salmon fish in marathi: साल्मन /ˈसॅमन / Salmon fish ला मराठी भाषेत काय म्हणतात? हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर हा मासा Salmonidae कुटूंबातील एका माशाचा प्रकार आहे. त्याच बरोबर trout, char, grayling, आणि whitefish हे माशे सुद्धा Salmonidae कुटूंबातील प्रजाती आहेत. सॅल्मन माश्याचे मूळ उत्तर अटलांटिक (genus Salmo) आणि पॅसिफिक महासागर हे आहे.
दक्षिण अमेरिका स्थित ग्रेट लेक्स ऑफ नॉर्थ अमेरिका आणि पॅटागोनिया सारख्या तुलनेने थोडया उष्ण वातावरणात सुद्धा Salmon माश्याच्या बऱ्याच प्रजाती अस्तित्वात आल्या आहेत. त्यानंतर आता जगातील बर्याच भागात Salmon माशाची कृत्रिम शेती केली जाते.
सामान्यतः साल्मन मासे हे “एनाड्रोमस” असतात म्हणजेच प्रवाहाच्या विरुध्द पोहणारे. सुरुवातीला हे गोड्या पाण्यातून समुद्रात थलांतर करतात आणि प्रजनन करण्यासाठी गोड्या पाण्याकडे परत जातात. आपली अंडी देण्यासाठी हे मासे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने नदीकडे पोहतात.
Table of Contents
Salmon माश्याच्या प्रजाती । salmon fish in marathi
salmon fish in marathi: साल्मन माश्यांच्या दोन प्रमुख प्रजाती आढळतात Salmo आणि Oncorhynchus. Salmo ही प्रजाती मुख्यत्वे अटलांटिक साल्मन म्हणून ओळखली जाते तर Oncorhynchus ही पॅसिफिक साल्मन म्हणून ओळखली जाते. अटलांटिक साल्मन मध्ये Salmo ही एकचं प्रजाती येते तर पॅसिफिक साल्मन मध्ये एकूण ६ उप-प्रजाती येतात याबद्दल खालील यादी पहा.
1. Salmo: Atlantic salmon
2. Pacific salmon: 1) Chinook salmon 2) Chum salmon 3) Coho salmon 4) Masu salmon 5) Pink salmon 6) Sockeye salmon
आणखी कुठल्या माश्यांना salmon fish म्हटले जाते? salmon fish in marathi
salmon fish बाबतीत आता पर्येंत बऱ्यापैकी माहिती आपल्याला झाली असेल. पण जगात आणखीही काही मासे आहेत ज्यांना साल्मन मासे म्हणून ओळखले जाते. आणि त्यातील एक भारतीय सुद्धा आहे. होय तुम्ही अगदी अचूक अंदाज लावला. चला तर मग जाणून घेऊया कि आणखी कुठल्या माश्यांना salmon fish समजले जाते.
सामान्य नाव | शास्त्रीय नाव |
Australian salmon | Arripis trutta (Forster, 1801) |
Hawaiian salmon | Elagatis bipinnulata (Quoy & Gaimard, 1825) |
Danube salmon | Hucho hucho (Linnaeus, 1758) |
Indian salmon | Eleutheronema tetradactylum (Shaw, 1804) |
salmon fish nutrition value in marathi
सामान्यतः साल्मन माश्यांपासून उच्च दर्जाचं प्रोटीन, हेल्दी गुड फॅट, आणि ओमेगा-3 फॅटी ऍसिड मिळतं. त्याचबरोबर अनेक आवश्यक विटामिन्स जसे B3, B5, B6, B12, vitamin D, vitamin E आणि मिनरल्स देखील मिळतात म्हणून हा मासा जगभरात लोकप्रिय आहे.
Salmon fish Nutrition Facts in marathi
खालील पौष्टिक माहिती USDA द्वारे (85 ग्रॅम) कच्च्या, अटलांटिक सॅल्मनसाठी प्रदान केली आहेत.
