19 easy weight loss tips in Marathi |हे सोपे उपाय करा व लठ्ठपणा संपवा.

weight loss tips in Marathi: आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत काही सोपे उपाय (डाएट प्लान मराठी) जे तुमचा लठ्ठपणा संपवण्यासाठी खात्रीशीर उपयोगी पडणार आहेत. weight loss करणे हा प्रकारचं मिथकांचा आहे. याला कारण आहे चुकीचे आणि भ्रमित करणारे सल्ले देणारे लोक.

परंतु, इथे वेट लॉस टिप्स इन मराठीच्या या लेखात वाढलेले वजन झटपट कसे नियंत्रणात आणता येईल याबाबत सविस्तररित्या काही easy weight loss tips in Marathi आम्ही देत आहोत. विशेष म्हणजे आम्ही तुम्हाला या लेखात उपाशी राहायला अजिबात सांगणार नाही.

खात्रीशीरपणे वजन कमी करण्यासाठी व पोटाची चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपाय तसेच वजन कमी करण्यासाठी काय खावे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा लेख शेवट पर्यंत वाचावा लागेल. चला तर मग अजिबात उशीर न करता मुद्देसूद पणे जाणून घेऊया 19 easy weight loss tips in Marathi.

1. कोमट पाणी, मध आणि लिंबू.

weight loss करण्याची सुरवातच तुम्हाला इथून करावी लागेल. वजन कमी करण्यासाठी प्रभावी उपाय म्हणून दररोज सकाळी एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा कापलेल्या लिंबाचा रस, एक चमचा मध आणि चिमूटभर काळीमिरी मिसळून प्या.

लिंबू, मध आणि काळीमिरी असलेल्या या पाण्यात वजन कमी करणारे अनेक घटक असतात. त्याच बरोबर शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास देखील मदत करतात. शिवाय पोटसुद्धा स्वछ होते.

2. नाश्ता (breakfast) चुकवू नका.

उपाशी राहिल्याने वजन कमी होणार नाही. किंबहुना नाश्ता न करणे के लठ्ठपणा वाढन्यास कारणीभूत ठरू शकत. सकाळचा नाश्ता न केल्यास तुम्हाला आवश्‍यक पोषक घटक मिळणार नाहीत जे दिवसाच्या सुरवातीलाच तुमच्या शरीराला हवे असतात.

वजन कमी करण्यासाठी सकाळचा नाश्ता (breakfast) न घेतल्यास तुम्हाला सारखी भूक लागेल. तुम्हाला चिडचिड होईल. दुपारच्या जेवणात तुमची खाण्याची इच्छा जास्त तीव्र होईल मग दुपारचे जेवण तुम्ही नेहमीपेक्षा जास्त जेवाल जे चुकीचे आहे व वजन वाढण्याचे एक प्रमुख कारण आहे.

3. उकडलेली अंडी खा.

weight loss करण्यासाठी आपल्याला आहारातून कार्बोहायड्रेडचे प्रमाण कमी करून प्रोटीन आणि गुड फॅट चे प्रमाण वाढवणे आवश्यक असते.

उकडलेली अंडी हे प्रोटीनचे सहज उपलब्ध असलेले आणि स्वस्त स्रोत आहे. दररोज सकाळी २ उकडलेली अंडी खाणे weight loss करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. नाश्त्यात अंडी घेतल्याने तुम्हाला दिवसभर भरपूर ऊर्जा सुद्धा मिळेल.

4. साखर खाणे बंद करा.

कुठलाही असा पदार्थ घरातला किंवा बाजारातला ज्यात कृत्रिमरित्या साखर ऍड केली असेल ते पदार्थ खाणे टाळा. एका निरीक्षणानुसार कृत्रिमरित्या ऍड केलेली साखर (आणि high-fructose corn syrup) याचा संबंध लठ्ठपणाच्या वाढीव जोखमीशी आहे, तसेच टाईप 2 मधुमेह आणि हृदयरोग होण्यास कारणीभूत ठरू शकते.

