माझा आवडता सण दिवाळी निबंध | Best Marathi Nibandh Diwali 2021

Best Marathi Nibandh Diwali: विध्यार्थी मित्रांनो जसे की आपण सगळे जाणतोच की, भारत हा विविधतेने नटलेला देश आहे, अनेक धर्माचे आणि पंथाचे लोक इथे आनंदाने राहतात. म्हणून भारतात वर्षभर विविध धर्माचे सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. दिवाळी (diwali information in marathi) हा सण अश्विन महिन्यात येतो इंग्रजी कॅलेंडर नुसार, साधारणतः ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात येतो.

आपल्या शाळेत दरवर्षी निबंध स्पर्धा आयोजित केली जाते, विध्यार्थी विविध विषयावर निबंध लेखन करतात. कधी कधी कुठल्यातरी एकाच विषयावर निबंध लिहिण्यासाठी आपल्याला सांगितलं जात. तसेच दरवर्षी दैवाच्या सुट्टीत एक निबंध हमखास लिहून आणायला सांगितलं जातो तो म्हणजे “माझा आवडता सण दिवाळी” (Marathi Nibandh Diwali) हा निबंध.

आणि म्हणूनच मी तुमचे मदत करण्यासाठी इथे आहे. तुम्हाला निबंध लिहितांना योग्य मुद्दे मांडता यावे म्हणून मी तुमच्यासाठी हा “Best Marathi Nibandh On Diwali” म्हणजेच “माझा आवडता सण दिवाळी” हा निबंध लिहीत आहे. उद्धेश फक्त एकच आहे, जेणेकरून दिवाळीवर निबंध लेखन करतांना तुम्हाला मदत व्हावी.

दिवाळीत शाळेला सुट्टी असते. तरीही, दरवर्षी शाळेत आपले शिक्षक हा निबंध लिहायला सांगतात त्यासाठी तुम्हाला मदत व्हावी म्हणून हा लेख प्रपंच. चला तर मग आणखी उशीर न करता आपण माझा आवडता सण दिवाळी (Marathi Nibandh) Diwaliहा निबंध लिहायला घेऊया तुम्हाला हा निबंध आवडला तर तुम्ही यात थोडाफार बदल करून तुमच्या होमवर्कसाठी याचा समावेश बिनदिक्कत करू शकता. मला या गोष्टीचा आनंदच होईल. चला तर मग मित्रांनो माझा आवडता सण दिवाळी निबंध | Marathi nibandh Diwali लिहायला सुरुवात करूया.

Marathi Nibandh Diwali
Diwali

माझा आवडता सण दिवाळी | Marathi Nibandh Diwali

दिवाळी किंवा “दीपावली” म्हणून ओळखल्या जाणारा हा सण भारतात आणि जगभरात राहणाऱ्या हिंदूंचा सर्वात मोठा व पवित्र सण आहे. हा सण जगभरातील लोक मोठ्या उत्साहात साजरा करतात. हा हिंदू सण मानला जात असला तरी, विविध समाजातील, जाती-धर्मातील लोक भेदभाव विसरून दिवे लावून हा सण साजरा करतात.

दिवाळी हा सण “दिपोत्सव” अंधारावर प्रकाशाचा विजय अर्थात प्रकाशाचा सण म्हणून ओळखला जातो. घरो-घरी मातीच्या पणतीचे दिवे लावले जातात. वेगवेगळ्या रंगांचे, आकारांचे दिवे लावून व आकाश कंदील लावून सारा परिसर “प्रकाशमान” केला जातो. हा सण जेंव्हा साजरा केला जातो तेंव्हा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसून येतो.

सांस्कृतिक मान्यतेनुसार प्रभू राम यांचे लंके वरून याचं दिवशी अयोध्येला आगमन झाले होते. दशानन रावणाचे गर्वहरण करून, वाईटावर चांगुलपणाचा, अंधकारावर प्रकाशाचा विजय मिळवून ते स्वगृही परतले होते. वाटेत त्यांचे स्वागत करण्यासाठी दिवे लावले गेले. त्याची आठवण म्हणून आजही दिवाळी किंवा “दीपावली” साजरी केली जाते. असे म्हटले जाते.

