रायगड किल्ला/ Raigad fort information in Marathi

रायगड किल्ला/ Raigad fort information in marathi

दुर्गप्रकार-

गिरिदुर्ग

उंची-

८२० मीटर/२७०० फूट

डोंगररांग

सह्याद्री

ठिकाण-

रायगड, महाराष्ट्र

पोहचायचे ठिकाण-

महाड

चढाईची श्रेणी

सोपी

सध्याची अवस्था

ठीक

ताबा-

मराठा साम्राज्य-(1656-1689, 1707-1818)
मोगल साम्राज्य-(1689-1707)
ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी-(1818-1858)
ब्रिटिश साम्राज्य-(1858-1947)
केंद्र सरकार, भारत-(1947-वर्तमान)

वास्तुविद्याविशारद-

हिरोजी इंदुलकर

Raigad fort/रायगडाची इतर नावे

आजवरच्या इतिहासात रायगड किल्ल्याला (Raigad fort) इतर १५ विविध नावांनी संबोधिले गेले आहे. जसे..

 • रायगड 
 • रायरी 
 • इस्लामगड 
 • नंदादीप 
 • जंबुद्वीप 
 • तणस 
 • राशिवटा 
 • बदेनूर 
 • रायगिरी 
 • राजगिरी 
 • भिवगड 
 • रेड्डी 
 • शिवलंका 
 • राहीर 
 • पूर्वेकडील जिब्राल्टर
raigad fort
Raigad Fort

सभासद बखर

(रायगड किल्ला/ Raigad fort) ‘देवगिरीच्याहुन दशगुणी, दीड गाव उंच, प्रशस्त जागा. पर्जन्यकाळी कड्यावर गवत उगवत नाहि. उभ्या कड्यावर पाखरू उतरावयास जागा नाहि’ हे बघून महाराज खुशीने म्हणाले… ‘तख्तास जागा हाच गड करावा’. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या शब्दाचा उल्लेख बखरीत आहे. रायगडाचे स्थान लक्षात घेऊन या किल्यावरच राजधानी बसवण्याचे महाराजांनी निश्चित केले.

राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चखोटा. चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे दिड गांव उंच. पर्जन्यकाळी कडियावर गवत उगवत नाही आणि धोंडा तासीव एकच आहे. दौलताबाद पृथ्वीवर चखोट गड खरा, परंतु तो उंचीने थोडका. दौलताबादचे दशगुणी गड उंच असे देखोन बहुत संतुष्ट झाले आणि बोलिले, तक्तास जागा हाच गड करावा.

रायगड किल्ला/Raigad Fort हा मराठी मनाचा मानबिंदू आणि महाराष्ट्राची शान आहे. छत्रपती शिवाजीराजांनी रायगडचे स्थान आणि महत्त्व पाहून इ.स.1674 ला या गडाला आपल्या राज्याची राजधानी बनविली.

रायगड हा महाराष्ट्रातील, रायगड जिल्ह्यातील महाड येथे एक डोंगर किल्ला आहे. हा डेक्कन पठारामधील सर्वात मजबूत किल्ल्यांपैकी एक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांची राजधानी बनवताना रायगडवर बरीच बांधकामे व संरचना बांधल्या.

हा किल्ला सह्याद्री पर्वतरांगेत आहे, त्याची उंची समुद्रसपाटीपासून 820 मीटर (2,700 फूट) आहे. गडावर सुमारे 1737 पायर्‍या आहेत. रायगड रोप-वे, एक एरियल ट्राम-वे अस्तित्त्वात आहे. या रोप-वेची उंची 400 मीटर आहे आणि लांबी 750 मीटर आहे आणि त्यामुळे रायगडावर पोहचायला फक्त 4 मिनिटे लागतात.

रायगड किल्ला/Raigad Fort 1765 पासून रायगड जिंकणे हा ब्रिटिश ईस्ट इंडियन कंपनीसाठी त्यांच्या सशस्त्र मोहोमेचा महत्वाचा भाग होता. ब्रिटिश लोक रायगडाला ‘पूर्वेकडील जिब्राल्टर’ असे म्हणत असत. अखेरीस 9 मे 1818 रोजी इंग्रजांनी किल्ला जिंकला, लुटला आणि नष्ट केला.

apj Abdul Kalam यांची प्रेरणादायी 12 मराठी पुस्तके

शिवराज्याभिषेक

शिवराज्याभिषेक हा रायगडाने अनुभवलेला सर्वश्रेष्ठ प्रसंग आहे. महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे, महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासातील एक लक्षणीय घटना आहे. १९ मे १६७४ रोजी राज्याभिषेकाच्या विधी पूर्वी महाराजांनी प्रतापगडाच्या भवानीचे दर्शन घेतले.