साखर हे वजन वाढण्याचे प्रमुख कारण आहे. दिवसभरात ३ कप साखरेचा चहा घेत असाल तर वजन वाढणे सहाजिकच आहे. चहा पिणे बंद करा त्याऐवजी फक्त कॉफी प्या तेही बिनसाखरेची(black coffee).

5. चहा नको कॉफी प्या.

कॉफीमध्ये कॅफिन असतं ज्यामुळे ताजतवानं वाटेल, कॉफी पिल्याने आळस दूर होतो त्यामुळे तुम्ही अधिक ऍक्टिव्ह राहता. coffee मध्ये कॅफिन हे घटक असतं जे तुम्हाला वजन कमी करण्यास मदत करतं.

एक काप पाणी उकडून घ्या, त्यात एक छोटे पाऊच कॉफी टाका, साखर न टाकता छान मिसळून घ्या आणि प्या. कॉफी सकाळी दिवसातून एकदाच घ्या अन्यथा रात्री झोप न येण्याचा त्रास होऊ शकतो.

6. ग्रीन टी प्या.

ज्यांना दिवसभरात बरेच कप साखरेचा चहा प्यायची सवय आहे त्यांचे वजन वाढणे स्वाभाविक आहे. साखर आपल्या शरीरात चरबी वाढवण्याचे काम करते त्यामुळे साखरेचा चहा घेणे बंदच केले पाहिजे. त्याऐवजी ग्रीन टी प्या.

कॉफीप्रमाणेच ग्रीन टीचे सुद्धा अनेक फायदे आहेत, त्यापैकी एक म्हणजे वजन कमी करणे. जरी ग्रीन-टी मध्ये कॅफीन कमी प्रमाणातअसले, तरीही त्यात कॅटेचिन नावाच्या शक्तिशाली अँटिऑक्सिडंट्स असतात जे फॅट बर्निंग वाढविण्यासाठी कॅफीनसह एकत्रितपणे कार्य करतात.

7. कमी अंतराने जेवा.

एकदाच पोट गच्च होईल असं जेऊ नका. दिवसातून ५ ते ६ वेळा खाण्याचा प्रयत्न करा पण थोडे-थोडे. दिवसा नियमित वेळी खाल्ल्याने कॅलरी जलद बर्न होण्यास मदत होते. दिवसातून ५ ते ६ वेळा थोडे-थोडे खाण्याची सवय लावल्यास तुमचे पोट एक प्रकारे फॅट बर्निंग मशीन बनते.

दिवसातून २ वेळ जेवायची सवय असल्यामुळे आपल्याला जेवणावेळी खूप भूक लागल्यामुळे एकत्र अधिक अन्न खाल्ल्या जाते म्हणजेच अधिक कॅलरी, ह्याच कॅलरीचं रूपांतर वाढत्या चरबीमध्ये होतं. आणि ही चरबी लठ्ठपणाचं कारण ठरते.

8. जेवणाआधी सलाद खा.

आपल्या भारतीय लोकांची जेवण बनवायची पद्धत अशी आहे कि, आपण कुठलाही पदार्थ अति प्रमाणात शिजवून खातो जरी तशी खाण्याची गरज नसते तरीही. आपल्याला जेवणात व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सपेक्षा भाजीची चव मह्त्वाची असते.

आपण नेहमी पाहतो विदेशी लोक त्यांच्या दैनंदिन आहारात कच्या भाज्यांचा समावेश करतात. त्यांच्या सळपातळ शरीरयष्टीमागचे हे सुद्धा एक कारण आहे. ज्या भाज्या शिजवून खायची गरज नाही त्या कच्च्याच खाल्ल्या पाहिजे.

जेवणाआधी काकडी, गाजर, टोमॅटो, कांदा, बीट हे सलाद भरपूर प्रमाणात खाल्लं पाहिजे यातून आपल्या शरीराला मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स मिळतात शिवाय जेवणाआधी सॅलड खाल्ल्याने भूक ही कमी होते आणि वजन कमी करण्यास मदत होते.

9. तळलेले, भाजलेले पदार्थ खाणे टाळा.

