणखी एक उदाहरण देता येईल Darren Rowse नावाचा एक ब्लॉगर आहे. त्याच्या वेबसाईटचं नाव ProBlogger.net आहे. हे एक छान नाव आहे परंतु या नावामुळे त्याने खूप सारा ट्रॅफिक गमावला जो त्याला मिळू शकला असता.

याला मुख्य कारण होतं .com extension त्याच्या ब्लॉगच्या डोमेन नावात नसणे. जेव्हा लोक वेबसाइटबद्दल विचार करतात तेव्हा ते .com बद्दल विचार करतात.

Darren Rowse त्याच्या कडे .com डोमेन नसल्या कारणाने इतका traffic गमावत होता की त्याच्या प्रतिस्पर्धि कडे योग्य वेबसाइट नसतानाही ProBlogger.net चे अ‍ॅलेक्सा ट्रॅफिक नाटकीय पातळीवर जाऊ खाली जाऊ लागले! नंतर केवळ त्याच्या ब्रँडच्या संरक्षणासाठी त्याला ProBlogger.com अफाट रक्कम मोजून खरेदी करावे लागले.

म्हणूनच आपण अद्याप तुम्ही एखादे Domain Name निवडले नसेल तर आपल्या ब्लॉगसाठी योग्य डोमेन नाव निवडण्यास मदत करण्यासाठी खाली काही tips देत आहे. एक चांगले डोमेन नाव ठेवणे तुम्हाला कधीही फायदाच करून देईल आणि तुमचा स्वतःची एक मौल्यवान ब्रँड होईल.

How to Choose a Domain name in 5 steps:

step 1. Go for a .com… Always!

मी .com नावांचा मोठा चाहता आहे. अलिकडच्या वर्षांत बरीच डोमेन नेम extensions launched केली गेली तरीही .com त्याचे value गमावल्याचे दिसत नाही.

प्रत्येक वेळी जेव्हा एखादी कंपनी स्वत: चे .com extensions ब्रँड घेते तेव्हा प्रत्येक वेळेला .com आणखी ताकदवर बनून वर येते.

thankmelater.in

 

thnkmelater.in

AirAsia ने त्यांच्या सर्व एअरलाइन्स ग्राफिक्सची पुनर्बांधणी केली. यापूर्वी त्यांच्या फ्लाइटवर फक्त “एअरएशिया” म्हणून लिहिले जात होते आणि आता ते “AirAsia.com” मध्ये बदलले आहे.

अशा प्रकारे ब्रँडिंग क्रियाकलाप .com चे मूल्य वाढवतात!

सहसा, बरेच लोक .com किंवा जर .com extensions उपलब्ध नसल्यास .org वर जाण्यास प्राधान्य देतात. अर्थ साधा आणि सरळ आहे .com जर तुमच्या कडे नसेल तर भविष्यात तुमच्या कडे येणार मिलिअन्स traffic तुम्ही गमावून बसाल ( ProBlogger.net सारखा )

लोकांना extensions पेक्षा ब्रॅण्डची नावे अधिक लक्षात असतात आणि ते सहजपणे ब्रँडच्या पुढे .com टाइप करून मोकळे होतात.

मी माझा thankmelater.in ब्लॉग चालवत आहे तेव्हा बरेच लोक माझी वेबसाइट thankmelater.com म्हणून टाईप करत असतात. त्यामुळे मी दार महिना बराच traffic गमावतोय.

मी thankmelater.com च्या मालकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु तो 25,000 डॉलर्स एवढ्या भल्यामोठ्या किमतीत .Com विकण्याच्या विचारात आहे. कुठून आणायचं एवढा पैसे सांगा बरं!

तुम्ही premium domains साठी जाऊ इच्छित नसल्यास, कारण ती जरा महाग असतात. तुम्ही LeanDomainSearch येथे आपले नशीब देखील आजमावून पाहू शकता जिथे आपल्याला शब्दांच्या भिन्न संयोगांसह भरपूर प्रमाणात .com उपलब्ध असतात.

उदाहरणार्थ, आपण मोटारींविषयी ब्लॉग सुरू करणार असाल तर आपणास .कॉम नावाची prefix किंवा suffix असलेली ‘car’ या शब्दाची नावे सापडतील.

मला आत्ताच कळले की CarSigma.com हे Domain Name उपलब्ध आहे. हे कुठल्या car चे किंवा ब्लॉगचे नाव नाही, पण जर एखाद्या ते घेऊ इच्छित असेल तर…

step 2. Consider a premium .com domain name.

आता तुम्हाला खात्री झाली असेल कि .com हे Domain Name म्हणून का निवडावे.

कदाचित आता तुम्हाला पुढंचा प्रश्न पडला असेल कि जेवढी काही सर्वात चांगली .com extensions वाले नावं लोकांनी घेऊन झाली आहेत मग मी काय करावं?

होय, हे खरं आहे की बर्‍याच चांगली .com नावे आधीच घेण्यात आली आहेत, परंतु हे आपल्याला चांगले .com नाव मिळवण्यापासून रोखू शकत नाही. बर्‍याच .com ची नावे पुन्हा विकली जात आहेत. आपण प्रीमियम डोमेन नेम मार्केटप्लेसमधून चांगली .com डोमेन नावे शोधण्यात सक्षम असाल तर ती घेण्यात काहीचं गैर नाही.

