लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी (labhale amhas bhagya bolato marathi lyrics)

labhale amhas bhagya bolato marathi lyrics: “लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी” एकताक्षणी तमाम मराठी भाषिकांच्या अंगावर शहारे आणणारे हे आपले “मराठी अभिमान गीत“. या संपूर्ण गीताच्या ओळी म्हणजेच (lyrics) आज आपण जाणून घेणार आहोत. पण त्या आधी आपण या गीताबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात.

जसे की हे गीत कुणी लिहिले त्या कवीचे नाव काय? त्यांचे आणखी कुठले साहित्य उपलब्ध आहे? या सर्व गोष्टींवर आज आपण प्रकाश टाकणार आहोत. तर मित्रांनो या महान महाराष्ट्र गीताचे गीतकार आहेत अखंड महाराष्ट्राचे मानबिंदू ‘मराठी गझलसम्राट’सुरेश भट.

“लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी” हे गीत मराठी मनाला प्रचंड ऊर्जा देणारे आहे. मराठी नवीन वर्ष गुढीपाडवा असो की, मराठी भाषा दिन असो किंवा महाराष्ट्र दिवस असो या गीताचे गायन झाल्याशिवाय आपण तो उत्सव पूर्ण झाल्यासारखे वाटतच नाही. कारण मायमराठीचे कौतुक करण्यासाठी हे सर्वात उत्त्तम गाणे आहे. म्हणून या गीताचे लेखक कवी सुरेश भट यांच्याबद्दल आपल्याला माहिती असलीच पाहिजे. चला तर मग थोडक्यात जाणून घेऊया गझलसम्राट’सुरेश भट यांच्याबद्दल.

सुरेश भट यांच्याबद्दल माहिती (labhale amhas bhagya bolato marathi lyrics)

labhale amhas bhagya bolato marathi lyrics
Suresh Bhat

labhale amhas bhagya bolato marathi lyrics: कवी सुरेश भट यांचा जन्म दि . 15 April 1932 या दिवशी अमरावतीला झाला. त्यांचे वडील श्रीधर भट हे व्यवसायाने डॉक्टर होते. त्यांच्या आईला कवितांची प्रचंड आवड होती. त्यांच्यामुळे सुरेश भट यांना लहानपणीच मराठी कवितांची गोडी निर्माण झाली. सुरेश भट यांनी ते अडीच वर्षाचे असताना पोलिओची बाधा झाली. त्यामुळे त्याचा उजवा पाय जन्मभरासाठी अधू झाला होता.

कवी सुरेश भट यांनी मराठी भाषेत गझल हा काव्यप्रकार पहिल्यांदाच रुजवला. त्यामुळे त्यांना ‘गझलसम्राट’ असे मानाने संबोधले जाते.

शिक्षण आणि काव्यरचना

सुरेश भटांचे संपूर्ण शिक्षण अमरावती येथेच झाले. बी.ए. च्या अंतिम वर्षाला दोन वेळा नापास झाल्यावर शेवटी १९५५ साली ते बी.ए. पास झाले. त्यानंतर त्यांनी शिक्षक म्हणून नोकरी स्वीकारली. अमरावती जिल्ह्यात ग्रामीण भागात नोकरी करताना त्यांनी त्यांचे काव्यलेखन सुरू ठेवले होते. त्यांनी लिहिलेल्या कवितांची एक वही हृदयनाथ मंगेशकरांना एका फुटपाथवर सापडली. (labhale amhas bhagya bolato marathi lyrics) त्यातील कविता वाचून ते खूप प्रभावित झाले व त्यांनी सुरेश भटांना शोधून काढले.

मंगेशकरांनी त्यांच्या कवितांना चाली लावून त्या कविता अमर केल्या. त्यांच्या गझला व कविता हृदयनाथ मंगेशकर, लता मंगेशकर, आशा भोसले, सुरेश वाडकर आदींनी गायल्या आहेत. गडचिरोली येथे भरलेल्या ३९ व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष देखील होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता. बाबासाहेबांप्रमाणे आयुष्याच्या अखेरच्या पर्वात सुरेश भट यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला होता.

सुरेश भट यांची संगीतसेवा

त्यांच्या आईसाहेबांमुळे शालेय जीवनातच त्यांना संगीताची गोडी लागली होती. त्यांच्या आई स्वतः हार्मोनिअम वाजवत. त्यांनी मैदानी खेळ खेळण्यास असमर्थ असणाऱ्या आपल्या लाडक्या मुलासाठी बाजाची पेटी आणली होती. भट यांचे वडील- श्रीधरपंतही संगीतप्रेमी होते. त्यांच्याकडे एच. एम. व्ही.चा एक ग्रामोफोन होता, मुलाची आवड पाहून आठवड्यातून ते एक तरी ध्वनिमुद्रिका विकत आणायला विसरत नसत.

ही संगीत आवड सुरेश भट यांना शाळेच्या बँडपथकात घेऊन गेली. तिथे ते बासरी वाजवीत. संगीतातील प्रगती पाहून श्रीधरपंतांनी सुरेशला रीतसर संगीत शिक्षण द्यायचे ठरविले. आजारी असताना सुरेश भट तासन् तास अंथरुणावर बासरी वाजवत बसलेले असायचे. सुरेश भट हे सुद्धा स्वतः उत्तम गायक होते. त्यांचा गायनाचा एक कार्यक्रम अमरावतीत २०-२-१९८४ रोजी झाला होता. त्यावेळी साथीसाठी पेटीवर हृदयनाथ मंगेशकर होते.

