positive thoughts in marathi (marathi suvichar short, marathi suvichar on life, marathi suvichar for students)
सकारात्मक विचार म्हणजे केवळ आनंदी असणे असे नव्हे. तर सकारात्मक विचारांचा अर्थ असा आहे की आयुष्यात काही real values निर्माण करणे आणि कौशल्ये (skills) तयार करणे जे आपल्या आयुष्यात क्षणिक आनंदापेक्षा जास्त काळ टिकतील.
केवळ सकारात्मक विचारसरणी ठेवून तुम्हाला याचा परिणाम तुमच्या कार्यावर, तुमच्या आरोग्यावर आणि अगदी तुमच्या वयक्तीक जीवनावरही दिसू लागेल आणि तुम्हाला आयुष्य पूर्वीपेक्षा अधिक आनंदी वाटू लागेल.
सकारात्मक विचारांची शक्ती घनघोर अंधाराला सुद्धा एका आशेच्या किरणाने प्रकाशात बदलू शकते. आपल्या विचारांवर आपले स्वतःचे नियंत्रण असते, म्हणून तुम्हालाचं ठरवायचे आहे की,
तुम्हाला सकारात्मक विचार करायचा आहे की नकारात्मक?
आपण सर्वांनी 3 इडियट्स हा चित्रपट पाहिला आहे, ज्यात आमिर खानचा एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय डायलॉगआहे- All is Well. आणि आमिर खान या चित्रपटात पुन्हा पुन्हा हा डायलॉग का म्हणतो हे देखील आपल्याला माहित आहे.
तुमच्या डोक्यात सुरु असलेल्या नकारात्मक विचारांना घाबरू नका त्यांना थारा देऊ नका, आयुष्यात कुठलंही काम करतांना negative thoughts मुळे मागे राहू नका. पुढे जात रहा. होय! नकारात्मक विचारांना तुम्ही हरवू शकता ते फक्त सकारात्मक विचार करून.
म्हणून तुमच्या विचार शक्तीला सकारात्मक बनवण्यासाठी खाली काही सकारात्मक विचार (positive thoughts in marathi) दिले गेले आहेत, जे तुम्ही तुमच्या जीवनात अमलात आणू शकता. तुमच्या मनात सुरु असलेल्या नकारात्मक विचारांना थांबवू शकता व तुमच्या आयुष्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता. त्यामुळे प्रत्येक ओळ काळजीपूर्वक वाचा आणि त्याचा अर्थ काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा.
सकारात्मक विचार मराठीत (positive thoughts in marathi)
निर्धार

गर्दी नेहमीच त्याच वाटेवर चालते जी सहज आणि सोपी दिसते. याचा अर्थ असा नाही की गर्दी नेहमीच योग्य मार्गावर चालते. तुमचा मार्ग तुम्ही स्वत: निवडा कारण तुम्हाला तुमच्यापेक्ष्या कुणीच चांगले ओळखु शकत नाही.
जीवन
तुमचा जन्म झाला तेंव्हा तुम्ही रडत होता आणि इतर हसत होते. जीवन असे जागा की, शेवटच्या दिवशी तुम्ही हसत असाल आणि तुमच्यासाठी जग रडतं असेल.
अडचणी
जोपर्यंत तुम्ही इतरांना तुमच्या समस्या आणि अडचणींचे कारण समजत आहात, तोपर्यंत तुम्ही तुमच्या समस्या आणि अडचणी सोडवू शकत नाही. जबाबदारी घ्यायला शिका.
हार मानू नका
अर्ध्या वाटेवरून परत मागे फिरण्यात काही अर्थ नाही, कारण परत येताना तुम्हाला ध्येय गाठायला बाकी असेल तितकेच अंतर पार करावे लागेल. थांबू नका. नेहमी पुढे जा.
अशक्य
या जगात काहीही अशक्य नाही. आपण ते सगळं करू शकतो, ज्या बद्दल आपण विचार करू शकतो. आणि आपल्या डोक्यात असेही विचार येऊ शकतात ज्याचा विचार या जगात कुणी केलाही नसेल. नाविन्यपूर्ण (innovative) विचार करायला शिका.
जय-पराजय
यश आपली ओळख जगाशी करून देतं, आणि आपलं अपयश आपल्याला या जगाची ओळख करून देतं. यशाने हुरळून जाऊ नका आणि अपयश आल्यास खचून जाऊ नका.
आत्मविश्वास



