100+ छान छान लहान मुलांच्या मराठी गोष्टी [Marathi goshti]

marathi goshti : लहान मुलांना छान-छान गोष्टी ऐकायला आवडतात ही गोष्ट आपल्या सर्वांना माहित आहे. पण आजच्या धावपडीच्या जीवन शैलीत पालकांना त्यांच्या लहान मुलांना गोष्टी एकवायच्या तर आहेत मात्र, वेळेची मर्यादा आणि लहान मुलांच्या गोष्टी (marathi stories for kids) आता त्यांच्या स्मरणात नाहीत.

त्यासाठीच आम्ही या लेखात घेऊन आलो आहोत लहान मुलांच्या गोष्टींचा खजिना. या लेखात दिलेल्या गोष्टी तुम्ही तुमच्या मुलांना वाचून ऐकवू शकता. या गोष्टी मुळे नुसते मनोरंजन होणार नाही तर आपली
लहान मुले या छोट्याशा गोष्टींमधनू खपू मोठी मूल्य शिकणार आहेत.

लहान मुलांना गोष्ट सांगणे हा सुद्धा त्यांच्यावर आपण करत असलेल्या संस्काराचा भाग आहे. या छोट्या-छोट्या गोष्टींमधून त्यांना एक चांगला माणूस बनण्याची प्रेरणा मिळते. या गोष्टींमधून त्यांचा जीवनाचे खूप महत्वाचे धडे मिळतात.

आपण या लहान मुलांच्या गोष्टींच्या (marathi goshti) माध्यमातून मनोरंजन, संस्कार आणि ज्ञान या तिघांचाही मिलाफ घडवनू आणणार आहोत. मग, मी जास्त वेळ घेत नाही चला तर मग गोष्टी वाचूया !!

1 आळशी चिनू (story in marathi)

ही गोष्ट एका चिनु नावाच्या मुलाची आहे तो आपल्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता एकुलता एक
म्हणजे त्याला कोणीही भावडं नव्हते. ना मोठा दादा होता,ना कोणी छोटी बहिण होती, त्यामुळेच आजी-आजोबा,आई -बाबा, काका-काकी मामा या सर्वांचा तो अत्यतं लाडका होता.

खूप लाडका असल्यामुळे त्याला कोणीही ओरडत नसे तो स्वतःचे काम स्वतः करत नसे. त्याची सर्व कामे
त्याची आईच करायची .दिवसेंदिवस तो खूपच आळशी होत होता. जस-जसा तो मोठा होत गेला तशी आई त्याला समजावनू सांगू लागली पण त्याला आपला आळशीपणा सोडावाच वाटतच नव्हता.

शाळेतून गृहपाठ दिला तर तो कधीच वेळेवर करत नसे, आईने काही काम सांगितले तरी तो करत नसायचा. त्यामुळे घरातले सर्वजण चिंतेत होते आता काय करायचे बरे?? तो दिवस होता 25 डिसेंबर म्हणजे सांताक्लॉजच्या येण्याचा दिवस !

सर्व लहान मुलं आवडीने त्या दिवसाची वाट पाहत असतात की सांताक्लॉज मोठ्या पिशवी मधून आपल्याला छान-छान खेळणी घेऊन येईल, छान छान खाऊ घेऊन येईल आणि तसाच चिनू सुद्धा 24 डिसेंबरला रात्री झोपला होता, त्याला सांताक्लॉजला भेटायचे होते. त्याच्याकडून छान छान खेळणी घ्यायची होती.

सकाळ झाली आणि तो क्रिसमस ट्री च्या बाजूला जाऊन उभा राहिला, त्याला वाटले सांताक्लॉजने
आपल्याला खपू काही भेटवस्तू ठेवल्या असतील पण तो आजही नेहमीप्रमाणे उशिरा उठला होता आणि त्यामुळे भेटवस्तू, खाऊ हे सर्व इतर मुले घेऊन गेली होती आणि आपल्या चिनूला मात्र काहीच उरले नव्हते.


