कलौंजिला मराठीत काय म्हणतात? 10 प्रभावी आरोग्य फायदे : kalonji in marathi

kalonji in marathi : भारतीय स्वयंपाकघराला विविध आयुर्वेदिक वनस्पतींचा खजिना असे म्हटले तर वावगं ठरू नये! याला कारणही तसेच आहे. भारतीय स्वयंपाकघरात अनेक प्रकारचे मसाले वापरले जातात.

यातील अनेक मसाले हे औषधी गुणांनी परिपूर्ण असतात व किरकोळ आजारात अगदी घरच्या घरी उपचार करण्यासाठी सुरक्षित आणि उपयुक्त ठरतात.

यापैकीच आणखी एक आश्चर्यकारक फायदे असलेला पदार्थ म्हणजे “कलौंजि” (kalonji plant in marathi) कलौंजि हा पदार्थ आपल्या किचनमध्ये बिया स्वरूपात आढळतो.

याचा वापर प्रामुख्याने मसाला बनविताना केला जात असला तरी, किरकोळ स्वरूपाच्या अनेक आजारांवर कलौंजिचे सेवन रामबाण उपाय ठरते. अनेक जीवनसत्वाने युक्त हा पदार्थ रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयोगी आहे.

kalonji in marathi

kalonji meaning in marathi
kalonji

kalonji meaning in marathi : कलौंजि या वनस्पतीचे शास्त्रीय नाव Nigella Sativa (निजेला सटाईव्हा) असे आहे, जे लॅटिन शब्द “निजर” म्हणजे (काळा) पासून घेतले आहे.

इंग्रजी मध्ये कलौंजि या वनस्पतीला Black seeds असे म्हणतात. तर हिंदीमध्ये कलौंजि किंवा “प्याज के बीज” किंवा “मंगरेला” असे म्हटले जाते. याचे संस्कृत मध्ये नाव “कृष्णजीरा” असे आहे.

भारत सहित दक्षिण पश्चिम आशियायी भूमध्य सागराच्या तटीय प्रदेशात तसेच, उत्तर आफ्रिकेत kalonji चे पीक घेतले जाते. कलौंजिचे रोप २० ते ३० सेंटीमीटर उंच असते.

लांबट पातळ विभाजित पाने, मुलायम पांढरे किंवा फिक्कट निळ्या रंगांची फुले या रोपाला लागतात. चेंडूच्या आकाराचे याला फळ येते आणि या फळाच्या बिया (kalonji seed in marathi) म्हणजेच कलौंजि होय.

चमत्कारिक औषधी गुणांनी भरपूर असणारे हे बीज अनेक रोगांवर रामबाण इलाज आहे. असे म्हटले जाते कि मृत्यु सोडला तर प्रत्येक आजारावर हे गुणकारी औषध काम करते.

अनेक प्रकारच्या आजारावर वर्षानुवर्षे उपचार म्हणून कलौंजिचा वापर केला जातो. वरील भागात आपण पाहिलंच की विविध भाषेत कलौंजिला काय म्हटले जाते. तर मराठी भाषेत याला काय पर्यायी शब्द आहे ते आता आपण पाहू.

खरं तर, ब्रोन्कायटीसपासून ते अतिसार (diarrhea) पर्यंतच्या प्रत्येक गोष्टीचा नैसर्गिक उपाय म्हणून अनेक शतके याचा उपयोग केला जात होता. तर मराठी भाषेत याला एक ठराविक असे नाव नाही, लोक वेगवेगळ्या प्रकारे या बियांना संबोधतात.

त्यातील काही नावे हे पुढील प्रमाणे आहेत. तुम्हाला जे नाव सोपं वाटेल त्याचा वापर तुम्ही तुमच्या दैनंदिन व्यावहारिक जीवनात करू शकता.

 • कलौंजि (मराठी/हिंदी)
 • मंगरेला (हिंदी/मराठी)
 • काळं जिरं (मराठी)
 • निगेला बियाणे (मराठी)
 • काळे कांदा बियाणं (मराठी)
 • ब्लॅक सीड (इंग्रजी)
 • काला जीरा (हिंदी)
 • प्याज के बीज (हिंदी)
 • कृष्णजीरा (संस्कृत)
 • नायजेला सॅटिवा/Nigella Sativa (शास्त्रीय नाव)

कलौंजिचा उपयोग kalonji meaning in marathi

कलौंजिचा वापर औषधे, सौन्दर्य प्रसाधने, मसाले व सुगंधी व्यंजने बनवण्यासाठी केला जातो. प्रामुख्याने भारतीय स्वयंपाकघरात याचा मसाले म्हणून वापर केला जातो.

चवीला कलौंजि सौम्य प्रमाणात कडू व तिखट असते. याचा उपयोय ब्रेड, नान, केक किंवा लोणचंबनवण्यासाठी केला जातो.

