इंटरनेट वरून पैसे कमावण्याचे 12 मार्ग how to earn money online in Marathi Without Investment

how to earn money online in marathi : तुम्ही कधी विचार केला आहे का? की तुमच्या बरोबरच का असे घडले असावे?

याला कारण एकतर तुम्हाला माहित नसावं की, तुम्हाला पोहचायचं कुठे आहे? आणि मुख्य म्हणजे सुरुवात कुठून करावी?

आपल्याला भरमसाठ पैसे कमावण्याचा shortcut हवा असतो. मी तुम्हाला खरं सांगतो, पैसे मिळविण्याकरिता कोणताही शॉर्टकट नसतो. आपल्याला कठोर परिश्रम करावे लागतात.

उदाहरणार्थ मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो.

माझा एक मित्र एकदा एका digital festival साठी गेला होता. तेथे त्याने एका मुलाला एक मोठा बोर्ड लावून बसलेला पाहिला, “Earn money fast: simple and easy form and survey filling job”.

हा गडी लगेच उत्साहीत झाला, ही ऑफर त्याला आकर्षक वाटली. त्याने काउंटरजवळ जाऊन जॉब साठी साइन-अप केले. नोंदणी पूर्ण करण्यासाठी 2800 रुपयाची नोंदणी फी त्याला द्यावी लागेल असा करार होता. एकदा ते पूर्ण झाल्यानंतर, त्याला काही survey forms प्राप्त होतील आणि survey पूर्ण केल्यावर, त्याबदल्यात त्याला पैसे दिले जातील.

काही दिवस, त्याला आणखी ऑनलाइन survey forms येत होते. जे त्याने आनंदाने भरले आणि पाठविले. आतापर्यंत त्याचा महिना भरत आला होता. एके दिवशी त्याचं communication channel (ईमेल) सदर कंपनी पर्यंत पोहचायचे बंद झाले. त्याच्या कुठल्याही ईमेलचं उत्तर येईना. ज्याला 2800 रुपये दिलेले, तो मुलगा फरार झाला. … चुना लागला!

इथे इंटरनेटवर सुरु असलेल्या लाखो घोटाळ्यांपैकी हि एक छोटीशी कथा आहे. मी तुम्हाला ही गोष्ट सांगण्याचे कारण म्हणजे, तुम्हाला घाबरविणे नव्हे, तर वास्तविकता दाखवणे होय.

कुठल्याही job साठी साइन-अप करण्यापूर्वी proper verification करा. ब्रँड किंवा ब्रँडच्या मागे असलेल्या व्यक्तीबद्दल तपासा. अन्यथा, तुम्ही तासन्तास काम कराल आणि त्याचा मोबदला घ्यायची जेंव्हा वेळ येईल, त्यावेळेला तुम्हाला भोपळा मिळू शकतो. तेंव्हा जपून!

आज मी इंटरनेट वरून पैसे कमावण्यासाठी काही सोप्या आणि कायदेशीर मार्गांची माहिती तुमच्याशी share करणार आहे. हे ऑनलाईन काम कुणीही करू शकेल. 40 वर्षांचा गृहस्थ असो, 15 वर्षाचं शाळेत शिकणारं मूल असो किंवा सेवानिवृत्त व्यक्ती, आपण आपले पर्याय निवडू शकता आणि ऑनलाइन काम करण्यास सुरुवात करू शकता.

नवीन ब्लॉगर्स ना मला हे सांगायचंय कि, तुम्ही जेंव्हा एक मोठा ब्लॉग बनवण्यावर मेहनत घेत असता, तेंव्हा संघर्षाच्या काळात तुम्हाला सुरुवातीची बिले भरण्यासाठी थोडे तरी पैसे कमावणे गरजेचे असते. इंटरनेटचा व वीज बिलाचा खर्च ब्लॉगरच्या पाचवीलाचं पुजलेला असतो नाही का? 

म्हणूनच, पैसे कमविण्यात तुमची मदत करण्यासाठी, ऑनलाइन पैसे कमविण्याचे 12 मार्ग मी खाली देत आहे. ऑनलाइन पैसे कमविण्यासाठी तुम्हाला फक्त या दोन गोष्टींची गरज आहे. internet connection, आणि computer!