तो खूपच रडवेला झाला, तो रडणार इतक्यात टाळी वाजवण्याचा आवाज झाला बघतो तर काय खिडकीतनू
त्याला सांताक्लॉज दिसला. तो खूप खुश झाला कारण त्याच्या पिशवीत अजून ही गिफ्ट होत्याच पण जसा सांताक्लॉज समोर आला सांताक्लॉज ने आपले मोठे- मोठे नाक आपल्या हाताने झाकून घेतले.

अरे,काय रे चिनू मी तुला मोठं गिफ्ट द्यायला आलो होतो आणि तू अजून ब्रश पण केला नाहीस, आंघोळ ही केली नाहीस आणि अभ्यास पूर्ण केला नाहीस. मी तुला आता जे गिफ्ट देणार होतो ते आता मी तुला देणारच नाही मी जातो बाय बाय, माझी इतर मुले वाट पाहत असतील.

असं म्हणनू तो खिडकीतनू निघनू गेला आणि चिनूला खरंच खूप रडायला आलं मग त्याला आठवलं मी रात्री झोपताना आईने सांगनू ही ब्रश केलचं नव्हतं. आई बाबांच जर मी ऐकलं असतं, ब्रश केल असतं लवकर झोपलो असतो, तर लवकर उठलो असतो,

छान छान आंघोळ केली असती आणि अभ्यासही झाला असता माझा ……आणि सांताक्लॉज खुश होऊन मला मोठ-मोठठ गिफ्ट देऊन गेला असता. पण, आता काय उपयोग? असंकरून त्यांनी डोळे उघडले तर पाहतो तर काय ???

समोरच खराखरुा सांताक्लॉज होता आणि तो सांताक्लॉज म्हणजे त्याचे लाडके आजोबा होते त्यांनी त्याच्यासाठी खपू छान छान खेळणी आणली होती,आई-बाबांनी गोष्टीची पुस्तके आणली होती आणि खूप खाऊ पण आणला होता.

आता आपला चिनू हुशार झाला होता त्यांनी सर्वात आधी बाथरूम मध्ये धाव घेतली ब्रश केला आंघोळ केली देव बाप्पाला नमस्कार केला आपल्या आजी-आजोबांना म्हणजे सांताक्लॉजचा नमस्कार करून गिफ्ट घेऊन खेळायला लागला. आई बाबा आणि सर्व खूप खशु झाले कारण आज आपला चिनू आळशी चिनू नव्हता तर खूप चांगला मुलगा म्हणजेच गुड बॉय झाला होता!

मग काय मुलांनो आवडली की नाही गोष्ट अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात पण आपण त्या करायला
आळस करतो आणि मग आपल्याला मोठ्या मोठ्या गोष्टी मिळतच नाहीत असं बघा जर आपण ब्रश केला
नाही तर आपले दात किडतील आणि मग दात जर तटुलेतर आपण छान छान चॉकलेट, गोड मिठाई, छान
फळ जेवण खाऊ शकू का ? नाही ना?

मग आपण आपल्याला चांगल्या सवयी लावनू घेतल्या पाहिजेत आणि चांगल आरोग्यवान व्हायला पाहिजे
मग आज आपण या गोष्टीतनू काय शिकलो?

  • तात्पर्य : चांगल्या सवयीचे फळ हे नेहमी चांगलेच मिळते

हे वाचलं का?

2 कावळा आणि चिमणी [story in marathi]

marathi goshti
Marathi short stories

एका गावामध्ये एक मोठं जंगल होतं आणि त्या जंगलामध्ये एक पेरूचे झाड होते त्या झाडावर एक कावळा
राहत होता आणि त्या पेरूच्या झाडाचा समोर जे छोटसं चिकूचे झाड होतं त्या झाडावर एक चिमणी
राहत होती.

दोघांचा घरटं अगदी समोरासमोर होतं त्यामुळे ते एकमेकांचे चांगले मित्र होते चिमणी होती
शहाणी पण कावळा थोडासा द्वाड होता. ते दोघेही एकत्र उडत उडत जाऊन पाणी टिपायचे खेळायचे.