कलौंजिचे फायदे kalonji meaning in marathi

kalonji meaning in marathi
कलौंजि/kalonji

टाइप -2 मधुमेह

दरदिवशी नियमित २ ग्राम कलौंजि खाल्ल्याने वाढतं ग्लुकोजचं प्रमाण कमी होऊ शकत. इन्सुलिन रेजिस्टेंस मध्ये घट होते, बीटा सेलच्या कार्यप्रणालीमध्ये वाढ होते आणि ग्लायकोसिलेटिड हिमोग्लोबीन कमी होण्यास मदत होते.

एका टेस्ट-ट्यूब अभ्यासानुसार कलौंजि तेलाने आवश्यक अँटीऑक्सिडंट म्हणून देखील काम केले. (Trusted Source)

मधुमेह असलेल्या 57 लोकांवर केलेल्या एका अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की, एक वर्षापर्यंत आहारात पूरक प्रमाणात कलौंजिचा समावेश केल्याने एलडीएल कोलेस्ट्रॉल कमी झाला आहे. (Trusted Source).

कॅन्सर

२०२१ मध्ये समोर आलेल्या एका संशोधनानुसार मध आणि कलौंजिच्या तेलात ट्युमर विरोधी गुण आढळून आले आहेत. जे कर्करोगाच्या पेशींची होणारी अनियंत्रित वाढ रोखण्यास सक्षम आहेत.

यामध्ये असणारे Antioxidants हा असा पदार्थ आहे जो हानिकारक मुक्त रॅडिकल्सला neutralize करतो आणि पेशींचे होणारे ऑक्सिडेटिव्ह नुकसान टाळतो.

काही अभ्यासक असे सूचित करतात की अँटीऑक्सिडंट्स हे कर्करोग, मधुमेह, हृदयरोग आणि लठ्ठपणा अश्या अनेक प्रकारच्या रोगांचे तीव्र परिस्थितींपासून संरक्षण करू शकतात. (Trusted Source).

मधुमेह असलेल्या लोकांमध्ये केलेल्या अभ्यासानुसार असे आढळले आहे की दररोज १२ ग्रॅम कालौन्जी १२ आठवड्यांसाठी घेतल्यास total आणि एलडीएल कोलेस्ट्रॉल (“bad” LDL cholesterol) दोन्ही कमी होते. (Trusted Source).

कोलेस्ट्रॉल

कोलेस्ट्रॉल हा आपल्या शरीरात चरबीसारखा पदार्थ आहे. आपल्याला कोलेस्टेरॉलची आवश्यकता असते परंतु, जंक-फूड मुळे व पुरेसा पौष्टिक आहार न घेतल्यामुळे आपल्या रक्तात उच्च प्रमाणात कोलेस्टेरॉल तयार होऊ शकते आणि हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.

१७ अभ्यासकांनी मिळून केलेल्या एक स्टडी मध्ये असे दिसून आले आहे की कॅलोन्जी बरोबर पूरक पौष्टिक आहार घेतल्यामुळे एकूण आणि “bad” LDL cholesterol तसेच blood triglycerides या दोन्हीमध्ये महत्त्वपूर्ण घट झाली आहे.

विशेष म्हणजे, हे देखील आढळले की कालौन्जीच्या बियाणे पावडरपेक्षा कलौंजिच्या तेलाचा जास्त प्रभाव होता. (Trusted Source)

रक्तदाब (Blood pressure)

एक कप गरम पाण्यात अर्धा चमचा एका कलौंजिचे तेल टाकून दिवसातून दोनदा पिण्यामुळे रक्तदाब नियंत्रित होतो. एक चमचा कलौंजिच्या तेलात २० मिली ऑलिव्ह ऑईल मिसळून शरीरावर मालिश केल्यानंतर अर्धा तास उन्हात उभे राहिल्यास रक्तदाब कमी होतो.

हा उपाय दर तिसऱ्या दिवशी एक महिना केल्यास याचा फायदा होतो.

यकृत

यकृत हा एक महत्त्वपूर्ण अवयव आहे. हे विषारी पदार्थ आपल्या शरीरातून काढून टाकते, औषधांचे चयापचय करते, पोषक प्रक्रिया करते आणि आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या प्रथिने आणि रसायने तयार करते.

कित्येक प्राण्यांच्या आश्वासक अभ्यासानुसार असे आढळले आहे की कलौंजि यकृताची इजा आणि नुकसानीपासून संरक्षण करू शकते. (Trusted Source).

पोलिओ

अर्धा कप गरम पाण्यात एक चमचे मध मिसळून अर्धा चमचा कलौंजिचे तेल घालून उपाशी पोटी पिल्याने पोलिओ होण्याचा धोका कमी होतो.