तीन मण सोन्याचे म्हणजेच ५६ हजार किंमतीचे छत्र देवीला अर्पण केले. गडावरील राज सभेत ६ जून १६७४, ज्येष्ठ शुद्ध १३ शके १५९६, शनिवार या दिवशी राज्याभिषेक साजरा झाला.

२४ सप्टेंबर १६७४, ललिता पंचमी आश्विन शुद्ध ५, आनंद संवत्सर शके १५९६ या दिवशी तांत्रिक पद्धतीने राजांनी स्वतःला आणखी एक राज्याभिषेक करून घेतला.

marathi typing tool free download कसे करावे? Windows, Chrome आणि Android साठी. 5 सोप्या steps

Raigad Fort/रायगड किल्याचा इतिहास

शिर्के पाचव्या शतकापासून रायगडाचे स्वामी होते. इ.स.1656 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेतला, त्याआधी रायगडाला रायरी म्हणून ओळखले जायचे. हा किल्ला जावळीचा जहांगीरदार चंद्रराव मोरे यांच्या ताब्यात होता. चंद्रराव मोरे हे विजापूरकरांचे (आदिलशाह) पिढीजात जहागीरदार होते.

तदनंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरी किल्ल्याचे नूतनीकरण व विस्तारीकरण केले. त्याचे नाव रायगड (राजाचा किल्ला) असे ठेवले. ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्याची राजधानी बनले.

Raigad Fort/रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी पाचाड व रायगडवाडी ही गावे आहेत. रायगडमधील मराठा राजवटीत ही दोन्ही गावे अत्यंत महत्त्वाची मानली जात होती. रायगड किल्ल्याच्या माथ्यावरची खरी चढाई पाचडपासून सुरू होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शासनकाळात पाचाड गावात 10,000 घोड्यांची घोडदळ नेहमीच स्टँडबायवर ठेवली जात असे. शिवाजी महाराजांनीं रायगडपासून सुमारे दोन मैलांच्या अंतरावर लिंगाणा हा दुसरा किल्लाही बांधला. लिंगाणा किल्ला कैद्यांना ठेवण्यासाठी वापरला जात असे.

त्यानंतर इ.स. 1689 मध्ये मुघल सरदार झुल्फिखार खानने रायगड ताब्यात घेतला आणि औरंगजेबाने त्याचे नाव इस्लामगड असे ठेवले. 1707 मध्ये, सिद्दी फतेहखान याने हा किल्ला ताब्यात घेतला आणि 1733 पर्यंत रायगड त्याच्या ताब्यात होता. 1733 मध्ये हा गड मराठ्यांनी पुन्हा ताब्यात घेतला पुढे 1818 पर्येंत रायगडावर मराठ्यांचा ताबा होता.

इ.स. 1765 पासून ब्रिटिशांचा या गडावर डोळा होता. सध्याचा महाराष्ट्रातील दक्षिणेकडील जिल्हा असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणसह रायगडचा किल्ला ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने सशस्त्र मोहिमेत लक्ष्य केले होते. 1818 मध्ये कालकाई च्या टेकडीवर तोफ डागण्यात आली. आणि कराराच्या अनुषंगाने रायगड किल्ला/Raigad Fort हा 9 मे 1818 रोजी ते ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात देण्यात आला.

World’s No.1 Richest Man Elon Musk कोण आहेत?

प्रमुख वैशिष्ट्ये

रायगड किल्ला/Raigad Fort हा छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला होता आणि गडाचे मुख्य वास्तुविशारद/अभियंता हीरोजी इंदुलकर होते. मुख्य राजवाडा लाकूड वापरून बांधला गेला होता, आता त्यातील फक्त आधारस्तंभ उरले आहेत.