- कॅलरी: 121
- चरबी: 5.4 ग्रॅम
- सोडियम: 37.4 मीली ग्रॅम
- कार्बोहाइड्रेट: 0 ग्रॅम
- प्रोटीन: 17 ग्रॅम
- फाइबर: 0 ग्रॅम
- साखर: 0 ग्रॅम
प्रथिने
85 ग्रॅम कच्च्या अटलांटिक सॅल्मन माश्यांमध्ये 17 ग्रॅम प्रथिने असतात. कृत्रिम शेतात वाढवलेल्या सॅल्मन मध्ये चरबी जास्त असल्यामुळे, वजनात प्रोटीन किंचित कमी असते. म्हणून सॅल्मन मासा एक उच्च-गुणवत्तेच्या संपूर्ण प्रोटीनचा एक उत्कृष्ट स्त्रोत आहे जो आपल्या शरीरात आवश्यक असणारे अमीनो ऍसिड आपल्याला प्रदान करतो.
कार्ब
सॅल्मन मासा हा नैसर्गिक फायबर आणि साखरेसह कार्बोहायड्रेट्सपासून मुक्त आहे.
फॅट
85 ग्रॅम कच्च्या अटलांटिक सॅल्मन माश्यांमध्ये चरबीचे प्रमाण (good fat) 5.4 ग्रॅम असते. यापैकी यापैकी EPA आणि DHA सह सुमारे 1.5 ग्रॅम फायदेशीर ओमेगा-3 फॅटी ऍसिड असते. जे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत लाभकारक आहे.
जीवनसत्त्वे आणि खनिजे
सॅल्मन माश्यापासून व्हिटॅमिन ए आणि अनेक बी-जीवनसत्त्वे मिळतात. व्हिटॅमिन डी साठी सॅल्मन मासा हा एक चांगला स्रोत आहे. तसेच हा मासा बऱ्याच मिनरल्सच्या नैसर्गिक अन्न स्त्रोतांपैकी एक आहे. सॅल्मनमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस, जस्त आणि सेलेनियम यासह अनेक मिनरल्स देखील मोठ्या प्रमाणात असतात. याव्यतिरिक्त, सॅल्मनमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम देखील असते.
Benefits of Salmon Fish in marathi
साल्मन मासे खाल्ल्याने खालील फायदे होऊ शकतात. salmon fish in marathi
1. हृदयाच्या आरोग्यासाठी
हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्यासाठी साल्मन फिशचे फायदे घेतले जाऊ शकतात. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या मते, आठवड्यातून एकदा सॅल्मन फिश खाणे हृदयविकाराचा झटका आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांपासून बचाव करू शकतो. अश्या प्रकरणात, सॅल्मन फिश आठवड्यातून एक किंवा दोनदा सेवन केले जाऊ शकतात. पण त्याआधी डॉक्टर कडून एकदा वैद्यकीय सल्ला नक्की घ्यावा.
2. वजन कमी करण्यासाठी
वजन कमी करण्यासाठी सॅल्मन फिशचा वापर केला जाऊ शकतो. सीडीसी (सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन) च्या मते वजन कमी करण्यासाठी, कमी कॅलरीयुक्त आहारामुळे वजन नियंत्रित राहू शकते. या प्रकरणात, ग्रील्ड सॅल्मन किंवा भाजलेले साल्मन खाणे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
3. सूज कमी करण्यासाठी
सॅल्मन फिशचा उपयोग शरीरात होणार्या काही सामान्य प्रकारची सूज कमी करण्यासाठी केला जाऊ शकतो. सॅल्मन माशामध्ये ओलेगा-3 फॅटी ऍसिड आढळतो, जो दाहक-विरोधी समजला जातो. जर सूज अधिक गंभीर असेल तर वैद्यकीय उपचार घ्या.