कुठल्याही पायाभूत सुविधा नसतांना आकाशात किल्ले बांधलेत इथल्या मावळ्यांनी! कश्याच्या जोरावर? आत्मविश्वास!
महानता



इतिहास साक्षी आहे, दुसऱ्याला खाली पाडून कुणी महान होत नाही तर खाली पडून परत उभा राहणारा महान बनतो. उठा आणि पुन्हा तयारीला लागा.
चुका
तुमच्या कडून झालेल्या चुका वेळेवर न स्वीकारल्यास तुम्ही आणखी एक मोठी चूक करत आहात. जेव्हा आपण आपल्या चुका स्वीकारतो तेव्हाच आपण आपल्या चुकांपासून शिकू शकतो. तुमच्या कडून झालेली चूक कबूल करायला लाजू नका.
दृष्टीकोन
पावसाळ्यात सर्व पक्षी आसरा शोधतात पण गरुड पक्षी ढगांच्या वर चढून पाऊस टाळतो. समस्या प्रत्येकाला आहेत, परंतु त्यांचा सामना करण्यासाठी आपल्याकडे आपला दृष्टीकोन हवा. आपल्या कौशल्याने समस्येवर मात करा.
काळजी
तुमच्या नियंत्रणाखाली नसलेल्या गोष्टी आणि परिस्थितीमुळे तुम्ही जर काळजी करत असाल तर याचे दोन परिणाम होतील. तुमच्या वेळेचा अपव्यय होईल आणि भविष्याबद्दल तुम्हाला पश्चात्ताप वाटेल. ज्या गोष्टी तुमच्या हातातचं नाहीत त्याबद्दल काळजी करणे सोडा.
शक्ति
विश्वातल्या सर्व शक्ती आधीपासूनच आपल्या मालकीच्या आहेत. आपणच डोळ्यांवर हात ठेवतो आणि मग काळोख होतो म्हणून रडतो. उघळ्या डोळ्यांनी कल्पनेच्या उंच भराऱ्या घ्या.
पदवी
पदवीधर असणे हे फ़ायदेशीरच आहे. जर आपण इंजिनियर किंवा डॉक्टर असाल तर आपण तेच काम करू शकता. पण तुमच्याकडे जरी पदवी नसेल तरी निराश होऊ नका तुम्ही काहीही करू शकता. शिक्षणाचा आणि बुद्धिमत्तेचा काहीही संबंध नाही. या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत.
कठोर परिश्रम
जर आपण ठरवले तर आपण आपल्या आत्मविश्वासाच्या आणि कठोर परिश्रमाच्या बळावर स्वतःचे नशीब लिहू शकतो आणि आपले नशीब कसे लिहावे हे आपल्याला ठाऊक नसल्यास मग परिस्थिती आपले भाग्यठरवते. कठोर परिश्रमाच्या बळावर स्वतःचे शिल्पकार बना. स्वयंप्रकाशित व्हा.
स्वप्ने
स्वप्ने ती नाहीत जी आपण झोपेत असतांना बघतो. स्वप्ने अशी बघायला हवीत जी आपल्याला झोपू देणार नाहीत. उघळ्या डोळ्यांनी स्वप्ने बघा आणि ती पूर्ण करण्यासाठी झपाटल्यासारखे प्रयत्न करा. तुम्ही नक्की यशस्वी व्हाल.
वेळ