मुख्य किल्ल्याचे अवशेष म्हणजे राण्यांच्या खोल्या आहेत, यात सहा खोल्यांचा समावेश आहे, ज्यामध्ये प्रत्येक खोलीत स्वतःची खासगी स्नानगृहे आहेत. याव्यतिरिक्त, तीन टेहळणी बुरुजांचे अवशेष थेट राजवाड्याच्या मैदानासमोर दिसतात, त्यापैकी फक्त दोनच उरले, कारण तिसऱ्या बुरुजाचा एका बॉम्बस्फोटात नाश झाला होता. रायगड किल्ल्यात घोडेस्वार चालकांसाठी बाजारपेठ उपलब्ध असल्याचे अवशेषही आहेत. गडावर गंगासागर तलाव म्हणून ओळखल्या जाणार्‍या कृत्रिम तलावाचे देखील दर्शन होते.

किल्ल्याचा एकमेव मुख्य मार्ग म्हणजे “महा दरवाजा” (प्रचंड दरवाजा). जो पूर्वी सूर्यास्ताच्या वेळी बंद केला जात होता. महा दरवाजाच्या दोन्ही बाजूला दोन प्रचंड बुरुज असून उंची अंदाजे 65-70 फूट उंच आहे. या दरवाज्यापासून किल्ल्याचे शिखर 600 फूट उंच आहे.

रायगड किल्ल्याच्या आत राज- दरबारात शत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूळ सिंहासनाची प्रतिकृती आहे. किल्ल्यावरून टकमक टोक नावाच्या शिक्षा अंमलबजावणीचे ठिकाण पहायला मिळते. स्वराज्याशी गद्दारी करणाऱ्या कैद्यांना त्यांच्या मृत्यूपर्यंत ठार मारण्याची शिक्षा सुचवल्यावर या टोकावरून त्यांना खाली फेकण्यात येत असे, या भागास आता कुंपण घालण्यात आले आहे.

मुख्य बाजारपेठेच्या अवशेषांसमोरच छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. जगदीश्वर मंदिर व छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी गडावर आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आई माता जिजाबाईची समाधी खाली पाचड या गावी आहे.

इंटरनेट वरून पैसे कमावण्याचे 12 मार्ग (Without Investment)