मला दिवाळी हा सण खूप आवडतो. कारण दिवाळीत सर्वांना सुट्टी असते आणि सर्व कुटुंबीय एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात. एकमेकांना भेटवस्तू दिल्या जातात. मी माझ्या सर्व मित्रांना फराळाला घरी बोलावतो, शिवाय माझे मित्र सुद्धा मला त्यांच्या घरी फराळाला नेतात, त्यामुळे आम्हा मित्रमैत्रिणीचीं एकमेकांच्या पालकांशी सुद्धा ओळख होते.

मी आणि माझे मित्र दिवाळीत किल्ला बनवतो. दिवाळीत माझी ताई दारासमोर दररोज सुंदर रांगोळी काढते. आई बनवत असलेल्या पदार्थांचा खमंग सुवास घरात दरवळतो, आई दिवाळीसाठी स्वादिष्ठ फराळ बनवते जसे चकली, लाडू, करंजी, शंकरपाळे, चिवडा. मला लाडू खूप आवडतात.

दिवाळीत बाबा आम्हाला नवीन कपडे घेतात. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आम्ही सर्व कुटुंबीय मिळून लक्ष्मीपूजन करतो. भाऊबीजेच्या दिवशी ताईच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा असतो. त्यादिवशी ताई मला ओवाळते आणि मी तिला भेटवस्तू देतो. ताई माझे खूप लाड करते.

दिवाळीत काही लोक फटाके वाजवतात. पण त्यामुळे मुक्या प्राण्यांना व पक्ष्यांना खूप त्रास होतो. बिचारे मोठ्या आवाजाने खूप भेदरतात. सणासुदीला मुक्या जीवांना असा त्रास देणे मला आवडत नाही. फटाके वाजवल्याने प्रर्यावर्णाचा खूप ह्रास होतो, फटाके प्रदूषण वाढीला कारणीभूत ठरतात असे सरांनी शिकवल्या नंतर मी मोठ्ठा आवाज करणारे फटाके वाजवायचे टाळतो.

तरी बाबा माझ्यासाठी चक्री, फुलभाज्या आणतात. त्या मी पुरेशी काळजी घेऊन माझ्या शाळेतील मित्रांबरोबर पेटवतो. आम्ही मित्र दिवाळीत सर्व लहान मोठ्यांना शुभेच्छा देतो. खूप खेळ खेळतो पण शाळेतून दिलेला होमवर्क सुट्टी संपायच्या आधी पूर्ण करतो.

दिवाळी हा सण अंधारावर प्रकाशाने मिळवलेला विजय आहे म्हणजे “वाईटावर चांगुलपणाचा विजय” हा या सणाचा संदेश आहे. म्हणून मला हा सण खूप आवडतो. त्यातून आदर्श घेऊन मी एक चांगला भारतीय नागरिक बनण्याचा निश्चय करतो. भविष्यात देशासाठी चांगले काम करण्याचा मी प्रण करतो आणि माझ्या सर्व बंधू-भगिनींना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. (समाप्त)

विध्यार्थी मित्रांनो मला आशा आहे की माझा आवडता सण दिवाळी | Marathi Nibandh Diwali हा निबंध तुम्हाला नक्कीच आवडला असेल. निबंध लिहिण्याची इच्छा असलेल्या तरुण विध्यार्थ्यांसाठी मदतगार आहे. वरील निबंधातील दिवाळी या सणाबद्दल ज्या मुख्य गोष्टी आहेत त्या सामावून घेण्याचा प्रामाणिक प्रयन्त या निबंधात केला गेला आहे.

Marathi Nibandh Diwali: दिवाळीवरील या निबंधातील, विध्यार्थी आपल्या काही कल्पना निवडू शकतात आणि काही ओळींचा मसुदा तयार करू शकतात. वाक्य कसे बनवायचे, वाक्यरचना कशी करायची आणि स्वतःचे लेखन कौशल्य कसे वाढवायचे हे शिकू शकतात. लेख आवडल्यास आपल्या मित्रांना, नातलगांना सोशल मीडियावर नक्की शेअर करा.

Share on:

2 thoughts on “माझा आवडता सण दिवाळी निबंध | Best Marathi Nibandh Diwali 2021”

  1. Washing your face at least two times a day and dedicating a day to give yourself a mask and garlic treatment will help your skin to become healthy. Dianna Geordie Ludwog

    Reply

Leave a Comment