OK: ओके चा फुल फॉर्म काय आहे? What is the full form of OK (2021)

आज मी तुम्हाला सांगणार आहे ओके चा फुल फॉर्म काय आहे? ok meaning in marathi, ok शब्दाची उत्पत्ति कशी झाली, ok या शब्दाचे आणखी काय-काय full form मान्यताप्राप्त आहेत, ओके चा (ok full form in marathi) शब्दप्रयोग कुठे आणि कधी केला जातो. तर मग आणखी उशीर न करता चला समजून घेऊयात.

ओके चा फुल फॉर्म काय आहे?

ok
ओके चा फुल फॉर्म काय आहे?

ओके चा फुल फॉर्म आहे “All Correct“. ok हा शब्द सामान्यतः सगळ्याच बोलीभाषेत वापरल्या जातो. ok हा जगातील सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या शब्दांपैकी एक आहे, या गोष्टीचा BBC सारख्या वेबसाइटने उल्लेख केला आहे. त्याच बरोबर आणखी काही वेबसाइट्स च्या मते Ok हा Hello या शब्दांनंतर सर्वात जास्त वापरला जाणारा शब्द आहे.

तसं पहिलं गेल्यास OK हा इंग्रजी भाषेतील शब्द आहे, परंतु आता हा शब्द प्रत्येक भाषेतील दैनंदिन व्यवहारात सर्हास वापरला जातो.

बोलीभाषेच्या ऐवजी पुस्तके, वृत्तपत्रे, कार्यालयं, ई-मेल, व्हाट्सऍप मॅसेज फेसबुक आणि इतरही ok हा शब्दप्रयोग अधिकाधिक केल्या जातो त्याअर्थी आता हा मान्यताप्राप्त शब्द आहे असे मानल्यास गैर नाही. OK चा उपयोग एक विशिष्ठ क्रियेसाठी मर्यादित न राहता वेगवेगळ्या प्रकारे या शब्दाचा उपयोग केल्या जातो.

सामान्यतः प्रत्येक व्यक्ती आपली स्वीकृती दर्शवण्यासाठी ok या शब्दाचा प्रयोग करते. आजपासून नव्हे तर OK या शब्दाचा इतिहास खूप जुना आहे. तरी पण आज सुद्धा लोकांवर या शब्दाचं गारुड कायम आहे, आणि प्रत्येकाला या शब्दाची उत्पत्ती कशी झाली या बद्दल उत्सुकता आहे.

खरंच OK चा काही फुल फॉर्म होतो का? ????

हो Absolutely Ok चा full form आहे, एकचं नाही तर ok चे अनेक फुल फॉर्म मानल्या गेले आहेत. याला कारण आहे ok शब्दाचा वेगवेगळ्या प्रकारे केला जाणारा वापर.

लोकांनी आपआपल्या पद्धतीने ok चा वापर करून घेतला आहे. तुर्तास इतिहासात ok या शब्दाचा काय full form समोर आला आहे आधी हे जाणून घेऊया, मग मी आणखीही ok चे कुठले फुल फॉर्म आहेत त्याबद्दल सांगेल.

OK चा Full-Form मराठीत (ok cha full form in marathi)

ओके चा फुल फॉर्म मराठी भाषेत “ठीक आहे” असा होतो. उदाहरणार्थ कुणी आपल्याला विचारलं “कसा/कशी आहेस” आपल्या तोंडात आपसूपचं उत्तर येतं OK! . काही शाळांमध्ये शिक्षकांद्वारे विध्यार्थ्यांना शिकवल्या जातं कि, Okay या शब्दाचा short form हा OK असा आहे. परंतु हे तितकसं खरं नाही. इतिहासात डोकावून बघितलं तर असं लक्ष्यात येत कि OK हा कुठल्या शब्दाचा Short form नसून, OK या शब्दाचा Okay असा Full Form आहे.

तसं पाहिल्या गेल्यास जाणकारांनी OK या शब्दाचे बरेच फुल फॉर्म सांगितले आहेत पण, नीट इतिहासात बघितलं तर OK या शब्दाचा भावार्थ “All Correct” असाच निघतो.

OK Full Form In Marathi – All Correct

ओके शब्दाची उत्पत्ती

ओके शब्दाच्या उत्पत्ती बाबत बरीच मतमतांतरे आहेत. परंतु हा शब्द 19 व्या शतकाच्या पूर्वार्धापासून बोलला जातो यात शंका नाही. ok शब्दाचा प्रयोग सर्वात आधी 1838 साली अमेरीकतल्या बोस्टन शहरात म्युनिसिपल कॉर्पोरेशन द्वारा लागू केल्या गेलेल्या एका कायद्याविरोधात Anti-Bell-Ringing-Society शी संबंधित आहे.