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे

 1. महाराजांची समाधी : मंदिराचा पूर्वदरवाजापासून थोड्या अंतरावर जो अष्टकोनी चौथरा दिसतो तीच महाराजांची समाधी. सभासद बखर म्हणते, ‘क्षत्रियकुलावतंस श्रीमन्महाराजाधिराज शिवाजी महाराज छत्रपती यांचा काल शके १६०२चैत्र (शुद्ध १५ (इसवी1680) या दिवशी रायगड येथे मृत्यू झ़ाला. तेथे काळ्या दगडाचा चिऱ्याचे सुमारे छातीभर उंचीचे अष्टकोनी जोते बांधिले असून वरून फरसबंदी केलेली आहे. फरसबंदीचा खाली पोकळी आहे, तिथे महाराजांचा अवशिष्टांश रक्षामिश्र मृत्तिकारूपाने सापडते. दहनभूमी पलीकडे भग्‍न इमारतींचा अवशेषांची एक रांग आहे, ते शिबंदीचे निवासस्थान असावे. त्याचा पलीकडे सदर वस्तीपासून विलग असा एक घराचा चौथरा दिसतो. हे घर इ.स. 1674 मध्ये इंग्रज वकील हेनरी ऑक्झेंडन यास राहावयास दिले होते. महाराजांचा समाधीचा पूर्वेकडे भवानी टोक आहे तर उजवीकडे दारूची कोठारे, इथून बारा टाकी दिसतात.
 2. हिरकणी टोक : गंगासागराचा उजवीकडे पश्चिमेस जी चिंचोळी वाट जाते ती हिरकणी टोकाकडे जाते. हिरकणी टोकाशी संबंधित हिरकणी गवळणीची एक कथा सांगितली जाते. या बुरुजावर काही तोफाही ठेवलेल्या दिसतात. बुरुजावर उभे राहिले तर डाव्या हाताला गांधारीचे खोरे, उजव्या बाजूला काळ नदीचे खोरे दिसते. तसेच इथून पाचाड, खुबलढा बुरूज, मशीद मोर्चा ही ठिकाणे तोफेचा माऱ्यात आहेत. त्यामुळे युद्धशास्त्राचा तसेच लढाऊ दृष्टीने ही खूप महत्त्वाची आणि मोक्याची जागा आहे.
 3. टकमक टोक : बाजारपेठेच्या समोरील टेपावरून खाली उतरून टकमक टोकाकडे जाता येते. तेथेच दारूच्या कोठाराचे अवशेष दिसतात. जसजसे टोकाकडे जावे तसतसा रस्ता निमुळता होत जातो. उजव्या हाताला सरळ तुटलेला २६०० फूट खोल कडा आहे. टोकावर वारा प्रचंड असतो व जागाही कमी असल्यामुळे गोंधळ न करता सावधानता बाळगावी लागते.आधीपासुनच शिवराज्यकाळात या ठिकाणावरून गुन्हेगारांचा कडेलोट केला जाई.
 4. वाघदरवाजा : कुशावर्त तलावाजवळून घळीने उतरत वाघ दरवाजाकडे जाता येते. आज्ञापत्रात लिहिले आहे की, ‘किल्ल्यास एक दरवाजा थोर आयब आहे, यांकरीता गड पाहून एक दोन – तीन दरवाजे, तशाच चोरदिंडा करून ठेवाव्या. त्यामध्ये हमेशा राबत्यास पाहिजे तितक्या ठेवून वरकड दरवाजे व दिंडा चिणून टाकाव्या.’ हे दूरदर्शीपणाचे धोरण ठेऊनच महाराजांनी महादरवाजाशिवाय हा दरवाजा बांधून घेतला. या दरवाजाने वर येणे जवळजवळ अशक्यच असले तरी दोर लावून खाली उतरू शकतो. पुढे राजाराम महाराज व त्यांची मंडळी झुल्फिरखानाचा वेढा फोडून याच दरवाजाने निसटली होती.
 5. कुशावर्त तलाव : होळीचा माळ डाव्या हातास सोडून उजवीकडील वाट कुशावर्त तलावाकडे जाते. तलावाजवळ महादेवाचे छोटेसे देऊळ दिसते. देवळासमोर फुटलेल्या अवस्थेतला नंदी दिसतो.
 6. जगदीश्वर मंदिर : बाजारपेठेचा खालचा बाजूस पूर्वेकडील उतारावर ब्राह्मणवस्ती, ब्राह्मणतळे वगैरे अवशेष दिसतात. तेथूनच समोर जे भव्य मंदिर दिसते तेच महादेवाचे म्हणजे जगदीश्वराचे मंदिर. मंदिरासमोर नंदीची भव्य आणि सुबक मूर्ती आहे. पण सध्या ही मूर्ती भग्रावस्थेत आहे. मंदिरात प्रवेश केला की भव्य सभामंडप लागतो. मंडपाच्या मध्यभागी भव्य कासव आहे. गाभाऱ्याचा भिंतीस हनुमंताची भव्य मूर्ती दिसते. मंदिराचा प्रवेशद्वाराचा पायऱ्यांचा खाली एक लहानसा शिलालेख दिसतो. तो पुढीलप्रमाणे, ‘सेवेचे ठायी तत्पर हिरोजी इटळकर’ या दरवाजाचा उजव्या बाजूस भिंतीवर एक सुंदर शिलालेख दिसतो. याचा थोडक्यात अर्थ पुढीलप्रमाणे -’सर्व जगाला आनंददायी असा हा जगदीश्वराचा प्रासाद श्रीमद् छत्रपती शिवाजी राजांचा आज्ञेने शके १५९६ मध्ये आनंदनाम संवत्सर चालू असताना सुमुहुर्तावर निर्माण केला. या रायगडावर हिरोजी नावाचा शिल्पकाराने विहिरी, तळी, बागा, रस्ते, स्तंभ, गजशाळा, राजगृहे अशांची उभारणी केली आहे. ती चंद्रसूर्य असेतोवर खुशाल नांदो.’
