कडुलिंबाचे 11 आश्चर्यकारक फायदे: neem tree information in marathi

neem tree information in marathi: कडुनिंब हे नैसर्गिकरीत्या उगवणारे, संपूर्ण भारतीय उपमहाद्वीप येथे आढळणारे, एक बहूपयोगी असे झाड आहे. या झाडाला लिंबाच्या रंगाची छोटी छोटी चवीने कडू असलेली फळे लागतात, म्हणून या झाडाचे नाव कडूलिंब. या झाडाची फळे, बिया, पाने, साल, अगदी मुळे सुद्धा कडू असतात. याच्या अनेक उपयोगांमुळे या झाडाची तुलना “औषधी कल्पवृक्ष” अशी केली जाते. कडू असल्यामुळे “जंतुनाशक” हा याचा प्रमुख गुणधर्म आहे.

मानव, पशु-पक्षी, पिकें, या सर्वांसाठी हे झाड एक प्रकारे वरदानच आहे. मराठी नववर्ष गुढीपाडवा या अत्त्यंत महत्वाच्या शुभ दिवशी याची कोवळी पाने, फुले, लहान कोवळी फळे, जिरे, मिरे, सैन्धव मीठ, ओवा, गूळ, हिंग, चिंच हे सर्व एकत्र वाटून त्याची गोळी करून खातात. यावरूनच या झाडाचे सांस्कृतिक महत्व किती आहे हे लक्ष्यात येते.

म्हणूनच आज आपण या लेखात या झाडाविषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग मित्रांनो आणखी वेळ न-घालवता जाणून घेऊयात कडुनिंब (neem tree information in marathi) या झाडाची संपूर्ण माहिती.

कडुलिंब औषधी वनस्पतींची माहिती (neem tree information in marathi)

neem tree information in marathi कडुलिंबाच्या झाडाचे चित्र
कडुलिंबाच्या झाडाचे चित्र

neem tree information in marathi: कडुलिंब, निम्ब, लिंब किंवा बाळंतलिंब या सर्व नावाने हे झाड ओळखले जाते. कडुलिंबाचे शास्त्रीय नाव: Azadirachta indica असे आहे, तर या झाडाचे कुळ Meliaceae आहे. हे झाड म्हणजे भारतीय उपखंडातील भारत, पाकिस्तान, नेपाळ व बांगलादेश या देशात आढळणारा एक वृक्ष आहे. या वृक्षाची पाने व फळे कडू असल्याने त्याला कडुनिंब म्हटले जाते. विशेष म्हणजे हे झाड ऑक्सिजनचा खूप मोठा स्रोत आहे त्यामुळे या झाडापासून प्रदूषण कमी करण्यात मोलाची मदत होते.

सर्वसाधारणपणे कडुलिंबाचे झाड मोठे म्हणजे आठ ते दहा मीटर उंच वाढते. याचे खोड सरळ वाढते, नंतर याला लांब फांद्या फुटतात या झाडाची साल काळी व खडबडीत मगरीच्या पाठीसारखी असते. याची पाने हिरवी, मध्यम आकाराची व लांबट असतात. पानाच्या कडेने नक्षी असते. एका काडीला दहा ते पंधरा पाने असतात. पानाचा देठ बारीक असतो. चवीला अत्यंत कडू असते. कडुलिंबाच्या झाडाची सावली थंड असते. या कडुलिंब झाडाच्या सावलीमुळे (छाया) खासकरून विदर्भ, मराठवाडा, खान्देश येथील घरे उन्हाळ्यात थंड राहण्यास मदत होते.

कडुलिंबाचे वर्णन (neem tree information in marathi)

neem tree information in marathi: कडुलिंब हा आकाराने मोठा, ३०-६० फूट उंच वाढणारा छायादार वृक्ष आहे. याला साधारणत: ९ ते १५ इंच लांब देठ व त्यास सम अंतरावर, हिरव्या रंगाची २-३ सेंटिमीटर लांबीची, टोकदार, करवतीसारखे दाते असणारी १० ते १५ पाने येतात. पानांच्या दोन्ही बाजू वेगवेगळ्या (oblique leaf) सुरू होतात.

कडुलिंबाची फुले सुरवातीला रंगाने पांढरी, लहान व सुगंधित असतात. तर फळे आधी हिरवी व पिकल्यावर पिवळी होतात. साधारण ३-४ मिलिमीटर लांब असलेल्या या फळांत प्रत्येकी एक बी असते. त्या बियांना निंबोळी किंवा लिंबोणी असे म्हणतात. कडुलिंबाचं लाकूड दर्जेदार मानलं जात, कडुलिंबाच्या लाकडाचा वापर बांधकाम करण्यासाठी व लाकडी पेट्या वगैरे बनविण्यासाठी होतो.

कडुलिंबाची इतर भाषेत नावे (neem tree information in marathi)

कडुलिंबाला इतर भारतीय भाषांमधून वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. ती नावे कुठली आहे ते आपण खाली पाहूया.