कलौंजिचे आणखी काही फायदे kalonji in marathi

kalonji meaning in marathi
kalonji seed
 • कलौंजिचा काढा बनवून पिल्याने गर्भधारणेदरम्यान होणाऱ्या वेदना कमी होण्यास मदत होते.
 • कलौंजिची पेस्ट बनवून रात्री झोपतांना चेहऱ्यावर लावण्याने मुरूम होण्याचा त्रास कमी होतो.
 • सांधेदुखीवर कलौंजिचा काढा फायदेशीर आहे.
 • ज्यांना स्वप्नदोष होण्याचा त्रास आहे त्यांनी एक कप सफरचंदाच्या रसात अर्धा चमचा कलौंजिचे तेल घालून पिल्यास फायदा होतो.
 • झोपण्यापूर्वी एक कप गरम पाण्यात अर्धा चमचा कलौंजिचे तेल घालून पिल्यास मानसिक तणाव दूर होण्यास मदत होते.
 • ज्यांना संधिवाताचा त्रास आहे त्यांनी कलौंजिचा काढा पिल्यास फायदा होतो.
 • ज्यांना निद्रानाशाचा त्रास आहे त्यांनी, झोपण्यापूर्वी एक कप गरम पाण्यात अर्धा चमचा कलौंजिचे तेल घालून पिल्यास शांत झोप लागण्यास मदत होते.
 • सूज असल्यास कलौंजि वाटून सूज असलेल्या भागावर लेप लावल्यास सूज कमी होते.
 • उलटी (Vomiting) होण्याचा ज्यांना त्रास आहे त्यांनी सकाळी अर्धा चमचा आल्याचा रस आणि अर्धा चमचा कलौंजिचे तेल हे मिश्रण पिल्यास त्रास नाहीसा होतो.
 • ५० ग्रॅम कलौंजि एक लिटर पाण्यात उकळून त्या पाण्याने केस धुतल्यास केसांची वाढ जलद होते.

कलौंजि खाण्याचे काही नुकसान kalonji in marathi

आपण वर बघितल्या प्रमाणे कलौंजिचे (kalonji meaning in marathi) आरोग्यविषयक अनेक फायदे आहेत आणि ते मसाल्याच्या रूपात किंवा मसाला म्हणून सामान्यतः सुरक्षित असतात, तर कॅलोंजी supplement म्हणून घेतल्यास किंवा कलौंजि तेल वापरण्याचे काही दुष्परिणाम सुद्धा असू शकतात.

काही टेस्ट-ट्यूब अभ्यासानुसार असे आढळले आहे की कलौंजि आणि त्याचे घटक रक्त गोठण्यास प्रभावित करतात. जर तुम्ही रक्त गोठण्यासाठी औषध घेत असाल तर, कलौंजि सप्लीमेंट्स घेण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांशी सल्लामसलत करून खात्री करा. (Trusted Source).

याव्यतिरिक्त, काही प्राण्यांवर केलेल्या अभ्यासानुसार असे आढळले आहे की गर्भधारणेदरम्यान कलौंजि सुरक्षितपणे सेवन केले जाऊ शकते, परंतु एका प्राण्यांच्या अभ्यासानुसार असे आढळले आहे की हे तेल मोठ्या प्रमाणात वापरल्यास ते गर्भाशयाच्या आकुंचन कमी करते. (Trusted Source).

आपण गर्भवती असल्यास, हे मध्यम प्रमाणात वापरण्याची खात्री करा किंवा वापर करण्याआधी आपल्याला काही समस्या असल्यास आपल्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

तात्पर्य

तर मित्रांनो आज आपण काय शिकलो? आपण हे शिकलो की कलौंजि म्हणजे काय? (kalonji meaning in marathi) कलौंजिचे शास्त्रीय नाव काय आहे?

तसेच कलौंजिला आणखी किती नावाने ओळखले जाते? कलौंजि खायचे किती फायदे आहेत? यात काय काय पौष्टिक तत्वे आहेत? कलौंजिला आपल्या मराठी भाषेत कुठल्या नावाने ओळखतात?

वरील सर्व प्रश्न आणि कलौंजि बद्दल बरीच माहिती आपण या लेखात समजून घेतली आहे. मला आशा आहे तुम्हाला माझा हा लेख (kalonji mhanje kay marathi) नक्की आवडला असेल तुमचे आणखी काही प्रश्न असतील तर नक्की कॉमेंटबॉक्स मध्ये कळवा. लेख आवडल्यास सोशल मीडियावर शेअर करा.

Disclaimer

प्रस्तुत लेखातील सूचना आणि सल्ले हे केवळ सामान्य माहितीसाठीच आहेत, यांना व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून घेतले जाऊ शकत नाही. कृपया आरोग्यविषयक कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Share on:

1 thought on “कलौंजिला मराठीत काय म्हणतात? 10 प्रभावी आरोग्य फायदे : kalonji in marathi”

Leave a Comment