काही लोकांच्या मते स्कॉटिश शब्द och aye (meaning- “oh yes”) किंवा ग्रीक शब्द ‘ola kala’ (meaning- “All Good”) या शब्दांचा अपभ्रंश होऊन ok या शब्दाची उत्पत्ती झाली असावी असं मत आहे. परंतु सर्वमान्य भाषातज्ज्ञांच्या मते Anti-Bell-Ringing-Society हीच या शब्दाची जननी आहे. कसे ते आपण पुढे पाहूया.

Allen Walker Read यांनी या शब्दाच्या उत्पत्ती बाबत गंभीररीत्या संशोधन केले आहे त्यांच्या मते, या शब्दाचा लिखित वापर सर्वात आधी 23 मार्च 1839 रोजी बोस्टन मॉर्निग पोस्ट ने केला होता. स्तंभलेखक चार्ल्स गार्डन ग्रीन ( charles gordon greene ) यांनी आपल्या लेखात सर्वप्रथम ok या शब्दाचा वापर केला.

OK शब्दाचे काही आणखी Full Form

विसाव्या आणि एकविसाव्या शतकात इंग्रजी ही एक वैश्विक भाषा बनली आहे. त्याचबरोबर ओके (ok) हा सुद्धा खऱ्या अर्थाने वैश्विक शब्द बनला आहे. या शब्दाला ना कुठल्या देशाचं बंधन आहे ना कुठल्या भाषेचं. अगदी मेट्रो-सिटी पासून ते गाव-खेड्या पर्यंत हा शब्द सहजरित्या वापरला जातो.

What is the full form of OK:

 • OK – All Correct
 • OK – All Clear
 • OK – Okay
 • OK – Objection Killed
 • OK – Objection Knocked
 • OK – All Korrect

OK शब्दाचे काही प्रयोग

मुळात ओके हा इंग्रजी भाषेतला शब्द आहे ( अमेरिकन इंग्रजी ) प्रसिद्ध विद्वान Allen Metcalf हे OK: The Improbable Story Of America’s Greatest Word आपल्या या पुस्तकात असं म्हणतात कि ok हा hello नंतर जगात सर्वात जास्त वापरला जाणारा शब्द आहे.

ok शब्दाचा उपयोय स्वीकृती, अनुमोदन, सहमती, तडजोड यांच्यासाठी संकेत (इशारा) म्हणून वापरला जातो. ज्यांना इंग्रजी येत नाही अश्याही लोकांच्या तोंडी हा शब्द लगेच आपले बस्तान बसवतो आणि एकटाच जगभर फिरून येतो. आहे ना अमेझिंग!

 

स्वीकृती / अनुमोदन देण्यासाठी

जर तुम्हाला कुठे जायचं असेल, काही खायचं असेल, काही काम करायचं असेल आणि ज्या कामात दुसऱ्याची परवानगी घेणे आवश्यक असेल तर समोरची व्यक्ती तुम्हाला स्वीकृती दर्शवतांना ओके शब्द वापरतो. उदाहरणार्थ :

 • पाल्य – मी सिनेमा बघायला जाऊ का?
 • पालक – OK
 • विध्यार्थी – सर उद्या मी सुट्टी घेऊ शकतो का?
 • शिक्षक – OK

सूचना किंवा आदेश देण्यासाठी

 • जो उद्या शाळेत येणार नाही त्याला शिक्षा मिळेल OK !
 • मला उद्या सर्वांचा अभ्यास OK पाहिजे.
 • तू तुझ्या कामात लक्ष दे OK !
 • OK ! उद्या मी तुमचं पुस्तक परत करतो.
 • OK बघूया काय करता येईल !
 • तू दुपारच्या सुट्टीत मला लायब्रेरीत भेट OK !

आणखी काही उदाहरणे

 • माझी गाडी एकदम OK आहे.
 • इथे सगळं OK आहे.
 • आता माझी तब्यत OK आहे.
 • मी OK आहे !
 • सध्या माझा जॉब OK आहे.

OK प्रसिद्ध होण्याची कारणे

19 व्या शतकाच्या पूर्वार्धात साधारण 1810 ते 1840 च्या सुमारास अमेरिकन-इंग्रजी शब्दांना short करून उपयोगात आणण्याची जणू स्पर्धाच सुरु होती. तरुण सुशिक्षित पिढी ने या शब्दाचा संक्षिप्त रूपात उपयोग करून नवीन फॅशनच आणलेली.