असेच दिवस जात होते आणि पावसाळा सरूु झाला विजा चमकायला लागल्या, ढग गडगडू लागले, आणि जोर जोरात पाऊस पडायला लागला पावसामुळे पक्षांचे खपू हाल होऊ लागले त्यामध्ये पेरूच्या झाडावर कावळ्याचे घर होते ते शेणाचे होते आणि ते शेणाचे घर पाण्यात वाहून गेलेत्याला थंडी वाजायला लागली.

तो विचार करू लागला आता मी कुठे जाऊ आणि समोर पाहिले तर चिमणी चिकूच्या झाडावर आपल्या मेणाच्या घरामध्ये सरुक्षित होती, कावळ्याने ठरवले आपण चिऊ ताईच्या घरी जाऊ मग आपण भिजणार नाही तसा तो चिऊताईच्या घरी गेला.

त्याने दार वाजवले चिऊताई चिऊताई येऊ का घरी? चिऊताई ने म्हंटले थांब थांब कावळे दादा मी जेवण करते ताईने काही दार उघडले नाही कावळे दादाने मग पुन्हा हाक मारली चिऊताई चिऊताई येऊ का घरी? चिऊ ताई म्हणाली थांबा कावळे दादा मी भांडी घासते!

शेवटी चिऊताईचे दार उघडले आणि कावळे दादाला आपल्या घरी घेतले थंडीने कुडकुडणाऱ्या कावळेदादाला तिने छान छान गरम गरम जेवण दिले उबदार कपडे दिले व झोपायला पांघरून दिले.

थोड्या वेळाने चिऊताईला आवाज येऊ लागला कावळेदादा काहीतरी खात होता चिऊताईने कावळे दादाला विचारले कावळेदादा कावळेदादा काय खातो रे? कावळेदादा म्हणाला बडीशेप मी खातो बडीशेप चिमणीला ही बडीशेप आवडत होती. तिने म्हटले मला दे.. मला दे.. मला दे जरा.

तर आता पाऊस गेला होता आणि सकाळ झाली होती कावळेदादा तिला म्हणाला सपंली सपंली जातो मी माझ्या घरा!

ही गोष्ट होती चिऊ आणि काऊची पण काऊ कसा? लबाड काऊ दादाची. बिचारी चांगली चिमणी पण काम झाल्यावर काऊदादाने चिऊचे उपकार ठेवले नाही आणि तो आपले काम झाल्यावर पसार झाला या गोष्टीवरून आपण काय शिकलो?

  • तात्पर्य : उपकाराची परतफेड करता नाही आली तरीही उपकाराची जाणीव ठेवलीच पाहिजे

हे ही बघा :

3 कोल्ह्याला द्राक्ष आंबट [marathi goshti]

फार फार वर्षा पर्वीूची गोष्ट आहे एक मोठे जंगल होते आणि त्या जंगला मध्ये छान छान फळांची झाडे होती ही सर्व फळे खूपच चविष्ट होते त्यामुळे लांबनू लांबनू ती फळं खाण्यासाठी वेगवेगळे प्राणी तिथे यायचे.

आंब्याची आमराई होती, डाळिंबाची बाग होती, केळीचे बन होते आणि द्राक्षाच्या वेली ही होत्या व त्या सर्व झाडे आणि वेलींवर छान छान गोड गोड रसदार अशी फळे लागलेली असायची.

एके दिवशी खपू दपुार झाली होती सर्व प्राणी छान छान फळं खाऊन आपापले जेवण करून, छान झोप घेत होती, आणि अशाच एका दपुारी एक भकुेलेला कोल्हा भटकत भटकत एका द्राक्षाच्या बागेकडे जाऊन पोहोचला.

पाहतो तर काय मोठमोठ्या द्राक्षाच्या वेली आणि त्यावर मोठी मोठी हिरवी गार द्राक्ष. त्याच्या तोंडाला तर पाणी सटुले.