 7.  शिरकाई देऊळ : महाराजांचा पुतळ्याचा डाव्या बाजूस जे छोटे देऊळ दिसते ते शिरकाईचे देऊळ. शिरकाई ही गडावरील मुख्य देवता. शिर्के पाचव्या शतकापासून रायगडाचे स्वामी होते. याची आठवण देणारी गडस्वमिनी शिरकाई हिचे मंदिर गडावर आहे. लोकमान्य टिळकांचा काळात मावळकर नावाचा इंजिनिअराने हे मंदिर बांधले आहे. ते शिरकाईचे मूळ मंदिर नाही. मूर्ती मात्र प्राचीन आहे. मूळ शिरकाई मंदिर राजवाड्यास लागून डावीकडे होळी माळावर होते. तेथे मूळ देवळाचा चबुतरा अजूनही आहे. ब्रिटिश काळात तेथे शिरकाईचा घरटा हा नामफलक होता.
 8. बाजारपेठ : नगारखान्याकडून डावीकडे उतरून आले की, समोर जी मोकळी जागा दिसते तो ‘होळीचा माळ’. तेथेच आता शिवछत्रपतींचा भव्य पुतळा बसवलेला आहे. पुतळ्यासमोर जे दोन रांगांमध्ये भव्य अवशेष दिसतात तीच शिवाजी महाराजांचा काळातील बाजारपेठ. पेठेचा दोन रांगात प्रत्येकी २२ दुकाने आहेत. दोन रांगांमधून जवळजवळ चाळीस फूट रुंदीचा रस्ता आहे.हे बाजार पेठ आजही हुबेहुब जसेचा तसेच आहे.
 9. नगारखाना : सिंहासनाचा समोर जे भव्य प्रवेशद्वार दिसते तोच हा नगारखाना. हे बालेकिल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे. नगारखान्यातून पायऱ्या चढून वर गेले की माणूस किल्ल्यावरील सर्वाधिक उंचीवर असतो.
 10. राजसभा : महाराजांचा राज्याभिषेक जेथे झ़ाला, तीच ही राजसभा. राजसभा २२० फूट लांब व १२४ फूट रुंद आहे. येथेच पूर्वेकडे तोंड केलेली सिंहासनाची जागा आहे. येथे बत्तीस मणांचे सोन्याचे सिंहासन होते. सभासद बखर म्हणते, ‘तख्त सुवर्णाचे बत्तीस मणांचे सिद्ध करवले. नवरत्‍ने अमोलिक जितकी कोशात होती, त्यामध्ये शोध करून मोठी मोलाची रत्‍ने जडाव केली.’
 11. राजभवन : राणीवशाचा समोर डाव्या हातास दासदासींचा मकानांचे अवशेष दिसतात. या अवशेषांचा मागे दुसरी जी समांतर भिंत आहे त्या भिंतीचा मध्यभागी जो दरवाजा आहे तेथून बालेकिल्ल्याचा अंतर्भागात प्रवेश केला की जो प्रशस्त चौथरा लागतो तेच हे महाराजांचे राजभवन. राजभवनाचा चौथारा ८६ फूट लांब व ३३ फूट रुंद आहे. १३. रत्‍नशाळा : राजप्रासादाजवळील स्तंभांच्या पूर्वेकडे असलेल्या मोकळ्या जागेत एक तळघर आहे, तीच ही रत्‍नशाळा. हा खलबतखाना म्हणजेच गुप्त बोलणी करण्यासाठी केलेली खोली असावी असेही म्हणतात.
 12. मेणा दरवाजा : पालखी दरवाजाने वर प्रवेश केला की, चढउतार असलेला एक सरळ मार्ग आपल्याला मेणा दरवाजापर्यंत घेऊन जातो. उजव्या हातास जे सात अवशेष दिसतात ते आहेत राण्यांचे महाल. मेणा दरवाजातून बालेकिल्ल्यावर प्रवेश करता येतो.
 13. पालखी दरवाजा : स्तंभांचा पश्चिमेस भिंत असलेल्या भागातून ३१ पायऱ्या बांधलेल्या दिसतात. त्या चढून गेल्यावर जो दरवाजा लागतो तो पालखी दरवाजा. या दरवाजातून बालेकिल्ल्यात प्रवेश करता येतो.
 14.  स्तंभ : गंगासागराचा दक्षिणेस दोन उंच मनोरे दिसतात. त्यासच स्तंभ म्हणतात. जगदीश्वराचा शिलालेखामध्ये ज्या स्तंभांचा उल्लेख केला आहे, ते हेच असावेत. ते पूर्वी पाच मजले होते असे म्हणतात. ते द्वादश कोनी असून बांधकामात नक्षीकाम आढळते.