तरुण मुलं Know Yuse साठी “KY” तर All Wright साठी “KW“, Our First Men साठी “OFMNo-Go साठी “NG” आणि Gone To Texas साठी “GT” तर Small Potatoes “SP” असा शब्दप्रयोग करायचे. आहे कि नाही गमतीशीर!

याचदरम्यान OK शब्दाला 1940 च्या राष्ट्रपती निवडणुकीत आनन्यसाधारण महत्व प्राप्त झालं होतं.

डेमोक्रेटिक पार्टीचे उमेदवार मार्टिन वान ब्युरन च्या समर्थकांनी आपल्या समर्थनासाठी असं म्हटलं की आम्ही Old Kinderhook ला सपोर्ट करतो. परंतु प्रचालनानुसार विरोधकांनी या शब्दाचं विकृतीकरण करून त्यांच्यावर कटाक्ष करायला सुरवात केली.

समर्थकांनी जिथे Vote For Ok (Ok अर्थात Old Kinderhook) ची मोहीम राबवली तिथे विरोधकांनी Ok ला Oll Korrect म्हणायला सुरुवात केली.

ओके ला प्रसिद्ध होण्यास दुसरे प्रमुख कारण म्हणजे टेलिग्राफचा अविष्कार. टेलिग्राफचा शोध 1844 मध्ये लागला, ok शब्द लोकप्रिय होऊन मोजकीच पाच वर्ष झाल्या नंतर. टेलिग्राफच्या सहाय्याने छोटे-छोटे संदेश इलेकट्रोनिक तरंगांच्या माध्यमातून एका जागेवरून दुसऱ्या जागेवर पोहचवल्या जायचे.

Communication पाठवणे किंवा प्राप्त करण्यासाठी OK शब्दाचा वापर खूप सरळ आणि सोपा वाटायचा. नंतर कुठलाही संवाद (Message) समाप्त करण्यासाठी किंवा थांबण्यासाठी OK हा शब्द अंतिम मानला गेला. आजही मानल्या जातो.

प्रसिद्ध होण्याचे आणखी एक कारण म्हणजे समजण्यास हा शब्द खूप सोपा आहे. अगदी अशिक्षित व्यक्तीला सुद्धा ok हा शब्द ओळखणे आणि लक्ष्यात ठेवणे सोपे आहे. हीच ok ची खरी ताकद आहे.

जगभरातल्या भाषांत शिरकाव

वास्तवात OK हा जगातला पहिला Viral Word आहे, तो सुद्धा त्या काळात ज्यावेळी सोशल मीडिया नव्हता.

आज या शब्दाचा जवळपास जगातल्या प्रयेक भाषेत वापर करण्यात येतो, स्वीकृती किंवा सहमती देण्याच्या अर्थाने as a ultimate neutral affirmative word.

जभरातल्या विविध देशातल्या भाषेत ओके शब्द वापण्यात विविधता आहे त्यातले काही उदाहरणं खाली देत आहे.

 • Afrikaans : oukei
 • Arabic : حسنا ( ukey) किंवा okey
 • Chinese : 好 Oukei
 • French : Okey
 • German : Okey
 • Hebrew : Okey בסדר
 • Hindi : ओके, OK
 • Japanese : オーケー oke
 • Korean : 확인 oke
 • Latin : Okej
 • Ukrainian : в порядку Okej

आहे ना अमेझिंग! इटुकलासा हा शब्द पण जगभर मजल मारली पठयाने, साऱ्या जगात त्याची कीर्ती आहे. इंग्रजी भाषा याच कारणाने जगभर मान्यताप्राप्त आहे कि ते सहज बदल स्वीकारते. प्रमाण भाषेचं ढोंग करत नाही. कुठल्याही भाषेच्या अतिक्रमणाचं भय नाही. नदीसारखी वळणं घेत वाहत जाते. जगातल्या प्रत्येक माणसापर्यंत.

मला आशा आहे की ओके चा फुल फॉर्म काय आहे? What is the full form of OK? या प्रश्नाचं सविस्तर आणि समाधानकारक उत्तर तुम्हाला मिळालं असेल. तुमच्या मनात आणखी काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्स मध्ये बिनधास्त विचारा, मला उत्तर द्यायला आनंद्च होईल.

लेख आवडला असल्या आपल्या मित्रांना, कुटुंबातल्या व्यक्तींना share करा.

because sharing is caring ❤️

Share on:

Leave a Comment