खाली काही वेबसाईट आहेत जिथे तुम्ही प्रीमियम डोमेन search करू शकता:

अशी प्रीमियम डोमेन नावं marketplaces domain $50 ते $100,000 पर्यंत विक्री करतात. आपण काय नाव शोधत आहात याची मला खात्री नाही पण तरीही तुम्ही व्यवसायासाठी मोठी वेबसाईट तयार करण्याच्या गंभीरतेने विचारात असाल तर उच्च-गुणवत्तेच्या डोमेन नावावर $ 1000 पर्यंत ची गुंतवणूक करणे ही वाईट कल्पना नाही.

step 3. The domain should pass the “Phone Test

डोमेन नाव निवडण्यासाठी “Phone Test” सर्वात मूलभूत आवश्यकता आहे. जर एखादा डोमेन फोन टेस्ट पास करत नसेल तर ब्लॉग किंवा त्याभोवतालचा ब्रँड बनवण्यापूर्वी मी दोनदा विचार करेन.

मी फोनवर माझे Domain Name तुम्हाला सांगितले तर तुम्ही ते कसे टाइप करावे ते विचारात न घेता अचूकरीत्या टाइप करण्यास ते नाव सक्षम असायला हवे.

समजा मी तुम्हाला फोनवर “Digitalsameer.com” म्हणालो तर कदाचित आपण मला spelling न विचारता ते टाइप करू शकाल. Digital आणि sameer हे दोन्ही शब्द पुरेसे सामान्य आहेत आणि “.com” तर स्पष्टचं आहे.

“google.com वर भेट द्या” – असं मी फोनवर हे सांगितले तर पुन्हा येथे spelling mistakes होण्याची शक्यता नाही.

जेव्हा जेव्हा मी डोमेन नाव खरेदी करण्यासाठी पैसे गुंतवतो तेव्हा मी खात्री करतो की ते “Phone Test” उत्तीर्ण करतात ना ! जरी Domain Name 3 शब्दाचे असले तरी ते ठीक आहे, परंतु ही चाचणी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

step 4. Avoid Copyright infringement!

तुम्ही नवीन डोमेन निवडण्यापूर्वी, कोणत्याही विद्यमान ब्रँड कॉपीराइट धोरणांचे उल्लंघन करीत नसल्याचे सुनिश्चित करा. उदाहरणार्थ, “WordPress” आपल्याला त्यामध्ये “WordPress” extension सह Domain Name ठेवण्याची परवानगी देत नाही. जर तुम्ही तसे केले तर त्यांच्या official letter साठी सज्ज व्हा. (तरीही तुम्ही “WordPres” ऐवजी “WP” असे नाव वापरू शकता.)

step 5. Avoid hyphens!

तुम्ही एक niche ब्लॉग तयार करीत असल्यास आणि keyword rich डोमेन मिळवण्याचा विचार करीत असल्यास, त्यातील हायफन असलेल्या डोमेन नावांपासून दूर रहाणे चांगले.

कित्येक वर्षांपूर्वी हायफिनेटेड डोमेन नावाने रँक करणे सोपे होते, परंतु यापुढे असे नाही. जर आपण सध्याची रँकिंग सिस्टम पाहत असाल तर आपल्याला स्पष्टपणे दिसेल की हायफन समाविष्ट असलेले नाव वापरण्याऐवजी पर्यायी डोमेन शोधणे ही एक चांगली कल्पना आहे.

कधीकधी लोक असे सुचवतात की आपण आपल्या ब्लॉगच्या niche अनुसार आपले Domain Name निवडावे. परंतु त्यामध्ये “tech” आणि “blog” सारख्या शब्दांसह डोमेन नावे शोधत असलेल्या ब्लॉगरसाठी हा उत्तम सल्ला नाही, उदाहरणार्थः

Techtip, techblog, bloggertips इ . इंटरनेटवर अशीच नावे वापरुन आधीच हजारो ब्लॉग आणि वेबसाइट्स आहेत. या कारणास्तव, भविष्यकाळात आपल्यासाठी विशिष्ट ब्रँडचा भाग होऊ शकेल असे नाव निवडणे चांगले आहे.

Where To Register and Hold Your Domain Names

तुम्हाला registration साठी .com नाव उपलब्ध असल्यास, तुम्ही NameSilo किंवा Namecheap वर डोमेन नाव नोंदणीकृत करू शकता. या रजिस्ट्रारमध्ये नोंदणीच्या पहिल्या वर्षाची किंमत अत्यंत स्वस्त आहे – मुख्यत: सुमारे $ 2- $ 12. आहे.

नोंदणीनंतर दोन महिन्यांनंतर आपली डोमेन नावे Transfer करणे शक्य असते. जेव्हा तुम्ही आपल्या डोमेन नावे नवीन रजिस्ट्रारकडे Transfer करता तेव्हा ते आपल्याला एक वर्षाचे नूतनीकरण विनामूल्य देतील जे त्यांच्या सामान्य नूतनीकरणाच्या शुल्कापेक्षा सहसा स्वस्त असते.

आता एक पाऊल पुढे व्हा थांबू नका तुम्ही हे करू शकता मला विश्वास आहे जा आणि सर्वोत्तम Domain Name शोधा!

नवीन ब्लॉग सुरू करण्यापूर्वी आपल्या मनात अद्याप काही प्रश्न असल्यास, कमेंटद्वारे मोकळ्या मनाने व्यक्त झालात तर मला अधिक आनंद होईल.

तुमच्या मित्रांना, परिवाराला, नातेवाईकांना ज्यांना-कुणाला ब्लॉगिंग विषयी उत्सुकता असेल, ब्लॉग बनवायचा असेल, ब्लॉगिंग करून खूप पैसे कमवायचे असतील त्यांना हा लेख share करा.

because sharing is caring ❤️

Share on:

Leave a Comment