4. केसांसाठी सॉल्मन फिशचे फायदे
केसांना निरोगी ठेवण्यासाठी साल्मन फिशचा वापर केला जाऊ शकतो. NCBI (नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फर्मेशन) च्या म्हणण्यानुसार, सालमन फिशमध्ये व्हिटॅमिन डी -3 घेणे केसांना निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
5. त्वचेसाठी सॅल्मन फिशचे फायदे salmon fish in marathi
त्वचेसाठी सॅल्मन माशांचे फायदे घेतले जाऊ शकतात. सॅल्मन फिश हा प्रथिनांचा चांगला स्रोत मानला जातो. प्रोटीनचे सेवन आपल्या स्नायू तसेच त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. अशा परिस्थितीत, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर मासे आहारात समाविष्ट केली जाऊ शकतात.
How to eat Salmon Fish in marathi
खालीलप्रमाणे सॅल्मन फिशचा वापर केला जाऊ शकतो.
कधी खावे: सॅल्मन मासे सकाळी न्याहारीत घेऊ शकता. आपण दुपारच्या जेवणात देखील सॅल्मन फिश खाऊ शकता. तसेच रात्रीच्या जेवणासाठी देखील सॅल्मन मासे खाऊ शकतो.
- साल्मन मासे तेलात तळून खाऊ शकता.
- फिश करी बनवून खाऊ शकतो.
- हे मासे वाफवून सुद्धा खाल्ले जाऊ शकतात.
- काही लोक हे मासे लिंबू पिळून कच्चे सुद्धा खातात.
- पालेभाज्यां बरोबर वाफवून खाऊ शकता.
- तव्यावर तेलात भाजून खाऊ शकता.
साल्मन माशाला मराठी भाषेत काय म्हणतात? salmon fish in marathi
आता मूळ विषयाकडे वळूया की सॅल्मन माशाला मराठी भाषेत काय म्हणतात? (salmon fish in marathi) सॅल्मन मासे हे मुळात थंड पाण्यात राहणारे मासे आहेत. भूमध्य, प्रशांत आणि अटलांटिक महासागराच्या थंड पाण्यात मुख्यतः वस्ती आहे. थोडक्यात सॅल्मन माश्याचे मूळ हे उबदार पाण्याचे नाही. आणि म्हणूनच साल्मन मासे हे भारतातील रहिवासी नसल्याने त्यासाठी विशेष असे मराठी किंवा इतर कुठल्याही भारतीय भाषेत नाव नाही.
काही लोकांना वाटत सॅल्मन मासा आणि “रावस” हे एकाच माशाचे नाव आहे. पण हे पूर्णतः खरे नाही. रावस माशाचे शास्त्रीय नाव Polynemus tetraductylus असे आहे. पण रावस माश्याला आपण भारतीय सॅल्मन (Indian salmon) म्हणू शकता. रावस माश्याला आपण सॅल्मन माशाचा लांबचा नातेवाईक समजूया जो भारतात राहतो. पण लक्षात ठेवा हे या माशाचे दोन वेगवेगळे प्रकार आहेत.
निष्कर्ष salmon fish in marathi
तर मित्रांनो आज आपण काय शिकलो? आपण हे शिकलो की सॅल्मन मासा कुठे आढळतो? सॅल्मन माश्याच शास्त्रीय नाव काय आहे? या माश्याच्या आणखी किती प्रजाती आहेत? हा मासा खायचे किती फायदे आहेत? यात काय काय पोष्ट तत्वे आहेत? आणि सॅल्मन माश्याला आपल्या मराठी भाषेत कुठल्या नावाने ओळखतात?
हे सर्व प्रश्न आणि बरीच माहिती आपण या लेखात समजून घेतली आहे. मला आशा आहे तुम्हाला माझा हा लेख (salmon fish in marathi) नक्की आवडला असेल तुमचे आणखी काही प्रश्न असतील तर नक्की कॉमेंटबॉक्स मध्ये कळवा. लेख आवडल्यास सोशल मीडियावर शेअर करा.
Disclaimer
प्रस्तुत लेखातील सूचना आणि सल्ले हे केवळ सामान्य माहितीसाठीच आहेत, यांना व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून घेतले जाऊ शकत नाही. कृपया आरोग्यविषयक कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.