तेलात तळलेले पदार्थ खाणे हे एक वजन वाढण्याचे प्रमुख कारण असू शकते. बाजारात मिळणारे चटपटीत, मसालेदार तळलेले किंवा भाजलेले पदार्थ खाण्याचे तर गंभीर आरोग्याविषयी परिणाम उद्भवू शकतात. पॅकेड फूड विकत घेण्याआधी त्यामागे दर्शविलेला तक्ता पहा.

बाजारात मिळणारे विविध प्रकारचे वेफर्स आणि चटपटीत पदार्थ तुम्हाला लठ्ठ बनविण्यास कारणीभूत ठरतात. त्यामुळे असे पदार्थ विकत घेणे व खाणे टाळले पाहिजे. एक लक्षात ठेवा स्वतःचे पैसे खर्च करून तुम्ही फक्त चरबी विकत घेत आहात.

10. भरपूर पाणी प्या.

दिवसभरात ३ ते ४ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. ठराविक वेळेच्या अंतराने पाणी पिल्यास आपली पाचनसंस्था सुरळीत राहते. आवश्यकतेनुसार पाणी पिण्याचा फायदा हा आहे की, पाण्यात कॅलोरीज नसतात.

एक ग्लास पाणी प्याल्याने तुम्ही काही काळ भूक नियंत्रित देखील करू शकता. नियमित पाणी पिल्याने आपली बॉडी डिहायड्रेड होण्यापासून वाचते. भरपूर पाणी पिल्याने आपली त्वचा सुद्धा तजलेदार राहण्यास मदत होते.

11. लहान प्लेट्स वापरा.

एका संशोधनातून असा निष्कर्ष समोर आला की, जेवण करतांना लहान प्लेट्सचा वापर केल्यामुळे खूप खाल्ल्याचा भास होतो किंवा, नेहमीपेक्षा कमी जेवल्यावर सुद्धा पोटभर खाल्ल्याचं समाधान मिळतं. त्यामुळे ज्यांना वजन कमी करण्याची इच्छा आहे त्यांनी जेवताना नेहमी लहान प्लेट्सचा वापर करावा.

12. उच्च फायबरयुक्त पदार्थ खा.

भरपूर फायबर असलेले अन्न तुम्हाला पोट भरलेलं ठेवण्यास मदत करू शकतात, जे वजन कमी करण्यासाठी अगदी योग्य आहे. आपण आहारात फायबर कोणत्या माध्यमातून घेऊ शकतो याची यादी पुढे पहा.

 1. फळे
 2. हिरव्या भाज्या
 3. ब्राऊन राइस
 4. ओट्स
 5. सुकामेवा

13. दारू कमी करा.

एका ग्लास वाइनमध्ये बर्फीच्या तुकड्याइतक्या कॅलरीज असू शकतात. जास्त मद्यपान केल्याने वजन वाढण्यास सहज हातभार लागतो. दारू पिल्यावर तुम्ही जेवणाच्या ताटावर आडवा हात मारण्याची जास्त शक्यता असते.

अर्थातच मद्यपान केल्याने आपण जास्त प्रमाणात कॅलरीज घेतो जे पुढे जाऊन लठ्ठपणाला कारणीभूत ठरू शकतात. वजन कमी करायचे असल्यास तुम्हाला मद्यपानावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.

14. जंक फूड आणि कोल्ड्रिंक्स बंद करा.

जंक फूड आणि कोल्ड्रिंक्स मध्ये अति प्रमाणात बॅड-फॅट आणि साखर असते. जंक फूड खाल्ल्यानंतर शेवटी त्याचे रूपांतर चरबीमध्येच होते.

शिवाय जंक फूड हे आरोग्यासाठी घातक असतात खासकरून हृदयासाठी. त्यामुळे आपल्याला जर लठ्ठपणा घालवायचा असेल तर जंक फूड आणि कोल्ड्रिंग्स सेवन करणे नियंत्रित करावे लागेल.

15. cheat day साजरा करा.

वजन कमी करत असतांना स्वतःवर आपण काही निर्बंध घातलेले असतात. आपण आपल्या आवडीचे अनेक पदार्थ आपल्या आहारातून काढून टाकलेले असतात.