ऑनलाईन काम करून तुम्ही चांगल्या प्रकारे income मिळवू शकता. तुमची income किती होईल, हे तुम्ही किती वेळ मेहनत घेतली यावर अवलंबून असेल.

इंटरनेट वरून पैसे कसे कमवावे ?

(Without Investment)

प्रामाणिकपणे, सांगायचं म्हटलं तर इंटरनेवरून पैसे कमावण्याचे शेकडो मार्ग आहेत. जेव्हा आपण ऑनलाइन पहाल, तेव्हा तुम्हाला कायदेशीर काम देणाऱ्या वेबसाइट्स बरोबरचं scams असणाऱ्या वेबसाईट्स सुद्धा सापडतात.

तुम्हाला ते काम देण्याच्या बदल्यात initial investment करण्यास सांगणार्‍या वेबसाइट्स पासून लांब राहा. काम देण्यासाठी जर कुठल्याही प्रकारची फी आकारत असतील तर अशा programs पासून दूर राहण्याची मी तुम्हाला शिफारस करतो.

येथे मी ऑनलाइन पैसे कसे कमवायचे (how to earn money online) बद्दल काही मार्ग सांगत आहे, जे एकाच वेळी वापरायला सोपे,खात्रीशीर, आणि कायदेशीर आहेत. त्यापैकी काही कामांसाठी तुमच्याकडे चांगली संभाषण कला, चांगली लिखाण क्षमता इत्यादी विशिष्ट कौशल्ये असणे आवश्यक आहे.

तर मग जराही उशीर न करता, चला सुरु करूया! (ye re ye re paisa)

1. Fiverr वर आपली कौशल्ये विका

ऑनलाईन इंटरनेवरून पैसे कमविण्याकरिता Fiverr हे सर्वोत्तम ठिकाण आहे. ही वेबसाइट तुम्हाला कोणत्याही प्रकारचे काम देऊ शकते. ज्यामध्ये तुम्हाला चांगले कौशल्य आहे. आणि त्यातून तुम्ही खूप पैसे कमवू शकता. Fiverr वर join होणे सोपे आहे आणि हे तुमच्या सारख्या ईंटरनेट वापरकर्त्यांसाठी डिझाइन केले आहे, जे घरी राहून काम करून पैसे कमविण्यास इच्छुक आहेत.

Fiverr वर बर्‍याच यशोगाथा आहेत, आणि एकदा तुम्ही त्यांची वेबसाइट ब्राउझ केल्यास तुम्हाला बरेच कामं सापडतील. जे तुम्हाला एक चांगली सुरुवात करण्यास मदत करतील. सर्वात चांगला भाग, हि वेबसाइट विनामूल्य आहे आणि कोणत्याही गुंतवणूकीशिवाय पैसे कमविण्याचा एक किलर मार्ग आहे.

2. Become a Virtual Assistant: आभासी सहाय्यक व्हा

इंटरनेट वरून पैसे कमावण्याच्या मार्गांपैकी हा आणखी एक चांगला मार्ग आहे. जसजसे solopreneurs संख्या वाढत आहे, तसतसे आभासी सहाय्यकाची मागणी देखील वाढत आहे. व्हर्च्युअल असिस्टंट चे काम हे वैयक्तिक सहाय्यकासारखेच असते, पण फक्त virtually.

जसे की –

 • रिसर्च करणे
 • ई-मेलला प्रत्युत्तर देणे
 • content Writing करणे
 • comments चे नियमन करणे

virtual assistant चा job तुम्हाला दर तासाला सरासरी, 2 डॉलर ते 30 डॉलर पर्यंत कमवून देऊ शकतो. जे कुणी घराबाहेर जाऊन जॉब करून पैसे कमवू शकत नाही, त्यांच्यासाठी virtual assistant बनून इंटरनेट वरून पैसे कमावण्याचा हा एक फायदेशीर पर्याय आहे.

3. Article Writing Service: Article लिहिणे

ब्लॉगर आणि वेबमास्टर्स नेहमीच त्यांच्या ब्लॉग आणि वेबसाइटसाठी नवीन आणि unique content शोधत असतात. article writer होण्यासाठी तुमच्याकडे चांगले writing skills असणे आवश्यक आहे आणि काम देणाऱ्या व्यक्तीला जा विषयावर लेख लिहून हवा आहे त्या विषयावर लेख लिहिण्यास तुम्ही सक्षम असायला हवे.