शास्त्रीय नाव Azadirachta indica
हिंदीनीम/ नीमला
इंग्रजीIndian Lilac, Neem, Margosa Tree
तमिळकड्डपगै/ अरुलुंदी
बंगालीनीमगाछ
मलयालमवेप्पु/ अतितिक्त
कानडीबेवु
गुजरातीलींबडो
तेलुगुनिम्बमु
संस्कृतनिम्ब/ तिक्तक/ अरिष्ट/ पारिभद्र/ पारिभद्रक/ पिचुमंद/ पिचुमर्द
Other names for the neem tree

कडुलिंबाच्या झाडाचे फायदे

neem tree information in marathi

कडुलिंबाच्या झाडाचे फायदे काय आहेत ते जाणून घेऊया. कडुलिंबाचा वृक्ष औषधी गुणांनी सगळ्या दृष्टीने परिपूर्ण आहे. याची पाने, काड्या वाटून, त्याचा रस उन्हाळात प्रशान केल्याने उन्हाचा त्रास होत नाही. असे म्हणतात की कडुलिंबाचा रस पिल्याने बुद्धी तल्लख होते. आपण कित्तेक लोकांना कडुलिंबाच्या काडीने दात घासताना पाहतो, कडुलिंबाच्या काडीने दात घासल्याने दातात किड होत नाही. दातांना बळकटी येते.

तसेच मुल्व्याधी पोटातील कृमीवर हे दातून उपाय म्हणून काम करते, कडूलिंबाची पाने धान्यात ठेवल्याने धान्याला सहसा कीड किंवा अळी लागत नाही. साबण, सौंदर्य प्रसाधने तसेच अनेक दंतमंजन, पेस्ट यामध्ये सुद्धा कडूलिंबाचा वापर मोठा प्रमाणात करतात. कडुलिंबाचा (neem tree information in marathi) पाला गरम पाण्यात उकळून अंघोळ करतांना अंगाला चोळल्यास अनेक प्रकारचे त्वचारोग बरे होऊ शकतात.

कडूलिंबची झाडे ज्या भागात जास्त प्रमाणात असतात तिथे ऑक्सिजनचे प्रमाण जास्त असते, तसेच तेथील हवा शुद्ध राहते. काही दिवस दररोज सकाळी एक कप कडुलिंबाच्या कोवळ्या पानांचा रस प्याल्यास पोटासंबंधी अनेक व्याधी दूर होण्यास मदत होते.

मधुमेहाच्या रुग्णांनी काही दिवस सकाळी रिकाम्यापोटी या झाडाच्या पानांचा एक कप रस नियमितपणे एक महिना घेतल्यास त्यांच्या शरीरातील साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत होते. (neem tree information in marathi) या झाडाच्या फळांचा रस काढून, त्याचा वापर तेल काढण्यासाठी केला जातो. त्या तेलाचा उपयोग सांधेदुखी कमी होण्यासाठी करतात.

कडुलिंबाचे धार्मिक महत्व

कडुलिंब हा उत्तराभाद्रपदा नक्षत्रचा आराध्यवृक्ष आहे. हिंदूंचे शालिवाहन नवीन वर्ष गुढीपाडव्यापासून सुरू होते. चैत्र महिन्यात झाडांना नवी पालवी फुटते आणि उन्हाचा कडाका जाणवू लागतो. उन्हामुळे शरीरातील उष्णता वाढून नाना प्रकारचे विविध आजार होतात. अशा आजारांचे प्रमाण कमी व्हावे आणि आपली रोग प्रतिकारशक्ती वाढावी, आपले नवीन वर्ष आरोग्यदायी जावे म्हणून आपल्या पूर्वजांनी पाडव्याला कडुनिंबाचे (neem tree information in marathi) सेवन सांगितले आहे.

मराठी नवीन वर्षाची सुरुवात चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुडीपाडव्याला होते हे आपल्याला माहीतच आहे. गुडीपाडव्याआधी या झाडाला फुले येतात, त्या दिवशी गुडी उभी करताना कडूलिंबाच्या झाडाची डहाळी वापरतात. तसेच या झाडाच्या फुलांची मिरपूड, मीठ, गुळ घालून केलेली चटणी खावी, अशी प्रथा महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून आहे.

कडुलिंबाच्या झाडाचे आणखी काही गुणधर्म

 • कडुलिंबामध्ये आयुर्वेदिक गुणधर्मही असतात व ते कडू, विपाकी, शीतवीर्य, लघु, मंदाग्निकर-खोकला, ज्वर, अरुची, कृमी, कफ, कुष्ठ नाशक म्हणून वापरले जाते. हा जणू औषधी कल्पवृक्षच आहे.
 • पूर्वी स्त्रियांना प्रसूतीनंतर तीन दिवस जेवणाआधी कडुलिंबाच्या पानांचा रस देत असत. त्यामुळे आईला दूधही जास्त येत असे. व्यालेल्या गाईलाही कडुनिंबाचा पाला खाण्यास देत असत.
 • उन्हाळ्यात गोवर, कांजिण्या, घामोळ्या ह्या सारखे रोग उद्भवतात, अश्यावेळी रोग्याला कडुनिंबाच्या पानांच्या अंथरुणावर झोपवल्यास आराम मिळतो.