आपण आपल्या आवडीचे पदार्थ खात नसल्यामुळे सुरुवातीला चिडचिड होणे स्वाभाविक आहे. त्यामुळे आपण वजन कमी करण्याचा निश्चय सोडून देऊ शकतो.

हे टाळण्यासाठी आठवड्यातून एक वार निवडा आणि तुमच्या आवडीचे जे काही पदार्थ आहेत ते मनसोक्त खा, पण प्रमाणात. असे केल्याने तुम्हाला भावनिक समाधान मिळेल. शिवाय अतिरिक्त ऊर्जा मिळेल व तुमचा वजन कमी करण्याचा निश्चय ढळणार नाही.

16. हळूहळू जेवा.

जेवतांना घाई करू नका. अगदी प्रत्येक घासाचा आस्वाद घ्या. नीट चावून खा. तुमच्या मेंदूला तुम्ही पुरेसे अन्न खाल्ल्याची नोंद करण्यास थोडा वेळ लागू शकतो. त्यामुळे सावकाश जेवा.

काही अभ्यासातून असे दिसून आले आहे की अन्न अधिक हळू चघळल्याने तुम्हाला कमी कॅलरीज खाण्यास मदत होते आणि वजन कमी करण्याशी संबंधित हार्मोन्सचे उत्पादन वाढू शकते.

17. हे पांढरे पदार्थ खाऊ नका.

 1. साखर
 2. मैदा (ब्रेड/पाव)
 3. आईसक्रीम
 4. बटर
 5. सोडा वॉटर
 6. भात (प्रमाणात)

18. सतत Active राहा.

तुम्ही जिममध्ये जाऊ शकत नसाल, रनिंग किंवा सायकलिंग करू शकत नसाल, तर घरच्या घरी सतत Active राहण्याचा प्रयत्न करा. स्वतःची कामे स्वतः करा.

आपल्या कामासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहू नका. हात आणि पायांचा शक्य तितका जास्त वापर करा. सतत Active राहिल्यास तुमच्या शरीराती अतिरिक्त कॅलरीज म्हणजे ऊर्जा खर्च होईल. वजन कमी करण्यासाठी हे तुम्हाला १००% उपयोगी ठरेल.

हे ही वाचा:

19. भरपूर झोप घ्या.

वजन कमी करण्यासाठी सकस आहार घेणे व व्यायाम कारण्याइतकेच भरपूर झोप घेणे हे ही महत्वाचे आहे.

अभ्यास दर्शविते की कमी झोप हे वजन वाढण्यासाठी सर्वात महत्वाच्या घटकांपैकी एक आहे,कमी झोप घेण्यामुळे मुलांमध्ये 89% आणि प्रौढांमध्ये 55% हे कारण वजन वाढण्याशी संबंधित आहे.

वजन कमी करत असतांना ८ ते ९ तास झोप घेण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी आपला दिवस लवकर सुरु करा आणि दैनंदिन कामे रात्री उशिरा पर्येंत करणे टाळा. हा वजन कमी करण्याचा एक खात्रीशीर उपाय आहे.

व्यायाम न करताही वजन कमी होऊ शकतं का?

निष्कर्ष

वर सांगितलेले 19 easy weight loss tips in Marathi हे उपाय हे वजन कमी करण्यासाठी खात्रीशीर आहेत. वेट लॉस टिप्स इन मराठीच्या या लेखात तुम्ही तुमचे वाढलेले वजन झटपट कमी करू शकता.

या वरील weight loss tips in Marathi चा वापर वजन कमी करतांना नक्की करा. मला आशा आहे तुम्ही तुमचे वाढलेले वजन निश्चितच नियंत्रित करू शकता. वजन कमी करण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा.

Disclaimer

प्रस्तुत लेखातील सूचना आणि सल्ले हे केवळ सामान्य माहितीसाठीच आहेत, यांना व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून घेतले जाऊ शकत नाही. कृपया आरोग्यविषयक कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Share on:

Leave a Comment