 15. गंगासागर तलाव : हत्तीतलावापासून जवळच रायगड जिल्हा परिषदेचा धर्मशाळेचा इमारती दिसतात. धर्मशाळेपासून दक्षिणेकडे अंदाजे ५० -६० पावले चालत गेल्यास जो तलाव लागतो तो गंगासागर तलाव. महाराजांचा राज्याभिषेकानंतर सप्तसागर व महानांची आणलेली तीर्थे याच तलावात टाकली गेली. म्हणूनच याचे गंगासागर असे नाव पडले. शिवाजी महाराजांचा काळात शिबंदीसाठी याचे पाणी वापरण्यात येई.
 16. हत्ती तलाव : महादरवाजातून थोडे पुढे आल्यावर जो तलाव दिसतो तो हत्ती तलाव. गजशाळेतून येणाऱ्या हत्तींच्या स्नानासाठी आणि पिण्यासाठी या तलावाचा उपयोग होत होता.
 17. महादरवाजा : महादरवाजाचा बाहेरील अंगास वर दोन्ही बाजूस दोन सुंदर कमळाकृती कोरल्या आहेत दरवाजावर असणाऱ्या या दोन कमळांचा अर्थं म्हणजे किल्ल्याचा आत ‘श्री आणि सरस्वती’ नांदत आहे. ‘श्री आणि सरस्वती’ म्हणजेच ‘विद्या व लक्ष्मी’ होय. महादरवाजाला दोन भव्य बुरूज असून एक ७५ फूट तर दुसरा ६५ फूट उंचं आहे. तटबंदीमध्ये जी उतरती भोके ठेवलेली असतात त्यास ‘जंग्या’ म्हणतात. शत्रूवर मारा करण्यासाठी ही भोके ठेवलेली असतात. बुरुजांमधील दरवाजा हा वायव्य दिशेस तोंड करून उभा आहे. महादरवाजातून आत आल्यावर पहारेकऱ्यांचा देवड्या दिसतात तसेच संरक्षकांसाठी केलेल्या राहण्याचा खोल्या दिसतात. महादरवाजापासून उजवीकडे टकमक टोकापर्यंत तर डावीकडे हिरकणी टोकापर्यंत तटबंदी बांधलेली आहे.
 18. चोरदिंडी : महादरवाजापासून उजवीकडे टकमक टोकापर्यंत जी तटबंदी जाते, त्यावरून चालत गेल्यास जिथे ही तटबंदी संपते, त्याचा थोडे अलीकडे बुरुजात ही चोरदिंडी बांधलेली आहे. बुरुजाचा आतून दरवाजापर्यंत येण्यासाठी पायऱ्या आहेत.
 19. खुबलढा बुरूज : गड चढू लागले म्हणजे एक बुरुजाचे ठिकाण दिसते, तोच हा सुप्रसिद्ध खुबलढा बुरूज. बुरुजा शेजारी एक दरवाजा होता, त्यास ‘चित्‌ दरवाजा’ म्हणत पण हा दरवाजा आता पूर्णपणे उध्वस्त झ़ाला आहे.
 20. नाना दरवाजा : या दरवाजास ‘नाणे दरवाजा’ असेही म्हणत. नाना दरवाजा याचाच अर्थ लहान दरवाजा. इ.स. १६७४ च्या मे महिन्यात राज्याभिषेकाचा निमित्ताने इंग्रजांचा वकील हेन्‍री ऑक्झेंडन याच दरवाजाने आला होता. या दरवाजास दोन कमानी आहेत. दरवाजाचा आतील बाजूस पहारेकऱ्यांसाठी दोन लहान खोल्या आहेत. त्यांस ‘देवडा’ म्हणतात. दरवाजास अडसर घालण्यासाठी खोबणी दिसतात.
 21. मदारमोर्चा किंवा मशीदमोर्चा : चित्‌ दरवाजाने गेल्यावर नागमोडी वळणे घेत गेलेल्या रस्त्याने पुढे गेल्यावर एक सपाटी लागते. या मोकळ्या जागेत टोकाशी दोन पडक्या इमारती दिसतात. त्यापैकी एक पहारेकऱ्यांची जागा असून दुसरे धान्याचे कोठार आहे. येथे मदनशहा नावाचा साधूचे थडगे आहे. तेथे एक प्रचंड तोफही दिसते. येथून पुढे गेल्यावर खडकात खोदलेल्या तीन गुहा दिसतात.
 22. पाचाडचा जिजाबाईंचा वाडा : उतारवयात जिजाबाईंना गडावरची थंड हवा, वारा मानवत नसे, म्हणून महाराजांनी त्यांचासाठी पाचाडजवळच एक वाडा बांधून दिला. तोच हा मासाहेबांचा राहता वाडा. वाड्याची व्यवस्था ठेवण्यासाठी काही अधिकारी तसेच शिपायांची व्यवस्थाही महाराजांनी केली होती. पायऱ्यांची एक उत्तम विहीर, तसेच जिजाबाईंना बसण्यासाठी केलेले दगडी आसन बघण्यासारखे आहे. यास ‘तक्क्याची विहीर’ असेही म्हणतात.
 23. रायगडावरील अश्‍मयुगीन गुहा : पाचाड गावातून रायगडचा दोरवाटेचा (रोप वेचा) तळावरून पाचाड खिंडीत येते. येथून पायउतार होऊन अवघ्या १४३५ पायऱ्या चढून गेले, की रायगडमाथा गाठता येतो. पण या पाचाड खिंडीतच रायगडाचा विरुद्ध दिशेस अवघ्या ४-५ मिनिटांचा चढणीवर एक गुहा आहे. तिला म्हणतात “वाघबीळ’ किंवा “नाचणटेपाची गुहा.’ नवे ट्रेकर्स या गुहेला “गन्स ऑफ पाचाड’ असे म्हणू लागले आहेत.