कोल्ह्याने द्राक्ष खायचा विचार केला पण द्राक्ष खायची कशी कारण द्राक्ष तर उंचच उंच काठीला लटकवनू
ठेवलेली होती बागेच्या मालकांनी कोणाच्या सहज हाताला मिळूनये म्हणनू ती मोठमोठ्या काट्या घालनू
वरती लटकत ठेवले होते.

कोल्ह्याने खूप उड्या मारल्या काठ्यांवर चढण्याचा प्रयत्न केला पण काही त्याला द्राक्षा पर्येंत पोहोचता आले नाही. कोल्हा खूप थकला. इतक्यात त्याच्या शेजारी एक चिमणी उडत होती ती त्याच्यावर हसायला लागली.

काय रे लबाड कोल्होबा द्राक्ष मिळत नाहीत का? कसा पचका झाला तुझा?? बरं झालं दुसऱ्याला सतवतोस ना? पण कोल्हा तर लबाड होता तो म्हणाला मला द्राक्ष नकोच होती कारण ते आबंट आहेत म्हणनूच
म्हण तयार झाली ‘कोल्ह्याला द्राक्ष आबंट!’

तात्पर्य: आपल्याला जे जमत नाही त्यात आपली चूक न शोधता दुसऱ्यांचे दोष काढणे चांगले नाही

हे ही पहा :

4 ससा आणि कासवाची शर्यत [marathi story]

एक छोटेसे गाव होते आणि त्या गावांमध्ये एक झळु झळु वाहणारी गोड पाण्याची नदी होती त्या नदी किनारी
वाळू मध्ये अनेक प्राणी झाडाझडुुपांमध्ये राहत असत आणि त्यामध्ये दोन मित्रही राहत होते एक होता ससा
एक होता कासव!

ससा होता पांढरा शभ्रु लाल लाल डोळ्यांचा मोठ्यामोठ्या कानांचा खूप गोरा गोबरा छान दिसायचा व कासव
होते चपटे छोटेसे आणि हळूहळू चालणारे पण हुशार बरं का या ससा आणि कासव यांची घट्ट मैत्री होती पण
दोघांचे स्वभाव आणि वैशिष्ट्ये अगदी भिन्न होती.

ससा खपू जलद चालायचा धावायचा आणि धावण्याच्या शर्यतीत नेहमी पहिला यायचा! कासव मात्र होतं हळू चालणारा शांत समजंस पण हुशार. तर कासव आणि ससा या दोघांनी एकदा ठरवलं की आपण धावण्याची शर्यत लावायची.

त्यांच्या समोर छोट्याशा टेकडीवर एक छान डरेेदार आब्ंयाचे झाड होतं त्या झाडाकडे जो कोणी पहिला पोहोचेल त्याचा पहिला नबंर असचं सशाने म्हटलं दोघांची लागली पैज. सस्याने ठरवलं की आपण ही पैज जिंकायचीच !

दोघांनी सकाळीच शर्यत लावली ससा नेहमी प्रमाणे जोषांमध्ये जोरजोरात धावू लागला त्याला वाटलं आपण
काहीच मिनिटात त्या झाडाजवळ पोहोचू, पण ते झाड खपूच लांब होते. शेवटी तो टेकडी जवळ आला आणि खपू दमला, पाठी वळून पाहिले तर कासव कुठेच दिसत नव्हते.

त्याला वाटले आता आपणच जिकंणार म्हणनू तो गोड-गोड नदीचे पाणी प्यायला त्याने लाल लाल गाजर खाल्ली आणि मस्त पैकी झोपून गेला. तिकडे कासव मजल दरमजल करत होते हळूहळू आपल्या ध्येयापर्यंत पोहोचत होते. ते मध्येच कुठे थांबले नव्हते, त्याने कुठेच आराम केला नव्हता, वाटेत त्याने पाहिले तर ससा झोपला होता.