इंटरनेट वरून पैसे कमविण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे.

लेख लिहिण्यासाठी पैसे देणाऱ्या वेबसाइटची सूची खाली देत आहेः

तुम्हाला शब्दांची आवश्यकता आणि गुणवत्ता यावर अवलंबून प्रति लेख 2 डॉलर्स ते 100 डॉलर्स दिले जातील. एखादा करार करताना तुम्हाला लेख, niche, शब्दांची संख्या इत्यादी गुणवत्तेविषयी सूचना दिली जाईल.

4. Freelancing:

घरून पैसे कमवायचेत : होय 

तुम्ही ग्राफिक डिझायनर किंवा फायनान्स मॅनेजर, लेखक असाल , तर Freelancing तुमच्यासाठी आहे. तुमचे कौशल्य कश्यात आहेत याचा विचार करणे आवश्यक आहे आणि त्याचा वापर करून तुम्ही इंटरनेट वरून पैसे कमवू शकता.

You can be your boss, can work from anywhere you like, and work according to your time schedule.

 • guru
 • upwork
 • peopleperhour
 • Fiverr

अर्थात, वेगवेगळ्या साइटचे पेमेंट वेळापत्रक आणि अटींचे भिन्न प्रकार आहेत. आपल्याला फक्त आपल्या गरजेनुसार साइट निवडण्याची आवश्यकता आहे. खासकरून fivverr ला भेट देण्यासाठी मी तुम्हाला शिफारस करेल.

वरीलपैकी कुठल्याही साइट्सवर Freelancing जॉबसाठी साइन अप करा, आणि तुमचं कौशल्य ज्या category मध्ये येतं तिथे join करा. कामाला लागा.. चला निघा..

टीपः एक चांगले प्रोफाइल तयार करा आणि तुमची strengths आणि मागील कामाचा उल्लेख करा. काम करून दिल्यानंतर लोकांना review देण्यास सांगा. हे आपल्याला फ्रीलांसिंग साइटवर नामांकित freelancer म्हणून स्थापित करेल.

5. स्वतःचा profitable blog बनवा

स्वतःचा profitable blog बनवा

तुम्हाला लिहिण्याची आवड असल्यास आणि तुमचे विचार, भावना किंवा तुमच्यात लोकांना काही शिकवण्या सारखं असेल तर ब्लॉगिंग आपल्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.

जर तुम्हाला वाटत असेल कि तुम्ही computer geek आहात किंवा tech-savvy आहात तर तुमचा ऑनलाईन प्रवास तुम्ही आजच सुरु करायला हरकत नाही.

जसं मला वाटत कि, मला ब्लॉगिंग बद्दल सखोल माहिती आहे, म्हणून मी स्वतःचा ब्लॉग बनवून लोकांना ब्लॉगिंग शिकायला मदत करतो. मी एक फुल-टाइम ब्लॉगर आहे आणि दरमहिना मी चांगली income घेतो. आज मी स्वतः स्वतःचा बॉस आहे.

ब्लॉगिंग करणे सोपे आहे, wordpress वर स्वतःचा ब्लॉग बनवून तुम्ही महिन्याकाठी लाखो रुपये कमवू शकता. ब्लॉगिंग सुरु करण्यासाठी तुम्हाला Domain आणि Hosting ची आवश्यकता असते.

ब्लॉगिंग करून तुम्हाला 2-3 महिन्यांत पैसे मिळायला सुरु होतील. तुम्ही किती वेळ, hard work आणि dedication देण्यास तयार आहात यावर हे सर्व अवलंबून आहे. ब्लॉगिंग करून तुम्ही इंटरनेट वरून पैसे कमवू शकता.

