गुढीपाडवा का साजरा केला जातो? माहिती आहे का?

प्रदिर्घ काळ महाराष्ट्र व आसपासच्या राज्यांवर राज्य करणारे महाराष्ट्रातील एकमेव घराणे म्हणजे "सातवाहन". आजच्या महाराष्ट्राच्या भाषा-संस्कृतीचा पाया घालणारा, तिचे वर्धन करत महाराष्ट्राची ओळख निर्माण करणारा हा राजवंश.

“तिनही समुद्रांचे पाणी चाखणारे अश्व असलेले सातवाहन” अशी सार्थ बिरुदावली त्यांनी मिरवली. साडेचारशे वर्षांच्या कालावधीत शेकडो महाराष्ट्री प्राकृतातील शिलालेख, हालाच्या “गाथा सप्तशती” सारखे नितांत सुंदर काव्यसंग्रह, वररुचीच्या “प्राकृतप्रकाश” या व्याकरण ग्रंथाने माहाराष्ट्रीला समृद्धी दिली.

गौतमीपूत्र सातकर्णी या महावीराने नहपान या शक क्षत्रपावर विजय मिळवून महाराष्ट्र व आसपासचा परिसर स्वतंत्र केला तो हा स्वातंत्र्यदिन…

संपुर्ण महाराष्ट्र आणि सातवाहनांची सत्ता असलेल्या अन्य प्रदेशांत (राज्यांत) गुढी पाडवा (gudi padwa) हा नववर्ष दिन म्हणून साजरा होतो.

आपल्या अनेक सणांमागे एक अद्भुत असा इतिहास दडलेला असतो.

गुढीपाडवा का साजरा केला जातो याबाबत सविस्तर माहिती घ्या पुढे..