कासव हळूहळूहळू आपल्या झाडापर्यंत जाऊन पोहोचले आणि मगच त्याने तिथे जाऊन आराम केला ससा खपू वेळाने उठला आणि पाहतो तर काय कासव दिसत नाही. त्याला वाटले कासव अजनू खपू मागे असेल म्हणून तो धावत धावत वरती झाडाकडे गेला.

पाहतो तर काय कासव समोर शांतपणे त्यालाच पाहत होते. हळूहळू चालणारे कासव पहिले आले होते.

तात्पर्य: कुणालाही कधीच कमी लेखू नये

5 हावरट भूत [marathi goshta]

खपू वर्षां पूर्वीची गोष्ट आहे एक रामपरू नावाचे गाव होते आणि त्या गावांमध्ये बरेच लोक गुण्यागोविंदाने राहत होते. गावामध्ये सगळ्या शेतकऱ्यांची छोटी छोटी घरे होती प्रत्येक जण महिन्याला येणारे सण खूप आनंदाने व उत्साहाने साजरे करीत असत.

एप्रिल महिना होता मराठी नववर्ष म्हणजे गुढीपाडवाचा दिवस होता. हा सण उत्साहात साजरा करण्याचे सर्व गावकऱ्यांनी मिळून ठरवले. गुढीपाडव्याच्या दिवशी जवळपास प्रत्येक घरात गोड गोड श्रीखडं आणि
गरमागरम पुऱ्यांचा बेत ठरलेला असतो. गावात विद्याताई म्हणून एक गृहिणी राहत असत. विद्याताईंनी ठरवले की आज आपणही गरमागरम पुरी आणि श्रीखडं करू.

दपुार झाली आणि प्रत्येकाच्या घरातनू गरमागरम चविष्ट जेवणाचा खमंग सुवास दरवळू लागला विद्याताईंनी हीचलू पेटवली होती आणि त्या गरमागरम पुऱ्या तळत होत्या, इतक्यात त्यांच्या खिडकी मध्ये एक हात आला.
त्यांना समजले की कोणीतरी आपल्या कडे पुरी मागत आहे त्यांनी त्या हातावर एक पुरी ठेवली.

तो हात होता एका भुताचा आणि त्याने ती पुरी गट्टम केली परत त्याने हात पुढे केला असं करता करता चार पाच वेळा झाले. शेवटी वैतागून विद्याताईंनी त्याच्या हातावर चुलीतील निखारा ठेवला जसा निखारा ठेवला, भुताच्या हाताला चटका बसला आणि तो पळून गेला.

तात्पर्य : अति लोभ नाशाला कारणीभतू ठरतो

हे सुद्धा वाचा:

6 एकीचे बळ [story in marathi]

एका जंगलामध्ये काही कबतुरे एकत्र राहत होती एका झाडावर राहणारी पधंरा ते वीस कबतुरे एकत्रच दाणे टिपायची फिरायची एकमेकांबरोबर राहून त्यांची चांगलीच ओळख आणि मैत्री झाली होती त्यातले काही कबतुरे एकमेकांशी भांडत असायचे परंतु नतंर कुणी समजावल्यावर ती आपले भांडण विसरून ही जायची.

असेच दिवस चालले होते आणि एका संध्याकाळी ही सर्व कबतूरे उडत उडत दूर एका नदी किनारी गेली तिथे काही मोकळ्या जागेमध्ये त्यांना काही दाणे विखरुलेले दिसले सर्व खुश होऊन दाणे टिपत बसली.

थोड्या वेळाने त्याच्या लक्षात आले की ती एका जाळ्यामध्ये अडकले आहेत. सुटण्याचा प्रत्येकाने वेगवेगळा प्रयत्न केला तरी सुद्धा जाळ्या मधून ते उडू शकत नव्हते आता काय करावे बरं?

इतक्यात एक अनभुवी म्हातारा कबतूर होता तो म्हणाला की आपण प्रत्येकाने प्रयत्न केला तर आपण कधीच या जाळ्यातनू सुटू शकणार नाही. सगळ्यांनाच सुटायचे असेल तर आपण एकत्रच उडूया.