ब्लॉगिंग शिकण्यासाठी खालील मार्गदर्शकपर लेख वाचा

6.YouTube चॅनेल तयार करा:

 • तुम्ही घरून काम करू शकता.
 • गुंतवणूक आवश्यक: किमान

तुम्ही YouTube व्हिडिओंवर किती वेळा जाहिराती पहिल्या आहेत? जोपर्येंत मला YouTube मधून पैसे कमावण्याच्या संधींबद्दल माहित नव्हतं, तो पर्यंत मी सुद्धा तुमच्या सारखा या गोष्टीपासून अनभिन्न होतो. कि आपण YouTube वर व्हिडिओ अपलोड करुन उत्पन्न मिळवू शकतो.

फक्त technical ज्ञान असलेले video अपलोड करूनचं नाही तर, funny किंवा गंभीर विषयाचे videos बनवून सुद्धा तुम्ही चांगली कमाई करू शकता.

तथापि, तुमचा व्हिडिओ original असणे आवश्यक आहे. तुम्ही सहजपणे YouTube वर व्हिडिओ अपलोड करू शकता आणि अ‍ॅडसेन्स monetize करून कमाई करू शकता.

तुम्हाला खूप खर्च करण्याची किंवा professional camera किंवा असा कोणतीही गॅझेट खरेदी करण्याची आवश्यकता नाही. एक चांगला स्मार्टफोन व्हिडिओ रेकॉर्डर जादू करू शकतो. फक्त काही crazy moments कॅप्चर करण्यासाठी सज्ज राहा.

होम-मेकर कुकरी शो किंवा तत्सम content सुरू करण्याचा विचार करू शकता. जर तुम्हाला योगा, किंवा व्यायामाच्या कोणत्याही प्रकारात चांगले ज्ञान असेल, तर तुम्ही स्वतःचे DIY व्हिडिओ तयार करू शकता, ते यूट्यूबवर अपलोड करू शकता आणि त्यावर जाहिराती (ads) लावू शकता. आणि इंटरनेट वरून पैसे कमवू शकता.

7.तुमच्या Clients साठी Guest पोस्टिंग करा

आवश्यक कौशल्ये:

1.लेखन आणि ग्राहक संवाद

2.घरून केले जाऊ शकते:

हे आपल्याला भरपूर इंटरनेट वरून पैसे कमविण्यास मदत करू शकते. ट्रॅफिक, एक्सपोजर, विश्वासार्हता आणि search engines मधील मान्यता या संदर्भात guest पोस्टिंगचे चांगले फायदे आहेत.

तुम्ही thankmelater या माझ्या ब्लॉगवर एखादी guest post लिहिली तर मी तुम्हाला पैसे मोजायलाही तयार आहे, अट फक्त एकचं आहे तुमचं artical उच्च दर्जाचे हवे. 

माझ्यासारखे असेच आणखी clients तुम्हाला हजारो डॉलर्स देऊ शकतात. यासाठी तुमच्याकडे लेखन कौशल्य असणे आवश्यक आहे. चांगले लेखन कौशल्य तुम्हाला इंटरनेट वरून पैसे कमविण्यास मदत करू शकते.

8. Affiliate Marketing

Affiliate marketing हा कोणासाठीही पैसे कमावण्यास सुरुवात करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. यासाठी शून्य गुंतवणूकीची आवश्यकता आहे, आणि तुम्ही तुमचा ब्लॉग किंवा ट्विटर, फेसबुक सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून इंटरनेट वरून पैसे कमवू शकता.

मला माहित आहे की कित्येक ब्लॉगर्स केवळ affiliate marketing करून घरी बसून लाखो रुपये कमवत आहेत.

काही काही Affiliate Programs ची लिंक देत आहे.

जा साइन-अप करा आणि पैसे कमवा!

9. Bitcoin and Cryptocurrencies

Bitcoin and Cryptocurrencies

हे 2021 साल आहे आणि या जगात cryptocurrencies आहेत यात तीळमात्र शंका नाही.

तसे पाहिल्यास डॉट कॉम बूम, बिटकॉइन आणि क्रिप्टोकरन्सीज या अगदी मूलभूत टप्प्यावर आहेत पण तुम्ही थोडी मेहनत घेतल्यास इथे बरेच पैसे कमवू शकता.