तुम्ही असे म्हणू शकत नाही की माझ्याकडे पुरेसा वेळ नाही कारण आपल्याकडे तितकाच वेळ असतो (24 तास) जेवढा महान आणि यशस्वी लोकांना मिळतो. वेळेचं योग्य नियोजन करा, दिवसाची सुरुवात लवकर करा. मुहूर्त पाहण्यात वेळ घालवू नका, महत्वाचं काम असेल तर आजच करा.
विश्वास
विश्वास दगडाला देव बनवतं आणि अविश्वास सजीव माणसाला सुद्धा निर्जीव बनवतो. प्रामाणिकपणे वागा. नेहमी इतरांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करा. लोक तुमच्यावर जीव ओवाळून टाकतील.
यश
लांबून आपल्याला यशाची सर्व दारं बंदच वाटतात कारण यशाचे मार्ग आपल्यासाठी तेंव्हाच उघडतात जेंव्हा आपण अगदी त्याच्या जवळ पोहचतो. म्हणून थांबू नका, कामात खंड पडू देऊ नका, तुमचं यशस्वी होणे निश्चित आहे.
सातत्य



छोट्या स्टेप्स आपल्याला जलद वर पोहचवतात. कामात सातत्य ठेऊन छोटी-छोटी पाऊलं उचला, छोटी सुरुवात करा पण काम मोठं करा.
आत्मघात
आत्महत्येचा विचार भेकडं लोक करतात. तुमची स्वप्ने जिवंत ठेवा जर तुमच्या स्वप्नांची ठिणगी विझली असेल तर तसेही तुम्ही मृत आहात. वयक्तिक आयुष्यात आलेलं प्रत्येक आवाहन स्वीकार करा मजबूत लढा द्या.
आनंद
ही पूर्वनिर्मित वस्तू नाही … ती आपल्या स्वतःच्या कृतीतून येते. यासाठी लोकांना प्रेम वाटा, प्राणिमात्रांवर दया दाखवा ते तुम्हाला १० पटीने प्रेम परत करतील त्यातून तुम्हाला आनंद मिळेल.
वेगळा मार्ग
आणि शेवटी ही कविता…
The Road Not Taken
(एक न निवडलेली वाट)
पिवळ्या जंगलात दोन वाटा स्वतंत्रपणे जात होत्या,
आणि हॅलो, मला त्यापैकी एकचं वाट निवडायची होती.
एक प्रवासी म्हणून मी तिथे बराच वेळ उभा राहिलो
मग मी जितक्या दूर पाहू शकत होतो एका वाटेकडे, मी पाहिलं
वृक्षांची दाटी दिसें पर्येंत पाहत राहिलो
मग मी दुसरी वाट धरली तीही तेवढीच चांगली होती,
कदाचित त्याहून अधिक चांगली
कारण येथे गवत जास्त, कदाचित या वाटेवरून प्रवासी कमी जायचे
आणि त्या सकाळी दोन्ही रस्ते एकसारख्या पानांनी झाकले गेले होते.
त्यावर कुणाच्याही चालण्याचे निशान नव्हते.
मग मी पहिली वाट, नंतर कधीतरी येईल म्हणून सोडून दिली
हे माहित असतांना ही की एक मार्ग कसा पुढच्या मार्गावर नेऊन सोडतो
मी तिथे परत कधी येईल का याची मला खात्री नव्हती.
आजपासून अनेक युगांनंतर
दीर्घ श्वास घेत मी म्हणणार
एका जंगलात दोन वाटा स्वतंत्रपणे जात होत्या आणि मी
ती वाट निवडली ज्यावरून मोजकेचं वाटकरी प्रवास करतात
आणि त्यामुळेच हा सारा बदल घडू शकला.
-Robert Lee Frost
आशा करतो तुम्हाला हा लेख 21 सकारात्मक विचार (positive thoughts in marathi) आवडला असेल आणि तुम्ही हे positive thoughts in marathi तुमच्या जीवनात अमलात आणा. आनंदी जीवन जागा आपल्या मित्रांना आणि कुटुंबातील सदस्यांना हा लेख share करायला विसरू नका.
because sharing is caring ❤️