सगळ्यांनी एकत्र म्हणायला सरुुवात केले 1,2,3…. आणि सर्व एकत्र जाळ्या सकट उडू लागले थोड्याच वेळात जाळे तुटून पडले आणि एकीचे बळ सर्वांना समजले.

तात्पर्य: एकीचे बळ हे खपू मोठेअसते मोठ्यात मोठी गोष्ट आपण मिळवू शकतो.

7 लबाड कोल्हा [marathi goshti]

दुपार झाली होती. एक कोल्हा रस्त्यातनू इकडे तिकडे पाहत फिरत होता त्याला सकाळपासनू काहीही खायला मिळाले नव्हते. तो उपाशी होता. काही मिळत आहे का ते शोधत होता तो भकुेला असला तरी खपूच स्वार्थी आणि लबाड होता.

अचानक त्याचे लक्ष एका झाडावर बसलेल्या कावळ्याकडे गेले त्या कावळ्याच्या तोंडात एक माशाचा तुकडा होता. कोल्ह्याच्या तोंडाला पाणी सुटले त्याला कसेही करून त्या कावळ्याच्या तोंडातील माझा खावयाचा होता. तो विचार करू लागला.

कोल्ह्याने कावळ्याशी गप्पा मारायला सुरुवात केली. कावळोबा कावळोबा तुझा आवाज किती गोड आहे, तू किती छान गातोस, मला एक गाणं गाऊन दाखवतोस का? कावळा खुश झाला, कारण त्याचा आवाज एकदमच बेसूर होता.

तो गालातल्या गालात हसला आणि गाणे म्हणू लागला जसे त्याने गाणे म्हणायला आपली चोच उघडली, तसा त्याच्या तोंडातला माशाचा तुकडा खाली पडला, आणि लबाड कोल्हा तो तुकडा घेऊन पळून गेला.

तात्पर्य: स्वतःचे गुण आणि दोष आपण ओळखले पाहिजेत.

8 हुशार बिरबल

बिरबलाच्या तर आपण खूप गोष्टी ऐकल्या असतील अकबर आणि बिरबल यांचे खूप किस्से प्रसिद्ध आहेत.
अकबर राजा होता आणि बिरबल हा त्याच्या दरबारात हुशार म्हणनू खपू प्रसिद्ध होता.

अकबर बादशहाला नेहमी आपल्या बिरबलाची परीक्षा घ्यायला खपू आवडायचे. एकदा नदी किनारी फिरताना बादशाहने वाळूमध्ये एक रेघ मारली आणि बिरबलाला म्हंटले माझ्या रेघेला कमी-जास्त न करता तू लहान करून दाखव?

अर्थात बिरबल हा हुशार होताच त्याने अकबर बादशहाच्या रेघेसमोर एक मोठी रेघ मारली. त्याबरोबर बादशहाची रेघ ही लहान झाली. बादशहाने बिरबलचे पुन्हा एकदा खूप कौतकु केले.

तात्पर्य: प्रतिस्पर्ध्याच्या कार्याशी तुलना न करता आपण आपले कार्य करत राहावे.

निष्कर्ष

पाहिलंत मित्रांनो, आपणच लहानपणी अशा कितीतरी छान छान लहान मुलांच्या मराठी गोष्टी ऐकलेल्या असतात पण त्या आपल्या विस्मरणात जातात जो आठवणींचा ठेवा आहे तो आपल्याला आपल्या पुढच्या पिढीकडे द्यायलाच हवा.

तर तुम्हालाही असा आठवणींचा ठेवा जो गोड गोष्टींमध्ये दडलेला असेल तो आपल्या पुढच्या पिढीकडे द्यावयाचा असेल तर आमच्या या ब्लॉगला नियमित भेट द्या. नमस्कार! आणि तुम्हाला आमच्या गोष्टी कशा काय वाटल्या याबद्दल नक्की कळवा तुमच्या प्रतिक्रियेच्या आम्ही प्रतीक्षेत आहोत!

Share on:

Leave a Comment