जगातील इतर सर्व गुहांपेक्षा या गुहेची रचना पूर्ण वेगळी आहे. पाचाड खिंडीतून येथवर चढून आले की गुहेचे एक तोंड दिसते. या तोंडातून आत गेले की समोर येणारे दृश्‍य अचंबित करणारे आहे. दोन गोलाकृती प्रचंड भोके पलीकडील बाजूला आहेत. तिथवर गेले, की पाचाडचा भुईकोट किल्ला, पाचाड गाव व पाचाडपासून ते पाचाड खिंडीकडे येणारा घाटरस्ता व्यवस्थित पाहता येतो.

या गुहेत सतत एकापाठोपाठ येणाऱ्या थंड वाऱ्याचा झ़ुळका आपला सारा थकवा दूर करतात. ज्या अर्थी अश्‍मयुगीन मानवाची इथे वस्ती होती. त्याअर्थी इथे जवळपास बारमाही पाण्याचे एखादे नैसर्गिक ठिकाण निश्‍चित असणार. त्याचा शोध घ्यायलाच हवा. रायगड पाहायला शेकडो-हजारो दुर्गयात्रींना या वाघबीळ गुहेची कल्पनाच नसते. अश्‍मयुगीन मानवाचे जुने वसतीस्थान, ३ तोंडे असणारी गुहा, तेथून दिसणारा उत्कृष्ट देखावा, सतत वाहणारा थंड वारा यांची अपूर्वाई येथे भेट देणाऱ्याला जाणवते.

तुम्हाला फसेबूकचं व्यसन लागलं आहे का? कसे सोडावे ? 8 उपाय

कसे पोहोचावे –

रायगड किल्ला/Raigad Fort वर शाळा महाविद्यालयांच्या आणि अनेक पर्यटन कंपन्यांच्या सहली रायगडावर आयोजित केल्या जातात. पुण्याहून रायगडापर्यंत जाण्यासाठी थेट बससेवा आहे. ही बस पुण्यातून भोरमार्गे वरंधा घाटातून महाडमार्गे पाचाड पर्येंत येते. गडावर दोरवाटेने (रोप-वे) पाळण्यात बसून जाता येते, तर हजार-बाराशे पायऱ्या चढून रायगडावर पोहोचता येते.

गडावर राहायची सोय

गडावर राहण्यासाठी उत्तम सोय आहे. गडावर एक धर्मशाळा आहे. एक मोठा हॉल व छोट्या मोठ्या अशा ७ ते ८ खोल्या आहेत. राहण्याची सोय विनाशुल्क आहे.