सर्वात चांगला भाग म्हणजे, तुम्हाला याबद्दल बहुतेक माहिती ऑनलाइन मिळू शकेल. पण मी तुम्हाला शिफारस करतो की, तुम्ही गुंतवणूक करण्यास सुरवात करण्यापूर्वी काही दिवस बिटकॉइन आणि क्रिप्टोकरन्सीजबद्दल संपूर्ण माहिती घ्या.

ही बाजारपेठ नवीन आहे आणि बर्‍याच लोकांचा यामध्ये प्रवेश होत असल्याने, तुम्ही येत्या काही महिन्यांत किंवा काही वर्षांत बरीच वाढीची अपेक्षा करू शकता.

क्रिप्टोकरन्सी बाबत तुम्ही सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला आवश्यक अशी काही उत्कृष्ट साधने आणि संसाधने येथे आहेतः

 • coinbase : Get free $10 when you buy/sell Cryptos for $100
 • binance : An exchange where you can deposit Bitcoin and Ethereum to start buying other low cap and high probability crypto coins.
 • Cex : An international website to buy Bitcoin, Ethereum, and a few other popular Cryptocurrencies using credit/debit cards.

तुम्हाला इथे काही ओळींमध्ये क्रिप्टोकरन्सीद्वारे पैसे कसे कमवू शकता हे मी स्पष्टपणे सांगू शकत नाही, परंतु येथे काही सूचना आहेतः

 • क्रिप्टोकरन्सी गुंतवणूक (चांगली नाणी खरेदी करणे)
 • क्रिप्टोकरन्सी ट्रेडिंग

मी वर म्हटल्याप्रमाणे, क्रिप्टोकरन्सीजबद्दल आपल्याला आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट शिकण्यासाठी तुम्ही ऑनलाईन खोलवर माहिती घ्या. आणि तरचं तुम्ही क्रिप्टोकरन्सीद्वारे इंटरनेट वरून पैसे कमवू शकता.

10. Online Paid Surveys

झटपट पैसा मिळविण्याची ही सर्वात सामान्य पद्धत आहे. हे ऑनलाइन सर्वेक्षण कसे काम करतात? थांबा मी तुम्हाला समजावून सांगतो.

बर्‍याच सर्वेक्षण कंपन्या आहेत ज्या सहसा इंटरनेट वापरकर्त्यांना त्यांच्या लोकप्रिय उत्पादन आणि सेवांविषयी तुमच्या opinion किंवा views च्या बदल्यात तुम्हाला पैसे देतात.

आपण ऑनलाईन पैसे कमविण्यासाठी एखादी मनोरंजक पद्धत शोधत असाल तर विश्वासू सर्वेक्षण कंपनीकडे नोंदणी करण्याचा विचार करा, आणि पुढे जा. पण जरा सांभाळून, कारण इंटरनेटवर याच विषयावर सर्वात जास्त scam होतात. be careful!

सशुल्क सर्वेक्षण मिळविण्यासाठी काही कार्यरत वेबसाइट्सः

तरीही, तुम्ही कोणत्याही ऑनलाइन सर्वेक्षण प्रोग्रामसाठी नोंदणी करण्यापूर्वी, त्यांची TOS वाचल्याचे सुनिश्चित करा, कारण बरेच कार्यक्रम यू.एस. किंवा कॅनडासारख्या विशिष्ट देशांमधीलचं participants स्वीकारतात.

वैयक्तिकरित्या, मी शिफारस करतो कि, सर्वेक्षणांसाठी पैसे देणारी चांगली साइट शोधा, कारण paid surveys करणाऱ्या बऱ्याच साईट्स फेक असतात.

11. वेबमास्टर्स आणि वेबसाइट मालकांसाठी ब्रोकर बना

वेबमास्टर फोरममध्ये सामील व्हा. आणि त्यांना जाहिराती देणारे ग्राहक मिळवून कमिशन कमवा. या प्रकारचे काम करण्यासाठी विक्रेत्यांशी संपर्क साधा.

इंटरनेट वरून पैसे कमविण्याचा आणखी एक लोकप्रिय मार्ग म्हणजे एखाद्यास त्यांची वेबसाइट किंवा डोमेन विकण्यात मदत करणे. हा एक मोठा व्यवसाय आहे आणि प्रत्येक यशस्वी विक्रीसह, आपण $ 20- $ 20,000 पर्यंत पैसे मिळवू शकता.