कडुलिंबाचा घरगुती उपयोग

 • या झाडाचे साल, मूळ, पान, बिया सर्वच औषधीं आहेत.
 • रक्त दूषित झाल्यावर त्वचेवर डाग पडतात, तेव्हा कडुलिंबाचे तेल लावतात. निबोण्यांचे तेलही औंषधी आहे.
 • कडुलिंबाची पान जखमेवर कुटून लावल्यास जखम लवकर बरी होते.
 • ताप आल्यास सकाळ-संध्याकाळ कडुलिंबाच्या सालीच्या काढा घेतात.
 • अंगाला खाज सुटत असेल तर पानाचा रस सर्व अंगाला किंवा आंघोळीच्या गरम पाण्यात दहा -बारा कडुलिंबाची पान ठेचून घालावी.
 • पोटात जर जंत झाले तर पानांचा रस काढून एक चमचा रसात थोडा (अगदी चिंचोक्याएवढाच) गूळ घालून तीन दिवस प्याल्यास जंत बाहेर पडतात.
 • कडुलिंब या झाडाची पाने खोबरेल तेलात काळी होईपर्यंत उकळायची आणि ते तेल नियमितपणे लावल्याने केसांची वाढ जोमाने होते. केसांच्या अनेक समस्या दूर होतात.
 • यापासून बनणाऱ्या औषधी – पंचनिंबचूर्ण, हे अनेक औषधांमधील एक प्रमुख घटक आहे.
 • आयुर्वेदानुसार – जंतुनाशक, सापाच्या विषावर, गर्मीवर, रक्तदोषहारक, विषमज्वरावर, कृमिनाशक, दाहावर, महारोगावर, बाळंतरोगावर, अफूच्या उतारासाठी, जखमेवर, मुळव्याध, मधुमेह, इ. अनेक रोगांवर कडुलिंब उपाय कारक आहे.
 • कडुलिंबाच्या काड्या दांत घासण्यास उपयोगी, तर लाकूड इमारतीसाठी.
 • सर्वात महत्त्वाचा उपयोग म्हणजे कडुनिंब हे अत्युत्तम जंतुनाशक आहे. ह्याच्या पानांची पूड शेतात पसरल्यास खत म्हणून उपयोगी तर पडतेच पण त्यापेक्षाही रोपांना किडीपासून दूर ठेवते.

कडुलिंबाचे तोटे

तसे पाहता कडुलिंबाचे तोटे काहीच नाहीत, वर म्हटल्याप्रमाणे कडुलिंब हा औषधी कल्पवृक्षच आहे. या झाडाचे फायदेच फायदे आहेत. तरी पण ज्या लोकांना कडू चवीची खूपच भीती वाटतं असेल ते आरोग्यासाठी इतर दुसरे पर्याय अवलंबू शकतात. कडुलिंबाचे लाकूड जर आपण जाळले तर त्याचा एक उग्र वास येतो जो नाकाला सहन होत नाही, येवढाच काय तो कडुलिंबाचा तोटा.

तात्पर्य

तर मित्रांनो असे हे बहुउपयोगी अनेक औषधी गुणांनी परिपूर्ण कडुलिंबाचे झाड (neem tree information in marathi) आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. म्हणून आपण या झाडाचे एक तरी रोप नक्की लावले पाहिजे व त्याला जगवले पाहिजे. झाडे आपल्या नकळत आपल्याला खूप काही देतात, आपण वर पाहिल्या प्रमाणे कडुलिंबाचे एक झाड प्रचंड प्रमाणात आपल्याला ऑक्सिजन देते.

वाढल्या ग्लोबल वोर्मिंगच्या काळात हे झाड आपल्यासाठी वरदान आहे. म्हणून या झाडाला जगवणे आपले आद्यकर्तव्य आहे. दरवर्षी एकतरी कडुलिंबाचे झाड जागवण्याचा आपण सर्व प्रयत्न करूया. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख “कडुलिंबाचे 11 आश्चर्यकारक फायदे” (neem tree information in marathi) नक्कीच आवडला असेल, हा लेख आपण आपल्या मित्रांना सोशल मीडियावर शेअर करा.

Disclaimer

प्रस्तुत लेखातील सूचना आणि सल्ले हे केवळ सामान्य माहितीसाठीच आहेत, यांना व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून घेतले जाऊ शकत नाही. कृपया आरोग्यविषयक कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Share on:

Leave a Comment