अंथरुणावर बसून आणि पडून असतांना सुद्धा त्यांनी गुलाबराव महाराज यांचा ‘गानसोपान’ हा ग्रंथ आणि विष्णू नारायण भातखंडेकृत ‘संगीत खंड’, असे अनेक ग्रंथ सुरेश भट यांनी त्याच काळात वाचले होते. त्यांनी ‘गानसोपान’ची अनेक पारायणे केली होती. संगीत शिकण्याची जिद्द पहा ! १९५२ ला त्यांना तबला शिकावासा वाटल्यावर तो ही ते शिकले. पुढे ते ढोलकीही वाजवीत असत.(labhale amhas bhagya bolato marathi lyrics)

शारीरिक व्यंग तरीही पट्टीचे खेळाडू

सुरेश भटांचा एक पाय दुर्बल झाल्यावर त्यांनी व्यायामावर जोर देण्याचे ठरविले व बाकीचे शरीर मजबूत बनवले. याचा उपयोग त्यांना त्याच्या गाण्यातही झाला. ते तासन् तास मैफली करू शकत असत. ते दंड-बैठका काढतच पण डबलबारवर १०० ते १५० डिप्स सुद्धा मारत. त्यामुळे इतकी शक्ती पायात आली की ते बिनदिक्कत सायकल चालवू लागले. वडिलांनी त्यांना मिलर कंपनीचा डायनोमा असलेली रॅले कंपनीची एक सायकल महाविद्यालयात जाण्यासाठी दिली होती.

१९६५ मध्ये जेव्हा अमरावती रेल्वेस्थानकावर उड्डाणपूल बनला तेव्हा अमरावतीतील सायकल रिक्षावाले त्यावर उतरून ती चढण चढत असत. पण सुरेश भट आपला भाऊ दिलीप याला डबलसीट घेऊन एका दमात ती चढण चढत. ते कबड्डी, व्हॉलीबॉलही खेळत. ते आकाशदिवा, पतंग, कॅलिडोस्कोप (शोभादर्शक) आणि पेरिस्कोप (परिदर्शक) सुद्धा उत्तम बनवीत.

काचा कुटून पतंगाचा मांजा बनविण्यात ते कमालीचे वाकबगार होते. सुरेश भट यांना गुलेर (बेचकी किंवा गलोल) बनविता येई. त्यांचा नेम अचूक असे. ते पाहून श्रीधरपंतांनी त्यांच्यासाठी खास अमेरिकन स्लिंग शॉट बंदूक आणून दिली होती. ती वापरून भट चिमणी, कबुतर घायाळ करीत. ते भालाफेकही करीत. (labhale amhas bhagya bolato marathi lyrics)

कवी सुरेश भट यांचा काव्यसंग्रह

“लिहिणारा माणूस कवितेत लपत नसतो. तो आपल्या कवितेत लपूच शकत नाही. कविता आरशाचे काम करते. ती स्वच्छ व निकोप चेहरे दाखवते आणि लबाड व घाणेरडे चेहरेही दाखवते. केवळ नक्षीदार शब्दांमुळे कवितेत यश मिळत नसते. सुबक, गोंडस व नक्षीदार शब्दांमुळे कविता सुंदर होत नसते आणि शब्दांचा थयथयाट घातला म्हणून कविता शक्तिशाली बनत नसते.”

सुरेश भट (15 April 1932 – 14 March 2003)
  • रूपगंधा
  • रंग माझा वेगळा
  • काफला
  • एल्गार
  • रसवंतीचा मुजरा
  • झंझावात
  • सप्‍तरंग
  • हिंडणारा सूर्य (गद्य)
  • सुरेश भट – निवडक कविता

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी (labhale amhas bhagya bolato marathi lyrics)

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी..!!


'लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी'
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी,
एवढ्या जगात माय मानतो मराठी

आमुच्या मनामनात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
आमुच्या उराराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी

आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या नहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी
आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी

येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाटते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी
येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलखात सादते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी

येथल्या नभामधऊन वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरीच हाल सोसते मराठी
हे असेच कितीक खेळ पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी

- सुरेश भट

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी | मराठी अभिमान गीत

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी | मराठी अभिमान गीत | कौशल इनामदार

निष्कर्ष

तर मित्रांनो आज आपण काय पाहिले? कवी सुरेश भट यांचा जीवन प्रवास कसा होता हे आपण आपण जाणून घेतले. त्याच बरोबर त्यांची संगीताची आवड, व त्यांचा काव्यसंग्रह आपण जाणून घेतला. महाराष्ट्र अभिमान गीत “लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी” (labhale amhas bhagya bolato marathi lyrics) आपण जाणून घेतले.

मला आशा आहे तुम्हाला माझा हा लेख व हे माहिती (labhale amhas bhagya bolato marathi lyrics) नक्की आवडली असेल. तुम्हाला मिळालेली हि माहिती तुम्ही आपल्या मित्रांना, कुटुंबियांना सोशल मीडियावर जरूर शेअर करा.

Leave a Reply

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी (labhale amhas bhagya bolato marathi lyrics)
labhale amhas bhagya bolato marathi lyrics