गडावर खाण्याची सोय

गडावर खाण्याची व विविध वस्तूंची दुकाने आहेत. गडावर खाण्याची सोय आहे पण स्वतःच्या सोयीप्रमाणे खाद्यपदार्थ घेऊन जावे.

गडावर पिण्याच्या पाण्याची सोय

गडावर जाण्यासाठी आता एकूण दोन मार्ग आहेत. येथे पाण्याची खूप चांगली सोय आहे. शुद्ध पाणी आणि फिल्टर केलेले पाणी आपणास मिळते. गडावर गंगासागर तलाव इत्यादी अनेक पाण्याचे तलाव आहेत. त्यांत मुबलक पाणी १२ महिने असते.

लेख आवडल्यास सोशल मीडियावर नक्की शेअर करा.

because sharing is caring ❤️

Share on:

4 thoughts on “रायगड किल्ला/ Raigad fort information in Marathi”

 1. Hii गुरुजी

  मला हे जाणुन घ्यायचं होत की तुमचा ब्लॉग कधी सुरू केला आहे.

  आणि हे पण विचारायचं होत की मराठी ब्लॉगिंग मध्ये ग्रोथ आहे का चांगली.

  आणि तुमच्या इमेज ची साईज किती आहे उंची आणि रुंदी मध्ये.

  मराठी ब्लॉगिंग मध्ये पण वाचक affiliate product विकत घेतात?

  शेवटचं थीम कोणती वापरता तुम्ही या ब्लॉग वरती.

  मला तुमच्या ब्लॉग चा डिझाईन खूप पसंद आला.

  Reply
  • नमस्कार गजानन सर..
   प्र- “मला हे जाणुन घ्यायचं होत की तुमचा ब्लॉग कधी सुरू केला आहे”?
   उ- मी हा ब्लॉग २०२० साली सुरु केला.
   प्र- मराठी ब्लॉगिंग मध्ये ग्रोथ आहे का चांगली?
   उ- होय, मराठी भाषेत खुप कमी कन्टेन्ट आहे इंटरनेट वर त्याचा फायदा आपण घेऊ शकतो पण त्या साठी कठोर मेहनत घ्यायची इच्छाशक्ती हवी. शिवाय ट्रॅफिक येण्यासाठी संयम ठेवावा लागेल. मराठी भाषेत cpc कमी असल्या कारणाने कदाचित इतर भाषेपेक्षा कमी अर्निग होण्याची शक्यता असते. जास्त ट्रॅफिक हवा असल्यास आपणाला जास्तीत जास्त पोस्ट लिहाव्या लागतील. त्यासाठी तेवढा वेळ मराठीत ब्लॉगिंग करतांना तुम्हाला द्यावा लागेल. तर यश निश्चित आहे.
   प्र- तुमच्या इमेज ची साईज किती आहे उंची आणि रुंदी मध्ये.?
   उ- मी सहसा 800px by 429px च्या इमेजेस वापरतो.
   प्र- मराठी ब्लॉगिंग मध्ये पण वाचक affiliate product विकत घेतात?
   उ- अजूनतरी नाही. पण मला आशा आहे कि घेतील एक दिवस
   प्र- थीम कोणती वापरता तुम्ही या ब्लॉग वरती.
   उ- फ्री wordprees थीम OceanWP.
   धन्यवाद.

   Reply
 2. मी एक विचारायचं विसरून गेलो की तुम्ही मराठी keyword research कसे करता प्लीज बताये.

  Reply
  • नमस्कार गजानन सर…
   “तुम्ही मराठी keyword research कसे करता प्लीज बताये.”

   उत्तर – तर फक्त मराठी मध्ये keyword research करण्यासाठी असे कुठलेही टूल आत्तातरी नाही? अपवाद म्हणून keyword.io टूल मराठी कीवर्ड शोधू शकतो पण त्याची विश्वास पात्रता कमी आहे? आपण मराठीत कीवर्ड शोधण्यासाठी google keyword planner चा वापर करावा. किंवा शक्यतो google search इंजिन मध्ये कीवर्ड type करून लोकं काय शोधतात याचा अंदाज घ्यावा.
   धन्यवाद.

   Reply

Leave a Comment