ऑनलाईन इंटरनेट वरून पैसे कमविण्याचे हे सर्व विनामूल्य मार्ग आहेत. व तुम्हाला तुमचा ब्लॉग अधिकाधिक उंचीवर नेण्यासाठी आणि तुम्हाला या ब्लॉगिंग करिअर मध्ये टिकून ठेवण्यासाठी अशी छोटी-छोटी deals उपयोगी पडतात.

टीप : कमिशन हे सहसा वेबसाइट किंवा डोमेनच्या विक्री किंमतीच्या 10% असते.

ब्लॉगर्स साठी मुद्दामून मी इथे नमूद करू इच्छितो की, त्यांनी जास्तीस-जास्त वेळ आपल्या मुख्य ब्लॉग वर द्यावा. तुमच्या नोकरी आणि तुमचा ब्लॉग यावर वेळेचं नियोजन करा. तुमची नोकरी आणि ब्लॉगचा वेळ दुसऱ्या कामांकडे वळवू नका.

12. ट्रान्सक्रिप्शन फ्रीलांसर बना

पॉडकास्ट आणि व्हिडिओ content ची संख्या जसजशी वाढत आहे, तसतसे ऑडिओला मजकूर स्वरूपात text format मध्ये करण्यासाठी Freelancers ची मागणी देखील आहे. Rev सारख्या सेवा आहेत ज्या तुम्हाला घरून काम करू देतात आणि ट्रान्सक्रिप्शन फ्रीलान्सिंग गिगद्वारे तुम्ही इंटरनेट वरून पैसे कमवू शकता.

होम गिगद्वारे कामाचे फायदे :

 • रेव फ्रीलान्सिंग जॉब तुम्हाला पाहिजे तेव्हा पाहिजे तितके किंवा थोडे काम करण्याची परवानगी देते.
 • आपल्याला आवडत असलेल्या विविध प्रकल्पांमधून निवडण्याचा पर्याय वापरू शकता.
 • पूर्ण झालेल्या सर्व कामासाठी पेपल मार्गे साप्ताहिक पेआउट प्राप्त करा. रेव ऑन-टाइम आणि विश्वासार्ह आहे.

इथे अश्या अनेक संधी आणि पर्याय आहेत ज्या तुम्ही स्वतः निवडू शकता आणि ऑनलाइन इंटरनेट वरून पैसे कमवू शकता. काही काळ एखाद्याला कामाला चिकटून राहण्याचा प्रयत्न करा, आणि कोणती गोष्ट work करते आणि कुठली गोष्ट तुमच्यासाठी work करत नाही हे पहा.

हे काम करतांना यशश्वी न होण्या मागचं सर्वात सामान्य कारण म्हणजे लोक एकाच वेळी एकाधिक पर्यायांचा वापर करतात. आणि एका कामात वापरायची शक्ती अनेक जागी खर्च करतात, त्यामुळे मग अपयश पदरात पडतं.

तुम्ही ती चूक करू नका! एकाग्रतेने एकाच कामात आपली सर्व शक्ती लावा, आणि यशश्वी व्हा!

तुम्ही ऑनलाइन पैसे मिळविण्यासाठी कोणतीही इतर पद्धत वापरत असल्यास मला कॉमेंट बॉक्स मध्ये कळवा. तुम्ही वरीलपैकी कोणती पद्धत वापरुन पाहिली आहे का? असेल तर माझ्याशी share करा. मी तुम्हाला ऑनलाईन पैसे कमावण्यासाठी शुभेच्छा देतो. खूप पैसे कमवा!!!

तुम्हाला इंटरनेट किंवा इंटरनेट वरून पैसे कसे कमवावे (how to earn money from internet) या बद्दल आणखी हवी असल्यास किंवा, ज्यांना-कुणाला ब्लॉगिंग विषयी उत्सुकता असेल, ब्लॉग बनवायचा असेल, ब्लॉगिंग करून खूप पैसे कमवायचे असतील त्यांना हा लेख share करा.

because sharing is caring ❤️

Share on:

4 thoughts on “इंटरनेट वरून पैसे कमावण्याचे 12 मार्ग how to earn money online in Marathi Without Investment”

Leave a Comment